ब्रूटस
सीजर कुणीच नव्हता
सारेच ब्रूटस होते.
खंजीरीच्या पात्यांना
रक्ताची तहान होती.
जो पळतो तो जिंकतो
बाजीरावाने घुडदौड केली
निजामचा पराभव केला.
शिंदेंनी विमानदौड केली
उद्धवचा पराभव केला.
दैवयोग
किती षड्यंत्र केले
किती वेश बदलले
नशिबी मात्र माझ्या
फक्त मंत्रिपद आले.
ज्ञानी
लोक रात्री झोपतात
ज्ञानी रात्री जागतात
गीतेचा संदेश हा
शिंदेंना कळला होता.
आजचा पाऊस वेगळा होता
आसामच्या डोंगर-दर्यातून
मुंबईत कोसळला होता.
मर्सडीज पाण्यात बुडाली
रिक्शा तरंगत होता.
नेता
ज्या रंगाची शिकार
त्या रंगाची भूषा.
का सखी सरडा
ना सखी नेता.
प्रतिक्रिया
12 Jul 2022 - 9:49 am | श्वेता व्यास
मस्त :)
18 Jul 2022 - 9:26 am | मनिष
भारी!!!
19 Jul 2022 - 8:04 am | nutanm
वरील पहिल्रया खडव्याच्या ओळी खरच लय भारी , मस्त आहेत. नेहमीच हा अनुभव येतो.
19 Jul 2022 - 8:07 am | nutanm
अशुध्द लेखन झाले आहे, वरील पहिल्या कडव्याच्या या ओळी खरच लय भारी मस्त आहेत.असे वाचावे.