सर्व भ्रष्टाचा-यांच्या गर्दीत
मारेक-यांच्या गारदी त
घराणेशाहीच्या चाटूकारांत
हिंदूविरोधांच्या बाटूकारांत
खोटारड्यांच्या जहरात
फंद फितूरांच्या शहरात
न्यूयाॅर्क टाईम्सच्या पेड लीस्टवर
अतिरेक्यांच्या हिट लीस्ट वर
घरभेदींच्या द्वेषात ही
शिव्याशापांच्या त्वेशात ही
एक माणूस आपल्या कामांमुळे
कसल्या उंचीवर जातो..
550 वर्षांचा रामजन्मभूमी विवाद
सोडवला
70 वर्षांचा काशमीर 370 विवाद
सोडवला
नोटाबंदी चा वादग्रस्त निर्णय
राफेल खरेदीचा अभूतपूर्व निर्णय
बालाकोट air-strike घरात घूसून
ठोकला.
निरपराधांनी घेतला काश्मीरात श्वास मोकळा
GST ची अंमलबजावणी करा
make in India चा नारा
नवकल्पना start up ला बळ
काळ्या पैसा पळवाट आवळ
करोना लसींचा जागतिक उच्चांक ताणणे
विद्यार्थ्यांना युद्ध थांबवून घरी आणणे
तिरंगा दाखवल्यास जीव घेणा-या काश्मीर पासून,
तिरंगा दाखवल्यास जीवनदान मिळण्यापर्यंत
हिंदूस्तान ची शक्ती वाढवणा-या.
एक माणूस आपल्या कामांमुळे
कसल्या उंचीवर जातो..
प्रतिक्रिया
11 Mar 2022 - 9:57 am | प्रचेतस
क्या बात है बाजीगरजी.
जबरदस्त कविता.
11 Mar 2022 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा
या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ... सावध हरणी सावध गं ! हे गीत आम्हाला आज आठवलं . नवकवींची करील कुणी पारध गं! - असा पुढचा आशयही त्यातून डोकावला .
ल्लुल्लुल्लु
11 Mar 2022 - 11:49 am | गवि
काही निर्णय चुकतात, काही बरोबर येतात. एक विशिष्ट उद्दिष्ट ठेवून निर्णय घेणे हेच मुळात धाडस आणि कौतुकास्पद असते. चुकलेल्या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी घेणे, चुका लक्षात आल्या की मान्य करणे, बदल करणे.. हे सर्व गुण फार महत्वाचे ठरतात. जो काहीच कठोर ठाम निर्णय घेत नाही त्याचे निर्णय चुकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या बाबतीत त्या माणसाचे कौतुक व्हावेच.
11 Mar 2022 - 5:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
जो निर्णय घेतो त्याचेच निर्णय चुकू शकतात.
कविता आवडली
पैजारबुवा,
11 Mar 2022 - 12:00 pm | बाजीगर
सहमत गवि यांच्या म्हणण्याबरौबर.
धन्यवाद प्रचेतस जी
धन्यवाद गवि जी
11 Mar 2022 - 1:01 pm | यश राज
वर गवि म्हणतात त्याच्याशी पूर्ण सहमत
हे वाक्य फार महत्त्वाचे. निर्णय घेणे खूप आवश्यक असते.
11 Mar 2022 - 1:42 pm | कर्नलतपस्वी
निर्णय घेतले तरच चुक का बरोबर कळणार. निर्णय क्षमता ही नेतृत्वाची खरी कसोटी. निर्णय घेण्यासाठी योग्य सुचनाप्रणाली आणी ती यशस्वी पणे राबविण्यासाठी योग्य माणसांची निवड हे फार महत्वाचे.
11 Mar 2022 - 6:37 pm | सुरिया
वाऊ,
ह्या अप्रतिम विश्र्वगौरव रचनेला मिपाच्या मुखपृष्ठावर कायम तहहयात स्थान द्यावे ही विनंती.
सोबत डेली ऑनलाईन फुले वाहण्याची सोय असेल तर सोने पे सुहागा. तोपर्यंत एक वाचन एक फुल असेही समजू.
11 Mar 2022 - 8:15 pm | अत्रुप्त आत्मा
बाकी ... भक्त संप्रदायी प्रासादिक काव्य आवडले
18 Mar 2022 - 11:36 pm | बाजीगर
राहीलाच...
आठवले नाही तेव्हा हे काम.
19 Mar 2022 - 11:08 am | प्रसाद गोडबोले
सुंदर कविता !
बाकी काहीही असेल पण कलम ३७० हटवणे , राममंदिर बांधणे आणि काशीविश्वनाथ मंदिराचा पुनरेकवार जीर्णोध्दार करणे ह्या तीन लोकोत्तर कामांमुळे मोदींनी आपले स्थान इतिहासात निश्चित केलेले आहे ह्यात शंका नाही !
आता आस आहे मथुरा कृष्णजन्मभुमीची ! तेही जुळुन येईल असा ठाम विश्वास वाटायला लागला आहे !
बाकी मोदी द्वेषापायी "भक्त" ह्या पवित्र हिंदु शब्दाचे विद्रुपीकरण करण्यामुळे स्वयंघोषित धर्मसुधारक असल्याचा आव आणाणार्या लिब्रांडुंचे सिक्युलॅरिझम चे बुरखे टराटरा फाटले हे एक उत्तम झाले ! #कुर्हाडीचा दांडा गोतास काळ . =))))
20 Mar 2022 - 1:24 am | बाजीगर
खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल