माळावर पडलो
डबके होऊन
आहे अन् मी
असाचं राहीन
मंजूर मजला हे
विश्व थिटे
लखलाभ तुम्हा ते
सागरगोटे
प्यार मजला
माझा चिख्खल
तळातील ती
ओली दलदल
ते म्हशींचे
मजेत डुंबणे
डुकरांचे अन्
सुखनैव लोळणे
बगळ्यांचे ते
ध्यानबहाणे
हळुच गटकन
बेडुक गिळणे
हिंस्र श्वापदे
रात्री येती
पिऊनी जलं हे
तहान मिटविती
कशास तोडू मी
माझी बंधने
नकोच मजला
सागर होणे
नदी नाले अन्
सागर डबके
सृष्टीला तर
सगळेच सारखे
माणूसच करतो
असले भेद
कुणी काळा तर
कुणी सफेद
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 12:50 pm | जागु
कल्पना छान आहे. पण डबक्यापेक्शा नदी मला वाटत जास्त सोइस्कर आहे. तिथेही ह्याच गोष्टी होतात आणि वाहत राहणे हाही प्ल्स पॉइंट आहे.
30 Apr 2009 - 1:55 pm | उदय सप्रे
"ऊठ्सूट इतरांना कमी लेखणार्या काही लोकांची मनोवृत्ती " यावर दिलेले थोडेसे "चपराक" स्टाईल उत्तर वाटते.....
30 Apr 2009 - 7:43 pm | क्रान्ति
वेगळाच विचार मस्त मांडलाय.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
30 Apr 2009 - 8:01 pm | प्राजु
काळा-गोरा, उच्च्-निच.. माणूसच करत असतो. अगदी खरंय!
कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 11:40 pm | बेसनलाडू
पण डबक्याच्या प्रतिमेतून मांडायचा विचार/तत्त्वज्ञान काहीसे कमी पडते आहे, असे वाटते. डबक्याचे एकंदर 'वर्णन' (श्वापदे पाणी पिणे, बगळ्यांनी बेडूक खाणे, म्हशी(?)-डुकरे डुंबणे इ.) कवितेत जास्त व्यापक झाले आहे. त्यामानाने 'विचार' फक्त दुसर्या-तिसर्या नि शेवटच्या दोन कडव्यात येतो आहे, असे वाटले. मला थिटे विश्व-सागरगोटे फार आवडले.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
(आस्वादक)बेसनलाडू
1 May 2009 - 9:03 am | राघव
कविता आवडली.
बेलाचा प्रतिसादही तेवढाच सुंदर!
राघव
1 May 2009 - 9:56 am | भडकमकर मास्तर
कविता वेगळी आहे...
आवडली...
हे आत्मसंतुष्टतेचे कौतुक की त्या कौतुकाचे विडंबन आहे ? असा प्रश्न वगैरे पडला......
अवांतर : मराठी आंतरजालाविषयी काही क्रिप्टिक कॉमेंट आहेत की काय अशा अर्थाने शोध घेतला पण काही सापडले नाही... ;)
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)