कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच.
मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ.
पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय.
इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एक पोरगेली आकृती दिसतेय.
मी वेळेत खाली दुबकून लपतो. नीट हालचाली केल्या पाहिजेत. शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे आलो तरच त्याला बेसावध ठेवून मागून घाव घालता येईल. एकच चान्स आहे मला.
मी टाकीमागे लपवलेली दाभण उचलतो. अस्वस्थता कमी होत चाललीय, ती सुखद उत्तेजित अवस्था आलीय. घाव चुकता कामा नये. मग थोडं शांत शांत वाटेल..
प्रतिक्रिया
11 May 2022 - 4:33 pm | चांदणे संदीप
+१
ही खरी शशक!
सं - दी - प
12 May 2022 - 3:21 am | ब़जरबट्टू
बघा बरे आपले सम्पादक मन्डळ काय म्हणते :)
केवळ सरळधोपट कथा सांगणे हा या लेखनप्रकाराचा मूलभूत उद्देश नसतो.
• बरोब्बर १०० शब्दांमध्ये कथा सांगणे आणि
• शेवटच्या शब्दात / वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे,
ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.
11 May 2022 - 4:57 pm | डाम्बिस बोका
छान
11 May 2022 - 5:17 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
जव्हेरगंज :)
11 May 2022 - 10:42 pm | जव्हेरगंज
नॉट मी :)
पण छान मांडली आहे.
+१
11 May 2022 - 5:23 pm | वामन देशमुख
+१
11 May 2022 - 5:23 pm | चौथा कोनाडा
+१
छान.
रत्नाकर मतकरींची "शेवटची बस" आठवली.
11 May 2022 - 6:22 pm | एमी
+१
केवळ शेवटच्या वाक्यात तो सिरिअल किलर आहे हे कळलं असतं तर जास्त मस्त झाली असती.
12 May 2022 - 3:18 am | ब़जरबट्टू
हेच म्हणतो. सिरीयल किलरचा धक्का शेवटी यायला हवा होता.
पण बाकी कथा छान !
11 May 2022 - 7:02 pm | कर्नलतपस्वी
छान कथा
11 May 2022 - 9:35 pm | Bhakti
छान लिहिलंय +१
11 May 2022 - 9:46 pm | सुक्या
+१
12 May 2022 - 5:43 am | कर्नलतपस्वी
+1
12 May 2022 - 10:17 am | मोहन
+१
12 May 2022 - 1:17 pm | विजुभाऊ
कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच.
मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ.
इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एक पोरगेली आकृती दिसतेय.
मी वेळेत खाली दुबकून लपतो. नीट हालचाली केल्या पाहिजेत.
शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे येतो.
अस्वस्थता कमी होत चाललीय, ती सुखद उत्तेजित अवस्था आलीय. मी हातातले दाभण पुन्हा एकदा चाचपतो. एकच चान्स आहे मला . पुढे होऊन बरोबर वर्मी घाव घालतो.
पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय.
**** ही कथा माझी नाहिय्ये.
12 May 2022 - 1:44 pm | जव्हेरगंज
आत एकदम परफेक्ट!!!!
12 May 2022 - 3:13 pm | संजय पाटिल
+१
12 May 2022 - 4:00 pm | कॉमी
विजुभाऊ तुमची कथा मूळ कथेला न्याय देत नाहीये.
मूळ कथेत तो सिरीयल किलर आधी त्या मुलीला वाचवायला म्हणून दबून बसला असतो, तो तिच्याकडे जातो सुद्धा त्याच हेतूने, पण मध्येच त्याच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू पकड घ्यावी लागते.
हे मानसिकतेतले द्वैत तुमच्या कथेत मिसिंग आहे. कथेतला हा बारीक मुद्दा सर्वात सुरेख आहे. तो कुठे दिसेल ? तर इथे-
हि कथा माझीही नाहीये :) पण मला हा मुद्दा दिसला म्हणून सांगतोय.
12 May 2022 - 4:05 pm | कॉमी
म्हणूनच कथेची मांडणी जशी केलीये तशी आहे-
सिरीयल किलरचे अस्तित्व आधी समजते.
गच्चीत असलेला व्यक्तीच किलर असेल अशी आपली समजूत होते.
पण तो "तिला" ऐवजी "त्याला" मारायला गेल्यावर चाणाक्ष वाचकांची समजूत होते की घरात आणि कोणी तरी आहे...
पण हळूहळू त्याचे मन बदलते.
12 May 2022 - 4:20 pm | कॉमी
पोरगेली आकृतीचं माझ्याकडून चुकीचं वाचन होऊन "मुलीची आकृती" असे काहीसे झाले.
हम्म, जर तशी कथा लिहिली असती तर काय झाली असती !
.........
कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच.
मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ.
पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय.
इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एका मुलीची आकृती दिसतेय.
तो दिवणघरातच असणारे- मला हळूच नीट हालचाली केल्या पाहिजेत. शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे आलो तरच त्याला बेसावध ठेवून मागून घाव घालता येईल. तिला वाचवायचा एकाच चान्स आहे.
मी टाकीमागे लपवलेली दाभण उचलतो. अस्वस्थता कमी होत चाललीय, ती सुखद उत्तेजित भावना वाढतीये. घाव चुकता कामा नये. मग शांत शांत वाटेल..
12 May 2022 - 1:50 pm | श्वेता२४
+१
12 May 2022 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान
-दिलीप बिरुटे
13 May 2022 - 12:28 am | सुखी
+१