ओल्या नारळाची बर्फी
करायला गेले नारळाची वडी झाली नारळाची चिक्की
असो.
साहित्य:
एक फुलपात्रं ओल्या नारळाचा चव
अर्धे फुलपात्रं साखर
दोन चमचे तूप
विलायची पावडर
रोझ सिरप २-४ चमचे
मिल्क पावडर/दुधाची साय
सजावटीसाठी सुका मेवा
नानस्टिक कढईत साजूक तूप किंचित गरम करायचे.
ओल्या नारळाचा चव (काळा भाग नको शक्यता) आणि साखर एकत्रित करून कढईत परतायची.मंद आच ठेवायची.
साखर विरघळली की त्यात विलायची पूड,रोझ सिरप टाकायचा.मिश्रण परतत राहायचे.
न्यूटनचा नियमानुसार उचटन सरळ उभं राहिलं की गॅस बंद करायचा किंवा मिश्रणाचा छोटा पेढ्या एवढा गोळा झाला की बंद करायचा.
तूप लावलेल्या ताटात किंवा बटर पेपर असलेल्या केकच्या भांड्यात गरम वड्या थापायच्या.
सुकामेव्याने सजावट करायची.
गुलाबी मस्त ओल्या नारळाची बर्फी तयार.
(माझा संशय मिल्क पावडर वर आहे मी ती जास्त वापरली म्हणून चिक्की तयार झाली,पण चवीला मस्त झाली )
-भक्ती
वाचने
8579
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वाह , सुंदर !
In reply to वाह , सुंदर ! by प्रसाद गोडबोले
:)
फोटो चांगले आले आहेत
In reply to फोटो चांगले आले आहेत by मुक्त विहारि
:)
पाकृ आणि फोटो आवडले.
In reply to पाकृ आणि फोटो आवडले. by वामन देशमुख
:)
मस्त...
In reply to मस्त... by कर्नलतपस्वी
:)
भारीच झाली की नारळाची बर्फी.
In reply to भारीच झाली की नारळाची बर्फी. by प्रचेतस
:)
मस्त
In reply to मस्त by सरिता बांदेकर
होय मिल्क पावडर घातली की
वा! छानच दिसतायत वड्या
छानच दिसत आहेत वड्या!
मस्त आवडली
भारी
In reply to भारी by राघव
मला आवड आहे वेगवेगळे प्रयोग