शाहिस्तेखानाने दिलेले उघड आव्हान बघून आम्हाला राहवलं नाही
अभिषेक बच्चन आणि त्याच्या करोडो (? ) पंख्यांना समर्पित....
स्टार हा झाला खरा... अभिषेक बच्चन
अमितजींचा हा हिरा... अभिषेक बच्चन
नाच, दस, दिल्ली सहा, उमराव नि द्रोण
करमणूकीचा झरा?... अभिषेक बच्चन
धुम, गुरू, सरकार, दोस्ताना अन युवा
यात थोडा हा बरा... अभिषेक बच्चन
चोपडा, रामू, मणी आणिक करण जोहर
हेच याचा आसरा... अभिषेक बच्चन
रोल नात्यांचा मुळे प्रत्येक मिळतो
ऍश याचा कासरा... अभिषेक बच्चन
कोणती ती चीज हा खपवेल सांगा
ऍडमध्ये वापरा?... अभिषेक बच्चन
स्क्रीन वर येताच हा शोधून बघतो
कोपरा अन कोपरा... अभिषेक बच्चन
खान, खन्ना, दत्त नावडतात ज्यांना
दाखवा त्यांना जरा... अभिषेक बच्चन
प्रतिक्रिया
30 Apr 2009 - 2:58 am | मुक्तसुनीत
गुर्जी !!!
मूळ कविता अगदीच चलतूफा आहे. मात्र तुमचे विडंबन ......अगायायायायाया !!
खालच्या ओळीत उतरवलेल्या चड्ड्या लय भारी !! =)) =)) =))
चोपडा, रामू, मणी आणिक करण जोहर
हेच याचा आसरा... अभिषेक बच्चन
ऍश याचा कासरा... अभिषेक बच्चन
स्क्रीन वर येताच हा शोधून बघतो
कोपरा अन कोपरा... अभिषेक बच्चन
30 Apr 2009 - 8:14 am | Nile
श्री केसु,
कृपया... अशा रचना करून आपल्या माझ्या मनातील प्रतिमेस तडा जाईल असे करू नये.
बाकी आपली इच्छा!
30 Apr 2009 - 9:24 am | यन्ना _रास्कला
मिसलपावचा जुना माल खंगालतोय. लई भारि भारि हिरंमानकं गवसलीयत. ह्ये पाहा अबिश्येकबाबा बद्दल लोकानी काय झांगड लिवलय. आटवुन आठवुन हासु येतय.
**
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील!
मनस्वी
**
अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर तोच मरेल!
अहो झेपायला पाहिजे ना!
(ज्योतिषी) आजानुकर्ण
**
नाचायचा प्रयत्न केलास तर पुढच्या जन्मी तू सरडा होशील.
मनस्वी
**
मै प्रेम की दिवानी हूं...
खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य Smile))
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही Smile)))
असो,
बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार.....
"आई-वडिला॑ची कृपा"
धमाल मुलगा
*********
फुडं वाचा http://misalpav.com/node/1148?page=1
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
30 Apr 2009 - 11:09 am | आंबोळी
:D
____/\____
आंबोळी
30 Apr 2009 - 11:42 am | स्वाती दिनेश
आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे,:)
स्वाती
30 Apr 2009 - 11:47 am | टारझन
आग्गायाया !!
केसू सर ... लोटेश पोटेश हो =))
खवाट ... नाव वाचूनच फुटलो ...
बाकी अमिताभचं विडंबणच आहे तो अभिशेक बच्चण .. हिण हिणकस आणि टूकार ... एकदम ..
केसूफॅण) टारसूमार
30 Apr 2009 - 2:21 pm | JAGOMOHANPYARE
आई-वडिला॑ची कृपा .... ?
'
'
'
'आई-वडिला॑ची व बायकोची कृपा'
30 Apr 2009 - 2:31 pm | दवबिन्दु
येकदम फाकडु दिस्तो. आपुनको भोत अच्छा लगता हय. माजे दोस्त लोक बोलतात मी पन थोडा थोडा तेच्यावानी दिस्तो.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
30 Apr 2009 - 2:47 pm | सुमीत भातखंडे
कडक विडंबन.
जबर्या.
30 Apr 2009 - 3:42 pm | नितिन थत्ते
जबरा विडंबन.
शनिमहात्म्य किंवा गुरुचरित्राच्या लयीत छान वाचता येते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
30 Apr 2009 - 3:50 pm | ऋषिकेश
मस्त विडंबन... मात्र शेवटाची काहि कडवी/शेर सोडल्यास (मुळ कविता आणि विडंबन दोन्ही) मला चालीत म्हणताच येत नाहि आहे :(
ऋषिकेश
30 Apr 2009 - 6:38 pm | शितल
जोरदार विडंबन. :)
30 Apr 2009 - 6:42 pm | चतुरंग
हे बुच्चन घट्ट बसलं तर अभिषेक बाबाचं काही खरं नाही! ;)
चतुरंग
30 Apr 2009 - 7:09 pm | प्राजु
सकाळ जोरदार साजरी झाली.
मस्तच. छान आदळला आहे अभिषेक ला.
त्याला पाहिलं की मला टांग्याच्या पुढे असलेल्या घोड्याची आठवण येते. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 7:42 pm | टारझन
ईईईईईईईईईईईईईईईईईई ... बरं म्हणाली नाहीस तो घाण वासमारा उंट फिरतो ना गल्लीत पोरांना राईट मारायला .. त्याची आठवण येते म्हणून ..
=)) =)) =))
आज संताबंता.कॉम वर बच्चन फॅमिलीचा फोटू आलाय .. ***** ऍश , महा**** अमिताभ आणि **** कुमार अभिशेक, ह्यांनी मधल्या बोटावर वोटिंग डॉट लावलाय आणि तो दाखवत आहेत , आणि शेजारीच पिठल्यासारख्या तोंडाची जया मॅडम थोबाड ताणून हसते आहे , फोटू ह्या इथे
फोटो इथे पहा : http://media.santabanta.com/gal/bollywood/bollywoodvotes/28.jpg
30 Apr 2009 - 8:03 pm | परिकथेतील राजकुमार
अभिषेकच्या कपड्यांवरुन त्याला घरात एकुणच दुय्यम (न कमावत्या, खात्या पित्या कार्ट्याला मिळते ती) वागणुक मिळत असावी असे वाटते.
अवांतर :- ते व्होटींग डॉट दाखवायलाच मधले बोट वर करुन उभे आहेत कशावरुन ? तुम्ही कितीपण अपमान करा, लाथा घाला पण आम्हाला चित्रपटात घेतातच का नाही ? असे कशावरुन म्हणत नसतील ?
परा कणेकर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 Apr 2009 - 11:54 pm | श्रावण मोडक
पिठल्यासारख्या तोंडाची जया
खल्लास!!! =))
(स्वगत: पदार्थ म्हणून पिठलं चांगलं असतं देवा पण इथं आता जयाचा तो चेहरा डोळ्यापुढं येताच... नकोच ती कल्पना. पिठलं हा आवडता पदार्थ आहे).
1 May 2009 - 12:14 am | मुक्तसुनीत
या प्रकारच्या पोझला अमेरिकन भाषेत "फ्लिपिंग अ बर्ड" असे म्हणतात. आणि भारतात काय नि अमेरिकेत काय , अशा पोझेस देण्याला एक विशिष्ट आणि असभ्य अर्थ आहे. बच्चनकुटुंबीयांच्या या घनघोर अज्ञानामुळे चक्कर येऊन पडायचा बाकी होतो ! हहपुवा !
1 May 2009 - 12:29 am | प्राजु
बच्चनकुटुंबीयांच्या या घनघोर अज्ञानामुळे चक्कर येऊन पडायचा बाकी होतो ! हहपुवा !
ए़क्झॅक्टली...!
माझ्याही डोक्यात हेच आलं होतं...
एकटाच नव्हे तर तिघे तिघे अशी पोझ देऊन उभे आहेत.. =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2009 - 12:42 am | चतुरंग
आपलेच हात आणि आपलेच बोट!!! :T :O
चतुरंग
30 Apr 2009 - 7:32 pm | क्रान्ति
विडंबनही भारी आणि प्रतिसादही भारी! [शनिमहात्म्य / गुरुचरित्र इ. इ.]
=)) =)) =)) =)) =))
अवांतर :- अभिशेकला मराठी वाचता आलं आणि त्यानं हे वाचलं, तर काय होईल? तेव्हा तरी त्याचा चेहरा थोडा पहाण्यासारखा दिसेल का?
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com