श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.
सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.
करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.
काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.
प्रतिक्रिया
9 Jul 2022 - 11:45 am | शाम भागवत
हा.
एकदम बरोबर.
त्यामुळे सगळं कसं एकदम नवीन वाटतेय.
:))))
9 Jul 2022 - 1:02 pm | श्रीगुरुजी
सेना जवळपास नामशेष झालेल्या अवस्थेत आल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेची युती होण्याची शक्यता बरीच वाढली आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात उद्धव ठाकरेंनी व्यावहारिक भूमिका घेऊन आपले पत्ते लपवून निम्म्यापेक्षा कमी जागा मान्य करून निकालानंतर आपली हुकुमाची पाने बाहेर काढली होती. भविष्यातही ते कॉंग्रेस व राष्ट्रवादीबरोबर युती करताना व्यावहारिक भूमिका घेऊन १०० पेक्षा कमी जागा मान्य करून युतीत निवडणुक लढतील असे वाटते. तसे झाले तर या तीन पक्षांच्या युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल.
9 Jul 2022 - 4:24 pm | सुक्या
या तीन पक्षांच्या युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल.
तसे झाले तर या मविआ च्या अडीच वर्षात जे पहायला मिळाले ते पुढची ५-१० वर्षे बघावे लागेल. जितके वाटे जास्त तितकी लुट मोठी असावी लागते.
देव करो तसे न होवो.
9 Jul 2022 - 4:32 pm | श्रीगुरुजी
तसे झाले तर सेनेचा मुख्यमंत्री न होता राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर प्रशासन गतिमान होईल. सुप्रिया सुळे झाल्या तर काय होईल ते आता सांगता येणार नाही.
9 Jul 2022 - 12:15 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या मागे शेपटी सारखं फडणवीस का फिरत असतात? अनेक राज्यात मुख्यमंत्री-ऊपमुख्यमंत्री आहेत पण असे प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या मागमागे जानारा ऊपमुख्यमंत्री मी तरी कधी पाहीला नाही. अजित पवारही अनेक वेळा ऊपमामू होते पण असं मागे मागे फिरलेलं कधी पाहीलं नाही. मुख्यमंत्र्याला काही प्रायवसी असते का नाही?
9 Jul 2022 - 1:02 pm | कपिलमुनी
ज्यांना शेती मधले षष्प कळतं नाही त्यांना या योजनेचे कौतुक ..
सुपर फ्लॉप योजना आहे..कोणत्याही जल तज्ज्ञाला विचारा
9 Jul 2022 - 4:21 pm | सुक्या
मी काही जलतज्ञ नाही परंतु सिंचन व पाणी संवर्धन यावर माझे अभियांत्रीकी शिक्षण झाले आहे. तेव्हा या योजनेत काय चुकीचे आहे ते समजुन घ्यायला आवडेल.
9 Jul 2022 - 6:48 pm | कपिलमुनी
तुम्ही गुगल करून शोधा... थोडे जरी शोधले तरी मी उर्वरीत माहिती देईन.
10 Jul 2022 - 2:07 am | सुक्या
गरज नाही. गुगल शोध करुन मी माझी मते बनवत नाही. तुम्हीही त्रास घेउ नका.
असेच रहा ... :-)
9 Jul 2022 - 10:14 pm | अमर विश्वास
कृपया एखादे उदाहरण द्याल का ? नक्की काय चुकीचे आहे योजनेत ?
9 Jul 2022 - 8:28 pm | अमरेंद्र बाहुबली
नव्या सरकारने वीजदरवाढ करून सामान्यांच्या कंबरड्यात चांगलीच लाथ घातली आहे. २ दिवसाआधी गमस दरवाढ करून केद्रीनेही अशीच लाथ घातली होती. चांगले सरकार नको होते ना? घ्या मग आता.
9 Jul 2022 - 9:28 pm | कंजूस
कोणतीही दरवाढ करायचीच नाही. कोणतेही उद्योग उभारायला द्यायचे नाहीत.
9 Jul 2022 - 9:33 pm | अमरेंद्र बाहुबली
व्वा. काय लाॅजीक आहे. कम्युनीस्ट दरवाढ करत नाहीत. जे दरवाढ करतात ते कम्युनीस्ट असतात. टाळ्या.
9 Jul 2022 - 10:05 pm | कंजूस
पण पुढे काय?
इंधन कुठून आणणार,कोण देणार?
10 Jul 2022 - 12:25 am | अमरेंद्र बाहुबली
संजय राठोडांना क्लिनचीट. बच्चूकडूंपाठोपाठ आणखी एक क्लिनचीट. भाजपात जा क्लिनचीट मिळवा. भाजपात नाही आलात तर मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय यंत्रणा तुम्हाला सळो का पळो करून सोडतील.
https://marathi.abplive.com/news/maharashtra/pooja-chavan-sucide-case-sa...
10 Jul 2022 - 12:48 am | टीपीके
एक तो घोडा बोलो या चतुर. म्हणजे राठोड गिल्टी की नाही? म्हणजे गिल्टी तर इतके दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर संसार का केला? अणि जर स्वच्छ तर काय चुकलं?
10 Jul 2022 - 6:53 am | श्रीगुरुजी
आधी बच्चू कडू आणि आता संजय राठोड. सरकार स्थापन होऊन १० दिवस झाले तरी इंधनकर कमी करण्याचा निर्णय नाही ज्याबद्दल हे रान उठवित होते.
याबाबतीत केजरीवाल अत्यंत चतुर. शपथविधी झाल्याच्या दिवशीच लोकप्रिय निर्णय जाहीर करून जनमानसात आपले स्थान पक्के करतात व निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करतात.
असो. फडणवीस समर्थक या निर्णयांचेही जोरदार समर्थन करतील याची खातरी आहे.
10 Jul 2022 - 9:16 am | श्रीगुरुजी
आता प्रताप सरनाईक व भावना गवळी रांगेत आहेत. जर नवाब मलिक व अनिल देशमुख भाजपत आले तर ते सुद्धा निर्दोष सुटतील.
10 Jul 2022 - 9:48 am | रात्रीचे चांदणे
अजून सरदेसाई का सरदेशमुख ची क्लीन चिट बाकी आहे. अत्ता खरी पंचाईत ED आणि किरीट सोमयांची होणार आहे.
10 Jul 2022 - 10:44 am | श्रीगुरुजी
किरीट सोमय्यांना भाजपत विचारतंय कोण? २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या मागणीवरून सोमय्यांना उमेदवारी नाकारली होती. केवळ ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी सोमय्यांचा वापर सुरू होता. आता ठाकरे सरकार नसल्याने सध्या तरी सोमय्यांची गरज उरलेली नाही.
10 Jul 2022 - 9:48 pm | कानडाऊ योगेशु
औरंगाबाद नामांतरावरुन शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला हे माहीतच नव्हते. अर्थात काकांची ही कोलांटीउडी अपेक्षितच आहे. शेवटच्या बैठकित घेतलेले तडकाफडकी निर्णय हे येणार्या सरकारला डोकेदुखी उत्पन्न करणारे असावेत ह्या एकाच उद्देशाने घेतले होते. घेतलेल्या काही निर्णयांचे खापर पुढे शिवसेनेवरच फुटणार व मी नाही त्यातली ही भूमिका सोयिस्कररीत्या घेतली जाणार.
11 Jul 2022 - 9:25 am | सुक्या
आजकाल काका जरा जास्त प्रेडिक्टेबल झाले आहेत नै?
11 Jul 2022 - 8:07 am | कानडाऊ योगेशु
आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला तीन चाकाच्या रिक्षाचे सरकार म्हणत होतो आणि आता सरकार चालवायला एक खरोखरच रिक्षावाला आलाय. ह्याला काव्यात्मक न्याय म्हणावे काय?
11 Jul 2022 - 8:31 am | अमरेंद्र बाहुबली
सहमत. १०६ हुतात्म्यांनी गुजराती माणसाशी भांडून गुजरात पासून मुंबई घेतली, आणी आज १०६ मृतात्मे गुजराती माणसाच्या तालावर नाचतात ह्यालाही काव्यगत न्यायच म्हणावे लागेल.
11 Jul 2022 - 9:11 am | कंजूस
अमराठीच्या हातीच.
11 Jul 2022 - 10:21 am | अमरेंद्र बाहुबली
मुंबई गुजरातला द्यायचीय का? भाजपच्या नादी लागून ईतक्या लवकर गुजरात समर्थन चालू होईल असं वाटलं नव्हतं. मानसीक तयारी सुरू झालीय वाटतं गुजरात वाद्यांची.
11 Jul 2022 - 5:57 pm | चौकस२१२
आली का गाडी गुजराथी मराठी वर
उदयाला जर गडकरी आले नेतेपदी आणि बाजूल समजा फडणवीस मग कोणाचं नावाने ठणाणा करणार ?
पशिचम महाराष्ट्र्र विरुद्ध विदर्भ कि काय / कि काकांनी सांगून ठेवलाय पागोटे आणि पगडी अशी " काडी लावा"
11 Jul 2022 - 5:58 pm | चौकस२१२
आली का गाडी गुजराथी मराठी वर
उदयाला जर गडकरी आले नेतेपदी आणि बाजूल समजा फडणवीस मग कोणाचं नावाने ठणाणा करणार ?
पशिचम महाराष्ट्र्र विरुद्ध विदर्भ कि काय / कि काकांनी सांगून ठेवलाय पागोटे आणि पगडी अशी " काडी लावा"
गुजराथ वादि ! हायला शब्दोकोश / टूल किट मधील नवीन शब्द
11 Jul 2022 - 10:06 am | कानडाऊ योगेशु
इतकं दडपण नका घेऊ साहेब!
11 Jul 2022 - 10:17 am | श्रीगुरुजी
उपमुख्यमंत्री नावाचे पद घटनेत नाही असे सांगून आपल्या ५ वर्षांच्या कारकिर्दीत मंत्रीमंडळातील कोणालाही हे पद न देणाऱ्या फडणवीसांना २०१९ मध्ये आपल्या ८० तासांच्या औटघटकेच्या सरकारात अजित पवारांना मुख्यमंत्री करावे लागले आणि आता स्वत:च उपमुख्यमंत्री पदावर बसावे लागले. हा सुद्धा काव्यगत न्यायच नव्हे का?
11 Jul 2022 - 10:18 am | श्रीगुरुजी
अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावे लागले, असे वाचावे.
11 Jul 2022 - 10:28 am | अमरेंद्र बाहुबली
जळगाव ग्रामीण ह्या मतदार संघात आता गुलाबराव पाटील हे सेनेचे आमदार आहेत. तेथे आधी गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीचे आमदार होते. गुलाबराव हे नाव तसं दुर्मीळात दुर्मीळ त्यातच एकाच मतदारसंघात गुलाबराव विरूध्द गुलाबराव. हे पण काव्यगत न्यायात येत नाही योगायोगात येतं.
11 Jul 2022 - 10:30 am | अमरेंद्र बाहुबली
मी तरी ह्या दोन गुलाबरावां व्यतीरीक्त तिसरा गुलाबराव पाहीला नाहीये.
11 Jul 2022 - 11:15 am | कानडाऊ योगेशु
मी ह्याला काटेंकि टक्कर म्हणेल.
बाकी गुलाब हे नाव असण्याबाबत.
माझ्या एका मित्राच्या वडिलांचे नाव बदामराव होते आणि शाळेत पुरस्कार वितरणावेळी विद्यार्थाचे पूर्ण नाव पुकारले जात असे. तेव्हा बदामराव ह्या नावावर हशा पिकत असे.अडचण ही असे कि मित्र हुशार असल्याने बरेचसे बक्षिसे त्याला मिळत आणि दोनचार वेळेला त्याच्या नावाचा पुकारा होत असे. आणि हशा पिकत असे.
11 Jul 2022 - 11:17 am | कानडाऊ योगेशु
मी ह्याला काटेंकि टक्कर म्हणेल.
बाकी गुलाब हे नाव असण्याबाबत.
माझ्या एका मित्राच्या वडिलांचे नाव बदामराव होते आणि शाळेत पुरस्कार वितरणावेळी विद्यार्थाचे पूर्ण नाव पुकारले जात असे. तेव्हा बदामराव ह्या नावावर हशा पिकत असे.अडचण ही असे कि मित्र हुशार असल्याने बरेचसे बक्षिसे त्याला मिळत आणि दोनचार वेळेला त्याच्या नावाचा पुकारा होत असे. आणि हशा पिकत असे.
11 Jul 2022 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क. बदामराव. हहपुवा. माझ्या एका मित्राच्या वडीलांचे नाव रजनिकांत आहे. हात विशेष काही नाही पण जेव्हाही मित्र त्याच्या घरी जायचे तेव्हा त्याचे वडील लूंगीतच फिरत असायचे. ह्यावरून त्याला काॅलेजमध्ये खुप चिडवले जायचे. नाव खुपच सिरीयस घेतलं असं. नंतर त्याने त्याच्या पप्पाना स्ट्रीक्ट वार्नींग दिली लूंगी न घालण्याबद्दल. असो. लोक बोंबलतील चालू घडामोडीवर हे काय? असं.
बाकी बच्चू कडू हेही असंच वैशिष्टयपुर्ण नाव. कुणाचं नाव बच्चू कसं असू शकतं? बाकी मुनगंटीवार नी वडेट्टीवार हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षातील लोकही गोंधळ ऊडवतात. २०१४ ला १५०० मतांनी सुनिल तटकरे रायगड मतदार संघातून हरले होते. त्यांच्याच नावाच्या दुसर्या ऊमोदवाराने ७००० मते खाल्ली होती. धुळ्यात एकदा मेनबत्ती नी दिवा ह्या चिन्हांच्या कन्फ्युजन मध्ये मेनबत्तीवीला न जिंकनारा ऊमेदवार जिंकला होता.
11 Jul 2022 - 12:03 pm | कानडाऊ योगेशु
ह्या धाग्यावर अश्या घटनांचा उल्लेख आलेला आहे.
काही नावे काही व्यक्तींना विचित्र वाटतात हे खरे. माझ्यामते आपला पूर्वग्रह ह्याबाबतीत कारणीभूत असतो. माझ्या एका शिक्षकांचे नाव जितेंद्र होते. ईमेल वगैरे नुकतेच सुरु झालेले त्याकाळात त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता दिला तेव्हा जितेंद्र<<अमुकअमुक>>@<<तमुकतमुक>>.कॉम असा सांगितला.तो पावेतो ह्या शिक्षकांना फक्त आडनावानेच ओळखायचो म्हणुन व तसेच जितेंद्र हे नाव त्यांच्या एकुण व्यक्तिमत्वाला साजेसे वाटले नाही म्हणुन विचारले कि तुमच्या मुलाचा इमेल पत्ता आहे का? तेव्हा ते म्हणाले माझेच नाव जितेंद्र आहे. माझा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
दुसरा गमतीशीर प्रकार मित्राच्या बाबतीत झाला. वर्गात एकजण नवीन आला होता आणि सवयीप्रमाणे आडनावाप्रमाणे आम्ही एकमेकांना ओळख्त असू. काही कारणाने ह्या मित्राला त्याच्या घरी जाऊन त्याला बोलवायचे होते. हा मित्र घरी गेला. मित्राचे नाव अशोक श्याम <<टिंबटिंब>> होते आणि ह्या मित्राचा घोळ झाला कि नक्की ह्या मित्राचे नाव काय? अशोक का श्याम? अशोक जुन्या वळणाचे व श्याम नव्या वळणाचे वाटल्याने ह्याने श्याम श्याम असे खालुन सायकलवरून बेंबीच्या देठापासुन ओरडायला सुरवात केली. बाहेर त्याचे वडील आले. कोण हवे आहे. ? श्याम ..आमच्या वर्गात आहे मी त्याचा मित्र. वडिलांना एकुण कल्पना आली काही न बोलता अशोकला बाहेर पाठविले. बाहेर आल्यावर त्याने सांगितले कि माझे नाव अशोक आहे आणि वडिलांचे शाम आहे. मित्राच चेहरा पाहण्यासारखा झाला तिथे. कालांतराने शहर छोटे असल्याने दोन्ही घरे कौटुंबिक मित्र झाली तेव्हा दोन्ही कुटुंबे एकत्र आलेले अस्ताना अशोकचे वडील माझ्या मित्राला " हा माझा मित्र आहे हे सगळ्या गल्लीला माहिती आहे" असे मिश्किलपणे म्हणत असत.
11 Jul 2022 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली
धुळे लोकसभा २०१९ निवडणूकीत अनिल गोटे ह्यांनी फुगाहे चिन्ह घेतले होते. नंतर ६ महीन्यानी झालेल्या विधानसभेला फूगा हेच चिन्ह भाजप पुरस्कृत (शिवसेना ऊमेदवार असतानाही) अपक्ष ऊमेदवार राजवर्धन कदमबांडे ह्यांनी घेतलं. गोटे ह्यांना शिटी हे चिन्ह मिळालं. गोटेंचे फूगा चिन्ह असलेले जूने पोस्टर्स जाणून बुजुन समाज माध्यमात पसरवण्यात आले. बर्याच गोटे समर्थकांना कळालेच नाही की फुगा चिन्ह गोटेंचे आहे की कदमबांडेंचे. त्यामुळे विधानसभेला कदमबांडेंनी गोटेंची भरपुर मते खाल्ली. व गोटेंचा पराभव झाला ६ हजार मतांनी.
11 Jul 2022 - 10:15 am | क्लिंटन
गोव्यात विरोधी पक्षनेते आणि कळंगूटचे आमदार मायकेल लोबो आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह काही काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार अशी चर्चा आहे. मायकेल लोबोंना काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरून काढलेही आहे. याच मायकेल लोबोंनी फेब्रुवारी-मार्चमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मनोहर पर्रीकर हयात असताना त्यांनी पक्षातील ख्रिश्चन नेत्यांना सांभाळून घेतले होते पण त्यांच्यानंतर या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली अशाप्रकारच्या बातम्या होत्या. त्यातूनच मायकेल लोबो काँग्रेसमध्ये गेले. त्यांना त्यांची पत्नी दलायलाला शिवली मतदारसंघातून उमेदवारी हवी होती आणि त्यासाठी भाजप तयार नव्हता हे पण एक कारण होते. दिगंबर कामत सुरवातीला काँग्रेसमध्ये होते. १९९४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी ते भाजपत आले आणि १९९४, १९९९ आणि २०२२ या तीन निवडणुका जिंकले. २००५ मध्ये भाजपच्या काही आमदारांनी बंड केल्याने मनोहर पर्रीकरांचे सरकार पडले होते त्या आमदारांमध्ये दिगंबर कामत होते.त्यांना २००७ मध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री केले. आता परत ते भाजपत जाणार ही चर्चा आहे.
हा सगळा प्रकार खूपच शिसारी आणणारा आहे.शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी मराठी सरदार कधी आदिलशहाकडे, कधी निजामशहाकडे आणि कधी मोंगलांकडे असायचे तसलाच हा प्रकार दिसतो. २००७ ते २०१७ या दोन विधानसभांमध्ये असे घाऊक पक्षांतर झाले नव्हते. नाहीतर १९८९ मध्ये निवडून गेलेल्या विधानसभेपासून हेच चालू आहे. मूळ संघाची पार्श्वभूमी असलेले पर्रीकर, श्रीपाद नाईक, प्रमोद सावंत वगैरे लोक कायम भाजपत राहिले आणि त्यांनी कधीच पक्षांतर केले नाही. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षातही मुळचे काही लोक आहेत. असे काही अपवाद सोडले तर बाकी सगळे आज इथे तर उद्या तिथे. रमाकांत खलप यांच्यासारख्या नेत्यानेही पक्षांतर केले आहे मग इतरांची काय कथा. या सगळ्यांना हाकलून द्यावे असे फार वाटते पण आपण करू तरी काय शकतो?
11 Jul 2022 - 11:39 am | विजुभाऊ
सुशील कुल्कर्णीनी राष्ट्रवादी चे नामकरण मरून ते पश्चिम-महाराष्ट्रवादी असे केले आहे.
एकूणच राष्ट्रवादीचे क्षेत्रफळ पहाता योग्य नाव सुचवले आहे
11 Jul 2022 - 1:30 pm | पुंबा
मा. संजयजी राठोडसाहेब तसेच मा. प्रताप सरनाईकसाहेब यांची भाजपच्या सरकारला गरज आहे. त्यांना क्लिन चिट देण्यात चुकीचे ते काय? एवढे सोवळे भाजप समर्थकांनी राहू नये. राजकारणात तडजोडी कराव्या लागतात. देवेंद्र फडणविस हे बुद्धीमान राजकारणी आहेत. अजूनसुद्धा सो कॉल्ड भ्रष्ट नेते रांगा लावून आहेत, त्यांचा फायदा करून घ्यायला हवा. चित्रा वाघ ताईंनी किती समंजसपणे राठोडांची क्लिन चिट स्विकारली बघा. सर्व भाजपसमर्थकांनी असेच समंजस झाले पाहिजे.
11 Jul 2022 - 1:48 pm | अमरेंद्र बाहुबली
+१ :)
11 Jul 2022 - 7:34 pm | गामा पैलवान
चिवाताई म्हणे दुबईला जायच्या. आणि तिथे ताईभाई भेट व्हायची म्हणे. ऐकीव माहिती आहे.
-गा.पै.
12 Jul 2022 - 6:08 am | निनाद
लव्ह जिहादच्या आणखी एका प्रकरणात, इम्रान नावाच्या तरुणावर एका हिंदू महिलेला अडकवण्यासाठी आपली धार्मिक ओळख लपवल्याचा, त्यानंतर तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आणि तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील इज्जतनगर भागात ही घटना घडली आहे.
इम्रानने आधी तिच्यावर बलात्कार केला आणि मग या हिंदू महिलेचे आक्षेपार्ह फोटो घेतले केले. त्यानंतर त्याने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने गोमांस खाण्यासाठी आणि नमाज अदा करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करण्यासाठी या चित्रांचा वापर केला. तिने विरोध केल्यावर इम्रान आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला मारहाण केली आणि तिला जेवण आणि पाणी नाकारले. इमरान आणि त्याच्या कुटुंबीयांनीही तिला त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
सततच्या छळाला कंटाळून महिलेने इज्जतनगर पोलीस ठाणे गाठून इम्रान आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध छळ, मारहाण, बलात्कार, जबरदस्ती विवाह आणि धर्मांतराचे आरोप करत फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
12 Jul 2022 - 7:34 am | चौकस२१२
निनाद भाऊ कशाला फेक बातमी देता.. आहों प्रेमळ पेंगवीन धर्माचं लोकांनकडून असले काही घडतच नाही ....
अहो तो प्रेमळ प्रेमवीर आता तीला मक्केची पवित्र यात्रा हि घडवेल .. आहात कुठे ! त्याशी परामौजय डॉक्टर झाकीर यांची शिकवणी पण घेईल
काय ते म्हणतात ना भाजपचं आय टी सेल च्या बातम्या वाचता वाटत !
12 Jul 2022 - 7:34 am | चौकस२१२
निनाद भाऊ कशाला फेक बातमी देता.. आहों प्रेमळ पेंगवीन धर्माचं लोकांनकडून असले काही घडतच नाही ....
अहो तो प्रेमळ प्रेमवीर आता तीला मक्केची पवित्र यात्रा हि घडवेल .. आहात कुठे ! त्याशी परामौजय डॉक्टर झाकीर यांची शिकवणी पण घेईल
काय ते म्हणतात ना भाजपचं आय टी सेल च्या बातम्या वाचता वाटत !
12 Jul 2022 - 7:24 am | कंजूस
वकीलांच्या फिया हॉटेल बिलांपेक्षा स्वस्त असतात का?
12 Jul 2022 - 1:35 pm | कंजूस
द्रौपदी उमेदवारास पाठिंबा द्यायचा का यावर तीन दिवस खल झाला तेरा जणांत.
12 Jul 2022 - 5:54 pm | क्लिंटन
उध्दव ठाकरेंच्या शिवसेना गटाने द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. या विषयावर काल बोलावलेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत काही खासदार अनुपस्थित होते आणि जे खासदार उपस्थित होते त्यांनीही द्रौपदी मुर्मूंनाच पाठिंबा द्यायचा आग्रह धरला तसेच संजय राऊतांना धारेवर धरले अशा बातम्या आहेत. इतकी वर्षे युती असताना बहुतेक राष्ट्रपती निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजप उमेदवाराच्या विरोधात मत दिले आहे. आता युती नसताना स्वतःहून भाजपच्या बाजूला मत द्यायचा निर्णय घेतला आहे याचा अर्थ या निमित्ताने एक तर भाजपशी परत जवळीक साधायचा प्रयत्न असावा किंवा खासदारांचे ऐकले नाही तर आमदारांप्रमाणे खासदारही आपल्याला सोडून जातील ही भिती असावी.खासदारांचेही बरोबर आहे म्हणा. त्यांना लोकांपुढे जाऊन मते मागायची असतात. संजय राऊतप्रमाणे बेताल बडबड करत उंटावरून शेळ्या हाकणे त्यांना परवडायचे नाही.
काहीही झाले तरी ठाकरे, संजय राऊत ही घाण परत नको. शिवसेनेतही स्थानिक पातळीवर लोकांशी संपर्क आणि काम यामुळे लोकप्रिय असलेले नेते आहेत. असे लोक त्यांच्या मतदारसंघाबाहेर मते फिरवू शकले नाहीत तरी त्यांच्या त्यांच्या भागात काही प्रमाणावर लोकप्रियता राखून आहेत. अशा लोकांना 'केस बाय केस बेसिसवर' बरोबर घेतले तर भाजपच्या बहुसंख्य कार्यकर्ते आणि मतदारांनाही फार आक्षेप असेल असे वाटत नाही. पण ठाकरे, राऊत वगैरे लोक काही झाले तरी बरोबर नकोत आणि त्यांना राजकारणातून कायमचे हद्दपारच करायला हवे.
12 Jul 2022 - 6:11 pm | सुक्या
काहीही झाले तरी ठाकरे, संजय राऊत ही घाण परत नको.
सहमत. योगायोगाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा पुरेपुर वापर करुन एक सजग राजकारणी आहोत हे दाखवायची संधी उठा यांना मिळाली होती. आपल्याला राजकारणात पक्के पाय रोवण्याची ही संधी त्यांनी घालवलीच पण आहे त्याचा कालवुन चिखल करुन टाकला. "दैव देते नी कर्म नेते" याचा प्रत्यय उठा कडे पाहिला की येतो.
संजय राऊत यांना जनमानसात काडीची ही किंमत नाही हे त्यांना चांगले ठाउक आहे. म्हणुन "उथळ पाण्याला खळखळाट" बाकी काही नाही.
अजुन ४ वर्षे साहेब राज्यसभेत बरळतील ... नंतर सामना आहेच.