ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
25 Jun 2022 - 11:37 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.

काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.

पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?

दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?

उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 12:08 am | श्रीगुरुजी

हा रोज एक पायरी खाली उतरतोय. उद्धव ठाकरेंना संयमी वगैरे समजणाऱ्यांनी हा विचार करावा की इतकी गलिच्छ भाषा ते वर्षानुवर्षे कसे चालवून घेतात.. का त्यांच्या मनातलेच हा बोलतो.

https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/sanjay-raut-on-eknath-shin...

यश राज's picture

26 Jun 2022 - 2:33 am | यश राज

उद्धव ठाकरेंना संयमी वगैरे समजणाऱ्यांनी हा विचार करावा की इतकी गलिच्छ भाषा ते वर्षानुवर्षे कसे चालवून घेतात.

खरेच आहे..

नेहमीप्रमाणे बॉलिवूडची/लिब्रांडूची टूलकिट गँग सोमि वर सक्रिय झालिये( पेड प्रमोशन) त्यात सगळ्यांचा एकच सुर आहे की उ ठा सारखा संयमी,उत्तम संवाद करणारा(टोमणे भाषणं ऐकले नसतील) व प्रशासनावर उत्तम पकड(?) असलेला मुख्यमंत्री कोणीच नाही .

या सर्व भांड लोकांना खरंच जनतेच्या मनातली खदखद समजत नसेल का?

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Jun 2022 - 3:13 am | हणमंतअण्णा शंकर...

फक्त शिवसैनिकांचा विचार केला तर कोल्हापुरात हा मोठा मोर्चा निघाला -

यांना कुणी पैसे देऊन आणलेले नाही.

शिवसैनिक आता सुट्टी देत नसतात. हे राजेश क्ष्रीरसागर वगैरे शिंदेसेनेच्या सुशिक्षित गुंडांना सोडाच, चंद्रकांत पाटलांनासुद्धा कोल्हापुरात पायसुद्धा ठेऊ देणार नाहीत.

मध्यावधी निवडणुका लागल्या पाहिजेत. भाजप किती पाण्यात आहे हे तरी कळेल.

आणि आता भगव्या सुशिक्षित गुंडांना पांढर्‍या अशिक्षित गुंडांचा डायरेक्ट सपोर्ट आहे म्हणजे बघा. शिवसेनेने ही लढाई महाराष्ट्र विरूद्ध दिल्ली अशी केली पाहिजे. तशी सुरुवातही झाली आहे.

राऊतांनी शिंदेसमर्थकांचा आणि भाजपवाल्यांचा आणि काहीप्रमाणात शिवसैनिकांचा रोष ओढवून घेतला असला तरी शिवसैनिक राऊतांना माफ करेल. कारण गद्दारीला क्षमा नाही, वाचाळपणा ठीक आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 9:07 am | श्रीगुरुजी

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-politic...

पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी शिंदे गटासमोर आता कोणत्यातरी पक्षात विलीन होणे हा एकमेव पर्याय शिल्लक असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत हा गट मनसेत विलीन झाला तर सेनेच्याच एका शाखेत गेल्याने कोणाचा फारसा आक्षेप असेल असे वाटत नाही.

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 9:37 am | शाम भागवत

मी कालच म्हणालो की राज साहेब लवकर बरे व्हावेत. खळ्याळखट हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा मनसे पाहिजेच. फक्त त्यात उठा नकोत.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 9:52 am | अमरेंद्र बाहुबली

हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा मनसे पाहिजेच. का भाजप नको?? : )

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 10:15 am | श्रीगुरुजी

खळ्याळखट आणि हिंदुत्व यांचा दुरूनही संबंध नाही. जाळपोळ, दगडफेक, हाणामाऱ्या करणारे कोणत्याही जातीधर्माचे नसून ते फक्त झ दर्जाचे गुंड असतात. त्यांचा आणि हिंदुत्वाचा अजिबात संबंध नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 9:54 am | अमरेंद्र बाहुबली

अशा परिस्थितीत हा गट मनसेत विलीन झाला तर सेनेच्याच एका शाखेत गेल्याने कोणाचा फारसा आक्षेप असेल असे वाटत नाही. लोक एकवेळ बूडनार्या जहाजेत बसतील पण समुद्रात डूबकी मारून बूडालेल्या जहाजेत बसायला जानार नाही. बाकी शिंदे गटाचे खरे/खोटे बंड काही दिवसातंच थंड होईल. बोलणी करायला आमदार पाठवले आहेत.

क्लिंटन's picture

26 Jun 2022 - 11:17 am | क्लिंटन

या बंडाचे पुढे काय होईल माहित नाही. पण काहीही झाले तरी शिवसेना अडचणीत आली आहे हे नक्की. सरकार पडले तर चांगले आणि नाही पडले तर अजून चांगले अशी परिस्थिती आता आली आहे.

समजा हे आमदार स्वगृही परत जरी गेले तरी आलेली कटुता कायमच राहणार आहे. एकदा मने दुभंगली की ती दरी साधणे अशक्य होते. १९९५ मध्ये शंकरसिंग वाघेलांनी बंड केल्यावर ते काही दिवसातच भाजपत परत गेले होते. पण कटुता कायमच राहिली. आणखी एक महत्वाचा फरक म्हणजे त्यावेळी भाजपच्या कोणीही वाघेलांना डुक्कर, कचरा, वि* वगैरे जाहीरपणे बोलले नव्हते. ते सगळे एकनाथ शिंदे गटाविषयी शिवसेनेकडून जाहीरपणे बोलले जात आहे. त्यामुळे हे आमदार स्वगृही परतले तरी ती दरी भरणे अशक्य आहे. आताच महाराष्ट्रात सरकार आणि प्रशासनाच्या नावाने अगदी पूर्णच सावळागोंधळ उडालेला आहे. ती परिस्थिती अजून वाईट व्हायची शक्यता आहे. महाभकास आघाडी सरकारने जो सत्तेचा माज दाखवला आहे तो क्वचितच कोणत्या सरकारने कधी दाखवला असेल- अगदी लालूंच्या सरकारनेही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा आमदार परतले तरी विधानसभेत मतदानाचे अनेक प्रसंग येत असतात आणि त्यापैकी कोणत्याही वेळेस सरकार पडू शकते. त्यावेळी हे लोक कोणत्या बाजूने मत देणार ही टांगती तलवार सतत उधोजींच्या डोक्यावर राहणार.

त्यातून भाजप समर्थकांसाठी आणखी एक चांगली गोष्ट होऊ शकेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्ण देशातील मतदार मत द्यायला जातील तेव्हा मोदीविरोध या एका अजेंड्यावर तयार झालेल्या संधीसाधू आघाड्यांना मत दिलेत तर महाराष्ट्रात चालू आहे तो सावळागोंधळ पूर्ण देशात होईल हे चित्र जितक्या जास्त प्रमाणात उभे राहिल तितके भाजपसाठी चांगले असेल.

तेव्हा सरकार पडले तर जनतेच्या माथी मारलेल्या या अनैसर्गिक सरकारने घातलेल्या धुडगुसापासून मुक्तता ही चांगली गोष्ट होईल आणि पडले नाही तर आणखी दीड-पावणेदोन वर्षे धुडगूस चालू राहिल पण २०२४ मध्ये पूर्ण देशात त्यामुळे चांगले परिणाम होतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 10:02 am | अमरेंद्र बाहुबली

ह्या बंडामागे भाजप नाही असं चंद्रकांत पाटलांनी सांगीतलंय. आमदार भाजपशासीत गुजरातेत जातात तिथे मोहीत कंबोज हा भाजपचा विधानसभा निवडणूकीत हरलेला ऊमेदवार ऊपस्थीत असतो. ३५० पोलिसांचा गराडा असतो. तिथून आसाम ह्या भाजप शासीत राज्यात जातात. भाजपचे नेते महाराष्ट्राला नी मराठी माणसाला मुर्ख समजतात का? ह्यांचे नेते काहीही सांगतील नी लोकांना मुर्ख बनवतील. महाराष्ट्र हे सगळं पाहतोय पुढील निवडणूकीत महाराष्ट्र नक्कीच भाजपला धडा शिकवनार.
“कपटी मित्रापेक्षा दिलदात शत्रू बरा“ हे शिवसेनेचे मविआ स्थापन्यामागे धोरण होते. हे किती खरं आहे हे आज महाराष्ट्रच नव्हे तर देश पाहतोय. नितीश कूमारांनी भाजप पासून सावध रहावे. ममतांना युती करून गळाला लावायचा प्रयत्न भाजपनो अनेक वेळा केला पण ममता बधल्या नाहीत. आज बंगालात ममतांचं एकछत्री अंमल आहे. सेना, नितीश कुमारांनी ह्या पासून धडा घेऊन रणनिती आखावी.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 10:15 am | अमरेंद्र बाहुबली

Video : गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांमध्ये धुसफूस.
https://zeenews.india.com/marathi/video/insurgent-mlas-clash-in-guwahati...

मोदी मिडीया म्हणुन हिणवणार्या मिडीयाने ह्या प्रकरणात भाजपाला गोवायचा बराच प्रयत्न केला पण हाती काहीही लागल नाही. त्यानंतर ह्याच मिडीयाने बंडखोर कसे ऊकटे पडले आहेत, मविआ, ऊद्धव ठाकरेंनी बंडखोरांना कसे कोंडीत पकडले आहे.
आता शिवसेना जिंकल्यातच जमा आहे असा गाजावाजा करत आहे. गेल्या काही दिवसापासुन काही ठरावीक मिडीयांनी बंडखोर शिवसैनिका विरुद्ध मोर्चाच उघडलेला आहे. बंडखोर शिवसैनिकांचे मानसिक खच्चीकरण करणे हाच ह्यांचा डाव आहे. त्यात भाजपा अलित्प राहील्याने
बंडखोर शिवसैनिकांना एकजुटी शिवाय पर्याय नाही.

जो जाहीराती देतो मिडीया त्याची गुलाम असते हे सत्य समोर असताना सुद्धा लोक मिडीयाला गोदी मिडीया म्हणत असतात.

खेळ कोणाचा होणार हे काळच ठरवेल पण त्यात मिडीयाला हाताशी धरुन जनमत बनवण्याचा प्रकार सुरु आहे त्यावरुन आघाडीच्या तर्फे बुद्धीजीवींनी ह्यात उडी घेतली आहे हे स्पष्टच आहे.

मदनबाण's picture

26 Jun 2022 - 11:55 am | मदनबाण

उद्धव ठाकरे हे या अडीच वर्षात एक दुबळे नेता म्हणुन उघडे पडले ! नेता कसा नसावा याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपणहुन दिले.मुख्यमंत्री आहोत का पक्षप्रमुख याचे भान देखील त्यांना या काळात आहे असे एकदाही दिसले नाही.त्यांच्या भाषणाला भाषण देखील का म्हणावे अशी स्थिती... कारण आपण काय बोलतोय आणि कोणत्या पदावर बसुन याचे गांभिर्य देखील त्यांना कधी असल्याचे दिसले नाही. या मुख्यमंत्र्यांची ख्याती ते फोन उचलत नाहीत अशी झाली... युती करुन जेव्हा सत्ता स्थापनेची वेळ आली तेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचा वारंवार आलेला फोन घेतला नाही, अगदी हल्लीच माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही असे सांगितले होते आणि नंतर जेव्हा ड्राफ्ट वगरै तयार झाला तेव्हा मुखमंत्र्यांना फोन केला तेव्हा त्यांनी फोन घेतला नाही असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. आता जे खरे मावळे फुटुन बाहेर पडले त्यांनी देखील हेच सांगितले की मुख्यमंत्री हे आम्हाला भेटत नव्हते, फोनवर उपलब्ध नव्हते. स्वतःच्याच आमदारांना अशी वर्तणुक देणार असतील तर ते तुमच्या बरोबर कसे राहतील ?
लोकांना या संपूर्ण काळात आणि आताही त्यांचे केवळ टोमणे आणि रडगाणं हेच पहायला मिळाले.
आता सातत्याने गद्दार /गद्दारी हा शब्दप्रयोग वारंवार दिसतोय... पण याच महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपा आणि सेना यांच्या युतीला मतदान केले त्यांच्याशी आपण उघड गद्दारी केली यांची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे का ? इथे मला सत्तेचा लोभ नव्हता असे म्हणायचे आणि त्याच सत्तेच्या लोभा पायीच आपण युती मोडुन इतर पक्षांसी सोयरीक करुन महाभ्रष्ट भकास आघाडी केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारांची आणि स्वपक्ष नेत्यांची उघड फसवणुक केली वर मखलाशी काय केली की मी बाळासाहेबांना शब्द दिला होता की शिवसैनीक मुख्यमंत्री होणार !
संजय राऊत यांना वेसण घालण्याची गरज होती, त्यांना मोकाट रान दिले. खरं तर संजय राऊत यांचे आता अभिनंदन केले पाहिजे की त्यांनी वाचाळपणा करुन [ खरं तर वाचाळपणा हा देखील सौम्य शब्द भासावा. ] सेना फोडण्याची परिस्थीती निर्माण करुन विरोधकांना फार मोठी रसद पुरवली. पण हे देखील ज्या नेत्याला समजत नसेल किंवा समजुन घ्यायचे नसेल त्या नेत्याची दुसरी कोणती वेगळी अवस्था होणार ?
वाझे प्रकरणात सरकारची अब्रुच वेशीला टांगली गेली, त्याच वाझेच समर्थन करुन त्याला परत सेवेत घेणारे कोण ? त्या बद्धल सोयिस्कर मौन का पाळले गेले ?

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सत्तेत किती भ्रष्टाचार आणि घोटाळे झाले याची यादीच मा.माजी मुख्यमंत्री यांनी वाचुन दाखवली होती, त्यांनी सभागृहात केलेले भाषण ऐकण्या सारखेच आहे.

जाता जाता :- पैलवान तेल लावुन बसलेला होता, पण खेळ बुद्धीबळाचा होता ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SURESH WADKAR I VITTHAL AAWADI I LIVE PERFORMANCE I BIG CANVAS ENTERTAINMENT

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 12:15 pm | अमरेंद्र बाहुबली

हे बंडं खरं असेल तर एकनाथ शिंदेंनी स्वत:चं प्रचंड मोठॅ राजकीस नूकसान करून घेतलंय. जो माणूस सेनेत ऊध्दव ठाकरेंनंतर दोन नंबरला होता तो आता काहीच राहनार नाही.
कोरोनात केलेल्या ऊत्तम कामामूळे ठाकरे महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. सेनाप्रमूख नी मुख्यमंत्री ह्या दोन्हीही जबाबदार्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. मविआतील तीन पक्षात ऊत्तम समन्वय साधून राज्यकारभार हाकला. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यात ठाकेरेंचे नाव आघाडीवर असेल.

रात्रीचे चांदणे's picture

26 Jun 2022 - 1:37 pm | रात्रीचे चांदणे

उद्धव ठाकरे नंतर तर आदित्य ठाकरे असणार ना? आदित्यला लहान का मोठा भाऊही आहे तो पण कधीही येऊ शकतो.

डँबिस००७'s picture

26 Jun 2022 - 2:00 pm | डँबिस००७

<<<एकनाथ शिंदेंनी स्वत:चं प्रचंड मोठॅ राजकीस नूकसान करून घेतलंय. जो माणूस सेनेत ऊध्दव ठाकरेंनंतर दोन नंबरला होता तो आता काहीच राहनार नाही.>>>>

शिवसेनेचा ईतिहास तपासला तर कुटुंबा बाहेर उत्तराधिकारी असु शकत नाही हे
स्पष्टच आहे. सख्या कुटुंबातील राज ठाकरेची वर्णी लागली नाही तिथे आदित्य ठाकरे सारखे कुटुंबातील दावेदार असताना एकनाथ शिंदेँंचा चांस लागेल अशी अपेक्षा ठेवण मूर्खपणाच होईल.

गुवाहाटीमधून ४० आमदारांचे मृतदेह येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे अशी बातमी लोकमतवर आली आहे. संजय राऊत खरोखरच असे बोलले असतील तर ते वाचून अगदी किळस आली. महाभकास आघाडी सरकार ताबडतोब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणायला हवी. काय चालू आहे?

इथले शिवसेना समर्थक आणि 'उद्धव ठाकरे कित्ती कित्ती संयत बोलतात ब्रिगेड' चे लोक यावर काय म्हणतात हे बघायचे.

https://www.lokmat.com/maharashtra/eknath-shinde-revolt-in-shiv-sena-the...

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 1:59 pm | श्रीगुरुजी

हा रोज एक पायरी खाली उतरतोय. या भाषणात हा अत्यंत माजलेल्या अवस्थेत इतकं घाण बोललाय, की ते वाचून किळस आली. ही घाण आणि याचे पोशिंदे हे महाराष्ट्राला लागलेली विषारी कीड आहे. ही कीड लवकरात लवकर नष्ट व्हायला हवी.

प्रसाद_१९८२'s picture

26 Jun 2022 - 2:03 pm | प्रसाद_१९८२

बरळण्याचा एक एक विक्रम मोडत आहे नॉटी.

श्रीगुरुजी ते महाराष्ट्र वाचवत आहेत पवारांना सोबत घेऊन.

विजुभाऊ's picture

27 Jun 2022 - 12:11 pm | विजुभाऊ

नबाब मलीकांचे मंत्रीपद राष्ट्रवादीमुळॅ काढून घेता आले नाही ही एक मजबुरी होती
पण उद्धव ठाकरे हे राउताना का सहन करत आहेत हे गौडबंगाल आहे.
नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असणार.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली

पण उद्धव ठाकरे हे राउताना का सहन करत आहेत हे गौडबंगाल आहे.
नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असणार.
राऊत रोज भाजपची पिसे काढतात म्हणून. :)

क्लिंटन's picture

26 Jun 2022 - 2:36 pm | क्लिंटन

राऊत जे बरळले आहेत तसे समाजवादी पार्टी किंवा राष्ट्रीय जनता दलाचे लोकही जाहीरपणे म्हणणार नाहीत.

महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांची पत्नी परदेश दौर्‍यावर गेली असताना परत येताना त्यावेळी कडक असलेल्या कस्टम नियमांचे उल्लंघन करून तिने काही वस्तू चोरीने देशात आणल्या अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्याची चर्चा जाहीरपणे व्हायला लागली तर आपली किती बदनामी होईल या भयाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले असे वाचल्याचे/ऐकल्याचे आठवते. त्या मुख्यमंत्र्यांचे नाव होते मारोतराव कन्नमवार. आणि सध्याचे मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे अधिकृत प्रवक्ते उघडपणे हिंसेचे समर्थन करत आहेत ते निमूटपणे बघत आहेत. या प्रवक्त्यांनी वापरलेली भाषा आपण जाहीरपणे सोडाच खाजगी संभाषणातही वापरू शकणार नाही किंवा मिपासारख्या व्यासपीठावर लिहू शकणार नाही. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते चालू देतात याचा अर्थ त्यांचीही या सगळ्याला संमती असली पाहिजे. म्हणे उद्धव ठाकरे एकदम संयत बोलतात. माय फुट. असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे.

तथाकथित सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाने एकदम खालची पातळी गाठली आहे. यापेक्षा खाली जाऊ शकणार नाही असे वाटावे तोच नवीन काहीतरी होते आणि जुने विक्रम मोडले जात आहेत.

वामन देशमुख's picture

26 Jun 2022 - 3:15 pm | वामन देशमुख

.या प्रवक्त्यांनी वापरलेली भाषा आपण जाहीरपणे सोडाच खाजगी संभाषणातही वापरू शकणार नाही किंवा मिपासारख्या व्यासपीठावर लिहू शकणार नाही. तरीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते चालू देतात याचा अर्थ त्यांचीही या सगळ्याला संमती असली पाहिजे. म्हणे उद्धव ठाकरे एकदम संयत बोलतात. माय फुट. असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे.

हेच म्हणतो.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 3:33 pm | श्रीगुरुजी

असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे.

अगदी लहानपणी समजायला लागल्यापासून मला शिवसेना हा पक्ष, शिवसेना नेते आणि शिवसेना समर्थक यांची कायमच शिसारी वाटत आली आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 3:45 pm | अमरेंद्र बाहुबली

काहींना अचानक २०१९ नंतर शिसारी वाटतेय.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 4:30 pm | श्रीगुरुजी

गुवाहाटीमधून ४० आमदारांचे मृतदेह येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे अशी बातमी लोकमतवर आली आहे.

पूर्वी कृष्णा देसाई, श्रीधर खोपकर यांचे खून सेनेला पचविता आले. आता तसे करता येईल असे वाटत नाही. मनसुख हिरेनच्या खुनानंतर वाझेला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न उठांनी केला होता. पण तो अयशस्वी ठरला.

क्लिंटन साहेब अहो तुम्ही राऊत या अद्वितीय वाचाळवीरांना असे कसे बोलू शकता .....
त्यांचे म्हणे असे होते कि या ४० आमदारांचे आत्मे मेले आहेत आणि उरलेत ते मुडदे ... मग तेच (मुडदे) तर परत येणार ना मुंबई ला !

अतिशय स्वछ मनाच्या राऊतांवर असा आरोप करू नये

सुबोध खरे's picture

28 Jun 2022 - 10:49 am | सुबोध खरे

४० आमदारांचे आत्मे मेले आहेत आणि उरलेत ते मुडदे

दुर्दैवाने येणाऱ्या पार्थिवाना सरळ पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवू असे राऊत म्हणाले होते

म्हणून त्यांचे आत्मे मृत झाले आहेत हि मल्लिनाथी सर्वोच्च न्यायालयात टिकली नाही

आणि सर्वोच्च न्यायालयाने केवळ उच्च न्यायालयात का गेला नाहीत याचे कारण त्यांच्या मालमत्तेला आणि जीवाला धोका आहे हे स्वीकृत केले असेच नव्हे तर महाराष्ट्र सरकारवर त्यांच्या आणि कुटुंबियांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करण्या बद्दल स्पष्ट आदेश दिले.

तेंव्हा श्री राऊत यांचे बेफाट आणि बेताल वक्तव्य सतत शिवसेनेस भोवताना दिसते आहे.

पण लक्ष्यात कोण घेतो

कानडाऊ योगेशु's picture

26 Jun 2022 - 2:32 pm | कानडाऊ योगेशु

मा.उध्वजी जरी एकटे पडले तरी शिवसेना संपणार नाही.कारण जनकल्याणासाठी सत्तेचा वापर कुणीच करत नाही. स्वतःची तुंबडी भरण्यासाठीच सत्ताकारण व राजकार णाचा वापर होतो . जर एकजात सगळे शिवसेनेचे आमदार सेना सोडुन जरी गेले तरी अश्या स्वार्थी जनप्रतिनिधींची नवी फळी पुढे येईल ज्यांना सेने मधुन सत्तेकडे जाण्याची संधी आयतीच उपलब्ध होईल.

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2022 - 3:03 pm | कर्नलतपस्वी

बातमी उदय सामंत गोहाट्टी कडे.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 3:37 pm | श्रीगुरुजी
डँबिस००७'s picture

26 Jun 2022 - 3:20 pm | डँबिस००७

म रा सरकारने शिवसेनेच्या बंडखोर विधायकांच्या कुटूंबाची सुरक्षा व्यवस्था कालच काढुन घेतली होती. आज केंद्र सरकारने शिवसेनेच्या बंडखोर विधायकांनां व त्यांच्या कुटूंबाला वाय सूरक्षा व्यवस्था लागु केलेली आहे.

शिवसेनेच्या बंडखोर विधायकांनां व त्यांच्या कुटूंबाला जिवे मारण्याची धमकी देणार्या शिवसेनेतील सं रा सारख्या नेत्यांची अवस्था वाईट होणार आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 3:47 pm | अमरेंद्र बाहुबली

विधायक नाही हो “आमदार”. ईतकीही काय घाई झालीय मराठी शब्द डावलून हिंदी शब्द वापरायची?

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 3:30 pm | श्रीगुरुजी

आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत आहोत हे याला समजत नाही. संजय राऊत हा बहुतेक वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे.

बाकी शिवसेनेच्या बाबतीत विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण सार्थ होण्याची चिन्हे आहेत.

प्रसाद_१९८२'s picture

26 Jun 2022 - 4:28 pm | प्रसाद_१९८२

वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे.
--

ते वेड लागण्याचे कारण कदाचीत हे असावे.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 4:32 pm | श्रीगुरुजी

हा ट्रेंड ट्विटरवर जोरात आहे.

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 4:30 pm | शाम भागवत

मला असा संशय यायला लागला आहे की, संजय राऊत हे उठा यांचे अत्यंत विश्वासू व इमानदार सेवक आहेत व ते उठा व कुटुंबीय यांच्या मनातले विचार प्रगटपणे मांडत असतात. आपल्याकडे कितीही वाईटपणा आला तरी ते त्यांचे काम करत राहतात. त्यामुळे संजय राऊत यांना दूर करणे उठा यांना जरूरीच वाटत नाही. ध्यन्यासाठी इतका वाईटपणा घेणे, लोकांचे शिव्याशाप खाणे सोपे नाही.
😉

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 4:31 pm | श्रीगुरुजी

बरोबर आहे. आपल्याला जे बोलायचे आहे ते उठा राऊतच्या तोंडातून बोलतात.

प्रसाद_१९८२'s picture

26 Jun 2022 - 4:24 pm | प्रसाद_१९८२

उत्तर प्रदेश मधील रामपुर व आझमगड या मुस्लिमबहुल जागेंवर झालेल्या पोट निवडणुकीत भाजपाचा दणणीत विजय झाला आहे.

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 4:55 pm | शाम भागवत

हिंदुत्वाला महत्व येत चाललेच आहे.
कोणी जानवे घालायला लागलंय. कोणी दुर्गापूजा करायला लागलंय. कोणी इफ्तार पार्टी बरोबरच हिंदूसण साजरे करायला लागले आहे. कोणी नास्तीकचे आस्तीक व्हायला लागलंय. कोणी तर तुळजाभवानीला नवस बोलायला लागलंय.
जे हिंदुत्वापासून लांब जाणार त्यांची मतदान टक्केवारी घसरणार हे नक्की.

भुजबळांबरोबर जे बाहेर पडले त्यातील भुजबळ सोडता बाकीचे पुढच्या निवडणूकीत पडले. राणेंच्या बरोबर जे बाहेर पडले त्यातील राणे सोडता बाकीचे पुढच्या निवडणूकीत पडले. तसेच शिंदे सोडता बाकीचे पुढच्या निवडणूकीत पडणार असं काहीचं मत आहे.
पण
यावेळेस हिंदुत्वाच्या मुद्यावर शिंदे व त्यांचे समर्थक बाहेर पडल्याने, पुढच्या निवडणुकीत काय होईल हे पाहणे रोचक होईल.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 5:10 pm | श्रीगुरुजी

भुजबळ, राणे इ. बरोबर जे बाहेर त्यातील बरेचसे पडले, पण सर्वजण पडले नव्हते. राणे स्वतः दणदणीत बहुमताने जिंकले होते. विनायक निम्हण सुद्धा २००९ मध्ये जिंकले होते. उर्वरीत बरेच जण पडले होते, कारण भाजप बरोबर होता. गाडीत चढलेल्या फुकट्या प्रवाशाला गाडीतून उतरवल्यावर त्याला दुसऱ्या गाडीने घेतले नाही तर पाय घासत चालावे लागते. तसेच या फुकट्या पक्षाला भाजपने गाडीतून उतरवले आहे व इतरांना गाडीत घेतलंय. त्यामुळे शिंदे गटातील बहुसंख्य आमदार परत निवडून येतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 5:18 pm | अमरेंद्र बाहुबली

तसेच या फुकट्या पक्षाला भाजपने गाडीतून उतरवले आहे मातोश्रीवर फोन वर फोन कोण करत होतं गुरूजी?? ठाकरेंना आमचा फोन घेतला नाही हे कोण सांगत होतंं?? गाडीतून कुणी ऊतरवलं मग? फूकटं कोण??
काय होतंय गुरूजी? वस्तूस्थितीच्या विपरीत तुम्ही लिहीत असता.
उर्वरीत बरेच जण पडले होते, कारण भाजप बरोबर होता गुरूजींना शाळेत ६० टक्के पडत असतील नी त्यांच्या पुढच्या बेंचवर बसलेला मुलगा ९० टक्के पाडत असेल. तर गुरूजी म्हणत असतील त्याला ९० टक्के माझ्यामुळे पडले आहेत. :)

Trump's picture

26 Jun 2022 - 8:19 pm | Trump

परिक्षा एकट्याने द्यायची असते, निवडणुक सांघिक काम असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 8:38 pm | अमरेंद्र बाहुबली

स्वतचे निवडूण येत नव्हते नी म्हणे आम्ही शिवसेनेचे ऊमेदवार जिंकवत होतो. :)

शाम भागवत's picture

26 Jun 2022 - 5:14 pm | शाम भागवत

एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
कंकाका मायबोलीवर हे सापडले

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 5:26 pm | अमरेंद्र बाहुबली

असे पक्ष ताब्यात घेता आले अयते तर सुभाष बाबूंनी काॅंग्रेस कधीच ताब्यात घेतली असती.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 9:38 am | चौकस२१२

....ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का ?
तुम्ही संसदीय पक्ष म्हणताय कि नोंदणीकृत मुख्य पक्ष?
संसदीय पक्षात २/३ बाजूचे असतील तर शक्य आहे पण नोंदणीकृत मुख्य पक्ष घेणे अवघड आहे अर्हताःत त्यास्तही काय अकार्यपद्धती आह ए( मुळात आहे का) शिवसेन पक्षात?
काँग्रेस आणि भाजप मध्ये तशी अंतर्गत कार्यपद्धती निदान कागदोपत्री तरी असावी असे वाटते ,, सेनेत तर कागदो पत्री तरी अस्तित्वात आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Jun 2022 - 5:20 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी काही असो पण
भाजपने हिंदूंसाठी काय केले?
भाजप नेते मातोश्रावर युती करायला का यायचे?
ह्या दोन प्रश्नांवर श्रिगुरूजी चडीचूप असतात.

महाविकास आघाडीने अडीच वर्षात काय केलय हे पणा सांगा, सांगली पुराचे उदाहरणं देणारे गेल्यावर्षीच्या पुरात या सरकार काडीची मदत केली नाही हे सांगत नाहीत.