मिपावर फुटबॉल विश्वचषकाचा धागा किंवा त्यावर चर्चाही कशी नाही याचे आश्चर्य वाटले त्यामुळे आपणच त्याविषयी धागा काढू असा विचार केला.
अपेक्षेप्रमाणे गट फेरीत त्या त्या गटातील बलाढ्य संघांनी विजय मिळवला पण आज अनपेक्षितरित्या मेस्सीच्या अर्जेन्टिनाला दुबळ्या सौदी अरेबियाने २-१ असा झटका दिला. मात्र त्यांच्या गटातील इतर दोन संघ मेक्सिको आणि पोलंड असल्याने त्यांना हरवण्यास अर्जेन्टिनाला फारशी अडचण येणार नाही असे वाटते.
विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार)
गट फेरी
20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम -
21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 अल थुमामा स्टेडियम
22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, पहाटे 12.30, अल रेयान स्टेडियम
22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30 स्टेडियम 974
23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम
23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहाटे 12.30, अल जानोब स्टेडियम
23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 अल थुमामा स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 अल बायत स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, पहाटे 12.30 अल रेयान स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 अल जानोब स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974
25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम
25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 अल थुमामा स्टेडियम
25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, पहाटे 12:30, अल बायत स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974
27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको पहाटे12:30 लुसेल स्टेडियम
27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम
27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम
27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, पहाटे 12.30, अल बायत स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974
29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए पहाटे 12:30 अल थुमामा स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, पहाटे 12:30, अल रेयान स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 अल जानूब स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, पहाटे12:30 , Stadion 974
1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 लुसेल स्टेडियम
1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 अल थुमामा स्टेडियम
1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन पहाटे 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड पहाटे 12:30 स्टेडियन 974
बाद फेरी- १६ सामने (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता
4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D पहाटे 12:30 अल रेयान स्टेडियम
4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम
5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम
5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम
6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H पहाटे 12:30 उशीरा, स्टेडियन 974
6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम
11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम
उपांत्य फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
14 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30 , अल बेयट स्टेडियम
15 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30, लुसेल स्टेडियम
तिसरे स्थान सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
अंतिम सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम
प्रतिक्रिया
22 Nov 2022 - 7:04 pm | कर्नलतपस्वी
भारतात चेंडू फळीचा खेळ जास्त आवडीचा. फुटबाॅल गोवा,बंगाल व सात बहिणींच्या प्रदेशात खुपच खेळला जातो.
पावसाळ्यात चिखलात ल्या फुटबॉल ची मजाच काही वेगळी.
सैन्यात फुटबॉल या खेळाला खुपच प्राधान्य आहे. क्रिकेट च्या तुलनेत इतर मैदानी खेळांना सरकारकडून हवे तेव्हढे प्रोत्साहन मिळत नसल्याचे वाटते.
एआईएफएफ चे निदेशक रेफरी कर्नल गौतम कार (सेवानिवृत्त) माझ्याच केडरचे वरीष्ठ व पारीवारीक घनिष्ठ मित्र आहेत.
माझा पुतण्या जिम्नॅस्टिक्स व ऐरोबिक्सचा अतंरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री आहे त्याचे पण मत आहे की हवा तेवढा प्रतीसाद ऐनव्हायरमेन्ट कडून मिळत नाही.
समय सारीणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. बघू बिग बाॅस मधून वेळ किती मिळेल.
बा द वे मी बिग बाॅस अजीबात बघत नाही.
22 Nov 2022 - 7:27 pm | कपिलमुनी
आज अर्जेंटिना ला सौदी अरेबिया चया आयात टीम ने झटका दिला
22 Nov 2022 - 7:48 pm | प्रचेतस
अगदी, शेवटी मेस्सीचा चेहरा पाहवत नव्हता.
22 Nov 2022 - 8:55 pm | कर्नलतपस्वी
कदाचीत साऊदीला अर्जेंटीनाने हलके घेतले.
डेन्मार्क चांगला खेळला पण ट्युनिसीया चा गोलीने चांगले खेळत दोन गोल वाचवले.
डेन्मार्क टीमवर्क चांगले होते. सुरक्षात्मक खेळी.
22 Nov 2022 - 7:41 pm | श्रीगुरुजी
कोणत्या वाहिनीवर हे सामने दाखवितात?
22 Nov 2022 - 7:50 pm | प्रचेतस
स्पोर्ट्स 18 एचडी 1 आणि स्पोर्ट्स 18 1आणि ओटीटी वर पाहायची असल्यास जिओ सिनेमा. पण फूटबॉल मॅच कधीही ओटीटीवर पाहू नये असे मत, बँडविड्थ कितीही असली तरी लॅग जाणवतोच.
22 Nov 2022 - 7:59 pm | श्रीगुरुजी
स्पोर्ट्स १८ टाटा स्कायवर आहे का शोधतो. बहुतेक नसावे.
22 Nov 2022 - 8:11 pm | प्रचेतस
चॅनेल नवीन आहे पण टाटावरही आहे असे दिसते.
22 Nov 2022 - 8:24 pm | श्रीगुरुजी
धन्यवाद! लगेच घेऊन टाकतो.
22 Nov 2022 - 10:22 pm | श्रीगुरुजी
टाटा स्कायवर वाहिनी क्र. ४८७ Sports 18 - HD साठी आहे. तगेच घेतली.
22 Nov 2022 - 9:58 pm | कंजूस
मराठीत टंकली वाटतं!
---------
डिशटिवीवर आहे आणि पॅकेजमध्ये नसला तरी फ्रि दाखवत आहेत.
_____________
१)Jiocinema (android)app डाऊनलोड करा.
२) कुणा जिओनंबरवरून ओटीपी टाकून app open करा.
३) आता जिओ सिम नसले तरी एरटेल किंवा वाईफाईवर चालू राहील.
४) sports 18 -1 वर पाहा फिफा.
----------------
अर्जेंटिना ओफसाईड गोल बाद झाले ते कळले नाही. सौदीचे (ksa?) दोन्ही गोल सुरेख होते.
23 Nov 2022 - 6:00 am | प्रचेतस
जियोसिनेमा app फसलेले आहे, बफरिंग होत नाही, लॅग प्रचंड येतोय. स्पोर्ट्स 18 वर पाहणे उत्तम.
23 Nov 2022 - 6:30 am | कर्नलतपस्वी
इसको लगा डाला तो लाईफ झिंगालाला.
23 Nov 2022 - 8:28 am | कंजूस
एरटेलच्या डेटावर वापरतोय.
23 Nov 2022 - 6:14 am | कर्नलतपस्वी
हायलाइटस,
कतार इक्वाडोर मॅच मस्त होता. इक्वाडोर पुर्ण खेळात वरचढ होता. लाँग पास आणी हेड सुपर्ब गोल.
इंग्लंड इराण, इराण कमजोर टिम वाटली. इंग्लंडने सहा गोल करत आपले वर्चस्व कायम ठेवले.
23 Nov 2022 - 7:00 am | प्रचेतस
इराणसारख्या कमजोर संघानेही इंग्लंडवर दोन गोल लादले हे इंग्लंडला नक्कीच सलत असेल. फ्रान्सने काल 4 गोल केले
23 Nov 2022 - 12:21 pm | मोहन
अर्जेंटीनाचे दोन ऑफ साईड गोल ऑफ साईड नव्हते का? मला तरी खूपच हार्श निर्णय वाटले , दोन्ही.
23 Nov 2022 - 12:44 pm | प्रचेतस
एका गोलमध्ये मेस्सीची ऑफसाईड होती पण त्याच्याकडे थेट पास नव्हता आणि गोल करण्यातही त्याचा सहभाग नव्हता, फिफा नियम काय आहेत ते बघावे लागेल याबाबतीत.
23 Nov 2022 - 1:32 pm | कर्नलतपस्वी
Technology made it possible to monitor every action, movement in details and an effectivetool to pass correct judgment. म्हणून कधी कधी आपल्याला रेफ्री चा निर्णय चुकीचा वाटू शकतो.
ऑफसाइड नियमांबद्दलचा एक चांगला व्हीडीओ.
https://youtu.be/GePlbCsGniA
23 Nov 2022 - 3:46 pm | कंजूस
ते पेनल्टी किक निर्णय कंटाळवाणे आणि फसवेगिरी वाटते.
23 Nov 2022 - 7:39 pm | तुषार काळभोर
सौदी विरुद्ध अर्जेंटिना लैच धक्कादायक निकाल होता.
अवांतर : बाय द वे, नव्वदीच्या दशकात ८ आणि १६ बिट्स कन्सोलमुळे जगात उरुग्वे आणि पराग्वे असे दोन देश आहेत. इतकेच नव्हे तर ते फुटबॉल मधील नावाजलेले संघ आहेत अशी माहिती झालेली. पण १९९८ (रिकी मार्टिनच्या कप ऑफ लाईफ गाण्यामुळे उगाचच माहिती झालेला) वर्ल्डकपपासून पाहून आणि वाचून माहिती घेताना हे देश कुठेच नसायचे. २०१०-२०१२ ची दोनतीन वर्षे सोडली तर उरुग्वे प्राथमिक फेरीतच बाद व्हायचा. पराग्वेचं तर नावही नसायचं. आश्चर्य वाटायचं.
23 Nov 2022 - 8:05 pm | श्रीगुरुजी
उरूग्वेने दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे.
23 Nov 2022 - 8:56 pm | प्रचेतस
पराग्वेचं आधी खूप नाव असायचं पण हल्ली फक्त कोपा अमेरिका स्पर्धेतच खेळताना दिसतात.
23 Nov 2022 - 8:07 pm | श्रीगुरुजी
जर्मनी-जपान
आतापर्यंत १-१
23 Nov 2022 - 8:20 pm | श्रीगुरुजी
जपान २-१ पुढे. फक्त २ मिनिटे आहेत.
23 Nov 2022 - 8:57 pm | प्रचेतस
जर्मनीची मॅच बघायची होती खरं पण ऑफिसातून घरी यायला उशीर झाल्याने मिसलो.
24 Nov 2022 - 4:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भावा, कोंच्या च्यानलवर चालू आहेत या मॅचेस ? लिंक प्लीज.
-दिलीप बिरुटे
24 Nov 2022 - 5:09 pm | प्रचेतस
स्पोर्ट्स 18 एचडी
24 Nov 2022 - 5:10 pm | कर्नलतपस्वी
बिरूटे सर चॅनेल नबंर 487,488- 18 स्पोर्ट्स .
24 Nov 2022 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जिओ सिनेमावर मोबाईलवर बघण्यासाठी आणि स्पोर्ट्स १८ वर आहेच. उरुग्वे आणि कोरियाचा सामना बघतोय. धन्यवाद
-दिलीप बिरुटे
24 Nov 2022 - 7:11 pm | प्रचेतस
सामना लैच रटाळ चाललाय, काहीच मजा नै येऊन राह्यली.
24 Nov 2022 - 8:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
द.कोरियाकडून भारी आहे, पासेस. वगैरे . पण फोकलीच्याकडून गोल काही होईना...दोघांनाही चांगल्या संधी होत्या. शेवटचे दहा मिनिट.
-दिलीप बिरुटे
24 Nov 2022 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोर्तुगाल वि घाना हा सामना रंगतदार होऊन अप्रतिम गोल बघायला मिळावेत.
-दिलीप बिरुटे
24 Nov 2022 - 11:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोघाही संघाचा धुसमूसळेपणाचा खेळ सुरु आहे. खरं खोटं यात रोनाल्डोला अडवल्यामुळे ६४ व्या मिनिटाला पेनल्टी किक वर गोल केला तर प्रतिसाद लिहीपर्यन्त ७३ व्या मिनिटाला घानाने गोल केला.
१-१ मजा येतेय.
दिलीप बिरुटे
24 Nov 2022 - 11:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
७७ व्या आणि ८० व्या मिनिटाला पोर्तुगल चे दोन अप्रतिम गोल.
०३- ०१ जबरा सामना.
24 Nov 2022 - 11:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पोर्तुगल ०३ घाना ०२.
शेवटचे काही क्षण बाकी असतांना पोर्तुगलच्या गोल कीपरकडून बॉल हिस्कावून गोलपोष्ट मधे घालण्याची संधी घानाने घालवली.
-दिलीप बिरुटे
25 Nov 2022 - 3:14 am | कपिलमुनी
कीपर च्या मागे उभे राहून बॉल घ्यायची चाल अफलातून होती..
घसरल्याने यशस्वी झाली नाही.
घाना मस्त खेळले
25 Nov 2022 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब्राझील वि. सार्बियाचाही सामना भन्नाट झाला. ब्राझीलने अजिबात कुठेच संधी दिली नाही. ०२-० ने सार्बिया हरले. पण आवडलेला गोल.
-दिलीप बिरुटे
25 Nov 2022 - 12:08 pm | मोहन
अफलातून गोल होता. माझ्या मते आत्ता पर्यंतचा टुर्नामेंट मधला मी पहिलेला सर्वोत्तम गोल आहे.
26 Nov 2022 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालचे सामने रटाळ झाले. आज वेळ मिळाला की फॉलो करेनच. साला लै वेळ जातो.
-दिलीप बिरुटे
26 Nov 2022 - 11:17 am | कंजूस
ही एक पळवाट नियम बरोबर वाटत नाही.
26 Nov 2022 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. काल गोल झालेले दिलेले नाही.
-दिलीप बिरुटे
26 Nov 2022 - 11:39 am | प्रचेतस
नियम योग्य आहे नाहीतर दुसऱ्यांच्या गोलक्षेत्रात प्रतिस्पर्धी खेळाडू मागेच उभे राहून सहज गोल करत बसतील.
26 Nov 2022 - 12:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
घानाचा खेळाडु अगदी गोलकिपरच्या मागे लपून बसला होता. ब्राझीलच्या गोलकिपरने जमीनीवर बॉल ठेवला (यल्लो जर्सी) आणि घानाचा पठ्ठ्या ( पांढरी जर्सी) मागून पळत येत होता आणि नेमका बॉल हिसकावून घ्यायच्या वेळी घसरुन पडला. नाय तर गोल शंभर टक्के होता.
-दिलीप बिरुटे
26 Nov 2022 - 12:41 pm | प्रचेतस
ऑफसाईड
26 Nov 2022 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुव्याबद्दल आभार्स. पण, पास देण्यापूर्वी खेळाडु तिकडे असेल तर ऑफसाईड. पण, पास देऊन तिकडेच खेळ सुरु असेल तर
वरील छायाचित्रात पास देऊन बॉल तिकडे आलेला . बॉल क्लियर केला म्हणून वाचला नाय तर गोल दिला असता. ( असे वाटते)
-दिलीप बिरुटे
(गोलकिपर )
26 Nov 2022 - 12:51 pm | प्रचेतस
हं.. तो सामना पाहिला नसल्याने नेमकं काय झालंय ते सांगू शकत नै. गोल क्लिप असेल तर टाका भो.
26 Nov 2022 - 12:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या धाग्यात माझ्या आयुष्यातला फार मौल्यवान वेळ वाया चालला.
हं हा घ्या दुवा. आणि २ मिनिट आणि १२ व्या सेकंदाचा प्रसंग बघा आणि सांगा.
आणि आपलं जे मत असेल ते मान्य. विषय संपला.
-दिलीप बिरुटे
26 Nov 2022 - 2:22 pm | प्रचेतस
ही ऑफसाईड वाटत नाही कारण चेंडूचा ताबा गोलरक्षकाकडे होता, पण तो किक मारत असताना त्याच्या मागे प्रतिस्पर्धी खेळाडू उभा राहणे लीगल आहे का ह्या बाबत कल्पना नाही, तुम्हाला माहिती मिळाल्यास येथे अवश्य द्या.
29 Nov 2022 - 10:50 am | सागर
मी स्वतः फुटबॉल खेळलेलो असल्यामुळे हे सांगू शकतो
नियमाप्रमाणे ही ऑफ साईड होऊ शकत नाही
ही गोल किपर ची जबाबदारी असते की बॉल चा ताबा सोडताना प्रतिस्पर्धी खेळाडू जवळ आहे की नाही हे पाहणे.
गोल झाला असता तर नियमा नुसार गोल दिला गेला असता.
पाय घसरला आणि पोर्तुगाल वाचले अन्यथा बरोबरीत सामना सुटल्याचे दु:ख भोगावे लागले असते
26 Nov 2022 - 8:40 pm | श्रीगुरुजी
पोलंडने सौदी अरेबियाला २-० हरविले. आता त्या गटात पोलंड ४, सौदी अरेबिया ३, मेक्सिको १ व अर्जेंटिना ० अशी गुणसंख्या आहे. अर्जेंटिनाला बाद फेरीत जाण्यासाठी पोलंड व मेक्सिको विरूध्दचे सामने जिंकावेच लागतील.
27 Nov 2022 - 8:49 am | श्रीगुरुजी
अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-० असा पराभव केल्याने आपले आव्हान टिकविले आहे. आता पोलंड-अर्जेंटिना व सौदी अरेबिया - मेक्सिको हे या गटातील सामने शिल्लक आहेत. तांत्रिकदृष्ट्या चारही संघांना संधी आहे.
1 Dec 2022 - 9:41 am | श्रीगुरुजी
उपउपांत्यपूर्व फेरीचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले आहे.
नेदरलँड्स, सेनेगल, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, पोलंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल व ब्राझील या १० देशांनी बाद फेरीत प्रवेश केलाय.
पहिल्या सामन्यात सौदी अरेबिराकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतरही मेक्सिको व पोलंडला हरवून अर्जेंटिनाने मुसंडी मारली.
ई गटात स्पेन (४), जपान (३), कोस्टारिका (३) व जर्मनी (१) यांच्यात खूप चुरस आहे. जर्मनीने कोस्टारिकाला व स्पेनने जपानला हरविले तल स्पेन व जर्मनी बाद फेरीत जातील.
2 Dec 2022 - 5:51 am | प्रचेतस
जर्मनीने कॉस्टिरिकाला ४-२ ने हरवले मात्र स्पेन जपानविरुद्ध पराभूत झाल्याने जर्मनी विश्वचषकातून बाहेर पडली.
2 Dec 2022 - 8:40 am | श्रीगुरुजी
अरेरे. जर्मनी नाही हे पाहणे दु:खदायक आहे. यावेळी बेल्जियमबद्दल बरेच जण आशेवर होते. पण बेल्जियम सुद्धा बाहेर पडले.
स्पेन, मोरोक्को, जपान व क्रोएशिया बाद फेरीत आलेत. आता घाना, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड व कॅमेरून यापैकी दोन संघ बाद फेरीत येतील. सर्बिया व उरूग्वे यांना सुद्धा संधी आहे.
2 Dec 2022 - 9:07 am | प्रचेतस
जर्मनी मागील विश्वचषकातसुद्धा प्राथमिक फेरीतच आटोपले होते. २०१४ नंतर त्यांची अधोगतीच होत आहे.
2 Dec 2022 - 9:46 am | कपिलमुनी
जर्मनी मध्ये गुणवत्ता आहे पण संघ भावना किंवा एकत्र प्रॅक्टीस कमी आहे असा वाटला.
काल फिनिशिंग करता आले नाही. . क्रॉस पासेस ला रिसिव्ह करायला कोणी नव्हते . काहीजण तर पास न करता ग्लोरी शॉट्स मारत होते..
अन्यथा काल गोल डिफ्रन्स सहज भरून निघाला असता.
2 Dec 2022 - 7:46 pm | कंजूस
सुंदर खेळ.
3 Dec 2022 - 9:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या हापमधे नेदरलँड ०२ तर युएसए ००
-दिलीप बिरुटे
(व्यस्त)
3 Dec 2022 - 11:34 pm | श्रीगुरुजी
नेदरलँड्सने अमेरिकेला ३-१ असे हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज दुसरा सामना अर्जेंटिना व ऑस्ट्रेलिया यांच्यात आहे. सामना मध्यरात्री १२:३० ला सुरू होणार असल्याने बघणे अवघड आहे.
9 Dec 2022 - 10:50 pm | श्रीगुरुजी
उपांत्यपूर्व फेरी पहिला सामना -
ब्राझील १ - क्रोएशिया ०.
पहिली ९० मिनिटे ०-०. अतिरिक्त ३० मिनिटातील १३ व्या मिनिटाला नेमारने प्रैक्षणीय गोल केला.
9 Dec 2022 - 11:01 pm | श्रीगुरुजी
१-१
पेनल्टी शूटआऊट मध्ये जाणार बहुतेक.
9 Dec 2022 - 11:08 pm | श्रीगुरुजी
अतिरिक्त वेळातही १-१ बरोबरी.
आता पेनल्टी शूटआऊट.
9 Dec 2022 - 11:18 pm | प्रचेतस
दबावात येऊन ब्राझीलने पेनल्टी दवडल्या, स्पर्धेतून बाहेर.
9 Dec 2022 - 11:19 pm | श्रीगुरुजी
क्रोएशिया जिंकले (४-२)
9 Dec 2022 - 11:42 pm | श्रीगुरुजी
नेमारची शेवटची विश्वचषक स्पर्धा?
पोर्तुगाल- मोरोक्को आणि इंग्लंड-फ्रान्स सामने उद्या आहेत.
आज अजून ४५ मिनिटांनंतर अर्जेंटिना-नेदरलँड्स हा दुसरा सामना आहे.
10 Dec 2022 - 7:59 am | श्रीगुरुजी
पूर्ण वेळात आणि अतिरिक्त वेळात २-२ बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊट मध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सला ४-३ असे पराभूत केले.
आता हे सामने गोलकीपर्सचे होत आहेत.
10 Dec 2022 - 2:52 pm | तुषार काळभोर
आता ब्राझील बाहेर. दोन दिग्गज बाहेर पडलेत.
उपांत्य फेरीसाठी शक्यता कोणत्या वाटतात?
10 Dec 2022 - 10:33 pm | कंजूस
रोनाल्डिनोचा संघ परत
10 Dec 2022 - 11:22 pm | श्रीगुरुजी
स्पेन, जर्मनी, बेल्जियम, ब्राझील पाठोपाठ पोर्तुगाल बाहेर.
उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश.
11 Dec 2022 - 6:33 am | प्रचेतस
इंग्लड फ्रान्स लढत जोरदार झाली. फ्रान्स २-१ ने विजयी, इंग्लंडने शेवटी एक पेनल्टी किक दवडली अन्यथा खेळ अतिरिक्त वेळेत जाऊ शकला असता.
आता अर्जेंटिना विरुद्ध कोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को अशा उपांत्य फेरीच्या लढती होतील.
15 Dec 2022 - 6:21 am | कंजूस
Kane Ableझाला नाही.
14 Dec 2022 - 2:31 pm | चांदणे संदीप
फुटबॉल वर्ल्ड कपचा धागा आत्ता पाहिला. असो, सगळे सामने हायलाईट्स मध्ये पाहिले.
फक्त काल रात्री माझ्या आवडत्या मेस्सीसाठी जागल्याचे सार्थक झाले. पेनल्टी घेताना माझा बीपी हाय झालेला. शेवटचा असीस्ट तर क्लासच.
अर्जेंटिना हा वर्ल्ड कप जिंकू दे रे देवा!
सं - दी - प
14 Dec 2022 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेनल्टी किक आणि दुस-या हाफ मधे बॉल स्वतःकडे ठेवत गोल साठी दिलेला अफलातून पास. अहाहा.
फुटबॉलमधे यापेक्षा अजून कोणता सुखाचा क्षण असूच शकत नाही. काय नजाकत, अहाहा.
मेस्सी जब्रा रे भावा असाच खेळत राहा.
-दिलीप बिरुटे
14 Dec 2022 - 6:10 pm | राघव
अगदी..!! रात्री जागल्याचे सार्थक झाले हे खरे! अफलातून असिस्ट!!
अल्वारेजचा आधीचा गोल सुद्धा मस्त होता! मजा आली!
अवांतरः
भारत कधी फिफा वर्ल्ड कप खेळणार कल्पना नाही. पण एकदा का होईना भारतीय फुटबॉल टीमसाठी वर्ल्ड कप मधे चीअर करायची ईच्छा आहे! :-)
14 Dec 2022 - 8:49 pm | कंजूस
छाती फुटेपर्यंत?
15 Dec 2022 - 6:05 pm | राघव
माझ्या मते स्टॅमिना, फिटनेस आणि स्ट्रेन्ग्थ यात आपण सहज कव्हर करू शकतो.
गरज आहे ती फुटबॉल कल्चरची. आणि मोकळ्या अन् जरा मऊ ग्राऊंड्सची.
प्रत्येक राज्यातून एक मोठा क्लब तयार झाला तर त्यातून चांगला बेस बनेल. नव्हे ISL मुळे ते काही प्रमाणात सुरू झालेलेच आहे.
पण या क्लब्स च्या मागे एक पॅशन गरजेची असते. लोकांना तो क्लब आपला वाटला पाहिजे. तर ते चक्र फिरायला लागते! :-)
15 Dec 2022 - 12:12 am | कपिलमुनी
कतार प्रमाणे आपण ही यजमानपद मिळवले तर भारत खेळेल..
अदानी अंबानी सारखे श्रीमंत लोक असताना हे शक्य आहे फक्त त्यांना यात आर्थिक फायदा दिसायला हवा.
14 Dec 2022 - 8:25 pm | कंजूस
अल जंजिरा चानेलवर मालिका आहे.त्यातील मोरोक्को साठी
https://youtu.be/RpW45bgoc9s
15 Dec 2022 - 3:00 am | कंजूस
चांगले खेळले. केळ उत्कंठावर्धक झाला.
15 Dec 2022 - 5:45 am | प्रचेतस
फ्रान्स मोरोक्कोच्या तुलनेत खूपच जास्त ताकतवान संघ आहे.
15 Dec 2022 - 6:19 am | कंजूस
चांगल्या खेळाडूंसह सराव, स्पर्धा करायला मिळाली की खेळ सुधारण्याची शक्यता वाढते. आपल्या चालींना प्रतिस्पर्धी कसा विरोध करतो हे आजमावता येते. ते १४-१९ वयात मिळायला हवे. उशीर झाला तर शिकता येते पण शारिरीक चपळपणा तोपर्यंत जातो. (चांगल्या खेळाडूंशी खेळून बुद्धिबळात सुधारणा फारशी होईल ही शक्यता नसते. ती एक जात्याच कुवत असते आणि ती एका मर्यादेला गोठते.)
१)बॉल पायांत खेळवत पुढे नेण्याची कला यात ब्राझील आणि अर्जेंटिनाचे खेळाडू तरबेज,निष्णात आहेत. शिवाय
२)मी'च गोल करणार यापेक्षा 'आपला' गोल झाला पाहिजे हे ध्यानात ठेवणारे संघ यश मिळवतात.
(माझे मत)
15 Dec 2022 - 10:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक आणि दोनशी सहमती आहेच.
-दिलीप बिरुटे
17 Dec 2022 - 1:14 pm | Bhakti
२०१४ ला पाहिलेली फायनल आजही आठवतेय.मेस्सी हरला होता . यावेळी जिंकलाच पाहिजे.
फायनल-अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स.
17 Dec 2022 - 1:29 pm | श्रीगुरुजी
अर्जेंटिना जिंकणार असे माझे भाकीत आहे.
18 Dec 2022 - 11:29 pm | श्रीगुरुजी
भाकीत सत्य जाहले.
18 Dec 2022 - 3:48 am | कंजूस
क्रोएशिया जिंकली. असंही साइडिंगचा सामना मग दोन्ही संघांकडून बऱ्याच खेळाडूंना बदलून संधी दिली.
18 Dec 2022 - 5:45 am | प्रचेतस
तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवला जाणारा सामना निरर्थक आहे असे वाटते.
18 Dec 2022 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपलं मत फिफाला मेल करुन पाठवतो. इतक्या दिवस त्यांच्या हे लक्षात आलं नसावं.
आता, ते लक्ष घालतील अशी अपेक्षा करुया. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 11:33 am | कंजूस
एक ए ग्रेडचा सामना खेळायला मिळणे हे नवीन संघासाठी हवेच असते.
18 Dec 2022 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आज अंतिम सामना पारडं फ्रान्सचं जड आहे, मला मेस्सीची टीम जिंकावी असे वाटते.
फ्रान्स ६० % तर, ४० %अर्जेंटीना.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 8:55 pm | श्रीगुरुजी
अर्जेंटिना १ फ्रान्स ०
अर्जेंटिनाला अन्यायकारक पेनल्टी किक मिळाली. पेनल्टी किक देण्याइतके काहीही झाले नव्हते.
18 Dec 2022 - 9:31 pm | प्रचेतस
रेफ्रीचा चुकीचा निर्णय
18 Dec 2022 - 9:09 pm | श्रीगुरुजी
अर्जेंटिना २ फ्रान्स ०
अत्यंत प्रेक्षणीय गोल!
18 Dec 2022 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्जेंटीनाचं आक्रमण पाहता फ्रांसला अजुनही पहिला हाफ संपेपर्यन्त सुर गवसला नाही त्या तुलनेत आक्रमण पर आक्रमण मुळे अर्जेंटीना आघाडीवर... दोन शून्य ने पुढे. मला वाटतं लीड मोडणे इतकं आक्रमण करावे लागेल.. तरच फ्रांसचा निभाव लागेल.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 10:21 pm | चांदणे संदीप
तो सूर सापडूच नये असे वाटत असतानाच कुठून कसे दोन गोल झाले कळालंच नाही. :(
सं - दी - प
18 Dec 2022 - 10:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मूडच गेला माझा. आता एक्स्ट्रा टाइमिंग.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 9:52 pm | श्रीगुरुजी
फ्रान्सने सामना सोडून दिल्यासारखे दिसतेय.
18 Dec 2022 - 9:59 pm | शानबा५१२
विराट कोहली ह्यात नाहीत. त्यांनी मस्त गोल ठोकला असता त्यांना एवढा मोठा फुट्बॉल पण नाही लागणार. ह्या गावातुन मी मेस्सी भाऊंना पक्का आर्शिवाद देतो!
18 Dec 2022 - 10:05 pm | शानबा५१२
पहिल्याच गोलमध्ये.......रीझल्ट.......,मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप सामना आहे.
18 Dec 2022 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्रांसचे दोन गोल. म्याच् मधे मजा वाढली
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 10:24 pm | प्रचेतस
एम्बापेची फुल स्ट्रेच किक प्रेक्षणीय होती.
18 Dec 2022 - 10:32 pm | प्रचेतस
आता धसमुसळा खेळ चाललाय, जिरुडला बाकावर बडबड केली म्हणून पिवळे कार्ड मिळाले.
18 Dec 2022 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे लैच भारी होतं. आवडलं. =))
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 10:38 pm | श्रीगुरुजी
पीतपत्रांचा पाऊस पडतोय. आता बहुतेक काही जणांना ताम्रपत्र प्रदान होईल.
18 Dec 2022 - 10:36 pm | श्रीगुरुजी
फ्रान्सचा अविश्वसनीय खेळ. मुख्य वेळात सामना २-२.
18 Dec 2022 - 10:55 pm | चांदणे संदीप
फायनल हरल्यानंतर हताश चेहऱ्याचा मेस्सी बघून अतिशय वाईट वाटले होते. ते तसे यंदा होऊ नये हीच इच्छा!
सं - दी - प
18 Dec 2022 - 11:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अप्रतिम गोल. तीन-दोन.
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 11:02 pm | प्रचेतस
हा गोल खरंच भारी होता, ऑफसाईड मिलीमीटरने हुकली
18 Dec 2022 - 11:09 pm | प्रचेतस
हाताला बॉल लागल्याने पेनल्टी ३-३
18 Dec 2022 - 11:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
०३ - ०३
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 11:15 pm | प्रचेतस
पेनल्टी शूट औटचा तान घेऊ नका आता, झोपा, उद्या पेपरला रिझल्ट पहा,
18 Dec 2022 - 11:16 pm | श्रीगुरुजी
आता पेनल्टी शूटआऊट
18 Dec 2022 - 11:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्जेंटीना विश्वविजेता..०४ - ०२
-दिलीप बिरुटे
18 Dec 2022 - 11:27 pm | प्रचेतस
मेस्सीच्या खात्यात वर्ल्डकप, आता खऱ्या अर्थाने लिजेंड होईल.
19 Dec 2022 - 12:34 am | चांदणे संदीप
तुम्हारा रोनाल्डो झिंदाबाद है इससे हमें कोई ऐतराज नहीं पर हमारा मेस्सी झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा! ;)
सं - दी - प
19 Dec 2022 - 7:40 am | Bhakti
हा हा ! copied.
18 Dec 2022 - 11:38 pm | Bhakti
मेस्सी नंबर १० अल्वेज rock :) :)
19 Dec 2022 - 12:41 am | चांदणे संदीप
तोंडावर ऑक्सीजन मास्क लावायची वेळ आणली ह्या मॅचने. मेस्सी हरला असता तर उद्या ऑफिसवर काय तोंड घेऊन गेलो असतो.
एंबाप्पेचा खेळ चांगला झाला पण पहिल्या हाफमध्ये तर कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सुद्धा नाही आला अन्यथा निकाल फ्रान्सच्या बाजूने लागण्याची शक्यता होती. असो, मेस्सी अखेरच्या वर्ल्ड कप मध्ये यशस्वी ठरला आणि तेही स्वतःच्या हिमतीवर, हा ठेवा आयुष्यभर पुरेल. ____/\____
सं - दी - प
19 Dec 2022 - 7:39 am | Bhakti
बाडिस!आयुष्यभर पुरेल.
माझं तर ह्रदयच तुटलं असतं.
19 Dec 2022 - 2:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या हापमधे अर्जेंटीनाच्या सर्वच खेळाडुंची बॉलवर पकड होती. पहिल्या हाफमधे जेव्हा दोन शुन्यने अर्जेंटीनाने आघाडी घेतली तेव्हा आता अर्जेंटीना जिंकणारच असे वाटले होते. पण दुस-या हाफमधे जरा अर्जेंटीनाचा कंफिडन्स जास्तीचा वाढला आणि बॉलवरची पकड सैल झाली आणि मग कॅमे-याच्या फ्रेममधे एंबाप्पे दिसायला लागला आणि त्याने तीन गोलही केले. आता तो फार दिसू नये असे वाटायला लागले इतका शेवटच्या काही मिनिटात फ्रान्सचा परफॉर्म्स उंचावला. फ्रान्सला मिळालेली पेनल्टी, त्यांनी केलेला दुसरा तिसरा गोल अप्रतिम होते तेव्हा अर्जेंटीना मैदानावरच नाही असे वाटावे इतका तो खेळ दर्जेदार झाला. पेनल्टीशुटाऊटमधे अर्जेंटीनाच्या गोलकिपरने एक गोल वाचवला आणि एक किक बाहेर गेली त्यामुळे अर्जेंटीना जिंकली. विश्वचषक सामन्याचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला अंतिम सामन्याचा उच्च आनंद लुटता आला. अर्जेंटीना जिंकावी असे वाटत होते आणि जिंकली म्हणून तो क्षण आयुष्यभरासाठी साठवता आला. जे जे सामने बघता आले ते ते सर्व सामने अप्रतिम होते. मजा आली. आता पुढील विश्वचषकाची फक्त वाट पाहणे...!
धागालेखकाचेही आभार. वेळापत्रक दिल्यामुळे सामने पाहता आले. चर्चा करता आली, मजा आली. सर्वांचे तहेदिलसे शुक्रिया. आभार.
-दिलीप बिरुटे
19 Dec 2022 - 2:58 pm | प्रचेतस
पहिला पेनल्टी वादग्रस्त होता असे वाटते. क्षणचित्रे येथे पाहा, कदाचित हा पेनल्टी दिला नसता तर निकाल काही वेगळाच लागू शकला असता असे वाटते. ग्रिझमन, जिरुड फेल गेले, एम्बापे सेकंड हाफमध्ये कमालीचा खेळला.
19 Dec 2022 - 3:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पळत्या खेळाडूला डीमधे धक्का लागला आणि तो पडला. फूटबॉल खेळाडू काहीही निमित्त करुन पडतात नाटकं करतात हे खरं असलं तरी तो पेनल्टी दिला गेला. तसेच ७८ व्या मिनिटाला फ्रान्सला दिलेला पेनल्टीही तसाच वादग्रस्त वाटावा इतका तो फूळ्ळक होता. पण, खेळ म्हटला की जर तर चालायचेच. जिरुडला तर बाकडावर बसल्यावर यल्लो कार्ड दाखवले. माय गॉड हहपुवा झाली. बाकी एम्बापे सेकंड हाफमधे लै जबरा खेळल्या इतक्याच मताशी सहमत आहे. बाकी फ्रान्स हरल्यामुळे फ्रान्सचे चाहते म्हणून तुमचं दु:ख समजू शकतो. काळजी घ्या तब्येतीला जपा. (ह. घ्या) ;)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2022 - 3:50 pm | प्रचेतस
फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.
19 Dec 2022 - 10:28 pm | Trump
मुळचे फ्रेंच म्हणजे गोरे का? कृपया हा वर्णद्वेष सोडावा.
20 Dec 2022 - 5:59 am | प्रचेतस
अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः ।
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि तं नरं न रञ्जयति ॥
19 Dec 2022 - 6:58 am | कंजूस
मा(बा)पे चांगलाच खेळाडू. त्यांच्यामुळेच फ्रान्सला टिकता आलं.
पेनल्टी किकांना पर्याय सुचवतो.
तीन वि. तीन खेळाडुंना सहा मिनिटे खेळायची संधी द्यायची आणि ठरवायचे.
हा इमेल कुणीतरी फिफा'ला करा.
19 Dec 2022 - 2:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला फेवरेट या टूर्नामेंटमधला. माझा भौ. ;) ( छायाचित्र जालावरुन)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2022 - 2:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पेनल्टीशुटाऑउटमधे एक किक गोल पोष्टबाहेर गेली आणि एक वाचवली म्हणून इतकी मस्ती तर येणारच...! :)
(छायाचित्र जालावरुन)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2022 - 2:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(फिफावरुन)
-दिलीप बिरुटे
19 Dec 2022 - 3:01 pm | प्रचेतस
तुमच्या भावाने तो काळा कोट का बरे घातलाय?
19 Dec 2022 - 4:04 pm | चांदणे संदीप
हा... हा... =))
सं - दी - प
19 Dec 2022 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कतारच्या किंवा फूटबॉल संघ संयोजकांच्या शास्त्रात-मनात एखाद्याचा सन्मान करायचा असल्यास अशी वस्त्रे घालण्याचा प्रघात असावा.
बक्षीस वितरणप्रसंगी त्यांना अशी वस्त्र घालून सन्मानाने विश्वचषक सोपवण्यात आल्याचे दृश्य काल दूरदर्शनवर बघितले.
अधिकृत माहिती नाही.
-दिलीप बिरुटे
21 Dec 2022 - 11:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिश्ट काय आहे? कतार टूर्नामेंट आयोजन समितीचे महासचिव हसन अल थवाडी यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितलं की, हा अधिकृत समारंभासाठी परिधान करावयाचा पोशाख आहे. मेस्सीच्या विजयातील योगदानासाठी त्याला हा पोशाख देण्यात आला.
त्यांनी पुढे सांगितलं, वर्ल्ड कप हा आमच्यासाठी अरब विश्व आणि मुस्लीम संस्कृतीला जगाला जोडणारा दुवा आहे. मेस्सीला देण्यात आलेला हा पोशाख फक्त कतारतर्फे नाही तर या भागात आयोजित महोत्सवाचं प्रतीक आहे.
मेस्सीला जो पोशाख देण्यात आला त्याला बिश्ट असंही म्हणतात. अरब देशांमधला हा एक सांस्कृतिक पोशाख आहे. खास प्रसंगीच हा पोशाख घातला जातो.
रविवारचा अर्जेंटिनाचा विजय मेस्सीच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. हे लक्षात घेऊनच त्याला हा पोशाख देण्यात आला. जाळीदार असा काळा-सोनेरी रंगाचा हा पोशाख आहे. ( माहिती जालावरुन साभार)
-दिलीप बिरुटे
22 Dec 2022 - 8:43 am | प्रचेतस
माहितीबद्द्ल धन्यवाद.
22 Dec 2022 - 10:54 am | Bhakti
पोशाखच्या माहितीसाठी धन्यवाद सर.
पण ते अजिबात नाही आवडलं,ती काय वेळ होती का बिश्ट देण्याची.आमचा मेस्सी बघा किती समजूतदार ,आदर ठेवला त्यांचा.खेळ संस्कृती आहे पण उगाच ग्लोबल मार्केटिंग बिश्ट द्वारे.
22 Dec 2022 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॅडमजी...आता काय बोलायचं...! आपल्या मताशी सहमत आहे. आपण जो मार्केटींगचा उल्लेख केलाय ना, ते आता जगभर सुरुच आहे. खेळ आणि खेळभावना वाढीस लागाव्या अशा गोष्टी व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. पण, काही तरी नेमकं वेगळ करणारी मंडळी जगभर दिसून येतेच येते. म्हणजे आपल्या पुण्यात स्पर्धा झाल्या असत्या तर आपण सर्व खेळाडुंना पगड्या घातल्या असत्या. द्वारकेत वगैरे झाल्या असत्या या स्पर्धा तर, मोरपीसाच्या टोप्या खेळाडूंना घातल्या असत्या. शंक फुंकले गेले असते.....त्या त्या भागाच्या परंपरा संस्कृती, इतिहास-भूगोल. दंतकथा त्यातली प्रतिकं अशावेळी हटकून बाहेर येतात आणि मग काय बिघडलं असं सुरु होतं. अर्थात हे कशासाठी ? सांगायची गरज पडत नाही.
आता बघा, अंतिम सामना बघीतल्यावर सामना अर्जेंटीनाने जवळ जवळ एक हाती जिंकलाच होता. ऑलीव्हर जिरु, देम्बले मैदानाबाहेर आलेले होते. फ्रान्सच्या संघाच्या कपड्याच्या बॅगा भरल्याच होत्या. देहबोली हरलेली दिसत होती. पण सामना संपायला वीसेक मिनिटे बाकी होती तेव्हा कॅमाविंगा आणि किंगज्ले मैदानात उतरले आणि इतका वेळ कुठेच नसलेल्या एम्बापेचा प्रतिकार असा काही वाढला की आता अर्जेंटीना खपले असे वाटले. एम्बापेने पहिला पेनल्टीचा जाऊद्या पण दुसरा केलेला गोल अविश्वसनीय अप्रतिम होता. हं तर, आपण बोलत मार्केटींगबद्दल. फ्रान्स हरले.
तर, सामना संपल्या नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सहानुभूती दाखवायला आले. मला वाटतं ते एम्बापेशी संवाद करीत आहे, आणि एम्बापे दूर कुठेतरी पाहतोय असा एक फोटो वृत्तपत्रात आला होता. मॅक्रॉन यांनी आपल्या प्रचारासाठी संघाचा वापर केला अशी टीका नंतर झालेली बघायला मिळते. एम्बापे दुस-या संघाकडून खेळणार होता आणि मॅक्रॉन यांनी त्याच्यावर दबाव आणला अशी एक बातमी होती.
वर एका प्रतिसादात माझ्या मिपाकर मित्राची प्रतिसादात एक ओळ होती की, 'फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात' आणि 'नजाकत ताकद स्टॅमिना' बद्दलही काही भाष्य होतं. . मतं-प्रतिकुल आणि वादाची मतं त्यावरही येऊ शकतात. प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो.
एम्बापेच्या खेळाचं, ताकदीचं, आणि नजाकतीचं फुटबॉल जगताने मार्केटींग केलं नाही तर त्याचं काही नवल वाटू नये. मैदानाबाहेर बसलेल्या आणि संघात कधी स्थान- संधी मिळणार नाही असे वाटणा-या खेळाडूंना एम्बापे आयकॉन आदर्श असणार आहे. उत्तम खेळणा-यांना खेळात तरी समान संधी मिळते असे वाटणा-या तो एक आश्वासक चेहरा असणार आहे. अर्थात, येत्या काळात ते सगळं दिसेलच असे वाटते. अर्जेंटीनाचा मेस्सी भारीच होता. पण, एम्बापे काही कमी नव्हता यासाठी हा विश्वचषक कायम लक्षात राहील. इतकेच.
लिहितांना काही चुकलं असेल तर जरुर लिहा मॅडमजी.
-दिलीप बिरुटे
22 Dec 2022 - 8:42 pm | Bhakti
वाह सर एम्बापे इतर गोष्टींविषयी छान माहिती दिली.बिचार्यावर खुपचं अन्याय झाला म्हणजे :( फारच सुकला होता त्याचा चेहरा.
मला एवढंच म्हणायचं होतं की अंतिम सामन्यात तो कोट देऊन खेळातला त्यांचा अतिउच्च दिवसात लुडबुड नको होती इतर वेळी ,इतर सामान्यात दिला असता तर काहिच इश्यू नव्हता.हे असंच चालू राहिलं आणि पुण्यात ओलिंपिक झालं विजेत्यांना पुणेरी पगड्या घातल्या तरी मला चालणार आहे ;)
्
23 Dec 2022 - 8:42 am | प्रचेतस
इथं रंग कुठून मध्येच आणलात भो? फ्रेंच संघात नॉर्स खेळाडू असते तरीही मी हेच म्हटले असते. उद्या भारतीय क्रिकेट संघातून रोहिंगे, चिनी, श्रीलंकन, ब्रिटिश, पोर्तुगीज खेळाडू खेळताना दिसले असते तरीही मी हेच म्हणालो असतो. मूळ फ्रेंचांमध्ये फूटबॉल गुणवत्तेची कमी दिसतेय हे साहजिकच आहे.
20 Dec 2022 - 9:40 am | विवेकपटाईत
शेटजीने मेस्सीचे अभिनंदन का म्हणून केले असावे:
मेस्सीच्या हातावर
कमळाचे चिन्ह
शेटजीने जिंकला
वर्ल्ड काम आज.
20 Dec 2022 - 11:03 am | कर्नलतपस्वी
एकंदरीत मस्तच सामने झाले. छोट्या देशांच्या संघांनी सुद्धा कमालीचा खेळ दाखवला.
या खेळात थरार शेवटपर्यंत कायम असतो त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत इन्टरेस्ट टिकून राहातो.
काश भारतीय संघ या खेळात आसता तर.
मस्तच दिवस रात्र गेले.
या कालावधीत बिग बाॅस सारखे प्रक्षेपण बंद ठेवल्यास खेळांचे पुर्नप्रसारण,चर्चा सत्र बघण्यास टि व्ही ची उपलब्धता फुटबॉल प्रेमींना जास्त होईल.
एक पिडीत.....
27 Dec 2022 - 10:52 am | कर्नलतपस्वी
फिफा वर्ल्डकप सामने मस्तच झाले पण मिपावरील या धाग्याचे व प्रतिसादकांचे विषेश आभार कारण सामन्यांचे समीक्षण आणी आवांतर माहीती मुळे जास्त मजा आली.