ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ४)

क्लिंटन's picture
क्लिंटन in राजकारण
25 Jun 2022 - 11:37 am

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.

काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.

पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?

दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?

उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.

प्रतिक्रिया

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:28 pm | अमरेंद्र बाहुबली

२.५ वर्षपूर्वी जे १८०° घुमजाव केले त्यातून अनेक शिवसेना हितचिंतक निराश आणि दुःखी झाले आहेत या कडे दुर्लक्ष करू नका १८० अंशात घूमजाव भाजपने केले होते. २.५ वर्षए मुख्यमंत्रीपद देऊ असे सांगून. हे सेनेच्या मतदाराला माहीत असल्याने तो आजिबात सेनेवर नाराज नाहीये. नाराज आहेत ते फक्त घरी बसलेल्या १०५ चे समर्थक.
बाकी "ठाकरे कुटुंब मन्हजेच सेना" हे म्हणजे परत एकदा घराणेशाही मजबूत करण्याची भाषा ... वडील आमदार, काकू मंत्री तरी फडणवीस मुख्यमंत्री झाले ही घराणे शाही नसते का?? हे महाराष्ट्र जाणून असल्याने हा मूद्दा महाराष्च्रासाठी गैरलागू होतो.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 5:53 pm | चौकस२१२

अमरेंद्र तुमचा भाजप विरोध समजू शकतो पण तुम्हाला गंभीरपणे हे म्हणायचे आहे का कि भाजपात आणि त्यामागच्या संघहट पण पण वर्षानुवर्षे घराणेशाही आहे जेवढी काँग्रेस आणि इतर काँग्रेस च्या पिल्लं पक्षात आहे ?
- भाजप - शामाप्रसाद मुखर्जी - विजयाराजे - वाजपेयी- अडवाणी- जोशी- महाजन- मोदी - शहा ... हे एकाच कुटुंबात जन्माला आले नाही का?
- चाचा- इंदिरा- राजीव- सोनिया- राहुल - प्रियांका यांचे मात्र एक मेकांशी काह्ही नात्यतिल नाही !
- बाळासाहे- उद्धव - आदित्य हे हि बहुतेकक वेगवेगलया कुटुंबातीलच असावेत ...

काय साहेब काय शेंड्या लावताय

श्रीगुरुजी's picture

27 Jun 2022 - 6:45 pm | श्रीगुरुजी

एखाद्या शाळेत आधीच्या मुख्याध्यापकाने आपला मुलगा मुख्याध्यापक करणे आणि माळ्याने आपल्यानंतर आपल्या मुलाला बागेचे काम सोपविणे या दोन घराणेशाहीत अजिबात साम्य नाही.

सुबोध खरे's picture

27 Jun 2022 - 7:17 pm | सुबोध खरे

छे छे

गुरुजी तुमचा प्रतिसाद साफ पूर्वग्रहदूषित आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा मुलगा मतिमंद असेल तरी त्याला थेट सर्वोच्च न्यायालयात नेमले पाहिजे.
(येथे कोणत्याही पक्षाच्या युवराजांचा कोणताही अर्थाअर्थी संबंध नाही)

किंवा

हृदयाची शल्यक्रिया करणाऱ्या सर्जनचा मुलगा ढ असेल तरी त्याला थेट हृदयशल्यक्रिया विभागाचा विभागप्रमुख नेला पाहिजे

नाही तरी डॉक्टरला काय कळतंय?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:30 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी "ठाकरे कुटुंब मन्हजेच सेना" हे म्हणजे परत एकदा घराणेशाही मजबूत करण्याची भाषा ... तुम्हाला तसे नाही वाटले तरी सेना जगणारच आहे. :)

इरसाल's picture

25 Jun 2022 - 2:08 pm | इरसाल

तुमचा आशावाद आवडला. पण.......

मदनबाण's picture

25 Jun 2022 - 2:57 pm | मदनबाण
डँबिस००७'s picture

25 Jun 2022 - 4:40 pm | डँबिस००७

शिवसेनेचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल

हा नक्कीच भाबडा विश्वास आहे. आज ५५ आमदारांपैकी ४०-४२ आमदार फुटुन बाहेर पडलेत. सध्या उ ठा कडे मागे राहीलेल्या ब विधायकांची संख्या १३ धरली तरी त्याच्या ३ पट विधायक एकनाथ शिंद्यांकडे आहेत.

२०१९ साली , १८० (संख्ये बद्दल खात्री नाही) निवडणुक लढलेल्या शिवसेनेच्या नेत्यांत फक्त ५५ नेतेच जिंकलेले होते याचा अर्थ तेच नेते बर्यापैकी जनाधार असलेले होते. असे विधायक जेंव्हा पक्ष सोडुन बाहेर पडतात तेंव्हा पक्षाकडे काय जनाधार उरतो ?

अश्या पक्षाला युती फोडुन बाहेर पडण्याची लालुच देणार्यांनी शिवसेना संपवण्याचा निर्धार केलेला होता. आता जनाधार असलेल्या नेत्यां विरुद्ध पक्षाच्याच नगरसेवकांचा, पक्ष कार्यकर्त्यांना उठाव करायला पक्ष प्रमुखच सांगत आहेत. शिवसेनेचे आमदार सुद्धा अश्या अंतर्गत युद्धाला तयार असणार. असे नेते नगरसेवक व पक्ष कार्यकर्त्याना समजवुन सांगायचा प्रयत्न करतील ज र नाही ऐकल तर ग्रहयुद्द अटळ आहे. अश्यामूळे हार या दोघापैकी कोणाचीही झाली तरी शेवटी लॉस शिवसेनेचाच होणार आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 4:57 pm | श्रीगुरुजी

२०१९ साली , १८० (संख्ये बद्दल खात्री नाही) निवडणुक लढलेल्या शिवसेनेच्या नेत्यांत फक्त ५५ नेतेच जिंकलेले होते

२०१९ मध्ये सेनेच्या वाट्याला १२४ जागा झाल्या होत्या व त्यातील ५६ जिंकल्या होत्या.

अश्यामूळे हार या दोघापैकी कोणाचीही झाली तरी शेवटी लॉस शिवसेनेचाच होणार आहे.

सहमत. आता हे सरकार टिकले किंवा पडले तरी सेनेचे नुकसानच होणार आहे.

शिंदे आतून पोखरणार.

मुलाला उभे करता करता बापाचा वारसा सोडण्याची पाळी आली. ( उद्धववर, मा. मुख्यमंत्रीसाहेबांवर)

अगोदर वाटलं होतं हा सगळा फार्स आहे.. उठांनीच खेळलेलं राजकारण.. पण पक्षफुटीपर्यंत ताणल्या गेलेलं हे प्रकरण, राजकारण असू शकत नाही.. नॉट अ‍ॅट धिस प्राईस!

पण या निमित्तानं काही इतर मुद्दे चर्चेत आलेत तर बरे होईलसे वाटते -
१. कॉ+राकॉ यांच्यासोबत जाऊन शिवसेनेने चूक केलेली होती आणि ती आत्ता ठळकपणे पुढे आली. पण आपल्या लोकांना हे आवडणार नाही आणि त्याचे पुढचे परिणाम पक्षासाठी आणिक घातक असतील हे पक्षप्रमुख म्हणून निर्णय घेतांना उठांना जाणवले नसेल काय?
२. शिवसेना महाराष्ट्रात असायला हवी हे तर खरेच. पण त्यांनी सत्तेसाठी जी तडजोड केली ती लोकं विसरतील काय? निवडणुकीला सामोरं जातांना शिवसेना कॉ+राकॉ सोबत युती करून उभी राहिली तर तिला असलेला जनाधार कमी होईल का वाढेल?
३. भाजपने राकॉ सोबत सत्तेसाठी तडजोड करणे ही खूप मोठी चूक होती. ती नसती केली तर जनतेची सहानुभूती कायम पाठीशी घेऊन स्वबळावर पुढची निवडणूक जिंकण्याची ताकद भाजपात आली असती. ही घाण भाजप कशी साफ करणार निवडणुकांना सामोरं जातांना?
४. पवारसाहेब वाट्टेल ते राजकारण करून, कोलांटउड्या मारून सत्तेसाठी प्रयत्न करतात तर लोकं राजकारणी म्हणून त्यांचं कौतुक करतात. पण तसेच शिवसेना वा भाजपनं केलं तर सत्तापिपासू म्हणून वाभाडं काढतात. का? अजूनही या दोन पक्षांकडून जनतेला "पार्टी विथ डिफरन्स" या अ‍ॅटीट्यूडची अपेक्षा आहे काय?
५. संजय राऊत या माणसानं शिवसेनेची एकहाती केलेली घाण उठांना दिसत नाही काय? की काही खास कारणानं उठांचे हात बांधलेले आहेत?
६. ठाकरेंना हटवून शिवसेनेची मांडणी ही पटत नाही आणि ते इतके सहज शक्यही नाही. अगदी झालेच तरीही मतांमधे सरळ सरळ फूट पडणार हे उघड आहे. पण सगळ्यात नुकसान पक्षाचंच होणार. अशावेळेस सरकारमधून बाहेर पडणे, सर्व आमदारांना एकत्र घेणे आणि भाजपला बाहेरून पाठींबा देणे हे पक्ष वाचवण्यासाठी [ थोडी नाचक्की सहन करून ] उठांनी करणे योग्य ठरणार नाही काय?
७. पवारसाहेब स्वतः जर राजकारणातून निवृत्त झाले तर राकॉला काय भवितव्य राहील? त्यांच्यातही फूट पडणार नाही काय?

आणखीनही चर्चेचे विषय आहेत याच अनुषंगाने, पण तूर्तास इतके पुरे. :-)

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 8:20 pm | श्रीगुरुजी

१) सहमत
२) पहिल्या वाक्याशी पूर्णपणे असहमत
३) सहमत
४) फक्त भाजपकडून पार्टी विथ डिफरन्स असावी ही अपेक्षा आहे. सेनेकडून अजिबात नाही कारण सेनेने स्थापनेपासूनच अगदी मुस्लिम लीग आणि इतर अनेक पक्षांबरोबर साटंलोटं केलं आहे.
५) उद्धव ठाकरे आपल्याला हवे तेच राऊतच्या मुखातून बोलतात.
६) सेना सत्तेसाठी कोणाशीही तडजोड करू शकते. तसेच सेनेकडे कोणतीही दूरदृष्टी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडून भाजपला पाठिंबा देण्याची सुतराम शक्यता नाही.
७) अखेरच्या श्वासापर्यंत पवार राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. त्यांच्या पश्चात सुळे गट व अजित पवार गट असे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पडतील. काही जण भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये जातील. एकंदरीत पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपून जाईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 1:04 am | अमरेंद्र बाहुबली

एकंदरीत पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपून जाईल. महाराष्ट्रात सर्वाधीक वैचारीक ताकद असलेला पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काॅंग्रेस आहे. फुले शाहू आंबेडकर ही फक्त नावं नाहीत तर चळवळ आहे. ह्यांचा वारसा जपलाय तो फक्त राष्ट्रवादीने. त्यामुळे राष्ट्रवादी कधीही संपनार नाही.

४) फक्त भाजपकडून पार्टी विथ डिफरन्स असावी ही अपेक्षा आहे. सेनेकडून अजिबात नाही कारण सेनेने स्थापनेपासूनच अगदी मुस्लिम लीग आणि इतर अनेक पक्षांबरोबर साटंलोटं केलं आहे.

ह्म्म.. एकुणात जमीन पातळीवरून लोकांचा पाठिंबा असलेला एकही नेता सध्या महाराष्ट्रात नाही. त्यामुळेच तडजोडी वाढल्यात आणि त्यातून हा सर्व घोडेबाजार जन्माला येतो.

५) उद्धव ठाकरे आपल्याला हवे तेच राऊतच्या मुखातून बोलतात.

माझं मत :- उठांना असं वाटतं की संरा जे बोलतो ते त्यांच्या हिताचं आहे. पण संरा हा पवारसाहेबांना जे घडवून आणायचं असतं ते स्वतःच्या "गटारसरणीतून" बोलतो. यात केवळ आणि केवळ शिवसेनेचा घात आहे हे सुद्धा जर उठांना समजत नसेल तर पक्षप्रमुख म्हणून राहण्याची कोणती नैतिक जबाबदारी आहे त्यांची?

६) सेना सत्तेसाठी कोणाशीही तडजोड करू शकते. तसेच सेनेकडे कोणतीही दूरदृष्टी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडून भाजपला पाठिंबा देण्याची सुतराम शक्यता नाही.

शिवसेना ही सत्तेसाठी डेस्परेट आहे आणि त्यात काही चूक आहे असं मी मानत नाही. पण कमीतकमी स्वपक्षहीत हे तरी सर्व पक्ष जपत असतात. सध्यातरी उठा असं काही करतांना दिसत नाहीत. पक्षप्रमुख पदाचं महत्त्व कधीच हवेत उडून गेलंय. आज जेव्हा ९०% आमदार पक्षप्रमुखांच्या विरोधात बंडखोरी करतात तेव्हा त्यामागे केवळ पैसा/सत्ता/भिती ही कारणं असू शकत नाहीत. आत्मपरिक्षण करण्याची गरज आज उठांचीच आहे. पण असो. जे होणेच नाही त्याबद्दल चर्चा करून काय हशील?

७) अखेरच्या श्वासापर्यंत पवार राजकारणातून निवृत्त होणार नाहीत. त्यांच्या पश्चात सुळे गट व अजित पवार गट असे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे पडतील. काही जण भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये जातील. एकंदरीत पवारांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपून जाईल.

होय, हे पटतं. जर सत्तापालट होणार असेल तर पुढचे दिवस राकॉ साठी बिकट होऊ शकतील. पुढचे सत्ताधारी काय करतील ह्यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतील. मध्यावधी झाल्यात तर भाजपला विशेष फायदा होतांना दिसत नाही. २-२.५ वर्षे सत्तेत मिळालीत तर शक्यता वाढते.

प्रदीप's picture

27 Jun 2022 - 9:38 am | प्रदीप

एकुणात जमीन पातळीवरून लोकांचा पाठिंबा असलेला एकही नेता सध्या महाराष्ट्रात नाही. त्यामुळेच तडजोडी वाढल्यात आणि त्यातून हा सर्व घोडेबाजार जन्माला येतो.

१९६० साली राज्याची स्थापना झाल्यापासून असा कुठचा नेता महाराष्ट्राला, किंबहुना, भारताला लाभला होता/ आहे?

[माझे मतः एकही नाही. ह्याचे मूळ, आपण लोकशाही ह्या संकल्पनेला राबवण्यासाठी अतिशय अपरिपक्व आहोत. तेव्हा अनेक सर्वच राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना, टिकून राहायचे असेल, तर अनेक तडजोडी/ फोडाफोडी ह्या कराव्याच लागतात].

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:31 pm | अमरेंद्र बाहुबली

१९६० साली राज्याची स्थापना झाल्यापासून असा कुठचा नेता महाराष्ट्राला, किंबहुना, भारताला लाभला होता/ आहे? ईंदिरा गांधी.

गणेशा's picture

25 Jun 2022 - 9:52 pm | गणेशा

अगोदर वाटलं होतं हा सगळा फार्स आहे.. उठांनीच खेळलेलं राजकारण.. पण पक्षफुटीपर्यंत ताणल्या गेलेलं हे प्रकरण, राजकारण असू शकत नाही.. नॉट अ‍ॅट धिस प्राईस!

असे वाटणे सहाजिक असु शकते, परंतु सोशल मीडिया वरती असे जाणिव पुर्वक पसरवले जात होते, आणि कुजबुज करून आपले हित साधणारे मात्र अश्या गोष्टींना खतपाणी घालतात, त्यामुळे सामान्य माणसाला असा प्रश्न पडू हि शकतो..

१. भाजपा बरोबर जाण्यापेक्षा कधीही राष्ट्रवादी बरोबर संगनमत करणे जास्त इष्ट आहे असे माझे मत आहे,
भाजपा हा धूर्त आणि सहकारी पक्षांना गाडणारा पक्ष वाटतो, एव्हडेच कशाला स्वतःच्याच पक्षातील जुन्या लोकांना हि सत्तेच्या चाव्या साठी डावपेच करून बाहेरचा रस्ता दाखवण्यात त्यांना काहीही वाटत नाही.

४. पार्टी विथ डि्फरन्स नाही च, हेच खरे आहे, येथे कोणीच आम्ही वेगळे असे म्हणु शकत नाही, त्यातल्या त्यात पार्टी विथ डीफरन्स असे कोणाला म्हणता आले तर ते आप असतील..
भाजपा कडून तर या मध्ये काहीच अपेक्षा नाही. त्यांच्या सारखा साम दाम दंड भेद वापरणारा आणि पक्ष माणसे फोडताना यांना जराही लाजा नाही
त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणणे आजच्या घडीला कोणालाच म्हणता येणार नाहीये.

५. संजय राऊत यांचे बोलणे मला हि पटत नाहीच, पण त्याच वेळेस चंद्रकांत पाटील, फडणवीस यांच्या बद्दल हि तसेच वाटते..
मग संजय राऊत शिवसेनेला खाली न्हेतायेत तसेच चंद्रकांत पाटील हि भाजपा ला खालीच खेचत आहेत..

त्यामानाने राष्टावादी चे जयंत पाटील वगैरे लोक जास्त मुद्देसूद वाटतात..

नाना पटोले आणि आव्हाड पण डोक्यात जातात.

६. नाही, सेने ने फुटलेलं आमदार एकत्र घेऊन नाचक्की करून भाजपाला साथ देऊ नये..

७.
*पवारसाहेब स्वतः जर राजकारणातून निवृत्त झाले तर राकॉला काय भवितव्य राहील? त्यांच्यातही फूट पडणार नाही काय?*

पवार साहेबांच्या नंतर राष्ट्रवादी सोडा, महाराष्ट्रातील कुठल्याही नेत्याला देशात काडीची किंमत राहणार नाही हे नक्की..
महाराष्ट्र काँग्रेस ला जसे दिल्लीचे गुलाम म्हणले जायचे तसेच फडणवीस तरी असे दुसरे काय करतात?

बाकी शरद पवार नंतर राष्ट्रवादी एकसंध राहिल, परंतु तिचे महत्व जास्त नसेल असे वाटते.

१. भाजपा बरोबर जाण्यापेक्षा कधीही राष्ट्रवादी बरोबर संगनमत करणे जास्त इष्ट आहे असे माझे मत आहे

यात इतिहास बघीतला तर काँग्रेसनेच स्थानिक पक्षांसोबत जेव्हा जेव्हा युती केली तेव्हा तेव्हा स्थानिक पक्षाला नुकसान झालेले दिसेल. त्यांच्यासोबत जायला जर शिवसेना तयार असू शकते तर भाजपसोबत जाण्यास काहीही हरकत नसावी.

भाजपा हा धूर्त आणि सहकारी पक्षांना गाडणारा पक्ष वाटतो

सर्वच राजकीय पक्ष धूर्त असतात, नव्हे असायलाच हवेत नाही तर भोळसटपणानं मरायचीच वेळ येईल. त्यात मला तरी काहीही गैर वाटत नाही.

एव्हडेच कशाला स्वतःच्याच पक्षातील जुन्या लोकांना हि सत्तेच्या चाव्या साठी डावपेच करून बाहेरचा रस्ता दाखवण्यात त्यांना काहीही वाटत नाही.

भाजप हे करू शकतो यातच बर्‍याच गोष्टी आल्यात. एकखांबी तंबू होऊन तसेही हाती फार काळ यश टिकवता येत नाही.

४. पार्टी विथ डि्फरन्स नाही च, हेच खरे आहे, येथे कोणीच आम्ही वेगळे असे म्हणु शकत नाही, त्यातल्या त्यात पार्टी विथ डीफरन्स असे कोणाला म्हणता आले तर ते आप असतील..
भाजपा कडून तर या मध्ये काहीच अपेक्षा नाही. त्यांच्या सारखा साम दाम दंड भेद वापरणारा आणि पक्ष माणसे फोडताना यांना जराही लाजा नाही
त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स म्हणणे आजच्या घडीला कोणालाच म्हणता येणार नाहीये.

मी जन-अपेक्षा काय आहे असं म्हटलं. भाजप असा सत्तापिपासू झालेला लोकांना आवडत नाही ह्यातच त्यानं नीट वागावं अशी अपेक्षा दिसते. अर्थात् आजच्या घडीला असं कुणाला म्हणता येत नाही हे खरं.
पण बाकीचे साम-दाम-दंड-भेद वापरत होतेतच आणि अजूनही वापरतातच. त्यामुळे त्यांना यावर गळे काढण्याचा नैतिक अधिकार राहत नाही.

५. संजय राऊत यांचे बोलणे मला हि पटत नाहीच, पण त्याच वेळेस चंद्रकांत पाटील, फडणवीस यांच्या बद्दल हि तसेच वाटते..
मग संजय राऊत शिवसेनेला खाली न्हेतायेत तसेच चंद्रकांत पाटील हि भाजपा ला खालीच खेचत आहेत..
त्यामानाने राष्टावादी चे जयंत पाटील वगैरे लोक जास्त मुद्देसूद वाटतात..
नाना पटोले आणि आव्हाड पण डोक्यात जातात.

महाराष्ट्राला लोकनेत्याची गरज आहे. जमीन पातळीवर राज्यभर जनाधार असलेल्या नेत्याची गरज आहे. त्यासाठी खूप मेहनत घेणे जरूर असते आणि दुर्दैवानं तसं होतांना दिसत नाही.

६. नाही, सेने ने फुटलेलं आमदार एकत्र घेऊन नाचक्की करून भाजपाला साथ देऊ नये..

काय करतात हे दिसेलच लवकर, पण शिवसेनेचे खूप मोठे नुकसान झालेले आहे हे नक्की.

बाकी शरद पवार नंतर राष्ट्रवादी एकसंध राहिल, परंतु तिचे महत्व जास्त नसेल असे वाटते.

नाही, फार काळ एकसंध राहू शकणार नाही असे वाटते.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 8:37 am | चौकस२१२

राघव
सहमत

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 6:29 pm | अमरेंद्र बाहुबली

सेनेने महाराष्ट्रात भाजपला वाढवून किती मोठी चूक केलीय हे सेना नेत्यांना आता लक्षात आले असेल. जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी नव्हता अश्या पक्षासोबत सेनेने युती केली. आज अशी वेळ आलीय की हा पक्ष सेना संपवायला आटोकाट प्रयत्न करतोय. असंगाशी संग प्राणांशी गाठ ही म्हण येथे लागू पडते. जो पक्ष ४० वर्ष भाजप वाढवायला राबनार्या खडसेंना झाला नाही तो सेनेला होईल का?? सेनेने आता यापुढे कधीही भाजपशी युती करू नये. महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांसारखे नेते आज सेनेच्या पाठीशी खंबीरपणे ऊभेत. हे पाहून तारारणींचा काळ महाराष्ट्र पुन्हा अनूभवतोय.

राष्ट्रीय पक्षांशी हातमिळवणी करूच नये. काम झाले की फेकतात.

Bhakti's picture

25 Jun 2022 - 9:40 pm | Bhakti

+१ तेच पाहत होते.
तेलंगणा राज्य(TRS) फारच सुखी आणि प्रगतीशील वाटतंय याबाबत.एकला चलो रे!

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 10:04 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ सेनेने भाजपला वाढवलं नसतं तर आज एकला राजा असता राज्यात. हिंदूत्वाच्या नावाने यावं नी युती करून आपल्यालाच संपवावं. मराठी माणूस युध्दात जिंकतो तहात हरतो हा नायम मराठी माणसाच्या पक्षाला लागू पडलाय.

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 4:41 am | चौकस२१२

जो पक्ष कधीही हिंदूत्ववदी नव्हता अश्या पक्षासोबत सेनेने युती केली.
बर भाजपचं घर उन्हात बंधू हा ....
पण हे सांगा मग नास्तिक असेललाय शरद पवारांच्या "सर्वधर्मसमभावी" आव आणत जातीचे राजकारण खेळणाऱ्या पक्षाबरोअबर हे हिंदुत्व कसे काय हो राहणार ?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:33 pm | अमरेंद्र बाहुबली

पवारांच्या "सर्वधर्मसमभावी" आव आणत जातीचे राजकारण खेळणाऱ्या पक्षाबरोअबर असं फक्त भाजप समर्थकाना वाटतं. बाकी पहाटेचा फियास्को झाला नसता तर फडणवास राहनार होतेच ना? :)

महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांसारखे नेते आज सेनेच्या पाठीशी खंबीरपणे ऊभेत

हित, शरद पवार, पाठीशी खंबीरपणे ऊभे रहाणे.
ह्या तीन शब्दांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 7:55 pm | अमरेंद्र बाहुबली

तसेच शरद पवार नाव ऐकून जळफळाट न होणे ह्यांचाही काहीही संबंधं नाही. :)

डँबिस००७'s picture

25 Jun 2022 - 7:26 pm | डँबिस००७

तुमने मेरा घर तोडा था, पर तुम्हारा तो घमंड टुटेगा ! कंगना रनौत २०२१

उध्धवजीके पतन के दो कारण,
राउत प्रेम और रनाऊत का अभिशाप.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 7:54 pm | अमरेंद्र बाहुबली

उध्धवजीके पतन के दो कारण, कधी झालं पतन ? :)
बाकी अतिक्रमनात घर बांधनार्या कंगनाच्या शापाने ठाकरेंचं काहीही वाकडं झालं नाही. पण तिचा १०० कोटीचा सिनेमा अडाच कोटी कमावून संपला. तिलाच महाराष्ट्राची शाप लागला, जाहीरातू, स्टारडम , सिनेमे सगळं गेलं. धाकडचं यश पाहून आता तिला कोणता प्रोड्युसर दारातही ऊभा करनार नाही. :)
भाजपच्या नादी लागून पायावर धोंडा पाडून घेतलेले-
सचिन पायलट
ज्योतीरादित्य शिंदे
कंगना
अर्नब
परमवीर
वानखेडे
नितीश कूमार
राणा दांपत्य
नि आता बंडं खरं असेल तर एकनाथ शिंदे.

कॉन्ग्रेसला मत देणार.
कॉन्ग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यासाठी गप्प आहे. अचानक सर्व जागा लढवणार. सगळीकडे आनंदीआनंद होणार राहूल पंतप्रधान होणार. CRZ काढणार. ३७० आणणार. तलाक आणणार.

रात्रीचे चांदणे's picture

25 Jun 2022 - 8:09 pm | रात्रीचे चांदणे

राहुल गांधी अजून भाजपच्या नादी लागले नाहीत आणि म्हणूनच त्यांची प्रगती चालू आहे. उलट सेना भाजपच्या नादी लागली आणि १ आमदार ते ५५ आमदार अशी अधोगती झाली.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 8:15 pm | अमरेंद्र बाहुबली

उलट सेना भाजपच्या नादी लागली आणि १ आमदार ते ५५ आमदार अशी अधोगती झाली.
बरोबर. सेना भाजपच्या नादी लागावी म्हणून भाजप नेते मातोश्रीवर युती करा म्हणून विनवन्या करायला यायचे. :)

चौकस२१२'s picture

27 Jun 2022 - 4:43 am | चौकस२१२

कधी झालं पतन ? :)

पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे निघून जातात यात पतन नाही?

विजुभाऊ's picture

27 Jun 2022 - 12:03 pm | विजुभाऊ

तेच की.
आता तर ठाकरेंच्या मंत्रीमम्डळात एकटेच आदित्य ठाकरे हेच काय ते शिवसेनेचे मंत्री उरले आहेत.
या पेक्षा आणखी पतन काय असणार.
असो......
राऊतांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात सेना संपविणे हे एक पाप्/पुण्य जमा होणार हे मात नक्की.
राऊत आज आमदारांच्या बाबतीत हा अगोदर कुठेतरी वॉचमन होता , हा भाजी विकायचा , हा रस्त्यावर बसायचा असे कायकाय बोलतत होते.
राऊतसाहेबांचे सगळे प्रयत्न आमदारांनी सेनेपासून दूर जावे असेच आहेत.
लोकांना वाय झेड म्हणणे ,रेडे म्हणणे या मुळे लोकांची नाराजी दूर होत नाही ती वाढतेच.
अर्थात राऊत हे ठरवीऊन करत आहेत हेच दिसते.
ठाकरेंना कितीही वाटले की बंडखोर आमदारांनी सेनेकडे पुन्हा यावे तरीही राऊत ते होऊ देणार नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:38 pm | अमरेंद्र बाहुबली

राऊतांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात सेना संपविणे हे एक पाप्/पुण्य जमा होणार हे मात नक्की. राऊत ह्यांनी एकट्याने भाजपला अंगावर घेतलं तेही कुठल्याही चौकशी ला न घाबरता. बाकी सेना संपायची काळजी भाजपचे लोक फार करतात. :) सरळ सांगा की राऊत रोज भाजपची अब्रू वेशीवर टांगतात. त्यांनी २.५ वर्षात खंड पडू दिला नाहीये.
राऊत आज आमदारांच्या बाबतीत हा अगोदर कुठेतरी वॉचमन होता , हा भाजी विकायचा , हा रस्त्यावर बसायचा असे कायकाय बोलतत होते. खरं तेच बोलले. ह्या आमदारांना शिवसेनेनेच मोठं केलंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:35 pm | अमरेंद्र बाहुबली

पक्षाचे ५५ पैकी ४० आमदार असे निघून जातात यात पतन नाही? अजून सिनेमा संपलेला नाही. वाट पहा. मागच्या वेळेस ही “मोटा भाई ने गेम किया” म्हणून पहाटे पहाटे संदेश फाॅरवर्ड करायला सुरूवात केली होती. नंतर कळालं की मोटाभाईचाच गेम झालाय. :)

कानडाऊ योगेशु's picture

27 Jun 2022 - 2:41 pm | कानडाऊ योगेशु

हे मात्र खरे आहे. फिंगर्स क्रॉस्ड.

संजय राऊत सारखा बेअक्कल माणुस शिवसेनेत गदारोळ माजवायला लागलेला आहे. गोहत्ती मध्ये असरलेल्या शिवसेनेच्या विधायकांच्या परिवाराला सरळ सरळ धमकी देत आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या पुण्यातील ऑफिस मध्ये घुसुन शिवसेनेच्या गुंडांनी मोडतोड केलेली आहे. ह्याचा परीणाम वाईट होणार असे ईशारे यायला लागले आहेत.

शिवसेनेच्या बागी विधायकांनी मविआ सरकारच्या कारभारावर नाराजी जाहीर करताना बरेच प्रश्न उभे केलेले आहेत. जसे की योजनेसाठी पैश्याची वाटणी / विभागणी होत असताना शिवसेनेच्या विधायकांना ५० कोटी तर काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या विधायकांना ७०० - ८०० कोटी दिले जात होते. ह्या वर मविआ सरकार मधिल कोणीही बोलायला तयार नाही. शिवसेनेच्या बागी विधायकांनी सुरत व पुढे गोहात्तीला जाण्यामागे त्यांच्यामधल्या दाबलेल्या भावनांचा उद्रेक होऊनच त्याम्नी अशी पावले उचलली असतील.

शिवसेनेच्या बागी विधायकांनी उचललेल्या अश्या पावला बद्दल ईथल्या शिवसेनेच्या सापोर्ट्सना काय म्हणायच आहे. शिवसेनेच्या बागी विधायक पुर्णपणे चुक पण त्यांच्यावर अन्याय करणार्या मविआ सरकार मधिल काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या विधायकांना मात्र मोकळीक ?
शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ह्या नात्याने सुद्धा त्यांनी वेळीच शिवसेनेच्या नेत्यांनी उभे केलेल्या सवालांची उत्तरे दिली पाहीजे होती.

संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी गाठली आहे
आणि सुसंकृत म्हणवणाऱ्या उद्धवजींना तसू भर हि फरक नाही !
याला उत्तम उत्तर येथे बघा ...
https://www.youtube.com/watch?v=7jHjZ7ZnbVw

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Jun 2022 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली

संजय राऊतांनी अतिशय नीच पातळी गाठली आहे ३५ वर्षे ठाकरी शौली म्हणून फुले ऊधळनारे भाजपा समर्थक आता सेनेने गाडीतून ऊतरवल्यावर नीच वगैरे भाषा वैपरू लागलेत. ऊद्या युती झाली की ह्याच राऊतांची परत स्तुती सुरू होईल.

कानडाऊ योगेशु's picture

25 Jun 2022 - 8:19 pm | कानडाऊ योगेशु

इथुन पुढे मविआ जर तुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना हे सोबत मिळुन लढणार कि वेगवेगळे.? दोन्हीही केसमध्ये नुकसान शिवसेनेचेच आहे. भाजपाचे भले काही नुकसान होईल. पण शिवसेनेने स्वतःच शरद पवारांचे महत्व अतोनात वाढवुन ठेवले आहे. ( आठवा शरद पवार को समझने के लिये मोदी शहा को सौ जनम लेने पडेंगे. इति संजयजी राऊत.) तसे असताना जर शिवसेनेने मविआ अंतर्गत निवडणुक लढवली तर हे दोन्ही पक्ष शिवसेनेला लिंबुटिंबु सारखेच वागवणार. मविआ बाहेरुन लढवली तर फक्त भाजप द्वेष जो ह्या बाकीच्या दोन्ही पक्षांचा अगोदरचाच अजेंडा आहे त्यावर कितपत मते मिळवु शकतील? आणि शरद पवारांवर कुठल्या तोंडाने टिका करणार? शरद पवारांनी फडणवीस व आता उद्धव ठाकरे ह्या दोघांना नक्कीच धोबीपछाड टाकला आहे. काहीही म्हणा पण काका रॉक्स.

श्रीगुरुजी's picture

26 Jun 2022 - 12:12 am | श्रीगुरुजी

इथुन पुढे मविआ जर तुटली तर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेना हे सोबत मिळुन लढणार कि वेगवेगळे.?

मविआ तुटली किंवा टिकली तरी पुढील विधानसभा निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी व कॉंग्रेसची युती असेल. त्यात ते सेनेला घेणार नाहीत. सेनेला एकटे लढावे लागेल व जास्तीत जास्त १० जागा मिळतील. अगदी सेनेला युतीत घेतले तरी ते फार थोड्या जागा सेनेला देतील.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

26 Jun 2022 - 1:17 am | हणमंतअण्णा शंकर...

तर शिवसेनेला आताहून जास्त जागा मिळतील. फुटलेले बहुतांशी आमदार भाजपकढून लढण्याची शक्यता आहे किंवा एकतर त्यांना स्वतंत्र लढावे लागेल. दोन्हीकडून त्यांचा पराभव अटळ आहे.

२०१४ प्रमाणे चारही पक्ष स्वतंत्र लढतील असं वाटतंय कारण सतेज पाटलांसारखे लोक कदाचित एकत्र लढायला राजी होणार नाहीत. ( सतेज पाटलांनी सगळा कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसमय करून टाकला आहे ). भाजप सरसकट विजयी होऊ नये असं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्यांना वाटतंय त्यामुळे त्यांनी निवडणूकपूर्व युती करतील का? शिवसैनिक राजी होणार नाहीत त्यामुळे असं शक्य नाही. कॉंग्रेस + राष्ट्रवादी अंतिम हित लक्षात घेऊन आणि लोकल मतभेद मिटवून युती करतील असं वाटतंय. म्हणजे शिवसेना, भाजप आणि दोन्ही काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असं दिसतंय.

भाजप निवडणुकीमध्ये फायद्यात राहणार आहे त्यामुळे येनकेन प्रकारे भाजप संपूर्ण बहुमतासाठी आटोकाट प्रयत्न करेल. कदाचित (शिंदेसेना + मनसे + एनडीए) विरुद्ध (शिवसेना) विरुद्ध ( काँग्रेस + राष्ट्रवादी + वंचित बहुजन आघाडी + स्वाभिमानी शेतकरी + शेकाप ) अशी लढाई होऊ शकते.

श्रीगुरुजी's picture

25 Jun 2022 - 9:43 pm | श्रीगुरुजी

https://www.indiatoday.in/india/story/activist-teesta-setalvad-gujarat-a...

न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याने टिस्टा सेटलवाडला अटक झाली.

आग्या१९९०'s picture

25 Jun 2022 - 10:15 pm | आग्या१९९०

जगाला पुरेसा गहू निर्यात करू अशी घोषणा करून आठवड्याभरात गहू निर्यात बंद करण्याची नामुष्की पंतप्रधानांवर आली. कुठल्याच गोष्टीची सखोल माहिती न घेता घोषणा करायची आणि त्यातील चुका दुरुस्त करत बसायची पंतप्रधानपदाची खोड काही केल्या जात नाही. व्यापारी हे हुशार असतात हे नोटबंदीच्यावेळी दिसून आले. आता ह्याच व्यापाऱ्यांनी सरकारने गहू निर्यातबंदी केल्याने गव्हाचे पीठ निर्यात करायला सुरुवात केली. अचानक १० पट गव्हाच्या पिठाची निर्यात झाल्यावर सरकारचे डोळे उघडले. गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी करायचा विचार करतेय सरकार. असल्या डळमळीत विचारांमुळेच सरकारच्या योजनांवर लोकं विश्वास ठेवत नाही. आठ वर्षात इतक्या ठेचा खाऊनही हे सरकार सुधारायचे नाव घेत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Jun 2022 - 11:03 pm | अमरेंद्र बाहुबली

आता ह्याच व्यापाऱ्यांनी सरकारने गहू निर्यातबंदी केल्याने गव्हाचे पीठ निर्यात करायला सुरुवात केली.
खिक्क. ईतकी साधी गोष्ट ह्या सरकारला कळू नये. ह्यांचे समर्थक सोमावर ईतराना न्यान शिकवण्यात आघाडीवर असतात.

गव्हाच्या पिठावर निर्यातबंदी करायचा विचार करतेय सरकार.

बहुतेक व्यापारी त्यानंतर चपात्या / पोळ्या निर्यात करतील.

आग्या१९९०'s picture

26 Jun 2022 - 12:20 pm | आग्या१९९०

आता केंद्र सरकाराला स्वतःच्या योजना बासनात बांधून काँग्रेसच्या मनरेगा सारख्या योजनांच्या आयत्या पिठावर रेघोट्या माराव्या लागणार.

आग्या१९९०'s picture

25 Jun 2022 - 11:38 pm | आग्या१९९०

रिझर्व बँकेने रेपो दर वाढवल्यावर सरकारला देशात महागाई झाल्याचे समजले. धन्य ते सरकार आणि अर्थमंत्री. नाक्यावरचा पक्याच ह्या सरकारचे समर्थन करू शकेल.