क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

6 Nov 2022 - 10:23 am | कानडाऊ योगेशु

सगळी परिस्थिती १९९२ च्या विश्वचषकासारखी झाली आहे. पाकने उपउपांत्य फेरित पोहोचेपर्यंत फार मार खाल्ला होता तेव्हा. पण नशीबाने उपउपांत्य फेरीत पोहोचले आणि मग विश्वचषकच जिंकला. ह्यावेळीही असे काहीसे झाले तर फार आश्चर्य वाटायला नको.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2022 - 12:09 pm | श्रीगुरुजी

नाही. २००७ च्या ट-२० विश्वचषकाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. तेव्हासुद्धा पाक आपला भारताविरुद्धचा पहिला सामना हरले होते, परंतु अंतिम फेरीत आले होते.

कानडाऊ योगेशु's picture

6 Nov 2022 - 10:24 am | कानडाऊ योगेशु

भारत पाक फायनल झाली तर त्यात पाकचे पारडे जड असेल. आधीच्या सामन्यात केवळ नशीब बलवत्तर म्हणुन आपण वाचलो.

गणेशा's picture

6 Nov 2022 - 10:37 am | गणेशा

Nz is far better team than pak and ind.

रात्रीचे चांदणे's picture

6 Nov 2022 - 12:18 pm | रात्रीचे चांदणे

थोड्या फार ९२ सारख्या घटना घडल्या म्हणून लगेच पाक विश्वचषक जिंकेल हे फारच स्वप्नरंजन ठरेल. भारताच्या विजयात फक्त नशीबच नाहीतर आपला चांगला झालेला खेळही महत्वाचा factor आहे.

प्रसाद_१९८२'s picture

6 Nov 2022 - 12:52 pm | प्रसाद_१९८२

साऊथ अफ्रिकेने त्यांचा 'चोकर्स' हा शिक्का पुन्हा कायम ठेवला.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2022 - 5:17 pm | श्रीगुरुजी

अपेक्षेप्रमाणे भारताने झिंबाब्वेला व पाकड्यांनी बांगड्यांना हरविले. आता उपांत्य फेरीत भारत-इंग्लंड व न्यूझीलंड-पाकडे यांच्यात सामने होतील.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2022 - 4:07 pm | श्रीगुरुजी

पहिला उपांत्य सामना -

न्यूझीलंड १५२/४ (२०)
पाकडे ८७/० (१०)

पाकडे आरामात जिंकताहेत. १९९२ ची पुनरावृत्ती होणार की काय? तेव्हाही पाकड्यांनी उपांत्य फेरीत न्यूझीलंडला आणि अंतिम फेरीत इंग्लडला हरविले होते. आता दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंड आहेच.

श्रीगुरुजी's picture

9 Nov 2022 - 5:14 pm | श्रीगुरुजी

न्यूझीलंडचा उपांत्य फेरीत अगदी सहज पराभव करून पाकडे अंतिम फेरीत दाखल. पाकड्यांकडून उपांत्य फेरीत हरण्याची न्यूझीलंडची ही चवथी वेळ.

उद्या दीड वाजता भारत-इंग्लंड हा दुसरा उपांत्य सामना आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 1:15 pm | श्रीगुरुजी

उपांत्य सामना भारत वि. इंग्लंड -

इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सुदैवाने आज मार्क वुड आणि डेव्हिड मलान दुखापतीमुळे खेळत नाहीयेत.

प्रसाद_१९८२'s picture

10 Nov 2022 - 2:05 pm | प्रसाद_१९८२

सध्याचा भारताचा रनरेट पाहाता, भारत १५० रन तरी करेल का याची शंका वाटतेय.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 2:11 pm | श्रीगुरुजी

भारताची अत्यंत संथ फलंदाजी. ६२/२ (१०).

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 2:31 pm | श्रीगुरुजी

अत्यंत निराशाजनक फलंदाजी. ९०/३ (१३)

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 2:31 pm | श्रीगुरुजी

९०/३ (१४)

प्रसाद_१९८२'s picture

10 Nov 2022 - 3:07 pm | प्रसाद_१९८२

आज हार्दीक पंड्याने धुवाधार बॅंटिग केली. ६३/३३
भारत १६८/६.
आता सर्व मदार बॉलरवर आहे.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 3:30 pm | श्रीगुरुजी

१६८ पुरेशा नाहीत. इंग्लंड २३/० (२.३).

प्रसाद_१९८२'s picture

10 Nov 2022 - 3:47 pm | प्रसाद_१९८२

भारत T20 विश्वचषकातून बाहेर व्हायच्या उंबरठ्यावर आहे सध्या.
इंग्लडने १० रन/ओवर च्या धावगतीने ६४/० धावा केल्या आहेत. भारताचे १६८ धावांचे आव्हान इंग्लड १५ ओवरच्या आधीच पूर्ण करेल असे दिसतेय.

श्रीगुरुजी's picture

10 Nov 2022 - 3:54 pm | श्रीगुरुजी

सामना हरला आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे.

प्रसाद_१९८२'s picture

10 Nov 2022 - 4:51 pm | प्रसाद_१९८२

एक ही विकेट न गमावता इंगलडने सामना सोळाव्या ओवरमधे जिंकला व भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला.
आज भारतीय फलंदाज व गोलंदाज दोघांनी घोर निराश केले.

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2022 - 3:45 pm | श्रीगुरुजी

अंतिम सामना -

पाकडे १३७/८ (२०)
इंग्लंड ३२/२ (३.३)

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2022 - 4:25 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड ७७/३ (१०).

१० षटकांत ६१ हव्या.

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2022 - 5:14 pm | श्रीगुरुजी

जिंकले इंग्लंड. १३८/२ (१९). बेन स्टोक्स - १ बळी व ४९ चेंडूत नाबाद ५२ धावा.

इंग्लंडने दुसऱ्यांदा ट-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली.

प्रसाद_१९८२'s picture

13 Nov 2022 - 7:08 pm | प्रसाद_१९८२

१६ व्या षटकात बाबर आजमने, बेन स्टोक्सचा झेल सोडला नसता तर पाकिस्तानला विश्वचषक जिंकण्याची चांगली संधी होती.

श्रीगुरुजी's picture

13 Nov 2022 - 8:31 pm | श्रीगुरुजी

तरीही इंग्लंड जिंकले असते, कारण लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, सॅम करन असे चांगले फलंदाज शिल्लक होते आणि ५ षटकांत ४१ धावा करणे सहज शक्य होते.

श्रीगुरुजी's picture

9 Feb 2023 - 3:15 pm | श्रीगुरुजी

आजपासून भारतात ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली.

पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचे स्टार्क, हेझलवूड, ग्रीन खेळू शकले नाहीत. हेडला सुद्धा बाहेर ठेवले आहे. भरात असलेले हे ४ महत्त्वाचे खेळाडू संघात नसल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ एकदम दुबळा वाटतोय.

याचे प्रत्यंतर पहिल्या दिवशीच आले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावात संपला. जडेजाने ५ व अश्विनने ३ फलंदाज बाद केले। भारत आता २२/० (४.३) आहे.

रोहित शर्माचे शतक. जडेजाही छान खेळला!
बाकी मला पॅट कमिन्स आवडतो.. मस्त बॉलिंग आहे त्याची. लीदल.

श्रीगुरुजी's picture

10 Feb 2023 - 5:00 pm | श्रीगुरुजी

भारत दिवसाखेर ३२१/७. आतापर्यंत १४४ धावांची आघाडी. आज खूप झेल सुटले. टॉड मर्फीचे पदार्पणात ५ बळी.

कसोटी चांगली चालू आहे. जडेजा आणि अक्षरने चांगली आघाडी मिळवून दिली.
शुभमन गिलला संधी मिळेल असे वाटले होते.

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2023 - 12:01 pm | श्रीगुरुजी

भारत ४००/१०. २२३ धावांची आघाडी..

श्रीगुरुजी's picture

11 Feb 2023 - 4:01 pm | श्रीगुरुजी

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया सर्वबाद ९१. केवळ अडीच दिवसात भालत १ डाव व १३२ धावांनी विजयी.

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2023 - 6:07 pm | श्रीगुरुजी

आज कसोटी क्रिकेटमध्ये एक रोमांचक सामना पार पडला.

इंग्लंड सध्या न्यूझील़ड दौऱ्यावर आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा २६७ धावांनी दारूण पराभव केला होता.

२४ फेब्रुवारीस दुसरा कसोटी सामना सुरू झाला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडने फक्त ८७.१ षटकात ४३५/८ या धावसंख्येवर डाव घोषित केला. हॅरी ब्रुकने १८९ व जो रूटने नाबाद १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव फक्त २०९ धावात संपला व फॉलोऑन स्वीकारा लागला.

दुसऱ्या डावात न्यूझीलंडने टिच्चून फलंदाजी केली. कॉन्वे ६१, लाथम ८३, केन विल्यम्सन १३२, मिचेल ५४, ब्लंडेल ९० यांनी न्यूझीलंडला ४८३ पर्यंत नेले. चौथ्या दिवशी खेळ.संपताना २५८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंड ३९/१ होता. आज ५ व्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच इंग्लंडची अवस्था ८०/५ अशी वाईट झाली. आता सामना न्यूझीलंडकडे झुकला होता. परंतु बेन स्टोक्स व जो रूट या दोघांनी पडझड थांबवून इंग्लंडला २०० पर्यंत नेले. सामना परत इंग्लंडच्या हातात आला होता. २०१ धावसंख्या असताना बेन स्टोक्स ३३ धावांवर बाद झाल्यानंतर अजून २ फलंदाज झटपट बाद होऊन इंग्लंड २१५/८ या धावसंख्येवर अडखळले. आता सामना पुन्हा न्यूझीलंडच्या हातात आला होता. परंतु यष्टीरक्षक बेन फोक्सने हार मानली नाही. जॅक लीचला बरोबर घेऊन तो विजयाच्या दिशेने वाटचाल करू लागला. २२०/८, २३०/८, २४०/८, २५०/८ अशी वाटचाल सुरू राहिली. लीच धावा न करता फक्त बाद न होण्याचे काम करीत होता. २५१/८ असताना बेन फोक्स ३५ धावांवर बाद झाला. २५१/९ आणि दोन्ही संघांना समान संधी.

आता फक्त ७ धावा हव्या होत्या. ११ वा ४० वर्षीय जेम्स अँडरसन व लीचने किल्ला लढविणे सुरू ठेवले. तब्बल २४ चेंडू निर्धाव खेळल्यानंतर लीचने २५ व्या चेंडूवर खाते उघडले. त्याच षटकात अँडरसनने चौकार मारून धावसंख्या २५६/९ वर नेली.

आता विजयासाठी फक्त २ धावा व बरोबरीसाठी फक्त १ धाव हवी होती. लीचने पुढचे षटक निर्धाव खेळून काढले. नंतरच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर अँडरसन यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला व न्यूझीलंडने केवळ १ धावेने अविश्वसनीय विजय मिळविला. लीच ३१ चेंडूत १ धाव करून नाबाद राहिला.

फक्त १ धावेने विजय मिळविण्याची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही फक्त दुसरी कसोटी. १९९३ मध्ये वेस्ट इंडीजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध १ धावेच्या फरकाने विजय मिळविला होता.

कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले.

इंग्लंडला हॅरी ब्रुक हा एक खूप चांगला फलंदाज मिळाला आहे. आतापर्यंत ६ कसोटी सामन्यात ८०.९० सरासरीने ८०९ धावा (त्यात ४ शतके व ३ अर्धशतके) ही त्याची कामगिरी आहे. जो रूट खूप भरात आहे. ३६ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉड, ४० वर्षीय जेम्स अँडरसन व ३४ वर्षीय टिम सौदी हे जुने खेळाडू अजूनही चांगली गोलंदाजी करून बळी मिळवित आहेत. अँडरसनची कारकीर्द २० वर्षां हून अधिक आहे. ब्रॉड व सौदी १५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत.

प्रतिसाद वाचतानाच थरारक वाटत होते. सामना बघितला नाही. क्षणचित्रे नंतर बघेन.

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2023 - 6:14 pm | श्रीगुरुजी

या सामन्यात इंग्लंडने दोन चुका केल्या. पहिल्या प्रतिषटक ५ धावांच्या गतीने ४३५ धावा केल्यानंतर ५०० धावा करून डाव घोषित करायला हवा होता. परंतु त्यांनी जरा घाई केली. दुसरी चूक म्हणजे न्यूझीलंडला फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करून ४००+ धावांचे लक्ष्य दिले असते तर सामना बहुतेक जिंकला असता. फॉलोऑन न दिल्याने दमलेल्या इंग्लंडच्या गोलंदाजांना सलग जवळपास अडीच दिवस २१५ षटके गोलंदाजी करावी लागली व न्यूझीलंडने त्याचा पुरेपूर फायदा उचलून ४८३ धावा केल्या.

फॉलोऑन मिळालेल्या संघाने सामना जिंकण्याची ही चौथी वेळ.

मॅककलम च्या शिकवणी खाली इंग्लंड फारच आक्रमक खेळतो आहे.

श्रीगुरुजी's picture

28 Feb 2023 - 7:23 pm | श्रीगुरुजी

मॅकलमने नवीन बॅझबॉल धोरण आणले आहे. त्यानुसार कसोटी क्रिकेट एकदिवसीय सामन्याप्रमाणे आक्रमकपणे खेळले जात आहे.

सुजित जाधव's picture

28 Feb 2023 - 7:08 pm | सुजित जाधव

कसोटी क्रिकेट फक्त जिवंतच नाही तर अजूनही क्रिकेटच खरं स्वरूप हे कसोटी क्रिकेटच आहे हे आजच्या सामन्याकडे पाहून कळतं. इंटरनेटच्या फास्ट फॉरवर्ड युगात कसोटी क्रिकेटचा वेग वाढला असला तरी खेळाडूंचा खरा कस आणि त्यांचं कौशल्य इथेच पणाला लागतं. पहिले दोन दिवस पावसामुळे षटकं वाया गेली नसती तर हा सामना चौथ्या दिवशीच संपला असता.

उद्या पासून सुरु होणाऱ्या भारत वि. कांगारू तिसऱ्या सामन्याकडे आता डोळे लागले आहेत. के. एल. राहुल ऐवजी बहरदार फॉर्म मध्ये असलेल्या शुभामन गिलला संधी मिळणार का? हा कळीचा मुद्दा आहे. मागच्या सामन्यात ४४ धावा काढणारा विराट कसोटीतील शतकांचा दुष्काळ कधी संपवणार, पुजाराचा फॉर्म अश्या आणखी काही समस्या आहेतच.
कमिन्स, वॉर्नर यांची अनुपस्थिती तर स्टार्क, ग्रीन यांचा समावेश व स्टीव्ह स्मिथ कडे आलेली कर्णधारपदाची धुरा या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया भारतापुढे आव्हान उभे करणार की पुन्हा एकदा भारतीय फिरकीपुढे येणारा प्रत्येक चेंडू स्विप करत लोटांगण घालणार याची समस्त क्रिकेटप्रेमींना आस लागलेली असेल.
व्हाइट बॉल क्रिकेट मध्ये धावांची बरसात अनुभवणाऱ्या छोट्याशा इंदोर स्टेडियमवर धावांचा पाऊस पडणार की नागपूर आणि दिल्ली प्रमाणे इथेही फिरकीपटुंचीच चलती राहणार हे पाहावं लागेल..

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2025 - 3:11 pm | श्रीगुरुजी

१९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानमध्ये चँपियन्स करंडक स्पर्धा सुरू होत आहे. यात भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश व अफगाणिस्तान या क्रमवारीतील पहिल्या ८ संघांचा समावेश आहे. अंतिम सामना ९ मार्चला आहे.

चँपियन्स करंडकातील मागील स्पर्धा २०१७ मध्ये झाली होती. त्यानंतर ८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पुन्हा स्पर्धा होत आहे. मागील काही वर्षांत ट-२० सामन्यांचे प्रस्थ खूप वाढल्याने चँपियन्स करंडक स्पर्धेला मागे टाकले गेले. त्यामुळे २०१७ नंतर एकदिवसीय सामन्या़च्या दोन विश्वचषक स्पर्धा झाल्या तर ट-२० विश्वचषकाच्या ४ स्पर्धा झाल्या. सुदैवाने आता पुन्हा एकदा ही स्पर्धा होत आहे. यापुढे ही स्पर्धा नियमित सुरू होईल ही आशा आहे.

या स्पर्धेत भारताची आजवरची कामगिरी चांगली आहे.
२००० मध्ये भारत अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून हरला होता. नंतर २००२ मध्ये भारत व श्रीलंका संयुक्त विजेते होते. कारण सलग २ दिवस चाललेल्या पावसामुळे अंतिम सामना पूर्ण होऊ शकला नव्हता. २०१३ मध्ये अंतिम फेरीत भारताने इंग्लंडला हरवून विजेतेपद मिळविले होते. २०१७ मध्ये अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा दारूण पराभव केला होता.

यावर्षी पहिल्या गटात भारत, पाकिस्तान, बांगलादेश व न्यूझीलंड आहेत तर दुसऱ्या गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, आफ्रिका व अफगाणिस्तान आहेत.

भारताचा हुकुमी एक्का बुमराह दुखापतीमुळे संघात नाही. स्टार्क, कमिन्स, हेझलवूड व मिचेल मार्श दुखापतीमुळे संघात नसल्याने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी अत्यंत दुबळी दिसत आहे.

एकंदरीत भारत, पाकिस्तान, आफ्रिका व न्यूझीलःड हे उपांत्य फेरीत येतील असं आता वाटतंय.

भारताचे सर्व सामने दुबईत खेळले जाणार आहेत. अंतिम सामन्यात भारत असेल तर सामना दुबईत होईल, अन्यथा पाकिस्तानात होईल.

भारत गुरूवार २० फेब्रुवारीला बांगलादेशविरूद्ध, रविवारी २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरूद्ध व रविवार २ मार्चला न्यूझीलंडविरूद्ध खेळेल.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2025 - 7:36 pm | अमरेंद्र बाहुबली

क्रिकेट ह्या डोकेदुखीचे गारुड भारतीय समाजमनावरून कमी होतेय ही आनंदाची गोष्ट आहे. क्रिकेटभक्त अश्या काही स्पर्धा सुरू झाल्या की समजला त्रास द्यायला लागतात, कामावरून दांडी मारणे, लोकाना स्कोर विचारून हैराण करणे, फटाके , डीजे वाजवून लोकाना त्रास देणे वगैरे प्रकार होतात! हे सगळे प्रकार करताना बीसीसीआय चा संघ हा अधिकृत भारत सरकारचा संघ नसतो हे त्यांच्या गावीही नसते, जो बीसीसीआय चा नी भारत सरकारचा काहीही संबंध नाही, बीसीसीआय ही खासगी संस्था आहे त्यामुळे त्या संघाला देशाशी जोडून देशप्रेमाचे भरते येऊ नये. कारण क्रिकेट हा खेळ नसून व्यवसाय आहे, अनेक लोक वेगवेगळ्या बेटिंग ऍप वरून पैसे घालवतात, सट्टाबाजार तर करोडोमध्ये लोळतो. हाफ्ते पोहोचत असल्याने सरकारला ह्यासगळ्याशी काहीही देणेघेने नसते! त्यामुळे मॅच फिक्स नसतात हे कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही!
त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी बीसीसीआयचा संघ ह्या स्पर्धेतून लवकर बाहेर होवो नी भारतीयाना क्रिकेटभक्तांचा त्रास कमी होवो ह्यासाठी शुभेच्छा!

मुक्त विहारि's picture

18 Feb 2025 - 3:49 am | मुक्त विहारि

मनोरंजक प्रतिसाद....

सौंदाळा's picture

17 Feb 2025 - 9:28 pm | सौंदाळा

ट-२० मुळे कसोटी क्रिकेटला फटका बसेल असे १५ वर्षांपूर्वीचे अंदाज होते.
पण कसोटीऐवजी ट-२० चा फटका एकदिवसीय सामन्यांना बसला असे वाटते.
इग्लंड विरुद्ध भारतीय संघ चांगला खेळला पण तरीसुध्दा मला संघ बेभरवशी वाटत आहे.
बघू, स्पर्धेची रंगत हळूहळू वाढत जाते का?

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2025 - 9:37 pm | श्रीगुरुजी

आता हळूई ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचे पुनरागमन होतंय. ट-२० खरा फटका एकदिवसीय सामन्यांना बसतोय.

भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड एकाच गटात असल्यामुळे यापैकी दोनच संघ सेमीफायनल la jau शकतात, न्यूझीलंड च्या जागी इंग्लंड हवे

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2025 - 12:32 pm | श्रीगुरुजी

हो, ते लक्षातच आलं नाही. भारत, पाकिस्तान, आफ्रिका व इंग्लंड/ऑस्ट्रेलिया हे उपांत्य फेरीत असतील असं वाटतंय.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2025 - 8:43 pm | श्रीगुरुजी

कल्टी मारा येथून. हा धागा क्रिकेटप्रेमींसाठी आहे. क्रिकेट आवडत नसेल तर येथे फिरकू नये. येथे येण्याची कोणावरही सक्ती नाही. मला शास्त्रीय संगीत आवडत नाही म्हणून मी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात जाऊन शिव्या दिल्या तर जमलेले रसिक चपलेने सडकून हाकून लावतील. आपला अजिबात संबंध नाही अश्या ठिकाणी घुसून तंगडी वर करणे बंद करा.

अमरेंद्र बाहुबली's picture

17 Feb 2025 - 9:12 pm | अमरेंद्र बाहुबली

सहमत आहे.
क्रिकेट आवडत नसेल तर येथे फिरकू नये. तसेच ज्याना क्रिकेट आवडत नाही त्यांना त्रासही देऊ नये, तसेच बीसीसीआय च संघ जिंकला म्हणून रस्ता अडवून नाचगाणेही करून लोकांना त्रासही दिला जाऊ नये.

मला शास्त्रीय संगीत आवडत नाही म्हणून मी सवाई गंधर्व संगीत महोत्सवात जाऊन शिव्या दिल्या तर जमलेले रसिक चपलेने सडकून हाकून लावतील. सहमत! शास्त्रीय संगीतवाले रस्ता अडवून क्रिकेटप्रेमींसारखा धिंगाना घालत नाहीत. हेच क्रिकेटप्रेमिनीही पाळायला हवे, पण वर उल्लेखल्याप्रमाणे समाजाला त्रास दिला जातो.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2025 - 9:28 pm | श्रीगुरुजी

गाडी आली की रस्त्याच्या कडेला बसलेली लूत भरलेली मरतुकडी कुत्री उठून भुंकत गाडीमागे पळत जातात आणि गुमान शेपूट घालून परत येऊन पुढच्या गाडीची वाट पहात सावलीत बसतात. तसंच क्रिकेट विषय आला की काही जण लगेच उठून भुंकायला लागतात.

वामन देशमुख's picture

18 Feb 2025 - 12:02 am | वामन देशमुख

गाडी आली की रस्त्याच्या कडेला बसलेली लूत भरलेली मरतुकडी कुत्री उठून भुंकत गाडीमागे पळत जातात आणि गुमान शेपूट घालून परत येऊन पुढच्या गाडीची वाट पहात सावलीत बसतात. तसंच क्रिकेट विषय आला की काही जण लगेच उठून भुंकायला लागतात.

त्या लोकांना भुंकायला कुठल्याही विषय चालतो. कित्येकदा तर भुंकायला विषयाचीही गरज नसते!

---
मला क्रिकेटात फारसं गम्य नाही तथापि, "I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it." या भूमिकेतून वरचा प्रतिसाद दिलाय.

धनावडे's picture

20 Feb 2025 - 8:15 pm | धनावडे

सगळ्याच क्रीडा संघटना स्वतंत्र असतात, प्रत्येक्ष राजकीय हस्तक्षेप असला की ती संघटना निलंबित केली जाते, पण एवढी समज आहे कुठे त्यांना.

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2025 - 8:18 pm | श्रीगुरुजी

आपल्याला कोणत्याच विषयात समज नाही याची सुद्धा समज नाही.

श्रीगुरुजी's picture

20 Feb 2025 - 9:52 pm | श्रीगुरुजी

लगेच प्रत्यंतर आलं.