टिकली
मंगळसूत्र
जोडवी
बाईचं बाईपण
घराला घरपण
रूढी परंपरा
संस्कृतीचा हाकारा
पोरीची जात
सातच्या आत घरात
दिवसाउजेडी बलात्कार
तुझ्याच छातीचे उभार
हसलीस, तर दुर्योधन चिडेल
फसलीस, तर रावण पळवेल
रेषेच्या आत
सगळं काही चालेल
रेषेच्या पलीकडे
अग्निपरिक्षा लागेल
तुझ्या नावानंच सगळे
देतील शिव्या
तुझ्या अंगी मात्र
सोशिकपणा हवा
आपले आदर्श महान
आपली संस्कृती महान
तुला दिलंय की आम्ही त्यात
महत्वाचे स्थान
तू देवीचे स्वरूप
शिवाय भारतमातेचं रूप
.
.
.
वगैरे वगैरे चं बोचकं
एकदा तुला दिलं
की आम्ही मोकळे
'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' चा ढोल बडवायला
प्रतिक्रिया
4 Nov 2022 - 11:03 am | सस्नेह
खरंय..!
आता अलिकडे हळूहळू चित्र निश्चितपणे बदलत आहे.
4 Nov 2022 - 11:07 am | श्वेता२४
बरोबर आहे...
28 May 2023 - 6:24 am | कुमार१
बरोबर आहे...
28 May 2023 - 1:58 pm | Bhakti
छान लिहिलंय!
29 May 2023 - 11:30 am | आंद्रे वडापाव
5 Jun 2023 - 3:55 pm | चलत मुसाफिर
नारीची खेटरपूजा नारीच करीत आहेत. दृश्य पाहून संतोष जाहला. लायकीप्रमाणे पूजा व्हावी.
5 Jun 2023 - 4:37 pm | चंद्रसूर्यकुमार
याविषयी दुसर्या धाग्यातील चर्चेत लिहिले आहे. साक्षी मलिक आणि तिच्याबरोबरच्या कुस्तीपटू मागच्या रविवारी दिल्लीत नव्या संसदभवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता तिथे जाऊन तमाशा करायच्या उद्देशाने तिथे गेलेल्या होत्या. दिल्लीतील सगळ्यात जास्त काटेकोर सुरक्षा असलेल्या भागात संसदभवनाचा समावेश होतो (विशेषतः २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यापासून). तिथे जायचे असेल तर विहित प्रक्रीया पार करूनच (पास घेणे वगैरे) जावे लागते. तसे न करता तिथे कोणीही घुसायला लागल्यास पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे? खरं तर असे करणार्यांना उचलून तिथून हाकलून दिले नाही तरच पोलिसांना जाब विचारायला हवा. तसेच त्या दिवशी नव्या संसदभवनात पंतप्रधान आणि बरेच खासदार उपस्थित होते म्हणजे संसदेचे अधिवेशन चालू असताना जशी सुरक्षा असते तशीच त्या दिवशी तिथे असेल अशी अपेक्षा करायला हरकत नसावी. अशा वेळेस आणि अशा ठिकाणी उठसूट कोणीही घुसून तमाशा करायला लागला तर ते कसे चालेल? पोलिसांनी जे काही केले ते अगदी योग्यच केले.
त्या दिवशी साक्षी मलिक आणि इतर जणी तिथे तमाशा करायच्या उद्देशाने जाणार आहेत हे त्यांनी आधीच जाहीर केले होते. बहुदा त्यामुळे (किंवा अन्यथाही संसदभवनाच्या सुरक्षेसाठी) तिथे पुरेशा प्रमाणावर स्त्री पोलिस उपलब्ध होत्या.आपल्याकडे काहीकाही कायदे आणि नियम अनाकलनीय आहेत. त्याप्रमाणे कोणी स्त्री असले तमाशे करायला लागली तर तिला उचलायला स्त्री पोलिसच असायला लागतात. जिथे स्त्री पोलिस असतील तिथे अर्थातच ते काम त्यांनीच करावे पण सगळीकडे पोलिस, आणि त्यातूनही पुरेशा प्रमाणावर स्त्री पोलिस हजर असतात का? मागे सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आमच्या नवी मुंबईत एक तरूणी दारूच्या नशेत रस्त्यावर धिंगाणा करत होती आणि पोलिसांना मारत होती. पण स्त्री पोलिस येईपर्यंत तिथे समोर असलेल्या पोलिसांना काहीही करता आले नाही आणि ते बघत बसले. हा काय फालतूपणा आहे?पोलिसांच्या अंगावर हात टाकणे हा जगातील सगळ्या देशांमध्ये गुन्हाच समजला जातो- निदान आपल्याकडे तरी आहे. अशावेळेस त्या तरूणीला आवरायला स्त्री पोलिस यायची वाट का बघायची? एखाद्या पोलिसाने तिच्या कंबरड्यात सणसणीत लाथ घातली असती तर ती तरूणी गपगुमान सरळ आली असती.पण तसे केले असते तर त्या पोलिसावरच विनयभंगाची कारवाई झाली असती. याला काय अर्थ आहे? एल.टी.टी.ई या दहशतवादी संघटनेने दहशतवादी कारवायांमध्ये स्त्री केडरचा भरपूर वापर वेळोवेळी केला होता. राजीव गांधींची हत्या झाली ते करणारी मानवी बॉम्ब पण स्त्रीच होती. अशी वेळ कधी आली तर मग स्त्री पोलिस यायची वाट बघत बसायची का?
5 Jun 2023 - 2:50 pm | अहिरावण
अमेरीकेत किंवा विलायतेत असलं काही नसतं म्हणे... तिथे नारींची खूप पूजा केली जाते असे ऐकिवात आहे.
https://legaljobs.io/blog/sexual-assault-statistics/
6 Jun 2023 - 7:17 pm | राजेंद्र मेहेंदळे
आवडली असे म्हणवत नाही. पण पटली.