*लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द*
(खरं तर असे सेम टू सेम शब्द मायकल जॅक्सन आणी त्याच्या नंतर देवाघरी गेलेल्यांचेही होते)
*मृत्यूपेक्षा या जगात खरे दुसरे काहीही नाही.*
*जगातील सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे.*
*पण मला व्हीलचेअरवर बसवले जाते!*
*या जगात सर्व प्रकारच्या डिझाईन आणि रंग, महागडे कपडे, महागडे बूट, महागडे सामान हे सर्व माझ्या घरात आहे.*
*पण मी हॉस्पिटलने दिलेल्या शॉर्ट गाऊनमध्ये आहे!*
*माझ्या बँक खात्यात खूप पैसे आहेत पण त्याचा मला काही उपयोग नाही.*
*माझं घर माझ्यासाठी राजवाड्यासारखं आहे पण मी दवाखान्यात एका छोट्याशा बेडवर पडून आहे.*
*मी या जगातल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये फिरत राहिले.* *पण आता मला रुग्णालयातील एका प्रयोगशाळेतून दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवले जात आहे!*
*एक काळ असा होता जेव्हा 7 हेअरस्टायलिस्ट रोज माझे केस बनवत असत.*
*पण आज माझ्या डोक्यावर केस नाहीत.*
*मी जगभरातील विविध 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत होते.*
*पण आज दिवसातून दोन गोळ्या आणि रात्री एक थेंब मीठ हा माझा आहार आहे.*
*मी वेगवेगळ्या विमानांतून जगभर फिरत होते.*
*पण आज दोन लोक मला हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जायला मदत करतात.*
*कोणत्याही सुविधांनी मला मदत केली नाही.*
*कोणत्याही प्रकारे शिथिल नाही.*
*पण काही प्रिय व्यक्तींचे चेहरे, त्यांच्या प्रार्थना, प्रार्थना मला जिवंत ठेवतात.*
*हे जीवन आहे, तुमच्याकडे कितीही संपत्ती असली, तरी शेवटी तुम्ही रिकाम्या हाताने निघून जा, दयाळू व्हा, ज्याला शक्य असेल त्याला मदत करा*
*पैसा आणि सत्तेसाठी लोकांना महत्त्व देणे टाळा.*
*चांगल्या लोकांवर प्रेम करा, जे तुमच्यासाठी आहेत त्यांची कदर करा, कोणालाही दुखवू नका, चांगले व्हा, चांगले करा कारण तो तुमच्यासोबत जाईल.*
*लता मंगेशकर,,,*
निरनिराळ्या व्यक्तीच्या नावे कित्येक वर्ष ही पोस्ट फिरते आहे.
ज्या कोणी महामूर्खाने लतादीदीचे नाव जोडले आहे त्याला अक्कल पाहिजे कि लता दीदी महागडे बूट कशाला वापरतील? त्या प्रभुकुंज अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये रहायचे. राजवाड्यासारखे घर कोठून आले?
*हेअर स्टायलिस्ट केस बनवत होत्या???*
कोठून हे असले मराठी येते? आणि दीदी कशाला हेअरस्टाईल करतील? त्यांच्या कायम वेण्या असायच्या.
प्रतिक्रिया
16 Mar 2022 - 6:55 pm | मुक्त विहारि
फेसबुकीय आणि व्हाॅटस् अपीय ज्ञान हे मृगजळा समान ....
निखळ मैत्री करायची असेल तरच, ह्या साईट वापरायच्या...
मेसेज करतो ...
16 Mar 2022 - 7:39 pm | कंजूस
पूर्वी हे काम करत. आता संध्यांनंद. जीवनाचा फोलपणा प्रवासात वाचण्यासाठी. मोठा कागद असेल तर दोन कामे होतात. वाचन, करमणूक आणि शिटा पुसणे, फलाटावार अंथरणे वगैरे.
संदेश म्हणा किंवा करमणूक झालीच पाहिजे.
16 Mar 2022 - 7:51 pm | मुक्त विहारि
खात्रीशीर बातमी देत होते आणि कथा देखील असायच्या.
पण, "श्री" ची गोष्ट अशीच होती ... सनसनाटी बातम्या आणि लक्षवेधक शीर्षक, ही "श्री" ची खासीयत होती....
16 Mar 2022 - 8:19 pm | गवि
क्लिकबेटी शीर्षके ही ऑनलाईन जमान्यात अधिकच आवश्यक झाली आहेत असे दिसते.
अगदी लोकसत्ता किंवा अन्य ऑनलाईन वृत्तपत्र आवृत्त्या बघा.
-आकडा ऐकून थक्क व्हाल.. क्ष नटी कमावते इतके मानधन..
-"तुमच्या बापाला..." मा. अमुक यांचे खळबळजनक विधान
-"तर मी डोक्यावरचे केस.." मा. तमुक यांची जीभ घसरली
-"तू तर शत्रूपेक्षाही.." अमुक खेळाडूने लगावला टोला
वगैरे
आणि क्लिक केल्यावर आत काही खास कंटेंट नाहीच. असलेच तर एकच वाक्य पानभर फिरवत एक दोन फालतू आकडे, वाक्ये. दणका सनसनीखेज वगैरे काही नाही. फुसके बार.
16 Mar 2022 - 8:38 pm | धर्मराजमुटके
होय. मटा ने या बाबतीत अगदी नीचांक गाठला आहे. लोकसत्ता तसे बरे आहे अजून.
सकाळ ने चांगल्या बातम्यांसाठी पेड सर्विस चालू केली आहे पण मी ती वापरुन पाहिली नाही. मात्र विषय रोचक असावेत असे शीर्षकांवरुन वाटते.
18 Mar 2022 - 12:33 pm | Nitin Palkar
स्पेशल रिपोर्ट हा प्रकार मराठीत कदाचित "श्री साप्तहीकानेच" सुरु केला असावा... अरुण ताम्हणकर स्पेशल रिपोर्ट हे सदर लिहित. शोभा डे (तेव्हाच्या शोभा किलाचंद) याही श्री मध्ये लिहीत असत...
16 Mar 2022 - 8:13 pm | गवि
इतर अनेक क्वोटेबल क्वोट फिरत असतात सर्वत्र. यांतील सुपरस्टार म्हणजे आद्य दैवत आणि पायोनियर पु.लं.. ओशो.. मग नारायण मूर्ती इन्फोसिस, मा. अब्दुल कलामजी, मग नाना पाटेकर, विश्वास नांगरे पाटील आणि इतर.
जागतिक पातळीवर बिल गेट्स, वारेन बफे.
आणि काय वाट्टेल ते पुरस्कार, किताब, सन्मान इ जाहीर करणारी शिखर संस्था "युनेस्को"
16 Mar 2022 - 8:17 pm | अमरेंद्र बाहुबली
राजस्थानातील एका डाॅक्टरांकडे कोन कोन येऊन गेलं पहा.
*PL..READ CAREFULLY N FORWARD IN UR GR N FAMILY,.,...MAY SOMONE GET HELP .....*
मधुकर भावे
आॕगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दुसऱ्या महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई पिंपरी- चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा १ विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही. कंबर दुखू लागली, पायापर्यंत चमक मारु लागली. मंगलाच्या आजारपणामुळे माझं दुखण महत्वाच नव्हतं, त्यामुळे ते अंगावर काढल. त्यानंतर चालणं असह्य झालं.
म्हणून प्रथम डॉ.सुबोध मेहता मग डॉक्टर कपिल अशा नामवंत वैद्यक शास्त्र्यांकडून तपासणी झाली, MRI झाला, इंजेक्शन झाली, गोळ्या सुरु झाल्या. चालता येईना, दुखणं थांबेना. वेदना असह्य झाल्यावर दुखणं बर होत नाही असं जाणवल्यावर निराशा येत गेली त्यातच मंगलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले, निराशेत आणखी भर पडली. काय उपचार करावे सुचत नव्हते, डॉक्टरांनी मणक्याचे आॕपरेशन सुचवले, पण ते करणे धोक्याचे आहे, असे त्यांनीच मत दिले. आता काय करायचे ? काही प्रश्नांची उत्तर नियती देत असते.
एक दिवस अचानक माझे दोन मित्र श्री.किशोर अग्रहाळकर (नवी मुंबईचे माजी नगररचनाकार) आणि श्री.अशोक मुन्शी माझ्याकडे आले. माझं दुखणं पाहून त्यांनी सुचवलं की, ‘जोधपुरला चला’ असं सांगायलाच आलो आहोत. दोन्ही जिव्हाळ्याचे मित्र. जोधपूरला उपाय काय माहित नाही, त्यांच्यावर विश्वास ठेऊन जोधपूरला जायचं ठरले. त्यांनी सांगितले की, डॉ. गोवर्धनलाल पाराशर हे विख्यात डॉक्टर दोन अंगठयांनी कंबर, मणका, मान, पाय याठिकाणी ज्या मांसपेशीमध्ये शीर दबलेली असते तिला बरोबर मार्गी लावतात आणि अवघी १० मिनीटांची त्यांची जादू करुन तर बघा...४ डॉक्टर झाले होते, ४ प्रयोग झाले होते. ५ प्रयोग करुया असं समजून जोधपूरला निघालो, सोबत माझी सुविद्य कन्या डॉ.मृदूला (एम.एस.एफ.आर.सी.एस) ही सुध्दा होती. विमानात बसताना पायऱ्या चढता आल्या नाहीत. व्हिलचेअर वरुन आत जावे लागले. उतरताना व्हिलचेअरची गरज लागली. पुढे काय होणार माहित नव्हते.
चाळीस मिनीटात डॉ. पराशर यांच्या ‘आॕस्टियोपॅथी’ प्रयोगासाठी त्यांच्यासमोर उभा राहीलो. त्यांनी उपचार सुरु केले. त्यांच्या रुग्णालयात सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ पर्यंत रोज ३०० लोकांवर, या सर्व व्याधींवर उपचार केले जातात. त्यांचे बंधू डॉक्टर नंदु, ज्येष्ठ चिरंजीव डॉ.गिरीराज, दुसरे चिरंजीव डॉ.महेश आणि अन्य डॉक्टर सहकारी अशा १२ जणांची टीम ३०० रुग्णांवर पाच वाजेपर्यंत उपचार करते. जे रुग्ण लंगडत आलेले असतात, ज्या रुग्णांना कमरेला विळखा घालून उचलून आणलेले असते..अशा अनेक व्याधी असलेले रुग्ण जवळ पास रडत रडतच येतात आणि १० मिनीटाच्या उपचारानंतर टकाटक चालत, हसत आनंदाने परतताना दिसतात, ते सर्व मी बघत होतो.
डॉक्टर गोवर्धनजी मला म्हणाले ‘आपका तो कुछ भी नही है। दो दिन मे ठीक होके मुंबई जाओगे।’ मी ऐकत होतो. ५ प्रयोग आहे असच म्हणत होतो. डॉक्टरांच्या सोबत उपचाराच्या खोलीत गेलो. एका रुंद टेबलावर त्यांनी झोपवलं. दोन अंगठयांनी मणक्याची शीर दाबायला सुरुवात करुन कमरेपर्यंत दोन अंगठ्यात दुखरी शीर पकडत ते खालपर्यंत येत होते, पुन्हा वर जात होते. मला फरक जाणवू लागला. पायापर्यंत जाणारी चमक पहिल्या ५ मिनीटात कमी झाल्याच जाणवलं. पुढच्या ५ मिनिटानंतर डॉक्टर म्हणाले, ‘चलो उठो..आप खुद चलके जा सकते हो।’ मी टेबलवरुन खाली उतरलो. माझी पावलं ताड-ताड पडू लागली. काय झालयं मलाच समजेना. आवाजात एकदम फरक पडला, उत्साहात फरक पडला. नियती काय घडवतं असते. त्याचा अनुभव करत होतो. डॉक्टर साहेबांजवळ येऊन बसलो. कैसा महसूस कर रहे हो।...त्यांच्या प्रश्नावर इतकच म्हणालो की, ‘विश्वास बसत नाही असं काहीतरी घडलं आहे. पण माझ्यासमोरच्या डॉक्टरांनी हाताच्या २ अंगठयावर हजारो रुग्णांची व्यथा, पिडा गोवर्धन पर्वतासारखीच उचलली आणि त्यांची पिडा दूर केली. विलक्षण योगायोग म्हणजे त्या वैद्यकशास्त्राच नाव डॉक्टर गोवर्धनच आहे. अंगठयाची कमाल आहे. सेवेची आणि ‘आॕस्टियोपॅथीच्या अभ्यासाची ही साधना आहे.
डॉक्टरांनी एक पुस्तक हातात दिलं. उलटून बघितलं, विश्वास बसला नसता. फोटोसकट सगळी सचित्र माहिती होती. मान, पाठ, मणका, पोट-या एवढेच नव्हेतर हाताची एकमेकांवर चढलेली बोटं अशा अनंत व्याधी घेऊन डॉक्टरसाहेबांकडे कोणकोण आले आणि हे जागतिक किर्तीचे लोक अंगठयाच्या जादूने बरे होऊन गेले. त्यांनी कोणत्या कोणत्या शब्दात डॉक्टरांचं वर्णन कसं केलं... सगळ वाचून थक्क झाले. या उपचारामध्ये आहेत, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी राष्टपती डॉ. जॉर्ज बुश, बराक ओबामा, भारताचे माजी राष्टपती डॉ. अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, गुजरातचे त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, आजचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सिनेतारकांमध्ये देवानंद, राजेश खन्ना, धर्मेद्र, मिथुन चक्रवर्ती, सलमान खान, सनी देओल आणि शेवटची दोन नाव...लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या सर्वांचे या ना त्या रुपात डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत आणि त्या सर्वांच्या व्याधी दूर केलेल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग चक्क ६ दिवस दाखलच झाले होते. या महारथींच्यापेक्षा सुध्दा सकाळी ८-५ संध्याकाळी जी सामान्य माणसं येतात त्यांच्या चेह-यावरचा आनंद विलक्षण आहे आणि प्रत्येकाची फी फक्त रुपये १००/-
आणखी एका किस्सा सांगतो. ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मातोश्री श्रीमती कोकिलाबेन अंबानी यांच्या उपचारासाठी त्यांना जोधपुरात आणलं होतं. तो योग साधून त्यांचा वाढदिवस मुकेशजींनी जोधपूरमध्ये साजरा केला. ४०० मित्रांना वाढदिवसाला बोलावलं, १० चॅटर्ड विमान आणली, सगळी फाईव्हस्टार हॉटेल्स बुक केली, ५ कोटी रुपये खर्च केला म्हणतात मग नंतर डॉक्टर गोवर्धनलालजींना ते म्हणाले, ‘मी मुंबईमध्ये ५-२५ कोटी रुपये लावून तुमच्या उपचारांसाठी फाईव्हस्टार रुग्णालय उभं करतो, तुम्ही तिथे या. मला डॉक्टर गोवर्धनलाल यांची विशेषता यातच वाटते की, त्यांनी काय सांगितलं?.. ‘मुकेशभाई, आपका वह सेंटर तो फाईव्हस्टार हॉटेलसे भी उपर के लेवल का होगा, जाहीर है की ऐसे संस्थानमे मै गरीब तो क्या, मध्यमवर्ग का आदमी भी पहुंच नही सकता, मै विनम्रतापूर्वक इसे स्वीकार नही कर सकता, क्योंकी जहा गरीब रुग्ण की मेरे हाथसे सेवा नही हो सकती ऐसे हेल्थकेअर सेंटर मे मेरी विद्या किस काम की?..’
डॉक्टर गोवर्धनलाल पराशर यांची प्रखर मानसिकता, त्यांची उच्च विचारसरणी, व्यावसायाची निष्ठा, सामाजिक धाडस या सर्व गोष्टीचा परिचय त्या एकाच घटनेत होऊ शकतो.
६ दिवस उपचार घेतले, आज मी टकाटक पूर्वीप्रमाणे झपाटून कामाला लागलो आहे. जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत पण जोधपूरमधले डॉक्टर गोवर्धनलाल पाराशर यांचे दोन अंगठे जगातल्या ३२०० कोटी अंगठयांपेक्षा वेगळे अंगठे आहेत. ‘अंगठा दाखवला’ असा मराठीतला वाकप्रचार फार वाईट अर्थाने वापरला जातो. जोधपूरले हे २ अंगठे कमाल करणारे अंगठे आहेत. मी मुंबईला परत निघताना डॉक्टरसाहेबांना सांगितलं की,..‘डॉक्टरसाहब, आपका तहेदिलसे ऋणी हू आज मुंबई जा रहा हू। जोधपूर के २ अंगुठे का डंका मुंबई आणि पुरे महाराष्ट्र मे बजाने की मेरी जिम्मेदारी, आप से मेरा इतनाही वादा..’
मुंबईला आल्यावर अनेक महिने थांबलेला व्यायाम पूर्ववत सुरु केला आहे. मंगलाच्या निधनाने दु:ख पचवून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. डॉक्टर गोवर्धन यांची ही यशस्वी गाथा महाराष्ट्र भर सामान्य माणसाला उपयोगी पडेल यासाठी मुंबई, पुणे, नागपूर या २-३ ठिकाणी डॉ. पाराशर यांची आरोग्य शिबीरे आयोजित करण्याचे काम सुरु केले आहे. नियती या कामात यश देते की नाही ते पाहूया.
Jodhpur Dr Gowardhanlal Parashar
Osteopathy Center, Shree Sonwarlal Osteopathy Chartable
कार्य +91 84260 72222
Phone +91 291 297 2777
घर +91 291 262 2888
Personal drparashar@rediffmail.com
घर
18 E, Chopasni Housing Board, Jodhpur, Rajasthan, 342008.....
*हे माहीत आहेत का आधीपासून? काय असेल. तारखा, साल टाकत नाहीत हा प्रॉब्लेम आहे*
16 Mar 2022 - 8:18 pm | अमरेंद्र बाहुबली
जाॅर्ज बूश, ओबामा.
16 Mar 2022 - 9:23 pm | भागो
जगात १६०० कोेटी लोक राहतात, त्यांचे ३२०० कोेटी अंगठे आहेत.
हसून हसून फुटलो.
16 Mar 2022 - 10:25 pm | मुक्त विहारि
सहा बोटे असलेले, (काही जणांना, असे दोन अंगठे असतात) पकडले नाहीत ...
16 Mar 2022 - 11:10 pm | अनुस्वार
लई हसलो राव.
16 Mar 2022 - 10:29 pm | कर्नलतपस्वी
ग्रुप च ग्रुप चोहिकदे
तोच तोच सन्देश सगलीकदे
दहा पाचा ला फोर्वर्द करता
चन्ग्लि बातमी तुमच्यकदे
डा, पराशर यान्चा सन्दर्भ आन्तर्जालावर पाहु शकता. तरी सुद्धा बरेच वेळा सन्देश खोटे आसतात.
16 Mar 2022 - 10:36 pm | मुक्त विहारि
आता खरे मिपाकर झालात
https://www.misalpav.com/node/6332
17 Mar 2022 - 10:58 am | आंद्रे वडापाव
सनी लिऑनी के उपर हुआ अत्याचार ..
17 Mar 2022 - 3:13 pm | इरसाल
हे जे डॉ. गोवर्धन आहेत त्यांनी अंगठ्या ऐवजी करंगळीने उपचार करायला हवेत. पार पुराणाशी संबंध जोडता येईल.
17 Mar 2022 - 3:25 pm | Trump
अजुन एक धागा सापडला.
17 Mar 2022 - 4:07 pm | कंजूस
पण ज्यांना स्वत:च्या आजारपणाच्या श्टोऱ्या आणि किती खर्च केला हे सांगण्याची हौस असते ते तिकडे जात नाहीतच वर टिंगल करतात.
१) नेरळला एक गाववाला होता. (आता आहे का माहिती नाही. )त्याच्याकडे एका नातेवाइकाबरोबर गेलो होतो. पाठीत उसण भरली की तो मसाज करायचा पाच मिनिटे.त्यांचे दुखणे गायब होऊन परत आलो. अट एवढीच की पैसे,वस्तू द्यायच्या नाहीत.
२) वडलांना पाठीत उसण भरली होती . लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये मणक्याचे ओपरेशन सांगितले. पारल्याच्या होमिओपॅथी कॉलेज हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथले वयस्कर डॉक्टर वाडिया होते. ( डॉ. वाडिया आणि डॉ. देसाई आलटून पालटून बसत.)पाच सहा विद्यार्थी बसलेले. श्टोरी ऐकल्यावर चिडले "कुणी सांगितलं ओपरेशन?" मग विद्यार्थ्यांना काही बोलले आणि एक औषध दिले. ( त्या वेळेस केस पेपरचे पंचवीस पैसे एवढीच फी असे. औषध फुकट.). तर पुन्हा सात दिवसांनी गेलो बरं झालो सांगायला.
17 Mar 2022 - 4:10 pm | Trump
ह्या लोकांचा संसार कसा चालतो?
17 Mar 2022 - 9:10 pm | तर्कवादी
डॉ पराशर यांच्याबद्दल माहित नाही. पण मणक्याचे आजार दूर करणारे लोक असतात. काही तर डॉक्टरही नसतात. मला अहमदनगरचे असे एक गृहस्थ माहित आहेत. त्यांच्या उपचाराचा माझ्या पत्नीला खूप फायदा झाला. कुणाला गरज भासल्यास व्यक्तिगत संदेश पाठवावा.
18 Mar 2022 - 12:04 pm | अर्जुन
नमस्कार,
मला अहमदनगरच्या गृहस्थाची संपर्क माहिती पाठवावी . आपला आभारी आहे.
18 Mar 2022 - 1:46 pm | अमरेंद्र बाहुबली
ईथएच टाका तर्कवादी सर
18 Mar 2022 - 6:15 pm | शाम भागवत
नको.
सार्वजनिक करू नका.
कोणितरी अंधश्रध्दा निर्मूलनाच्या सापळ्यात अडकवायचा प्रयत्न करेल.
वैयक्तिक संदेशच बरा.
खरडवही सुध्दा नको.
असे मला वाटते.
18 Mar 2022 - 9:14 am | चौथा कोनाडा
छान ! कायप्पाचंच ढकलपत्र ते !
उद्या माझ्या नावाने ही हेच येऊ शकेल.
मिपाच्या चौथा कोनाडा यांचे शेवटचे शब्द ! :-))
हा .... हा ..... हा ..... !
18 Mar 2022 - 1:46 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क. खरं आहें
18 Mar 2022 - 12:38 pm | पुष्कर
हे ढकलपत्र ढकलपात्र नाही. शीर्षकात 'ढकल-अपात्र' असं जास्त सयुक्तिक वाटलं असतं.
18 Mar 2022 - 6:44 pm | धर्मराजमुटके
ते अमुक तमूक देवांचे ढकलपत्र आहे काय कोणाकडे ? जे पुढे ढकलल्यावर परिस्थिती सुधारते. मला सध्या त्याची गरज आहे हो. झटपट परिस्थिती सुधारण्यासाठी :)
18 Mar 2022 - 7:11 pm | मुक्त विहारि
अशा लोकांबरोबर संबंध न ठेवणेच इष्ट ....