क्वर्टी किबोर्ड ची आज अचानक आमच्यात चर्चा झाली ती एकाने नोकियाचा नवा मोबाईल आणल्यामुळे. ह्या चर्चेतून खूपच रंजक माहिती मिळाली.
क्वर्टी किबोर्डला क्वर्टी किबोर्ड हे नाव पडायला त्या किबोर्डावरील Q च्या रांगेतील पहिली सहा अक्षरे कारण आहेत. पण मुळात ही अक्षरे अशा पद्धतीने मांडायला एक कारण असे होते की, आपल्याला ज्या अक्षरांचा सतत वापर इंग्लिश लिहितांना करावा लागतो, त्यांचा टाइपबार पुर्वीच्या टाईपरायटरच्या वर एकमेकांना अडचण ठरु नये अथवा आदळू नये.
नंतर माणसाला ह्या किबोर्ड मांडणीची इतकी सवय झाली की, कंप्युटर किंवा मोबाईल फोनचा किबोर्ड लेआऊटही तसाच राहिला- खरे म्हणजे मेकॅनिकल टाइपरायटरचा टाइपबारचा प्रश्न येथे येत नाही पण सवय जास्त प्रभावी ठरली व तो लेआऊट तसाच ठेवला गेला.
ह्यावरुन एक विषेशण निर्माण झाले- ज्यावेळी माणूस एखादी गोष्ट अवघड असली (किंवा माहित नसले की एखादी गोष्ट अशीच का करायची) तरी करत राहतो, त्या सवयीला क्वर्टी-ईफेक्ट म्हणतात.
अधिक माहिती- इथे
प्रतिक्रिया
29 Apr 2009 - 1:40 pm | सहज
रंजक माहीती.
फोटो - क्वर्टी किबोर्ड मोबाईल मॉडेल नोकीया इ ७१

29 Apr 2009 - 1:40 pm | अनंता
Qwerty हा असा एकमेव(अपवादात्मक) इंग्रजी शब्द आहे की ज्यात Q या अक्षराच्या पुढे u हे अक्षर नाही!
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
29 Apr 2009 - 1:49 pm | अजय भागवत
Qwality (Walls) मधिल. :-)
29 Apr 2009 - 2:59 pm | अनंता
मी शब्दकोषातील 'क्यू'ने सुरू होणार्या अक्षराबद्दल बोलत होतो.
तरीही तुमचं म्हणणं रास्त.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
29 Apr 2009 - 3:11 pm | नितिन थत्ते
ते वॉल्स मधलं के डब्लयू ए एल आय टी वाय आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
29 Apr 2009 - 7:34 pm | अनंता
QWALITY हे आइस्क्रीमचे ब्रँड-नेम आहे आणि बर्याचदा ब्रँड-नेम मध्ये स्पेलिंगला फाट्यावर मारले जाते.
दर्जा या अर्थाने आपण म्हणत असू तर Quality हाच शब्द बरोबर आहे. आणि इथे स्पेलिंगमध्ये 'डब्लू' नाही, तर 'यू' आहे :)
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
29 Apr 2009 - 7:47 pm | प्राजु
ब्रँड च्या नावाखाली काहीही स्पेलिंग करतात.. अक्षरे उलटीसुलटी करता. आयडीया मोबाईचेच पहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Apr 2009 - 2:04 pm | नंदन
छोटेखानी लेख आवडला. क्वर्टी कीबोर्डमागचा इतिहास थोडाफार ठाऊक होता, पण क्वर्टी इफेक्ट ही संज्ञा नव्यानेच समजली. लिनक्सऐवजी विंडोज वापरणे किंवा मराठी माणसाने उद्योगधंद्यात विशेषत्वाने न पडणे यालाही क्वर्टी इफेक्टच म्हणता येईल :) [वाट ती चालावी रूळलेली]
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Apr 2009 - 7:19 pm | प्राजु
क्वर्टी इफेक्ट हा शब्द ऐकला होता पण त्यावेळी त्याचा अर्थ नक्की काय समजला नव्हता.
या माहितीतून समजला. :)
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Apr 2009 - 7:45 pm | चतुरंग
मोठ्या पडद्याची गरज असते. मोबाईल फोन वर एवढा मोठा कीबोर्ड देऊन त्याची जागा व्यापणे - ज्याला इलेक्ट्रॉनिक्स परिभाषेत 'रिअल इस्टेट' म्हणतात - परवडणारे नसते.
त्यामुळे वर्च्युअल कीबोर्ड ची सोय निघाली आहे (उदा. आयफोन). स्पर्शपडदा (टचस्क्रीन) सुविधेमुळे हे सहज शक्य होते. जेव्हा हवा तेव्हा की बोर्ड, नको तेव्हा पडदा.
आता अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम वापरणारा गूगलचा जी१ हा फोन देखील ह्या आभासी कीबोर्ड प्रकारात येतो आहे!
(म्हणजे कीबोर्ड आताशा 'पडदानशीन' व्हायला लागला आहे असं म्हणायला हरकत नाही ;))
चतुरंग
29 Apr 2009 - 8:15 pm | अजय भागवत
मोठ्या पडद्याची गरज असते. मोबाईल फोन वर एवढा मोठा कीबोर्ड देऊन त्याची जागा व्यापणे - ज्याला इलेक्ट्रॉनिक्स परिभाषेत 'रिअल इस्टेट' म्हणतात - परवडणारे नसते.
स्मार्टफोनचा (खरे म्हणजे सगळेच तंत्रज्ञान) पुढचा अवतार आम्हा-तुम्हाला थक्क करेल असा असेल. आणि अभिमानाची गोष्ट अशी की, ह्या नव्या तंत्रज्ञानामागे आपला एक भारतीय विद्यार्थी आहे. हे तंत्रज्ञान साकार झाले तर खर्या-खुर्या रियल इस्टेटचा वापर पडद्यासाठी होईल.
ह्या फितीच्या शेवटी लोकांनी किती वेळ उभ्या राहून टाळ्या वाजवल्या ते नक्की पहा.
">
29 Apr 2009 - 8:20 pm | चतुरंग
दोन आठवड्याखालीच संदीप चित्रेने मला दाखवलेन. (मला अजूनही हे नीट समजावून घ्यायचे आहे. नुसता धावता आढावा बघितलाय.)
चतुरंग
29 Apr 2009 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त क्लीप ! निव्वळ चमत्कार !
29 Apr 2009 - 8:46 pm | प्राजु
केवळ चमत्कार आहे.
प्रणव ला हॅट्स ऑफ!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Apr 2009 - 8:51 pm | अजय भागवत
पेटंट त्याचे असेल तर भविष्यात जगातील पहिल्या पाच श्रीमंतात तो नक्कीच गणला जाईल.
29 Apr 2009 - 9:25 pm | अभिज्ञ
जबरदस्त प्रकार आहे.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
30 Apr 2009 - 7:37 am | सहज
एकदम भारी प्रकार आहे!
29 Apr 2009 - 8:37 pm | क्रान्ति
खूपच रंजक माहिती आणि दुवे देखिल छान!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
30 Apr 2009 - 8:12 am | अनामिक
अरे वरचा विडिओ म्हणजे काय गम्मत आहे की काय.... असं काही पाहीलं की मारूती नक्कीच होतो :)
हॅटस् ऑफ टु प्रणव!
-अनामिक
30 Apr 2009 - 10:37 am | दशानन
हा किबोर्ड प्रकार खुप जुना आहे मोबाईल मध्ये तरी असे मला वाटते, मी वापरलेल्या नोकिया ९२००, ९२१० आय व २५०० ह्याच प्रकारचा किबोर्ड होताच, २००२ मध्ये आलेल्या आय-मेट एक्सडिए मध्ये पण हा किबोर्ड होता !
थोडेसं नवीन !
30 Apr 2009 - 4:48 pm | चतुरंग
हवा तेव्हा ऑन स्क्रिन येणारा बोर्ड हा नवीन आहे.
हा बघा नोकिया ९२१० फ्लिप फोन. ह्यावर कीबोर्ड आहे तो फिजिकल आहे वर्चुअल नव्हे.
चतुरंग
30 Apr 2009 - 6:14 pm | प्राची
माहितीपूर्ण लेख.
वरचा व्हिडियो म्हणजे अफलातून आहे आहे सगळं.
हॅटस् ऑफ टू प्रणव! =D> =D> =D>
30 Apr 2009 - 6:37 pm | अजय भागवत
मराठी टंकतांना क्वर्टी किबोर्ड अवघड वाटत असेल तर हे पहा- संगणकावर मराठी टायपिंग तुमची ह्या बद्दलची मते दिलीत तर आभार.