ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग २)

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in राजकारण
8 Jul 2022 - 7:29 am

श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.

सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.

करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.

काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.

प्रतिक्रिया

प्रमोद देर्देकर's picture

8 Jul 2022 - 9:44 am | प्रमोद देर्देकर

तुम्ही श्रमजीवी म्हटलंत ते ठीक हो कारण आहेत तळागाळातील लोक सेनेचे निष्ठावंत, पण बुद्धिजीवी कोण ते सांगाल काय?

क्लिंटन's picture

8 Jul 2022 - 9:51 am | क्लिंटन

मोदी आणि भाजपला विरोध करणार्‍या कोणालाही डोक्यावर घेणारी एक विचारवंतांची जमात आपल्या देशात आहे. २०१४ नंतर उठांचे माकडचाळे सुरू झाल्यानंतर त्या सगळ्यांचा उधोजींना पाठिंबा होता. २०१७ च्या महापालिका निवडणुकांच्या वेळेस उठांचे कौतुक करणारी ट्विट राजदीप सरदेसाईने केली होती. बहुदा असे लोक अभिप्रेत असावेत :)

कानडाऊ योगेशु's picture

8 Jul 2022 - 9:52 am | कानडाऊ योगेशु

माझ्यासारखे बरेच मिपाकर असावेत. (त्यांना मिपाजीवी वा टंकजीवी म्हणावे का आता?) ह.घ्या.

शाम भागवत's picture

8 Jul 2022 - 10:15 am | शाम भागवत

पण बुद्धिजीवी कोण ते सांगाल काय?

बुध्दिजीवी एकच. ते म्हणजे शिवसेनाप्रमुख. :)
तोच सध्याचा बुध्दीजीवी बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 10:27 am | अमरेंद्र बाहुबली

दुसर्याने घडवलेली शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकनाथ शिंदे किंवा जो कुणी असेल त्यांनी स्वत: नवीन पक्ष स्थापन करून दाखवावा. आयत्या पिठावर रेघोट्या तर राज्यातील अनेक “अभ्यासू” मारताहेत.
शिवसेना असे अनेक आमदार घडवू शकते. दुसर्या फळीतील नेत्यांना तर ही सुवर्णसंधी आहे. दादा भूसे, भूमरे, शिरसाठ ही लोकं निव्वळ शिवसेनेच्या मतांवर जिंकली आहेत. ह्यांच्या मतदार संघात शिवसेनेच्या नावावर दगड ही निवडूण येईल अशी परिस्थीती आहे. ऊध्दव ठाकरे शिवसेनेचे ऊत्तम नेतृत्व आहे. आता चांगली संधीय आहे ती घाण पक्षातून काढायची. तथाकथीत मोदी लाटेत ६३ आमदारा मोदीविरोधात जिंकवून दाखवले होते ठाकरेंनी. त्यामुळे आता आजिबात मवाळ भूमीका न घेता ऊध्दव ठाकरेंनी ताठ भूमीका घ्यावी.

कानडाऊ योगेशु's picture

8 Jul 2022 - 1:00 pm | कानडाऊ योगेशु

दुसर्याने घडवलेली शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा एकनाथ शिंदे किंवा जो कुणी असेल त्यांनी स्वत: नवीन पक्ष स्थापन करून दाखवावा. आयत्या पिठावर रेघोट्या तर राज्यातील अनेक “अभ्यासू” मारताहेत.

जे गेले ते नालायकच आहेत असे अगोदरच म्हणुन झालेले आहे. पुन्हापुन्हा त्यांना आव्हान देण्यात काही अर्थ नाही. मा.उद्धव साहेबांनी राहिलेल्या कार्यकर्त्यांतुन नवी शिवसेना निर्माण करावी. बहुदा त्यांनीही पक्षचिन्ह जाणार ह्याची तयारी करुन घेतलेली आहे व मा.आदित्य आजपासुन दौर्यावर जाणार आहेत अश्या बातम्या वाचल्या आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 1:06 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेना आहे तीच राहनार. शिंदेगटाला पाहपयात कोण विचारतं निवडणूकांत ते. शिवसेना कार्यकर्त्यांवर ऊभी आहे. आमदारांवर नाही. देवाची मुर्ती पाहून लोक नमस्कार करायचे, गाढवावा वाटायचं आपल्याला पाहून नमस्कार करताहेत. तसं झालंय आमदारांचं.

सुबोध खरे's picture

9 Jul 2022 - 9:34 am | सुबोध खरे

घाण पक्षातून काढायची

१९९७ पासून हे अनेक लोक शिवसेनेत विविध पदांवर कार्यरत होते

आणि त्यांना बाळासाहेब ठाकरे यानीच वर आणले आहे

म्हणजे इतकी वर्षे शिवसेनेत घाण साठून राहिली होती?

कि

बाळासाहेब ठाकरे याना माणसांची अजिबात पारख नव्हती?

महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील जनता कुणाच्या बाजूने ते कळू दे.

शाम भागवत's picture

8 Jul 2022 - 12:49 pm | शाम भागवत

हे एकदम बरोबर बोलला आहात. मी त्याचीच वाट पाहतोय. बाकीचं सगळं तोंडाची वाफ आहे.
नाही म्हणायला, राज ठाकरे यांची भूमिका आणि शिवसेना खासदारांमधून एक दोन मंत्री एवढेच कुतूहल असेल.

आतापर्यंत इतक्या भूमिका घेऊन झाल्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर आणि दीड दिवसांत विसर्जितही केल्यात. त्यावर कोणी छेडायचं नाही. सुरुवातींचा जो तरुणांचा जोर होता त्यांच्या पक्षाला तो ओसरला.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 8:24 pm | श्रीगुरुजी

राज व त्यांचा पक्ष राजकारणातून केव्हाच संपले आहेत. कधीतरी सहा महिन्यातून एकदम जागे होऊन एखादी सभा घेऊन नकला करून उपस्थितांचे मनोरंजन करतात व नंतर पुढील अनेक महिने अज्ञातवासात अंतर्धान पावतात. भाऊ तोरसेकर किंवा त्यांच्या विचारांच्या पत्रकारांना राजबद्दल खूप भाबडी आशा आहे. परंतु त्यांचा कायमच भ्रमनिरास होणार आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 8:25 pm | अमरेंद्र बाहुबली

भाऊ तोरसेकर किंवा त्यांच्या विचारांच्या पत्रकारांना राजबद्दल खूप भाबडी आशा आहे.
पवारद्वष्टेपणा शिवाय भाऊंच्या विडीओत काय असतं?

पवारद्वष्टेपणा शिवाय भाऊंच्या विडीओत काय असतं?

हायला

तुम्ही भाऊ तोरसेकरांचे व्हिडीओ बघता?

जागतिक अर्थकारणात आबे नॉमिक्स हा शब्द रुढ झाला त्या जपानच्या शिंजो आबे यांच्यावर पाठी मागुन शॉटगन चा वापर करुन हल्ला केला आहे, या प्राण घातक हल्ल्या नंतर आबे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते ! :(

एवढेच सांगतो, जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते, तेव्हा कुठल्यातरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, असे फडणवीस म्हणाले.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sundar te Dhyan | Ashadhi Ekadashi | #3Abhangs3Days | Aarya Ambekar

नि३सोलपुरकर's picture

8 Jul 2022 - 3:14 pm | नि३सोलपुरकर

शिंजो आबे यांचे प्राण घातक हल्ल्यात निधन .

__/\__

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 1:14 pm | अमरेंद्र बाहुबली

मुख्यमंत्री खोटं बोलले. टोळधाड अजूनही सुरूच.
https://www.lokmat.com/solapur/pandharpur-wari-who-is-the-chief-minister...

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 1:15 pm | अमरेंद्र बाहुबली

कोण मुख्यमंत्री??- टोलनाक्यावरील कर्मचारी :)
जनता ह्यांना कधीच स्विकारनार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली

गद्दारी शंभूराजेंसोबत सुध्दा झाली होती पण म्हणून मराठा साम्राज्य संपंल नाही. गद्दार आणी गद्दारांना हाताशी धरनारा दिल्लीतील औरंगजेब ह्याच भूमीत गाडले गेले. जगातला कुठलाही गद्दरा यशस्वी झालेला नाहीये. ऊध्दव ठाकरे परत जोमाने ऊभे राहतील. सामान्य शिवसैनिक त्यांच्या सोबत आहे.

काय चाललंय? उठांची तुलना शंभूराजांशी? डोक्यात आलेले विचार टंकल्यावर इथे टाकण्याआधी एकदा नीट वाचायचे कष्ट तरी घ्याल?

आता तुम्ही तुलना केलेलीच आहे तर -
शंभूराजांना आपल्या माणसांची चाड होती. आपल्या मागे आलेल्या माणसांची संपूर्ण जबाबदारी फार मोठी असते आणि त्याची किंमतही.
पन्हाळ्यावर दिलेरखानानं आपल्या ६००+ माणसांचे हात-पाय तोडलेले पाहिल्यावर, स्वतःची चूक लक्षात येऊन परत आलेले शंभूराजे हे खूप मोठा बदल झालेलं व्यक्तित्व होतं. त्यानंतर त्यांची नाळ आपल्या लोकांसमवेत पूर्णपणे जुळली आणि ते नेता म्हणून सर्वमान्य झाले.
महाराज गेल्यावर जेव्हा काही लोकांना त्यांनी कठोर शिक्षा केली, तेव्हा त्या कठोर वागण्याचं दु:खही त्यांना अपरंपार झालं असणार. बाळाजी आवजींच्या प्रसंगावरून ते सहज दिसतं. सांगण्याचा मुद्दा हा की ते केवळ शिवरायांचा मुलगा म्हणून न राहता नेता म्हणून सर्वमान्य झालेले होते, म्हणून तसं कठोर वागणं त्यांना शोभलं सुद्धा.

आपल्या लोकांना आपलंसं करून घेऊन त्यांच्या मागे उभं राहण्यानं नेता होत असतो. अशा माणसाच्या मागे लोकं स्वतःहून उभे राहतात.
उठा हे अर्धवट राजनेता आहेत. ज्याला आपल्या लोकांना काय हवं हे सुद्धा कळत नाही तो धड राजनेता सुद्धा नाही. नेता होण्यासाठी त्यांना खूपच जास्त मेहनत घ्यावी लागणार हे उघड गुपित आहे. जे पासंगालाही कुठं उभं राहत नाहीत त्यांची तुलना कसली करताय?
आपल्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी वाट्टेल ती उदाहरणं फेकणं बंद करा. ते त्या नेत्यांसाठी नाही, आमच्यासाठी अपमानास्पद आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 2:24 pm | अमरेंद्र बाहुबली

ठाकरेद्वेषातून तुम्ही जे ऊध्दव ठाकरेंबद्दल लिहीलंय ते अत्यंत चुकीचे आहे. ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अत्यंत ऊत्तम काम केले आहे महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा ऊंचावलीय. गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसला नाहीतर त्यांचं सरकार पडणं अवघड होतं.

कोणतं चांगलं काम ते तुम्ही सांगतंच नाही कधी, कि मागच्या जुलै महिन्यात आलेल्या पुरात काहीच मदत केली नाही हे काम, कि मेट्रो ची काम खोळंबली हे?

टीपीके's picture

10 Jul 2022 - 12:45 am | टीपीके

अहो सोडा, ते राजकारणी आहेत, सामान्य नागरिक नाहीत. त्यांच्याशी नका पंगा घेऊ, नाहीतर तुमची केतकी चितळे करतील. उद्या हेच ठाकरे आणि/किंवा राऊत पलटले अणि काकांना शिव्या घालू लागले तर ते लगेच वाईट होतील. सोडा त्या मुळे.

कपिलमुनी's picture

10 Jul 2022 - 1:55 pm | कपिलमुनी

पन्हाळ्यावर दिलेरखानानं आपल्या ६००+ माणसांचे हात-पाय तोडलेले पाहिल्यावर,?????

कानडाऊ योगेशु's picture

8 Jul 2022 - 3:11 pm | कानडाऊ योगेशु

चर्चा कुठल्या दिशेने नेणार त्याचा अंदाज आला. आपला पास.!

कानडाऊ योगेशु's picture

8 Jul 2022 - 3:33 pm | कानडाऊ योगेशु

एकाने केली तर ती गद्दारी असते सगळ्यांनी केले तर त्याला बंड म्हणतात.मा.उद्धवजींची अडचण ही आहे कि हे बंड मोडुन काढायला पण त्यांच्याकडे आता कोणी उरले नाही आहे.पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे हे नक्की.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 3:52 pm | अमरेंद्र बाहुबली

गद्दारीला बंडाचा मूलामा दिला तरू काही फायदा नाही. गद्दारी ही शेवटी गद्दारीच.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 1:17 pm | अमरेंद्र बाहुबली

जगातला कुठलाही गद्दार यशस्वी झालेला नाहीये असे वाचावे

प्रमोद देर्देकर's picture

8 Jul 2022 - 1:32 pm | प्रमोद देर्देकर

आत्ताची बातमी...

कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण, महापालिकेतील तब्बल ४० माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत.

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. शिंदे यावेळी पंतप्रधान मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप याबाबतही याच दौऱ्यात चर्चा होईल.

धमाल उडवतात आणि हातवारे द्या टाळी.

क्लिंटन's picture

8 Jul 2022 - 8:08 pm | क्लिंटन

माफिया मुख्यमंत्र्यापासून राज्याची मुक्तता केल्याबद्दल रिक्षावाला मुख्यमंत्र्यांचे आभार अशा स्वरूपाची ट्विट किरीट सोमय्या यांनी नुकतीच केली. म्हणजे उद्धव ठाकरेंना त्यांनी माफिया म्हटले. त्याविरोधात शिंदे कॅम्पमध्ये अस्वस्थता पसरली आहे अशा बातम्या आहेत. भाजपने यावेळी अजिबात कच खायला नको. महाभकास आघाडी सरकार असताना राष्ट्रवादीकडून मिळणाऱ्या लाथा हेच शिंदे कँपचे आमदार मुकाट्याने सहन करत होतेच ना? मग या भाजपकडून मिळणाऱ्या लाथाही तशाच गोड मानून त्यांनी सहन करायला हव्यात. तसेही एकनाथ शिंदेंना किंवा त्यांच्या बाजूच्या कोणाही आमदाराला काहीही म्हटलेले नाही तर त्याच आमदारांना उद्देशून विष्ठा वगैरे म्हणणाऱ्या उध्दव ठाकरेंना आणि त्याच आमदारांना बळी द्यायचे रेडे, घाण वगैरे बोलल्या जाणाऱ्या गोष्टी चालवून घेणाऱ्या उध्दव ठाकरेंना बोलले जात आहे. मग ते शिंदे कॅम्पला खुपायचे काहीच कारण नाही.

श्रीगुरुजी's picture

8 Jul 2022 - 8:19 pm | श्रीगुरुजी

शिंदे गटात गेलेले काही आमदार (कदाचित सगळेच) दोन्ही दगडांवर पाय ठेऊन आहेत. परिस्थितीनुसार दोनपैकी कोणत्याही बाजूला ते झुकतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 8:20 pm | अमरेंद्र बाहुबली

शिंदे आणी ईतर आमदार लवकरच फडणवीसना कंटाळून घरवापसी करतील, फडणवीसनी स्वपक्षातील लोकाना सोडलं नाही तर ह्याना सोडेल का?? सर्वांना कुचकामी करून फेकून दिलं जाईल.

क्लिंटन's picture

8 Jul 2022 - 8:24 pm | क्लिंटन

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी १०० कोटींचा घोटाळा केला असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर १०० कोटींचा अब्रूनुसानीचा खटला दाखल केला. हा खटला मेधा सोमय्या यांनी दाखल केला असला तरी त्यामागे किरीट सोमय्या पण असणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

यावेळी भाजपने अजिबात कच खायला नको. भाजपावाले बहुतेक वेळा भोळ्या सांबाचा अवतार असल्याप्रमाणे आयत्या वेळेस कच खातात. केजरीवालांनी नितीन गडकरी आणि अरुण जेटली यांच्याविरोधात असेच बेताल आरोप केले होते. खटला शेवटपर्यंत चालवून केजरीवालांना तुरूंगात पाठवायची अपेक्षा पंजाबी अरुण जेटली यांच्याकडून जास्त होती. मराठी माणसापेक्षा पंजाबी लोक अशा गोष्टी जास्त धरून ठेवतात त्यामुळे गडकरी नाही तरी जेटली तरी केजरीवालांना अजिबात सोडणार नाहीत असे वाटत होते. पण कुठचे काय. दोघेही निघाले भोळ्या सांबाचे अवतार. दोघांनीही केजरीवालांना नुसत्या माफीवर सोडून दिले.

संजय राऊत यांच्याविरोधात शिवडीच्या कोर्टाने वॉरंट काढले आहे. निदान सोमय्या जोडप्याने हा खटला शेवटपर्यंत चालवून संजय राऊत ला पूर्ण उघडे पाडावे ही अपेक्षा.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 12:10 pm | अमरेंद्र बाहुबली

गडकरींचं ऊत्पन्न आणी त्यांच्सा मुलाच्या लग्नात झालेला खर्च, तसंच अरूण जेटलींची मिळतत नसतानाची संपत्ती ह्या मागे हा प्रामाणीक आयएस अधीकारी लागला तर काय होईल हे ते दोघं जाणून असावेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली

गडकरींचं ऊत्पन्न आणी त्यांच्सा मुलाच्या लग्नात झालेला खर्च, तसंच अरूण जेटलींची मिळतत नसतानाची संपत्ती ह्या मागे हा प्रामाणीक आयएस अधीकारी लागला तर काय होईल हे ते दोघं जाणून असावेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 10:16 pm | अमरेंद्र बाहुबली

अन्यथा सत्तेची पर्वा नाही, एकनाथ शिंदे गटातील आमदाराचा भाजपला थेट इशारा

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/buldana-rebel-eknath-shind...

अमरेंद्र बाहुबली's picture

8 Jul 2022 - 11:30 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी काही म्हणा फडणवीसला ऊपमुख्यमंत्री बनवून अमीत शहांनी मने जिंकली. फडणवीस बाजूला ठेऊन जर ऊद्या शिवसेना भाजप युती होनार असेल तर तिचे जोरदार सिवागत दोन्ही बाजूने होईल. फडणवीसच्या गलिच्छ राजकारणामुळे आज भाजपात ऊपरे मजा मारताहेत दरेकर विरोधी पक्षनेता, नार्वेकर विधानसभा अध्यक्ष. मूळ भाजपेयी मुनगंटीवार, खडसे, मूंडे, तावडे, बावनकूळे ह्यांच्या तोंडाला पाने पुसली गेलीत. शिवसेनेत बंडखोरा माजलीय. एका फडणवीस मूळे ना शिवसेना आनंदी आहे ना भाजपा.
सवकरच अमीत शहानी भाजपचा ताबा कुणातरी हुशार नेत्याला देऊन महाराष्ट्र भाजपची स्वच्छता करावी.

गणेशा's picture

8 Jul 2022 - 11:53 pm | गणेशा

शिवसेनेचे काय होईल., हे येणारा काळ सांगेल...परंतु शिवसेना पुन्हा जोमाने नक्कीच उभी राहणार.. भले पहिल्या सारख्या जागा निवडून येणार नाही.. परंतु तावून सुलाखून निघाल्यावर शिवसेना पुन्हा बहरणार..

शिवसेनेकडे आता अजून गमावण्यासारखे काही नाही.. मुंबई किंवा ठाणे पालिका पण अवघड आहे.. हे सुद्धा ते जाणतील..
राज ठाकरे बाहेर पडल्यावरहि शिवसेना अर्धी संपणार असेच बोलले जात होते.. बाळासाहेब ठाकरें नंतरहि शिवसेनेची वाट लागणार असेच बोलले जात होते..परंतु शिवसेना संपली नाही..
आताही शिवसेना संपणार नाही..

हि गद्दारी नाही तर बंड आहे उठाव आहे हे सांगितले जातेय.. पण याला बंडखोरी हि म्हणता येणार नाहि.. हि फितुरी आहे..
आणि फितुर फुटून पुढच्या पक्षाला मिळतो आणि त्याचे वजन वाढते..
पण फितूर हा फितूरच गणला जातो.. त्याला स्वतःचे अस्तित्व असे नसते, तो बांडगुळा प्रमाणे दुसऱ्याच्या छत्रछायेतच वाढतो..

पण भाजपा ला हि माहिती आहे, हे फितूर आहेत.. आणि यांचा वापरच करायचा आहे..
फितूर झालेल्या लोकांना हि माहिती आहे, आपण कश्यासाठी आपल्याला मोठं केलेल्या पक्षाला सोडतोय आणि यामागचे खरे कारण काय आहे..
त्यामुळे माझ्यासारख्या शिवसैनिक नसलेल्या माणसाला जर हे लोक संधीसाधू वाटत असतील तर सामान्य शिवसैनिका ला हि नक्कीच असे वाटणार..
यातही मतभेद असतील, पण ते व्यक्तीसापेक्ष असतील, पक्षसापेक्ष नाही...

बाकी उद्धव ठाकरें ना बोललेले आवडले नाही, आमचीच खरी सेना.. आम्ही सेनेला वाचवतोय हे सगळे बोलणे म्हणजे सगळे सोंग आहे,
आणि या सगळ्यांचा बोलाविता धनी भाजप आहे..

एक शिवसैनिक नसूनही, असल्या धूर्त आणि खालच्या पातळीच्या राजकारणा मुळे मी आमदारकीला यावेळेस शिवसेना उमेदवाराला मत देणार आहे, आणि माझ्यासारखे असे बरेच जण असतील, जे शिवसैनिक नसतील पण कावेबाज, धूर्त राजकारणाविरुद्ध असतील...

बाकी उद्धव ठाकरें नी काम नीट केले नाही असे आणि फलाना पसरवले जातेय.. खुद्द २०१९ ला फडणवीस ने मत मागताना मागील पाच वर्षाच्या विकासा वर मत मागितले नव्हतेच.. भाषणे काढून बघा.. काश्मिर ३७० असल्या मुद्यावर मते मागितली गेलीत..
असो..

बाकी पार्टी विथ डि्फरन्स असले भंकस बोल जे २०१४ अगोदर स्वतःचीच मऊ म्हणुन घेताना बोलले होते, ते जनतेला समोर दिसलेच..
समाज पण निर्लज्जा सारखा सगळे एकसारखे म्हणण्यात धन्य मानतो..
याबाबतीत केजरीवाल मात्र खुप पुढे आहे.. पार्टी विथ डि्फरन्स फक्त तोच सध्या दाखवू शकतो..

असो, महाराष्ट्रात, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे पक्ष आहेत, ज्यांची पोहच तळागाळातील लोकांशी जोडलेली आहे, त्यांचे सामर्थ्य भले कमी ठिकाणी असेल पण जेथे आहे तेथे सामान्य लोकां पर्यंत तो पोहचलेला आहे, त्यामुळे शिवसेना संपणार हे कधीच शक्य होणार नाहि..
एकवेळ राष्ट्रवादी संपू शकेल पण शिवसेना कधीच नाही..

माझ्यासारखे पवार.. बाळासाहेब ठाकरे.. अटलबिहारी वाजपेयी.. आणि राजीव गांधी.. महात्मा गांधी.. जवाहरलाल नेहरू सगळेच नेते तितकेच आवडणारे लोक कमी असतील परंतु बाळासाहबे ठाकरेंच्या शिवसेनेला संपवून राजकारण करणारे धूर्त राजकारणी, ते लोक कधीच बरदास्त करणार नाहित..

शिवसेनाला सरळ मतदान करण्याची माझी नक्कीच पहिली वेळ असणार.. बघू.. तसेही लक्ष्मण जगताप यांना निवडणूक लढवता येईल वाटत नाही.. शरद पवार २३- २४ पर्यंत असतील का ह्याचा भरवसा मला वाटत नाही..
येणारा काळ हा bjp चा असु शकेल असे वाटते आहे..
कारण निवडणुकी अगोदरच लोकं फोडणे आणि जिंकून नाही आले कि सरकार फोडणे हि गुंडागर्दी ते नक्कीच करू शकतील, तरीही माझ्यासारखे लोक मात्र त्यांच्या विरोधात असणार आणि राहणार..

आणि काय माहित कदाचीत अजित पवार पुढील निवडणुकी नंतर मुख्यमंत्री असतील..
मागच्या वेळेस राष्ट्रवादी फडणवीस ला मिळाली होती तेंव्हा शरद पवार त्यांच्या मागे गेले असते तर राष्ट्रवादी ला मी कधीच मतदान केले नसते.. परंतु पवार यांना बदनाम करण्यातच त्यांच्या विरोधकांच्या पिढ्या गेल्यात हे सत्य आहे.. आणि शिवसेना संपेल असे वाट पाहणाऱ्यांच्या हि पिढ्या नक्कीच बदलतील..

--- गणेशा

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 1:00 am | अमरेंद्र बाहुबली

सहमत +१

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 1:24 am | अमरेंद्र बाहुबली

काहीही प्रशासकीय अनूभव नसलेल्या, घराणेशाहीतून पुढे आलेल्या फडणवीसला भाजपने २०१४ ला मुख्यमंत्री केले. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर आणी सांगलीत अननूभवी मुख्यमंत्र्यामुळे पुरपरिस्थीती हाताळता आली नाही व अनेक लोकाना मदत मिळाली नाही, अनेकांचे जिव गेले. भाजप प्रदेशाधक्ष चंद्रकांत पाटील ह्याना कोल्हापूर सोडून कोथरूड ह्या “सेफ” मतदार संघात पळून यावे लागले.
२०१४ ते २०१९ पर्यंत केलेल्या गचाळ कारभारामूळे १२२ चे १०५ झाले. शिवसेनेसारखी भक्तम संघठना पाठीशी नसती तर १०५ च्या जागी जेमतेम ६० आमदार जिंकले असते भाजपचे. शिवयेनेचे ऊपकार मानायचे सोडून त्याच शिवसेनेला दिलेला शब्द मोडून भाजपने पाठीत खंजीर खुपसला.
येणारा काळ हा bjp चा असु शकेल असे वाटते आहे.. येनारा काळ हा फक्त राष्ट्रवादीचा असनार आहे.
बाकी शिवसेनेचा मतदार हा ठाकरे ब्रॅंडलाच
करनार भाजपच्या वळचणीला लागलेल्या कुणालाही कुठलाही शिवसैनिक मत देनार नाही. शिवसेना जिथे नसेल तिथे राष्ट्रवादीला मतदान होईल. भाजपेयी कितीही हिंदूत्वाचं ढोंग करत फिरले तरी कटिटर हिंदू कधीहा भाजपला मत देनार नाही.

कानडाऊ योगेशु's picture

9 Jul 2022 - 9:43 am | कानडाऊ योगेशु

येनारा काळ हा फक्त राष्ट्रवादीचा असनार आहे

येस्स. खरा गेम हा बीजेपी आणि शिवसेनेचा झालाय. आणि काका पुन्हा तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे कोरडे बाहेर आलेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

सुबोध खरे's picture

9 Jul 2022 - 9:44 am | सुबोध खरे

काहीही प्रशासकीय अनूभव नसलेल्या, घराणेशाहीतून पुढे आलेल्या फडणवीसला

Fadnavis became a Corporator. 5 years later, in 1997, Fadnavis at 27 became the youngest mayor of the Nagpur Municipal Corporation and became the second-youngest mayor in the history of India.[13][14]

Fadnavis is representing Nagpur in the Legislative Assembly of Maharashtra State (Vidhan Sabha) since 1999.

निदान थोडं तरी वाचत चला.

अमरेंद्र बाहुबली's picture

9 Jul 2022 - 11:51 am | अमरेंद्र बाहुबली

मंत्रीपदाचा काही अनूभव होता का? सरळ महापौर वरून मुख्यमंत्री. भाजपात अनेक चांगले लोक होते याआधी नंतिरीपदं सांभाळलेले. अश्या कुणाला दिले असते तर महाराष्ट्राच आज गचाळ राजकारण करायची गरज नसती.

सुबोध खरे's picture

9 Jul 2022 - 12:08 pm | सुबोध खरे

बरं बुवा

नका वाचू

मंत्रीपदाचा काही अनूभव होता का?
तसा तो श्री श्री आदित्य ठाकरे यांना पण नव्हता पण झालेच ना ३ खात्याचे मंत्री. श्री श्री उध्दव ठाकरे यांना तर कसलाच अनुभव नव्हता. झालेच ना मुख्यमंत्री? असा प्रश्न विचारणाच होते. पण नंतर आठवले की असे प्रश्न विचारायचे नसतात .. म्हणौन नाही विचारला ..

ता.क. दोघांचे ही नाव खुप आदराने घेतले आहे. तेव्हा (राहेलेल्या) शिव सैनीकांनी माझ्या घराच्या काचा फोडायला येउ नये ही लम्र ईनंती.
-- हुकुमावरुन.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2022 - 5:20 pm | श्रीगुरुजी

मंत्रीपदाचा शून्य अनुभव असूनही थेट मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान या सर्वोच्च पदावर स्थानापन्न होणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. राजीव गांधी, मनोहर जोशी, उद्धव ठाकरे, एन टी रामाराव, नवीन पटनाईक, हेमंत सोरेन, केजरीवाल ही नावे लगेच आठवली.

श्रीगुरुजी's picture

9 Jul 2022 - 5:21 pm | श्रीगुरुजी

अजून एक - नरेंद्र मोदी

मान्य.
त्यांचे किल्ले ढासळणार नाहीत.
--
इंदिरा कॉचेही गड८०% टिकतील.
शिवसेनेचे गडही अभेद्य आहेत असे तीन नेते म्हणतात ते बरोबर. . .
पण . .
आतले किल्लेदार बदललेत.