ओल्या नारळाची बर्फी

Bhakti's picture
Bhakti in पाककृती
12 Aug 2022 - 11:53 am

करायला गेले नारळाची वडी झाली नारळाची चिक्की
असो.
साहित्य:
S
एक फुलपात्रं ओल्या नारळाचा चव
अर्धे फुलपात्रं साखर
दोन चमचे तूप
विलायची पावडर
रोझ सिरप २-४ चमचे
मिल्क पावडर/दुधाची साय
सजावटीसाठी सुका मेवा

नानस्टिक कढईत साजूक तूप किंचित गरम करायचे.

ओल्या नारळाचा चव (काळा भाग नको शक्यता) आणि साखर एकत्रित करून कढईत परतायची.मंद आच ठेवायची.

साखर विरघळली की त्यात विलायची पूड,रोझ सिरप टाकायचा.मिश्रण परतत राहायचे.

न्यूटनचा नियमानुसार उचटन सरळ उभं राहिलं की गॅस बंद करायचा किंवा मिश्रणाचा छोटा पेढ्या एवढा गोळा झाला की बंद करायचा.

तूप लावलेल्या ताटात किंवा बटर पेपर असलेल्या केकच्या भांड्यात गरम वड्या थापायच्या.

सुकामेव्याने सजावट करायची.
गुलाबी मस्त ओल्या नारळाची बर्फी तयार.
9

A

(माझा संशय मिल्क पावडर वर आहे मी ती जास्त वापरली म्हणून चिक्की तयार झाली,पण चवीला मस्त झाली )

-भक्ती

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

12 Aug 2022 - 2:53 pm | प्रसाद गोडबोले

वाह , सुंदर !
फुलपात्र हा शब्द जमान्यानंतर ऐकला , आज्जीची आठवण झाली :)

Bhakti's picture

12 Aug 2022 - 3:35 pm | Bhakti

:)

मुक्त विहारि's picture

12 Aug 2022 - 7:25 pm | मुक्त विहारि

फोटो चांगले आहेत

Bhakti's picture

13 Aug 2022 - 6:52 am | Bhakti

:)

वामन देशमुख's picture

12 Aug 2022 - 7:55 pm | वामन देशमुख

पाकृ आणि फोटो आवडले.

Bhakti's picture

13 Aug 2022 - 6:51 am | Bhakti

:)

कर्नलतपस्वी's picture

12 Aug 2022 - 9:39 pm | कर्नलतपस्वी

लहानपणी काजुकंदाची वडी खायचो,अशीच दिसायची. आजुनही चितळ्यांकडे मीळते.
स्वयंपाक घराशी वावडे असल्याने रेसिपीज कथे सारख्या वाटतात.

कथा एका नारळाच्या बर्फीची.

फोटो मस्त.

Bhakti's picture

13 Aug 2022 - 6:51 am | Bhakti

:)

भारीच झाली की नारळाची बर्फी. रंग एकदम मस्त आलाय.

Bhakti's picture

13 Aug 2022 - 11:17 am | Bhakti

:)

सरिता बांदेकर's picture

13 Aug 2022 - 6:06 pm | सरिता बांदेकर

मस्त पाककृती आहे.
होय मिल्क पावडर घातली की रवाळपणा येत नाही.
मला पण नेहमी हा प्रॅाब्लेम येतो, जेव्हा मिल्क पावडर वापरायला लागते.

होय मिल्क पावडर घातली की रवाळपणा येत नाही.

उलट पदार्थाचा चिकटपणाच वाढला.
प्रतिसादासाठी धन्यवाद!

नचिकेत जवखेडकर's picture

15 Aug 2022 - 10:00 am | नचिकेत जवखेडकर

वा! छानच दिसतायत वड्या

श्वेता व्यास's picture

15 Aug 2022 - 1:35 pm | श्वेता व्यास

छानच दिसत आहेत वड्या!

विवेकपटाईत's picture

17 Aug 2022 - 10:19 am | विवेकपटाईत

मस्त आवडली

राघव's picture

17 Aug 2022 - 1:53 pm | राघव

रंग टाकणे जरूरीच का? तशी चांगली लागतेच की! :-)

मला आवड आहे वेगवेगळे प्रयोग करायची.आणि तो रंग ‌नाही गुलाब सिरप आहे :)
सर्वांना धन्यवाद :)