अवास्तविक प्रेरणा!

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
26 Nov 2021 - 7:06 pm
गाभा: 

फेसबुक किंवा युट्यूब चाळताचाळता काही वेळा प्रेरणादायी विचारांचे लेखन केलेले किंवा चित्राला जोडून मजकूर असलेले किंवा युट्यूबवर विचारवंतांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी कुतूहल म्हणून तर कधी बघुया तरी काय सांगतायत ते असे म्हणून आपण ते वाचतो किंवा ऐकतो/पाहतो. सगळेच काही आपल्याला पटतील असे नसतात. एखादा तथाकथित यशस्वी(विविध अर्थांनी) विचारवंत काहीवेळा दवणीय बोलतो किंवा व्यवहारात वापरल्यास अापल्याच अंगलट येईल असेही विचार मांडतो. किंवा काहीवेळा ज्यातलं फारसं कळत नाही त्या क्षेत्राबाबतही तो विचारवंत काही विधाने करुन जातो. काही वेळा बोले तैसा चाले याची वानवा असते.
तुमच्याही बाबतीत कधी असं घडलंय का? एखादा प्रेरणादायी विचार किंवा विचारवंताचे बोलणे ऐकून 'काहीही बोलतायत' 'जाम पकवतायत' 'वास्तविक जगात असं होत नाही' असे विचार चमकून गेले आहेत का? लिहा मग त्या 'डोक्यात जाणार्‍या प्रेरणादायी विचारांबद्दल नि विचारवंताबद्दल!'

प्रतिक्रिया

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Nov 2021 - 9:56 pm | चंद्रसूर्यकुमार

एखादा प्रेरणादायी विचार किंवा विचारवंताचे बोलणे ऐकून 'काहीही बोलतायत' 'जाम पकवतायत' 'वास्तविक जगात असं होत नाही' असे विचार चमकून गेले आहेत का?

एक प्रश्न---
'काहीही बोलतायत', 'जाम पकवतायत' असे काही वाटत असेल तर ते प्रेरणादायी विचार कसे असू शकतील?

बाकी ज्यांना इतर अनेक लोक विचारवंत म्हणतात ते लोक बोलतात/लिहितात तेव्हा असे मला नेहमीच वाटते. या विचारवंत लोकांमध्ये समाजवादी/डाव्या लोकांचा समावेश होतो. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी सहमत असता तोपर्यंत त्यांच्याइतका सहिष्णू माणूस जगात सापडणार नाही. पण जरा त्यांच्याशी असहमती दर्शवा. मग ते कट्टरातल्या कट्टर फासिस्टापेक्षाही जास्त असहिष्णू बनतात आणि चवताळून अंगावर येतात हा अनुभव अनेकदा घेतला आहे.

उपयोजक's picture

26 Nov 2021 - 10:35 pm | उपयोजक

'काहीही बोलतायत', 'जाम पकवतायत' असे काही वाटत असेल तर ते प्रेरणादायी विचार कसे असू शकतील?

ते काहीतरी प्रेरणादायी छापाच्या शीर्षकाखाली येतात म्हणून तसं लिहिलंय. ;)

वामन देशमुख's picture

27 Nov 2021 - 8:43 am | वामन देशमुख

या विचारवंत लोकांमध्ये समाजवादी/डाव्या लोकांचा समावेश होतो. जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी सहमत असता तोपर्यंत त्यांच्याइतका सहिष्णू माणूस जगात सापडणार नाही. पण जरा त्यांच्याशी असहमती दर्शवा. मग ते कट्टरातल्या कट्टर फासिस्टापेक्षाही जास्त असहिष्णू बनतात आणि चवताळून अंगावर येतात.

प्रचंड सहमत आहे.

सर टोबी's picture

27 Nov 2021 - 8:23 am | सर टोबी

शिखरावर असणारे जगतगुरु यांचे विचार आणि कृती यात महत अंतर आहे हे जाणवते. श्री श्री रविशंकर यांच्या दिल्लीतील कार्यक्रमासाठी यमुनेच्या पात्रात उभारलेला मंच, त्यासाठी नदी पात्रात अवजड यंत्र फिरवून केलेली पर्यावरणाची हानी, सैन्य दलाचा वापर हे सर्व तिडीक आणणारे होते.

वर एक सदस्य उठसूठ समाजवादी विचारांवर तोंडसुख घेतो ते सुध्धा आचार आणि कृती मधील अंतरच दर्शवते. भांडवलशाहीचा उदो उदो करणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावं: पैसा हा सर्व दुष्ट प्रवृत्तीच मूळ आहे आणि एका मोठ्या समुदायाला अर्ध पोटी ठेऊन केलेली चंगळ ही अस्पृश्यते सारखीच एक दिवस अंगाशी येईल. कोरोनाने त्याची झलक दाखवलीच आहे.

जेम्स वांड's picture

27 Nov 2021 - 9:06 am | जेम्स वांड

कधीपासून ?

&#128562 &#129322

जग्गी वासुदेव. शब्दांचे सॅलड नुसते.

अलकेमिस्ट पुस्तक.

अर्थात, तिडीक आणि डोक्यात जाणे वैगेरे गोष्टी होत नाहीत. पटत नाहीत इतकेच. उलटे बऱ्याचदा पुष्कळ करमणूक होते.

चेतन सुभाष गुगळे's picture

17 Apr 2022 - 11:58 pm | चेतन सुभाष गुगळे
पाषाणभेद's picture

27 Nov 2021 - 12:02 pm | पाषाणभेद

गाभा:
ऑनलाईन फोरम किंवा ब्लॉग चाळताचाळता काही वेळा प्रेरणादायी विचारांचे लेखन केलेले किंवा चित्राला जोडून मजकूर असलेले किंवा फोरमवर विचारवंतांचे मार्गदर्शनपर लेख तुम्ही पाहिले असतील. कधी कुतूहल म्हणून तर कधी बघुया तरी काय सांगतायत ते असे म्हणून आपण ते वाचतो किंवा पाहतो. सगळेच काही आपल्याला पटतील असे नसतात. एखादा तथाकथित यशस्वी(विविध अर्थांनी) विचारवंत काहीवेळा दवणीय बोलतो किंवा व्यवहारात वापरल्यास अापल्याच अंगलट येईल असेही विचार मांडतो. किंवा काहीवेळा ज्यातलं फारसं कळत नाही त्या क्षेत्राबाबतही तो विचारवंत काही विधाने करुन जातो. काही वेळा बोले तैसा चाले याची वानवा असते.
तुमच्याही बाबतीत कधी असं घडलंय का? एखादा प्रेरणादायी विचार किंवा विचारवंताचे लिहीणे वाचून 'काहीही लिहीताय' 'जाम पकवतायत' 'वास्तविक जगात असं होत नाही' असे विचार चमकून गेले आहेत का? लिहा मग त्या 'डोक्यात जाणार्‍या प्रेरणादायी विचारांबद्दल नि विचारवंताबद्दल!'

जेम्स वांड's picture

27 Nov 2021 - 12:05 pm | जेम्स वांड

नुकतेच एक असे पात्र सापडले मिपावर, कैच्याकै लिहिणार, एजंडे रेटणार, प्रसंगी वैयक्तिक बोलणार पण मिपावर अमरपट्टा असल्यामुळे त्यांना सहन करणे सोडून काही उपाय नाही आमच्याकडे.

म्हणणे त्यांचे पटत नाही पण साहेब झोकात काहीतरी बोलतात अन आम्हाला मान डोलवावी लागते कारण जनतेला भावुक करण्याची कला त्या साहेबांना नीट अवगत आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Nov 2021 - 1:36 pm | चौथा कोनाडा

कॉपी पेस्टवाल्या स्वंयघोषीत विचारवंतांचा प्रचंड राग येतो.
हे असले भुरटे (यात हिंदी भाषिक उथळ उडाणटप्पु { हे कशाचाही व्हिडो तयार करून लोकांना बनवण्यात तरबेज असतात} लै डोक्यात जातात !

जेम्स वांड's picture

27 Nov 2021 - 1:51 pm | जेम्स वांड

अगदी मराठी आंतरजालावर सुद्धा असे नमुने सापडतात, स्वतःची जडजांबल मते ठोकून सांगताना वरतून स्वतः परप्रकाशित असल्याचे निर्लज्जपणे सांगतात सुद्धा.

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Nov 2021 - 2:48 pm | चंद्रसूर्यकुमार

परप्रकाशित असूनही ते न सांगणारे इतकेच नाही तर त्यावर मल्लीनाथी करणारे एक मराठी वर्तमानपत्राचे संपादक आहेत. आणि हो ते संपादक राऊत नाहीत :)

उपयोजक's picture

27 Nov 2021 - 3:28 pm | उपयोजक

हा विचार पटण्यासारखा आहे का?

जगणे

सर टोबी's picture

27 Nov 2021 - 6:45 pm | सर टोबी

नक्कीच पटणारा आहे. तो विचार वेडगळ, अती आदर्शवत वगैरे वाटत असेल तर थोडा, त्या सारखाच पण एक वेगळा विचार असा करून बघा:

A higher order goal takes care of lower order goals automatically.

मुक्त विहारि's picture

27 Nov 2021 - 8:10 pm | मुक्त विहारि

Achieve the Lower Goals. Maintainit And Carry on.

आधी तोरणा मग रायगड आणि मग दिल्ली...

तुम्ही वरील वाक्य चुकीचे इंटरप्रेट केले आहे.

सर टोबी's picture

28 Nov 2021 - 9:07 am | सर टोबी

परमार्थ साधा, स्वार्थ आपोआप साधला जाईल असा त्या वाक्याचा अर्थ होऊ शकतो.

उपयोजक's picture

27 Nov 2021 - 3:31 pm | उपयोजक

रिस्क

रिस्क कॅलक्युलेटेड असली पाहिजे ना?

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Nov 2021 - 3:32 pm | अमरेंद्र बाहुबली

सर्वात भयानक सुविचार.
“कूणी आपल्या मार्गात काटो पसरले तर आपण त्याच्या मार्गात फूल पसरवावेत.”
कशाला??

मुक्त विहारि's picture

27 Nov 2021 - 8:10 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

रावसाहेब चिंगभूतकर's picture

27 Nov 2021 - 9:17 pm | रावसाहेब चिंगभूतकर

“कूणी आपल्या मार्गात काटो पसरले तर आपण त्याच्या मार्गात फूल पसरवावेत.”

थोडा modify (मोदी-फाय असा वाचू नये) करतो:

“कूणी आपल्या मार्गात काटो पसरले तर आपण त्याच्या मार्गात फूल पसरवाववीत. अमोनिअम नायट्रेट ची.”

फूल पसरायला माझी हरकत नाही..
फुले पसरवू नयेत.

होत्या तिथेच.