धारावाहिक भयकथा : तृष्णा - भाग १

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
29 Jul 2022 - 2:50 pm

रात्रीचे २ वाजले होते. संदीप आपल्या गाडींत कुडकुडत बसला होता. समोरील रस्ता सुनसान असला तरी एक श्वान पथदिपाच्या खाली शेपूट हलवत पडले होते. आजूबाजूच्या छोट्या इमारती अगदी मृतवत शांत होत्या. चुकूनच एखाद्याने गॅलरीतील दिवा चालू ठेवला होता. संदीपच्या हृदयाची धकधक वाढत चालली होती. डाव्या बाजूच्या स्मशानाची गेट बंद होती. त्याने हातातील फोन कडे पहिले. चित्राला पुन्हा एकदा फोन करू का ? तिच्या कडे बोलताच त्याच्या मनात अवसान उत्पन्न झाले असते. उजव्या बाजूला पर्वतावर वाहने अजून चालू होती.त्यांचा उजेड इतक्या दुरून काजव्यांच्या शिस्तबद्ध हालचालीपरामें वाटत होता.

अगडंमवाडी शहराचे नाव लहानपणी गोष्टीच्या पुस्तकांतील एखाद्या काल्पनिक गावाच्या नावाप्रमाणे वाटत होते. चित्राशी लग्न होताच संदीप चे आयुष्य पालटले. चित्रा अप्सरे प्रमाणे सुंदर, लाघवी आणि प्रेमळ होती. कधीही स्त्री स्पर्श न केलेल्या संदीपला जणू सौंदर्याची लॉटरी लागली होती. प्रत्येक रात्रीचे शरीर सुख जणू प्रथम असावे असा अनुभव त्याला येत होता. पण त्याच वेळी, मुंबई शहरांतील आपला तो पगार किती तुटपुंजा होता ह्याची जाणीव सुद्धा प्रत्येक क्षणी होत होती. चित्राने कधीही तक्रार केली नसली तरी त्यालाच मनातून ते खात होते. चित्राला नोकरी करायची नव्हती आणि त्यांच्या प्रेमाला मुबईचा तो खुराडे वजा फ्लॅट अगदीच छोटा वाटत होता. रोज रोज बाहेर खाणे, प्रत्येक विकेंड ला चित्रपट किंवा कुठे बाहेर जाणे. मॉल मधील शॉपिंग. खर्चाचा डोंगर दिवसेंदवस सर करणे कठीण जात होते.

पण ह्यांतून अनपेक्षित पाणे मार्ग चित्रानेच काढला. चित्राचे काका वारले. मुंबईहुन ४ तासांच्या वाटेवर असलेले अगडंमवाडी हे छोटे शहर काकांची कर्मभूमी होती. तेथे त्यांचे प्रशस्त असे घर होते. संदीपची नोकरी रिमोट असल्याने इंटरनेट मिळाला तर त्याला तिथे राहणे सहज शक्य होते. महिन्यातून एकदा ऑफिस ला जाणे सुद्धा शक्य होते. त्यामुळे आधी त्याने आणि चित्राने अगडंमवाडी पाहून यायचे ठरवले. अगडंमवाडी पाहून संदीप थक्क झाला. अगडंमवाडी हे खेडेगांव नसून एक छोटे शहर होते. इथे काही डोंगरांवर एक दुर्मिळ प्रकारचे दगड असल्याने तिथे त्यांचे खाण काम होते असे. शेकडो मोठे ट्रक्स, मोठं मोठी शेवाळे इथे २४ तास चालत. डोंगरातून महा प्रचंड दगड कापून मागे ते जवळच्या कारखान्या जात, तिथे त्यांना आकार देऊन मग मुंबई च्या मार्गाने ते विदेशांत जात. खाणकाम करण्यासाठी सर्व राज्यांतून मोठया प्रमाणावर कामगार अगडंमवाडी गावांत स्थायिक होते. खाणकाम हे धोक्याचे असल्याने अपघात नित्याची बाब होती त्यामुळे मोठे  हॉस्पिटल होते. एक शाळा. ट्रक्स आणि इतर वाहने जास्त असल्याने रस्ते सुद्धा प्रशस्त होते. फक्त खाणकामाची धूळ हवेंत असायची पण त्याकडे दुर्लक्ष करणे संदीप आणि चित्रा दोघांनाही शक्य होते.

अगडंमवाडी ची संदीप आणि चित्राला सर्वांत आवडलेली गोष्ट मात्र हि होती कि गांवाच्या पायथ्याला असलेले सरोवर. ह्याला अछोडे असे नाव होते. संपूर्ण अगडंमवाडी खरे म्हणजे ह्या सरोवराच्या भोवताली वसला होता. नगरपालिकेने इथे एक टुमदार पार्क सुद्धा बनवले होते. काकांचे घर सुद्धा सरोवराच्या जवळ होते. अगडंमवाडी स्मशानभूमी ज्याच्या पुढे संदीप ची गाडी सध्या पार्क केली होती ते सुद्धा सरोवराच्या किनार्यालाच होते.

अगडंमवाडी चे घर ताब्यांत घेऊन चित्रा आणि संदीप ने मेहनत घेऊन साफ केले. इंटरनेट सेवा घेतली. केबलवाला सुद्धा केबल बसून गेला. काही दिवसांत ट्रक ने त्यांचे मुंबईतील सर्व सामान सुद्धा पोचले. लाईफ अगदी सेट झाल्या सारखे वाटत होते आणि इतक्यांत संदीप आणि चित्राच्या संसाराला दृष्ट लागली. युक्रेन वर रशियाचे आक्रमण झाले, त्यामुळे युरोप मधील वातावरण ढवळले गेले आणि संदीप ज्या सॉफ्टवेर कंपनीसाठी काम करत होता त्यांचे काँट्रॅक्त्त रद्द झाले. संदीप ची नोकरी गेली नसली तरी पगार अर्धा झाला. इतकेच नव्हे तर तो आता शहरापासून दूर असल्याने नवीन नोकरी शोधणे कठीण झाले.

पुन्हा तीच आर्थिक चणचण ! आणि ह्यातून सुद्धा अगदी अनपेक्षीत पणे मार्ग चित्रानेच काढला आणि तो सुद्धा इतका विचित्र.

चित्राचे मृत काका ह्यांनी चित्रासाठी एक डायरी ठेवली होती. त्यांत त्यांनी विविध गोष्टी लिहिल्या होत्या. संदीपला असल्या गोष्टी अजिबात आवडत नसल्याने त्याने डायरीला हात सुद्धा लावला नव्हता पण चित्राने ती वाचली होती. चित्राचे काका ज्यांना त्यांच्या परिवाराने नालायक म्हणून घरातून हाकलले होते, ज्यांनी दारू आणि जुगाराच्या आहारी जाऊन आयुष्य बरबाद करून घेतले होते त्यांनी ह्या गावांत येऊन बऱ्यापैकी आयुष्याची घडी घातली होती. त्यांना बायका मुले नसली तरी घर मोठे, आणि चांगले ठेवलेले होते.  घराच्या बाहेर चांगले मोठे गार्डन, तिथे आंबे, पेरूची झाडे. घरांतील भिंतीवर डोळ्यांत भरतील अशी पेंटिंग्स आणि जुन्या मूर्ती इत्यादी होत्या.आणि हा कायापालट त्यांनी कसा सिद्ध केला ह्याची माहिती चित्राला त्या डायरी मधूनच मिळाली.

"अरे अगदी छोटीशी गोष्ट आहे. करून पाहू ना संदीप. काकांना ह्या विषयाची खूप माहिती होती. नुकसान तरी होणार नाही ना ?" असे म्हणून तिने गोडीने संदीप ला समजावले होते. आयुष्यभर संदीप नेहमीच सध्या सरळ मार्गावरील मुलगा होता आणि म्हणूनच त्याला भीती वाटत होती. खाणीतील अपघात वारंवार व्हायचे. अनेक मजूर ओरिसा, बिहार मधील गरीब लोक असायचे. मेला तर कंपनी त्याची जबाबदारी कंत्राटदारांवर ढकलायची आणि कंत्राटदार मग ताबडतोब मजुराला स्मशानात नेवून त्याची विल्हेवाट लावायची. नाहीतर पोलीस वगैरे चौकशा मागे लागायची भीती होती. स्मशानात त्यामुळे रात्री एखादे दुसरे शव असायचेच. मग सकाळी भटजी आणि चांडाल येऊन सोपस्कार करायचे. पैसे कंत्राटदार द्यायचा. संदीप ने माहिती काढली होती.

गाडीत बसून संदीप विचार करत होता आणि इतक्यांत त्याचा फोन वाजला. दुसऱ्या बाजूला चित्रा होती. "अरे सर्व तयारी झाली आहे. तू घेऊन ये लवकर." ती सांगत होती. दूरवरून मोटारसायकल गेल्याचा आवाज आला आणि संदीप दचकला. कुणी पाहणार तर नाही ना ? आजूबाजूच्या इमारतीत कुणी जागा असेल तर ? अनेक विचार येत होत . आवाज कापरा होता. चित्राने त्याची मनस्थिती ओळखली होती. "अरे घाबरू नकोस. तू काही गुन्हा करत नाही आहेस. कुणीही पहिले तर ठरविल्या प्रमाणे अस्थि विसर्जनासाठी आलो होतो असे सांग". चित्राने आणि त्याने आधी तयारी केली होती. आपला कुत्रा वारला आणि त्याचे शरीर जाळले आणि आपल्या पुरोहिताने त्या अस्थी घरी न ठेवता स्मशानात फेकाव्या असे सांगतले आहे म्हणून आपण स्मशानात आलो होतो अशी थाप त्यांनी बऱ्यापैकी रिहर्स केली होती. बरोबर एक खोटी पुडी सुद्धा ठेवली होती.

संदीप ने कडकडत्या हातानी गाडीचे दार उघडले. स्मशानाच्या गेटजवळ जाऊन त्याने गेट उघडली. ताच्या हालचालीने ते कुत्रे जे दिव्याखाली लोळत पडले होते ते उठले आणि भुंकू लागले. संदीप मग वेगाने स्मशानात घुसला आणि पळत त्या खोलीकडे गेला जिथे शवे ठेवली जात होती. दरवाजाला कुलूप नव्हते. शवे थोडीच उठून पळून जातात. पुढे अनेक टेबल्स होती त्यातील एका टेबल वर पांढऱ्या कपड्यांत गुंडाळून एक शव ठेवले होते. तो थरथरत त्याच्या जवळ गेला. भीतीने त्याचा रक्तदाब वाढला असला तरी मेंदूने त्याच्या भावना बोथट सुद्धा केल्या होत्या. त्यामुळे भयाचे आवरण मनावर जे पसरले होते ते निघून जात होते. टेबल वर ठेवलेल्या शवाचा चेहेरा त्याने पहिला. कोण असावा हा ? हा मेला आहे हे त्याच्या परिवाराला ठाऊक असेल का ? कुठे तरी ओरिसातील गांवात त्याच्या परिवाराने आनंदाने जेवण करून झोपी जाण्याची तयारी केली असावी आणि उद्या सकाळी पासून ह्याचा फोन लागणार नाही म्हणून ते अस्वस्थ होतील का ? अनेक विचार त्याच्या मनात आले. त्याने खिशांतून झटपट कैची काढली आणि त्या शवच्या डोक्याचे काही केस कापले. लगबगीने खिशांत टाकले आणि तो वेगाने बाहेर गेला. गेटवर पोचताच एक दुचाकीस्वार अत्यंत वेगाने रस्त्यावरून गेला आणि ते नतद्रष्ट कुत्रे पुन्हा भुंकले. काहीही पर्वा न करता संदीप आपल्या गाडीत बसला आणि भरधाव वेगाने त्याने गाडी सोडली. ते केस असलेला त्याचा खिसा त्याला प्रचंड जड वाटत होता. हे आपण नक्की कुठे फसलो ? चित्रावरचे आपले प्रेम आंधळे तर नाही ना ? तिला अंधश्रद्धे पासून दूर ठेवायची जबाबदारी पती म्हणून माझी आहे, मी कमी पडतो आहे का ?

त्याने गाडी घराच्या पुढे घेतली आणि घामाघूम चेहरा घेऊन तो घरांत आला. चित्रा वाट पाहत होतीच. त्या तंत्राचा दुसरा भाग तिलाच करावा लागणार होता. एकवस्त्र आणि एकभुक्त होऊन ती तयार होती. घराच्या मागील दाराने ती परसांत आली. घराभोवती कुंपण होते त्यामुळे त्यांना कुणी पाहण्याची शक्यता नव्हतीच. परसांत एक पारिजाताचे झाड होते त्याच्या खाली एक धुपाटणे ठेवले होते. त्यांत शेणी होती. चित्राने लगबगीने हात पुढे केला आणि संदीपने घाबरत खिशांतून केसांचा तो झुपका बाहेर काढला आणि तिच्या कोमल हातावर ठेवला.

तिने धुपाटण्या पुढे बसून शेणीला आग लावली आणि ते केस त्यांत अर्पित केले. शेणाच्या धुराच्या वासांत त्या केसांच्या जळण्याचा वास मिश्रित झाला. काही क्षण गेले आणि आग विझली. राहिलेल्या राखेतून एक सोन्याची मुद्रा दिसत होती. चित्राने संदीपला इशारा केला आणि त्याने ती उचलली. पण दुसऱ्याच क्षणी त्याला प्रचंड चटका बसला. त्याच्या अपेक्षे पेक्षा ती जास्तच गरम होती. त्या गरमीने त्याचा हात बराच भाजला, त्वचा जळून प्लास्टिक जाळल्या प्रमाणे वास हवेंत पुंन्हा एकदा उत्पन्न झाला.

"चित्रा ... हि सुवर्णमुद्रा ह्यांत निर्माण झालं ? " म्हणजे हि तंत्र प्रक्रिया खरोखरच धन निर्माण करू शकते ? त्याने भाजलेला हात दुसऱ्या हाताने पकडत विचारले. एका बाजूने वेदना आणि दुसऱ्याबाजूने विस्मय अश्या दोन्ही  भावना त्याच्या मनात झिम्मा घालत होत्या.

चित्राने सर्वप्रथम त्याचा भाजलेला हात पकडला आणि त्यावर प्रेमाने फुंकर घातली. "अरे नाही रे, हि सुवर्णमुद्रा काकांचीच आहे. तीच तर तांत्रिक विद्येला शक्ती देते. नाहीतर मढ्याचे केस काय दररोज स्मशानात जाळले जातात. हि मुद्रा ह्या अछोड सरोवरांत होती, तिच्यांत सर्व सिद्धी आहेत. ह्या मुद्रिकेला प्रचंड इतिहास आहे."

"चित्रा हि सिद्धी मला महागात पडेल असे वाटते" त्याने हाताकडे पाहून म्हटले.

"किती बोरिंग आहेस रे तू. तिकडे मुंबईत आम्हाला मॉल्स होते, रेस्टोरंट होते, चौपाटी होती. इथे हे थ्रिल समज ना"

"तिथे चौपाटी आणि इथे काय ? स्मशान ? चित्रा तू सुद्धा ना"

"अरे बेडरूम मध्ये ये. तुला मी मोठे सर्प्राईस देते आज" तिने चावट नजरेने पाहत म्हटले. संदीपच्या शरीरांतील ऍड्रेनॅलीन चा पारा आणि टेस्टोस्टेरॉन चा पारा अचानक वर गेला. ती रात्र खरोखर जादुई वाटली त्याला. चित्राचे शरीर नेहमीपेक्षा जास्तच कठोर नि मुलायम दोन्ही वाटत होते.

सकाळ कधी झाले कळलेच नाही. रेशमी गाऊन घालून चित्रा खिडकी उघडत होती आणि त्यातून येणाऱ्या सूर्यकिरणांनी संदीपला उठवले. सूर्याची किरणे तिच्या गाऊन मधून आरपार जाऊन तिच्या मादक शरीराची बाह्याकृती अधोरेखित करत होती, आंत तिने काहीच घातले नव्हते हे त्याला समजत होते. आणखीन एक सेशन होईल का हा विचार त्याच्या मनात आला. त्याने घड्याळ पहिले तर त्यांत सडे नऊ वाजले होते. "शिट" कमला उशीर झाला होता. त्याच्या मदनतप्त शरीरावर जणू सत्यस्थितीच्या बर्फाचा विश्व झाला आणि तो अत्यंत वेगाने लॅपटॉप जवळ पळाला. त्याने लॉगिन केले.

आणि काही क्षणातच त्याला धक्का बसला. कंपनी CEO ने ऑल हॅन्ड्स घेतली होती. ऐकता ऐकता त्याच्यावर आभाळ कोसळले. कम्पनीला प्रचंड तोटा झाला होता. त्यामुळे मुंबईतील सर्व ऑपेरेशन्स कंपनी बंद करत होती. सर्व लोकांची नोकरी गेली होती. "घंटा तंत्र विद्या ! " तो ओरडलाच. चित्रा पळत पळत आली.

CEO पुढे बोलत होता. "पण सर्व कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची पर्वा कंपनीला आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची पुढील ५ वर्षाची सर्व सॅलरी आम्ही आत्ताच तात्काळ भरपाई म्हणून देत आहोत, त्यामुळे आर्थिक दृष्ट्या सर्वानाच फायदा आहे  ज्यांनी ५ वर्षांपेक्षा जास्त काम केलं आहे त्यांनाच हि रक्कम मिळेल" संदीप चे डोळे विस्फारले. मुंबईतील त्या सेंटर मध्ये फक्त १२ लोक पर्मनन्ट होते त्यापैकी फक्त ३ व्यक्तीनि ५ वर्षापेक्षा जास्त काम केले होते. त्यांत संदीप सुद्धा होता. हिशोब केला. साधारण २५ लाख रुपये एक रकमी मिळणार होते, टॅक्स वगैरे काढून. हे घबाडच होते.

"पाहिलेस संदीप ? तो तांत्रिक तोटका चालला कि नाही ? " चित्राने विचारले .

"पण नोकरी सुद्धा गेली ना ?" त्याने प्रतिप्रश्न केला.

"संदीप, काकांनी काही लिहिले नाही पण अश्या विद्यांचा एक नियम आहे तो म्हणजे जे काही चांगले मिळते त्याची काही न काही किमंत मोजावी लागते. तुझा हात भाजला आणि आज नोकरी गेली. पण लक्षावधी रुपये सुद्धा हाती आले ना ? नोकरी काय दुसरी सुद्धा मिळेल. "

संदीप च्या मनात अजून डाऊट होताच. पण तरी सुद्धा पैसे मिळाले म्हणून तो खुश होता. त्याने पुन्हा चित्राकडे खट्याळ नजरेने पहिले. "हो आणखीन एक मॉर्नींग सेशन हळू शकते हा सुद्धा फायदा आहे बरे का ? " म्हणून तिने त्याला पुन्हा मिठीत ओढले. त्याने दुसऱ्या हाताने लॅपटॉप बंद केला. आता त्याच्याकडे बराच वेळ होता आणि पैसे सुद्धा होते.

horror story

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

29 Jul 2022 - 4:20 pm | कर्नलतपस्वी

सुरवात छान झालीय. कथा लयीत खुलवत आहात.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कानडाऊ योगेशु's picture

29 Jul 2022 - 4:23 pm | कानडाऊ योगेशु

उत्कंठावर्धक. पु.भा.प्र.

तुषार काळभोर's picture

29 Jul 2022 - 4:45 pm | तुषार काळभोर

कथेचं नाव वाचलं. लेखकाचं नाव वाचलं.
चुकल्यासारखं वाटलं.
म्हणून परत एकदा वाचून खात्री केली :)

असो.. अनुभवी लेखिकेसारखं सराईतपणे लिहिलंय. पहिल्यांदाच काल्पनिक लिहिताय का? तसं वाटत नाहिये.

सौंदाळा's picture

29 Jul 2022 - 4:53 pm | सौंदाळा

जबरदस्त
अगडंमवाडी मधील सरोवराचा फोटो पण लाजवाब.
रहस्यकथा, भयकथा यांच्या भागांमधे मोठा गॅप नको. ऱोज एक भाग आलाच पाहिजे ही विनंती.

संजय पाटिल's picture

29 Jul 2022 - 5:18 pm | संजय पाटिल

पु.भा.प्र.

Nitin Palkar's picture

29 Jul 2022 - 7:33 pm | Nitin Palkar

उत्कृष्ट वातावरण निर्मिती. उत्कंठा वर्धक. पु.भा.प्र.

यश राज's picture

29 Jul 2022 - 8:38 pm | यश राज

मस्त चाललीये. लवकर पुढेचे भाग येवू द्या

धर्मराजमुटके's picture

29 Jul 2022 - 8:43 pm | धर्मराजमुटके

छान ! तुमच्या अंगी बर्‍याच लेखनकळा आहेत तर. पुढचे भाग लवकर येऊद्या. हल्ली मिपावर कथा, कादंबर्‍यांचा दुष्काळच पडला आहे.

गवि's picture

29 Jul 2022 - 8:52 pm | गवि

+१

चित्रगुप्त's picture

20 Dec 2022 - 12:19 am | चित्रगुप्त

हा पहिला भाग उत्कंठावर्धक झाला आहे. आता दुसरा वाचतो.