आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना ठेव दरवाजा खुला...
पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला
ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला
मी कसा वाईट ठरलो, सांगतो आता तुम्हा
(गोपिनाथाच्या बरोबर जायचो मी चौफुला)
दूरदेशी आमचा हा घोळ होतो नेहमी
समजतो बाईच आम्ही केशसंभारी मुला
जाहले आयुष्य आहे, आमचे बुजगावणे
बायको सांगेल तैसे या इथे आता डुला
छापकाटा चालला आहे कधीचा हा तिचा
एकदा लागेल नंबर याच आशेवर झुला
हेच होते शेवटी जे आज माझे जाहले
एवढे हासू नका शेकेल तुमचा ही कुला
तू विडंबन पाडले आहेस भीषण "केशवा"
खैर ना आता, पळाया ठेव दरवाजा खुला
प्रतिक्रिया
29 Apr 2009 - 4:29 am | बेसनलाडू
आवडले.
(अविवाहित)बेसनलाडू
29 Apr 2009 - 6:15 am | चतुरंग
एक लंबर!
तुम्हालाही हा खुला दरवाजा भुरळ पाडणार हे आम्हाला वाटलेच होते! ;)
चतुरंग
29 Apr 2009 - 9:54 am | श्रावण मोडक
दरवाजा खुला कसला, हे म्हणजे फ्लडगेट्स ओपन्ड असे झाले.
29 Apr 2009 - 10:40 am | आंबोळी
गुरुदेव,
छान झालय.
आंबोळी
29 Apr 2009 - 10:28 pm | लिखाळ
फार सुंदर.. मस्त !
-- लिखाळ.
29 Apr 2009 - 10:33 pm | ऋषिकेश
हा हा.. शेवटचे दोन शेर तसेच दूरदेशीचा घोळ आवडला
(शेकलेला) ऋषिकेश
29 Apr 2009 - 10:34 pm | प्राजु
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
30 Apr 2009 - 2:05 am | सुवर्णमयी
पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला
ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला
पुढचे सर्व शेर वाचायची गरजच उरली नाही.. एवढा धमाल आहे हा शेर.:)
सोनाली
30 Apr 2009 - 12:32 pm | केशवसुमार
प्रतिसाद देणार्या आणि प्रतिसाद न देणार्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार