मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फिफा विश्वचषक २०२२

प्रचेतस · · काथ्याकूट
मिपावर फुटबॉल विश्वचषकाचा धागा किंवा त्यावर चर्चाही कशी नाही याचे आश्चर्य वाटले त्यामुळे आपणच त्याविषयी धागा काढू असा विचार केला. अपेक्षेप्रमाणे गट फेरीत त्या त्या गटातील बलाढ्य संघांनी विजय मिळवला पण आज अनपेक्षितरित्या मेस्सीच्या अर्जेन्टिनाला दुबळ्या सौदी अरेबियाने २-१ असा झटका दिला. मात्र त्यांच्या गटातील इतर दोन संघ मेक्सिको आणि पोलंड असल्याने त्यांना हरवण्यास अर्जेन्टिनाला फारशी अडचण येणार नाही असे वाटते. विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार) गट फेरी 20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम - 21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 अल थुमामा स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, पहाटे 12.30, अल रेयान स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30 स्टेडियम 974 23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहाटे 12.30, अल जानोब स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 अल थुमामा स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 अल बायत स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, पहाटे 12.30 अल रेयान स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 अल जानोब स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974 25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 अल थुमामा स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, पहाटे 12:30, अल बायत स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974 27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको पहाटे12:30 लुसेल स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, पहाटे 12.30, अल बायत स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974 29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए पहाटे 12:30 अल थुमामा स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, पहाटे 12:30, अल रेयान स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 अल जानूब स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, पहाटे12:30 , Stadion 974 1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 लुसेल स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 अल थुमामा स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन पहाटे 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड पहाटे 12:30 स्टेडियन 974 बाद फेरी- १६ सामने (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता 4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D पहाटे 12:30 अल रेयान स्टेडियम 4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम 5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम 5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम 6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H पहाटे 12:30 उशीरा, स्टेडियन 974 6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम उपांत्यपूर्व फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम 10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम 11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम उपांत्य फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 14 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30 , अल बेयट स्टेडियम 15 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30, लुसेल स्टेडियम तिसरे स्थान सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम अंतिम सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम

वाचने 34671 वाचनखूण प्रतिक्रिया 142

कर्नलतपस्वी Tue, 11/22/2022 - 19:04
भारतात चेंडू फळीचा खेळ जास्त आवडीचा. फुटबाॅल गोवा,बंगाल व सात बहिणींच्या प्रदेशात खुपच खेळला जातो. पावसाळ्यात चिखलात ल्या फुटबॉल ची मजाच काही वेगळी. सैन्यात फुटबॉल या खेळाला खुपच प्राधान्य आहे. क्रिकेट च्या तुलनेत इतर मैदानी खेळांना सरकारकडून हवे तेव्हढे प्रोत्साहन मिळत नसल्याचे वाटते. एआईएफएफ चे निदेशक रेफरी कर्नल गौतम कार (सेवानिवृत्त) माझ्याच केडरचे वरीष्ठ व पारीवारीक घनिष्ठ मित्र आहेत. माझा पुतण्या जिम्नॅस्टिक्स व ऐरोबिक्सचा अतंरराष्ट्रीय खेळाडू व रेफ्री आहे त्याचे पण मत आहे की हवा तेवढा प्रतीसाद ऐनव्हायरमेन्ट कडून मिळत नाही. समय सारीणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. बघू बिग बाॅस मधून वेळ किती मिळेल. बा द वे मी बिग बाॅस अजीबात बघत नाही.

In reply to by कपिलमुनी

कर्नलतपस्वी Tue, 11/22/2022 - 20:55
कदाचीत साऊदीला अर्जेंटीनाने हलके घेतले. डेन्मार्क चांगला खेळला पण ट्युनिसीया चा गोलीने चांगले खेळत दोन गोल वाचवले. डेन्मार्क टीमवर्क चांगले होते. सुरक्षात्मक खेळी.

In reply to by श्रीगुरुजी

प्रचेतस Tue, 11/22/2022 - 19:50
स्पोर्ट्स 18 एचडी 1 आणि स्पोर्ट्स 18 1आणि ओटीटी वर पाहायची असल्यास जिओ सिनेमा. पण फूटबॉल मॅच कधीही ओटीटीवर पाहू नये असे मत, बँडविड्थ कितीही असली तरी लॅग जाणवतोच.

कंजूस Tue, 11/22/2022 - 21:58
मराठीत टंकली वाटतं! --------- डिशटिवीवर आहे आणि पॅकेजमध्ये नसला तरी फ्रि दाखवत आहेत. _____________ १)Jiocinema (android)app डाऊनलोड करा. २) कुणा जिओनंबरवरून ओटीपी टाकून app open करा. ३) आता जिओ सिम नसले तरी एरटेल किंवा वाईफाईवर चालू राहील. ४) sports 18 -1 वर पाहा फिफा. ---------------- अर्जेंटिना ओफसाईड गोल बाद झाले ते कळले नाही. सौदीचे (ksa?) दोन्ही गोल सुरेख होते.

कर्नलतपस्वी Wed, 11/23/2022 - 06:14
हायलाइटस, कतार इक्वाडोर मॅच मस्त होता. इक्वाडोर पुर्ण खेळात वरचढ होता. लाँग पास आणी हेड सुपर्ब गोल. इंग्लंड इराण, इराण कमजोर टिम वाटली. इंग्लंडने सहा गोल करत आपले वर्चस्व कायम ठेवले.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस Wed, 11/23/2022 - 07:00
इराणसारख्या कमजोर संघानेही इंग्लंडवर दोन गोल लादले हे इंग्लंडला नक्कीच सलत असेल. फ्रान्सने काल 4 गोल केले

मोहन Wed, 11/23/2022 - 12:21
अर्जेंटीनाचे दोन ऑफ साईड गोल ऑफ साईड नव्हते का? मला तरी खूपच हार्श निर्णय वाटले , दोन्ही.

In reply to by मोहन

प्रचेतस Wed, 11/23/2022 - 12:44
एका गोलमध्ये मेस्सीची ऑफसाईड होती पण त्याच्याकडे थेट पास नव्हता आणि गोल करण्यातही त्याचा सहभाग नव्हता, फिफा नियम काय आहेत ते बघावे लागेल याबाबतीत.

In reply to by प्रचेतस

कर्नलतपस्वी Wed, 11/23/2022 - 13:32
Technology made it possible to monitor every action, movement in details and an effectivetool to pass correct judgment. म्हणून कधी कधी आपल्याला रेफ्री चा निर्णय चुकीचा वाटू शकतो. ऑफसाइड नियमांबद्दलचा एक चांगला व्हीडीओ. https://youtu.be/GePlbCsGniA

तुषार काळभोर Wed, 11/23/2022 - 19:39
सौदी विरुद्ध अर्जेंटिना लैच धक्कादायक निकाल होता. अवांतर : बाय द वे, नव्वदीच्या दशकात ८ आणि १६ बिट्स कन्सोलमुळे जगात उरुग्वे आणि पराग्वे असे दोन देश आहेत. इतकेच नव्हे तर ते फुटबॉल मधील नावाजलेले संघ आहेत अशी माहिती झालेली. पण १९९८ (रिकी मार्टिनच्या कप ऑफ लाईफ गाण्यामुळे उगाचच माहिती झालेला) वर्ल्डकपपासून पाहून आणि वाचून माहिती घेताना हे देश कुठेच नसायचे. २०१०-२०१२ ची दोनतीन वर्षे सोडली तर उरुग्वे प्राथमिक फेरीतच बाद व्हायचा. पराग्वेचं तर नावही नसायचं. आश्चर्य वाटायचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/24/2022 - 18:40
जिओ सिनेमावर मोबाईलवर बघण्यासाठी आणि स्पोर्ट्स १८ वर आहेच. उरुग्वे आणि कोरियाचा सामना बघतोय. धन्यवाद -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/24/2022 - 20:08
द.कोरियाकडून भारी आहे, पासेस. वगैरे . पण फोकलीच्याकडून गोल काही होईना...दोघांनाही चांगल्या संधी होत्या. शेवटचे दहा मिनिट. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/24/2022 - 23:02
दोघाही संघाचा धुसमूसळेपणाचा खेळ सुरु आहे. खरं खोटं यात रोनाल्डोला अडवल्यामुळे ६४ व्या मिनिटाला पेनल्टी किक वर गोल केला तर प्रतिसाद लिहीपर्यन्त ७३ व्या मिनिटाला घानाने गोल केला. १-१ मजा येतेय. दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/24/2022 - 23:10
७७ व्या आणि ८० व्या मिनिटाला पोर्तुगल चे दोन अप्रतिम गोल. ०३- ०१ जबरा सामना.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/24/2022 - 23:34
पोर्तुगल ०३ घाना ०२. शेवटचे काही क्षण बाकी असतांना पोर्तुगलच्या गोल कीपरकडून बॉल हिस्कावून गोलपोष्ट मधे घालण्याची संधी घानाने घालवली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कपिलमुनी Fri, 11/25/2022 - 03:14
कीपर च्या मागे उभे राहून बॉल घ्यायची चाल अफलातून होती.. घसरल्याने यशस्वी झाली नाही. घाना मस्त खेळले

ब्राझील वि. सार्बियाचाही सामना भन्नाट झाला. ब्राझीलने अजिबात कुठेच संधी दिली नाही. ०२-० ने सार्बिया हरले. पण आवडलेला गोल. Screenshot (14) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

घानाचा खेळाडु अगदी गोलकिपरच्या मागे लपून बसला होता. ब्राझीलच्या गोलकिपरने जमीनीवर बॉल ठेवला (यल्लो जर्सी) आणि घानाचा पठ्ठ्या ( पांढरी जर्सी) मागून पळत येत होता आणि नेमका बॉल हिसकावून घ्यायच्या वेळी घसरुन पडला. नाय तर गोल शंभर टक्के होता. Screenshot (7) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

दुव्याबद्दल आभार्स. पण, पास देण्यापूर्वी खेळाडु तिकडे असेल तर ऑफसाईड. पण, पास देऊन तिकडेच खेळ सुरु असेल तर वरील छायाचित्रात पास देऊन बॉल तिकडे आलेला . बॉल क्लियर केला म्हणून वाचला नाय तर गोल दिला असता. ( असे वाटते) -दिलीप बिरुटे (गोलकिपर )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sat, 11/26/2022 - 12:51
पास देऊन तिकडेच खेळ सुरु असेल तर वरील छायाचित्रात पास देऊन बॉल तिकडे आलेला . बॉल क्लियर केला म्हणून वाचला नाय तर गोल दिला असता.
हं.. तो सामना पाहिला नसल्याने नेमकं काय झालंय ते सांगू शकत नै. गोल क्लिप असेल तर टाका भो.

In reply to by प्रचेतस

आपल्या धाग्यात माझ्या आयुष्यातला फार मौल्यवान वेळ वाया चालला. हं हा घ्या दुवा. आणि २ मिनिट आणि १२ व्या सेकंदाचा प्रसंग बघा आणि सांगा. आणि आपलं जे मत असेल ते मान्य. विषय संपला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Sat, 11/26/2022 - 14:22
ही ऑफसाईड वाटत नाही कारण चेंडूचा ताबा गोलरक्षकाकडे होता, पण तो किक मारत असताना त्याच्या मागे प्रतिस्पर्धी खेळाडू उभा राहणे लीगल आहे का ह्या बाबत कल्पना नाही, तुम्हाला माहिती मिळाल्यास येथे अवश्य द्या.

In reply to by प्रचेतस

सागर Tue, 11/29/2022 - 10:50
मी स्वतः फुटबॉल खेळलेलो असल्यामुळे हे सांगू शकतो नियमाप्रमाणे ही ऑफ साईड होऊ शकत नाही ही गोल किपर ची जबाबदारी असते की बॉल चा ताबा सोडताना प्रतिस्पर्धी खेळाडू जवळ आहे की नाही हे पाहणे. गोल झाला असता तर नियमा नुसार गोल दिला गेला असता. पाय घसरला आणि पोर्तुगाल वाचले अन्यथा बरोबरीत सामना सुटल्याचे दु:ख भोगावे लागले असते

श्रीगुरुजी Sat, 11/26/2022 - 20:40
पोलंडने सौदी अरेबियाला २-० हरविले. आता त्या गटात पोलंड ४, सौदी अरेबिया ३, मेक्सिको १ व अर्जेंटिना ० अशी गुणसंख्या आहे. अर्जेंटिनाला बाद फेरीत जाण्यासाठी पोलंड व मेक्सिको विरूध्दचे सामने जिंकावेच लागतील.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी Sun, 11/27/2022 - 08:49
अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-० असा पराभव केल्याने आपले आव्हान टिकविले आहे. आता पोलंड-अर्जेंटिना व सौदी अरेबिया - मेक्सिको हे या गटातील सामने शिल्लक आहेत. तांत्रिकदृष्ट्या चारही संघांना संधी आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2022 - 09:41
उपउपांत्यपूर्व फेरीचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले आहे. नेदरलँड्स, सेनेगल, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, पोलंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल व ब्राझील या १० देशांनी बाद फेरीत प्रवेश केलाय. पहिल्या सामन्यात सौदी अरेबिराकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतरही मेक्सिको व पोलंडला हरवून अर्जेंटिनाने मुसंडी मारली. ई गटात स्पेन (४), जपान (३), कोस्टारिका (३) व जर्मनी (१) यांच्यात खूप चुरस आहे. जर्मनीने कोस्टारिकाला व स्पेनने जपानला हरविले तल स्पेन व जर्मनी बाद फेरीत जातील.

In reply to by श्रीगुरुजी

प्रचेतस Fri, 12/02/2022 - 05:51
जर्मनीने कॉस्टिरिकाला ४-२ ने हरवले मात्र स्पेन जपानविरुद्ध पराभूत झाल्याने जर्मनी विश्वचषकातून बाहेर पडली.

In reply to by प्रचेतस

श्रीगुरुजी Fri, 12/02/2022 - 08:40
अरेरे. जर्मनी नाही हे पाहणे दु:खदायक आहे. यावेळी बेल्जियमबद्दल बरेच जण आशेवर होते. पण बेल्जियम सुद्धा बाहेर पडले. स्पेन, मोरोक्को, जपान व क्रोएशिया बाद फेरीत आलेत. आता घाना, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड व कॅमेरून यापैकी दोन संघ बाद फेरीत येतील. सर्बिया व उरूग्वे यांना सुद्धा संधी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

प्रचेतस Fri, 12/02/2022 - 09:07
जर्मनी मागील विश्वचषकातसुद्धा प्राथमिक फेरीतच आटोपले होते. २०१४ नंतर त्यांची अधोगतीच होत आहे.

In reply to by प्रचेतस

कपिलमुनी Fri, 12/02/2022 - 09:46
जर्मनी मध्ये गुणवत्ता आहे पण संघ भावना किंवा एकत्र प्रॅक्टीस कमी आहे असा वाटला. काल फिनिशिंग करता आले नाही. . क्रॉस पासेस ला रिसिव्ह करायला कोणी नव्हते . काहीजण तर पास न करता ग्लोरी शॉट्स मारत होते.. अन्यथा काल गोल डिफ्रन्स सहज भरून निघाला असता.

श्रीगुरुजी Sat, 12/03/2022 - 23:34
नेदरलँड्सने अमेरिकेला ३-१ असे हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज दुसरा सामना अर्जेंटिना व ऑस्ट्रेलिया यांच्यात आहे. सामना मध्यरात्री १२:३० ला सुरू होणार असल्याने बघणे अवघड आहे.

श्रीगुरुजी Fri, 12/09/2022 - 22:50
उपांत्यपूर्व फेरी पहिला सामना - ब्राझील १ - क्रोएशिया ०. पहिली ९० मिनिटे ०-०. अतिरिक्त ३० मिनिटातील १३ व्या मिनिटाला नेमारने प्रैक्षणीय गोल केला.

श्रीगुरुजी Fri, 12/09/2022 - 23:42
नेमारची शेवटची विश्वचषक स्पर्धा? पोर्तुगाल- मोरोक्को आणि इंग्लंड-फ्रान्स सामने उद्या आहेत. आज अजून ४५ मिनिटांनंतर अर्जेंटिना-नेदरलँड्स हा दुसरा सामना आहे.

श्रीगुरुजी Sat, 12/10/2022 - 07:59
पूर्ण वेळात आणि अतिरिक्त वेळात २-२ बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊट मध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सला ४-३ असे पराभूत केले. आता हे सामने गोलकीपर्सचे होत आहेत.

प्रचेतस Sun, 12/11/2022 - 06:33
इंग्लड फ्रान्स लढत जोरदार झाली. फ्रान्स २-१ ने विजयी, इंग्लंडने शेवटी एक पेनल्टी किक दवडली अन्यथा खेळ अतिरिक्त वेळेत जाऊ शकला असता. आता अर्जेंटिना विरुद्ध कोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को अशा उपांत्य फेरीच्या लढती होतील.

चांदणे संदीप Wed, 12/14/2022 - 14:31
फुटबॉल वर्ल्ड कपचा धागा आत्ता पाहिला. असो, सगळे सामने हायलाईट्स मध्ये पाहिले. फक्त काल रात्री माझ्या आवडत्या मेस्सीसाठी जागल्याचे सार्थक झाले. पेनल्टी घेताना माझा बीपी हाय झालेला. शेवटचा असीस्ट तर क्लासच. अर्जेंटिना हा वर्ल्ड कप जिंकू दे रे देवा! सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पेनल्टी किक आणि दुस-या हाफ मधे बॉल स्वतःकडे ठेवत गोल साठी दिलेला अफलातून पास. अहाहा. फुटबॉलमधे यापेक्षा अजून कोणता सुखाचा क्षण असूच शकत नाही. काय नजाकत, अहाहा. मेस्सी जब्रा रे भावा असाच खेळत राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

राघव Wed, 12/14/2022 - 18:10
अगदी..!! रात्री जागल्याचे सार्थक झाले हे खरे! अफलातून असिस्ट!! अल्वारेजचा आधीचा गोल सुद्धा मस्त होता! मजा आली! अवांतरः भारत कधी फिफा वर्ल्ड कप खेळणार कल्पना नाही. पण एकदा का होईना भारतीय फुटबॉल टीमसाठी वर्ल्ड कप मधे चीअर करायची ईच्छा आहे! :-)

In reply to by कंजूस

राघव गुरुवार, 12/15/2022 - 18:05
माझ्या मते स्टॅमिना, फिटनेस आणि स्ट्रेन्ग्थ यात आपण सहज कव्हर करू शकतो. गरज आहे ती फुटबॉल कल्चरची. आणि मोकळ्या अन् जरा मऊ ग्राऊंड्सची. प्रत्येक राज्यातून एक मोठा क्लब तयार झाला तर त्यातून चांगला बेस बनेल. नव्हे ISL मुळे ते काही प्रमाणात सुरू झालेलेच आहे. पण या क्लब्स च्या मागे एक पॅशन गरजेची असते. लोकांना तो क्लब आपला वाटला पाहिजे. तर ते चक्र फिरायला लागते! :-)

In reply to by राघव

कपिलमुनी गुरुवार, 12/15/2022 - 00:12
कतार प्रमाणे आपण ही यजमानपद मिळवले तर भारत खेळेल.. अदानी अंबानी सारखे श्रीमंत लोक असताना हे शक्य आहे फक्त त्यांना यात आर्थिक फायदा दिसायला हवा.

कंजूस गुरुवार, 12/15/2022 - 06:19
चांगल्या खेळाडूंसह सराव, स्पर्धा करायला मिळाली की खेळ सुधारण्याची शक्यता वाढते. आपल्या चालींना प्रतिस्पर्धी कसा विरोध करतो हे आजमावता येते. ते १४-१९ वयात मिळायला हवे. उशीर झाला तर शिकता येते पण शारिरीक चपळपणा तोपर्यंत जातो. (चांगल्या खेळाडूंशी खेळून बुद्धिबळात सुधारणा फारशी होईल ही शक्यता नसते. ती एक जात्याच कुवत असते आणि ती एका मर्यादेला गोठते.) १)बॉल पायांत खेळवत पुढे नेण्याची कला यात ब्राझील आणि अर्जेंटिनाचे खेळाडू तरबेज,निष्णात आहेत. शिवाय २)मी'च गोल करणार यापेक्षा 'आपला' गोल झाला पाहिजे हे ध्यानात ठेवणारे संघ यश मिळवतात. (माझे मत)

In reply to by प्रचेतस

आपलं मत फिफाला मेल करुन पाठवतो. इतक्या दिवस त्यांच्या हे लक्षात आलं नसावं. आता, ते लक्ष घालतील अशी अपेक्षा करुया. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

अर्जेंटीनाचं आक्रमण पाहता फ्रांसला अजुनही पहिला हाफ संपेपर्यन्त सुर गवसला नाही त्या तुलनेत आक्रमण पर आक्रमण मुळे अर्जेंटीना आघाडीवर... दोन शून्य ने पुढे. मला वाटतं लीड मोडणे इतकं आक्रमण करावे लागेल.. तरच फ्रांसचा निभाव लागेल. -दिलीप बिरुटे

शानबा५१२ Sun, 12/18/2022 - 21:59
विराट कोहली ह्यात नाहीत. त्यांनी मस्त गोल ठोकला असता त्यांना एवढा मोठा फुट्बॉल पण नाही लागणार. ह्या गावातुन मी मेस्सी भाऊंना पक्का आर्शिवाद देतो!

In reply to by प्रचेतस

चांदणे संदीप Mon, 12/19/2022 - 00:34
तुम्हारा रोनाल्डो झिंदाबाद है इससे हमें कोई ऐतराज नहीं पर हमारा मेस्सी झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा! ;) सं - दी - प

चांदणे संदीप Mon, 12/19/2022 - 00:41
तोंडावर ऑक्सीजन मास्क लावायची वेळ आणली ह्या मॅचने. मेस्सी हरला असता तर उद्या ऑफिसवर काय तोंड घेऊन गेलो असतो. एंबाप्पेचा खेळ चांगला झाला पण पहिल्या हाफमध्ये तर कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सुद्धा नाही आला अन्यथा निकाल फ्रान्सच्या बाजूने लागण्याची शक्यता होती. असो, मेस्सी अखेरच्या वर्ल्ड कप मध्ये यशस्वी ठरला आणि तेही स्वतःच्या हिमतीवर, हा ठेवा आयुष्यभर पुरेल. ____/\____ सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

पहिल्या हापमधे अर्जेंटीनाच्या सर्वच खेळाडुंची बॉलवर पकड होती. पहिल्या हाफमधे जेव्हा दोन शुन्यने अर्जेंटीनाने आघाडी घेतली तेव्हा आता अर्जेंटीना जिंकणारच असे वाटले होते. पण दुस-या हाफमधे जरा अर्जेंटीनाचा कंफिडन्स जास्तीचा वाढला आणि बॉलवरची पकड सैल झाली आणि मग कॅमे-याच्या फ्रेममधे एंबाप्पे दिसायला लागला आणि त्याने तीन गोलही केले. आता तो फार दिसू नये असे वाटायला लागले इतका शेवटच्या काही मिनिटात फ्रान्सचा परफॉर्म्स उंचावला. फ्रान्सला मिळालेली पेनल्टी, त्यांनी केलेला दुसरा तिसरा गोल अप्रतिम होते तेव्हा अर्जेंटीना मैदानावरच नाही असे वाटावे इतका तो खेळ दर्जेदार झाला. पेनल्टीशुटाऊटमधे अर्जेंटीनाच्या गोलकिपरने एक गोल वाचवला आणि एक किक बाहेर गेली त्यामुळे अर्जेंटीना जिंकली. विश्वचषक सामन्याचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला अंतिम सामन्याचा उच्च आनंद लुटता आला. अर्जेंटीना जिंकावी असे वाटत होते आणि जिंकली म्हणून तो क्षण आयुष्यभरासाठी साठवता आला. जे जे सामने बघता आले ते ते सर्व सामने अप्रतिम होते. मजा आली. आता पुढील विश्वचषकाची फक्त वाट पाहणे...! धागालेखकाचेही आभार. वेळापत्रक दिल्यामुळे सामने पाहता आले. चर्चा करता आली, मजा आली. सर्वांचे तहेदिलसे शुक्रिया. आभार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Mon, 12/19/2022 - 14:58
पहिला पेनल्टी वादग्रस्त होता असे वाटते. क्षणचित्रे येथे पाहा, कदाचित हा पेनल्टी दिला नसता तर निकाल काही वेगळाच लागू शकला असता असे वाटते. ग्रिझमन, जिरुड फेल गेले, एम्बापे सेकंड हाफमध्ये कमालीचा खेळला.

In reply to by प्रचेतस

पळत्या खेळाडूला डीमधे धक्का लागला आणि तो पडला. फूटबॉल खेळाडू काहीही निमित्त करुन पडतात नाटकं करतात हे खरं असलं तरी तो पेनल्टी दिला गेला. तसेच ७८ व्या मिनिटाला फ्रान्सला दिलेला पेनल्टीही तसाच वादग्रस्त वाटावा इतका तो फूळ्ळक होता. पण, खेळ म्हटला की जर तर चालायचेच. जिरुडला तर बाकडावर बसल्यावर यल्लो कार्ड दाखवले. माय गॉड हहपुवा झाली. बाकी एम्बापे सेकंड हाफमधे लै जबरा खेळल्या इतक्याच मताशी सहमत आहे. बाकी फ्रान्स हरल्यामुळे फ्रान्सचे चाहते म्हणून तुमचं दु:ख समजू शकतो. काळजी घ्या तब्येतीला जपा. (ह. घ्या) ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Mon, 12/19/2022 - 15:50
फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.

In reply to by प्रचेतस

Trump Mon, 12/19/2022 - 22:28
फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.
मुळचे फ्रेंच म्हणजे गोरे का? कृपया हा वर्णद्वेष सोडावा.

कंजूस Mon, 12/19/2022 - 06:58
मा(बा)पे चांगलाच खेळाडू. त्यांच्यामुळेच फ्रान्सला टिकता आलं. पेनल्टी किकांना पर्याय सुचवतो. तीन वि. तीन खेळाडुंना सहा मिनिटे खेळायची संधी द्यायची आणि ठरवायचे. हा इमेल कुणीतरी फिफा'ला करा.

In reply to by प्रचेतस

कतारच्या किंवा फूटबॉल संघ संयोजकांच्या शास्त्रात-मनात एखाद्याचा सन्मान करायचा असल्यास अशी वस्त्रे घालण्याचा प्रघात असावा. बक्षीस वितरणप्रसंगी त्यांना अशी वस्त्र घालून सन्मानाने विश्वचषक सोपवण्यात आल्याचे दृश्य काल दूरदर्शनवर बघितले. अधिकृत माहिती नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

बिश्ट काय आहे? कतार टूर्नामेंट आयोजन समितीचे महासचिव हसन अल थवाडी यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितलं की, हा अधिकृत समारंभासाठी परिधान करावयाचा पोशाख आहे. मेस्सीच्या विजयातील योगदानासाठी त्याला हा पोशाख देण्यात आला. त्यांनी पुढे सांगितलं, वर्ल्ड कप हा आमच्यासाठी अरब विश्व आणि मुस्लीम संस्कृतीला जगाला जोडणारा दुवा आहे. मेस्सीला देण्यात आलेला हा पोशाख फक्त कतारतर्फे नाही तर या भागात आयोजित महोत्सवाचं प्रतीक आहे. मेस्सीला जो पोशाख देण्यात आला त्याला बिश्ट असंही म्हणतात. अरब देशांमधला हा एक सांस्कृतिक पोशाख आहे. खास प्रसंगीच हा पोशाख घातला जातो. रविवारचा अर्जेंटिनाचा विजय मेस्सीच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. हे लक्षात घेऊनच त्याला हा पोशाख देण्यात आला. जाळीदार असा काळा-सोनेरी रंगाचा हा पोशाख आहे. ( माहिती जालावरुन साभार) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti गुरुवार, 12/22/2022 - 10:54
पोशाखच्या माहितीसाठी धन्यवाद सर. पण ते अजिबात नाही आवडलं,ती काय वेळ होती का बिश्ट देण्याची.आमचा मेस्सी बघा किती समजूतदार ,आदर ठेवला त्यांचा.खेळ संस्कृती आहे पण उगाच ग्लोबल मार्केटिंग बिश्ट द्वारे.

In reply to by Bhakti

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/22/2022 - 19:55
मॅडमजी...आता काय बोलायचं...! आपल्या मताशी सहमत आहे. आपण जो मार्केटींगचा उल्लेख केलाय ना, ते आता जगभर सुरुच आहे. खेळ आणि खेळभावना वाढीस लागाव्या अशा गोष्टी व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. पण, काही तरी नेमकं वेगळ करणारी मंडळी जगभर दिसून येतेच येते. म्हणजे आपल्या पुण्यात स्पर्धा झाल्या असत्या तर आपण सर्व खेळाडुंना पगड्या घातल्या असत्या. द्वारकेत वगैरे झाल्या असत्या या स्पर्धा तर, मोरपीसाच्या टोप्या खेळाडूंना घातल्या असत्या. शंक फुंकले गेले असते.....त्या त्या भागाच्या परंपरा संस्कृती, इतिहास-भूगोल. दंतकथा त्यातली प्रतिकं अशावेळी हटकून बाहेर येतात आणि मग काय बिघडलं असं सुरु होतं. अर्थात हे कशासाठी ? सांगायची गरज पडत नाही. आता बघा, अंतिम सामना बघीतल्यावर सामना अर्जेंटीनाने जवळ जवळ एक हाती जिंकलाच होता. ऑलीव्हर जिरु, देम्बले मैदानाबाहेर आलेले होते. फ्रान्सच्या संघाच्या कपड्याच्या बॅगा भरल्याच होत्या. देहबोली हरलेली दिसत होती. पण सामना संपायला वीसेक मिनिटे बाकी होती तेव्हा कॅमाविंगा आणि किंगज्ले मैदानात उतरले आणि इतका वेळ कुठेच नसलेल्या एम्बापेचा प्रतिकार असा काही वाढला की आता अर्जेंटीना खपले असे वाटले. एम्बापेने पहिला पेनल्टीचा जाऊद्या पण दुसरा केलेला गोल अविश्वसनीय अप्रतिम होता. हं तर, आपण बोलत मार्केटींगबद्दल. फ्रान्स हरले. तर, सामना संपल्या नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सहानुभूती दाखवायला आले. मला वाटतं ते एम्बापेशी संवाद करीत आहे, आणि एम्बापे दूर कुठेतरी पाहतोय असा एक फोटो वृत्तपत्रात आला होता. मॅक्रॉन यांनी आपल्या प्रचारासाठी संघाचा वापर केला अशी टीका नंतर झालेली बघायला मिळते. एम्बापे दुस-या संघाकडून खेळणार होता आणि मॅक्रॉन यांनी त्याच्यावर दबाव आणला अशी एक बातमी होती. वर एका प्रतिसादात माझ्या मिपाकर मित्राची प्रतिसादात एक ओळ होती की, 'फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात' आणि 'नजाकत ताकद स्टॅमिना' बद्दलही काही भाष्य होतं. . मतं-प्रतिकुल आणि वादाची मतं त्यावरही येऊ शकतात. प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो. एम्बापेच्या खेळाचं, ताकदीचं, आणि नजाकतीचं फुटबॉल जगताने मार्केटींग केलं नाही तर त्याचं काही नवल वाटू नये. मैदानाबाहेर बसलेल्या आणि संघात कधी स्थान- संधी मिळणार नाही असे वाटणा-या खेळाडूंना एम्बापे आयकॉन आदर्श असणार आहे. उत्तम खेळणा-यांना खेळात तरी समान संधी मिळते असे वाटणा-या तो एक आश्वासक चेहरा असणार आहे. अर्थात, येत्या काळात ते सगळं दिसेलच असे वाटते. अर्जेंटीनाचा मेस्सी भारीच होता. पण, एम्बापे काही कमी नव्हता यासाठी हा विश्वचषक कायम लक्षात राहील. इतकेच. लिहितांना काही चुकलं असेल तर जरुर लिहा मॅडमजी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti गुरुवार, 12/22/2022 - 20:42
वाह सर एम्बापे इतर गोष्टींविषयी छान माहिती दिली.बिचार्यावर खुपचं अन्याय झाला म्हणजे :( फारच सुकला होता त्याचा चेहरा. मला एवढंच म्हणायचं होतं की अंतिम सामन्यात तो कोट देऊन खेळातला त्यांचा अतिउच्च दिवसात लुडबुड नको होती इतर वेळी ,इतर सामान्यात दिला असता तर काहिच इश्यू नव्हता.हे असंच चालू राहिलं आणि पुण्यात ओलिंपिक झालं विजेत्यांना पुणेरी पगड्या घातल्या तरी मला चालणार आहे ;) ्

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस Fri, 12/23/2022 - 08:42
प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो.
इथं रंग कुठून मध्येच आणलात भो? फ्रेंच संघात नॉर्स खेळाडू असते तरीही मी हेच म्हटले असते. उद्या भारतीय क्रिकेट संघातून रोहिंगे, चिनी, श्रीलंकन, ब्रिटिश, पोर्तुगीज खेळाडू खेळताना दिसले असते तरीही मी हेच म्हणालो असतो. मूळ फ्रेंचांमध्ये फूटबॉल गुणवत्तेची कमी दिसतेय हे साहजिकच आहे.

कर्नलतपस्वी Tue, 12/20/2022 - 11:03
एकंदरीत मस्तच सामने झाले. छोट्या देशांच्या संघांनी सुद्धा कमालीचा खेळ दाखवला. या खेळात थरार शेवटपर्यंत कायम असतो त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत इन्टरेस्ट टिकून राहातो. काश भारतीय संघ या खेळात आसता तर. मस्तच दिवस रात्र गेले. या कालावधीत बिग बाॅस सारखे प्रक्षेपण बंद ठेवल्यास खेळांचे पुर्नप्रसारण,चर्चा सत्र बघण्यास टि व्ही ची उपलब्धता फुटबॉल प्रेमींना जास्त होईल. एक पिडीत.....

कर्नलतपस्वी Tue, 12/27/2022 - 10:52
फिफा वर्ल्डकप सामने मस्तच झाले पण मिपावरील या धाग्याचे व प्रतिसादकांचे विषेश आभार कारण सामन्यांचे समीक्षण आणी आवांतर माहीती मुळे जास्त मजा आली.