अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
अजि सोनियाचा दिनु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...
बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
बरवा उसंत ट्रॅफिकजॅमु
प्रगटलो अंतराळु
मेट्रो पाहिला रे, मेट्रो पाहिला रे...
अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे....
अजि सोनियाचा दिनु
कृपासिंधु करुणाकरू
कृपासिंधु करुणाकरू
नितिन देवेन मोदीवरु
बाप नितीन गडकरीवरु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापारी करार
पारदर्शी व्यवहार व भ्रष्टाचारा न थार
अजि सोनियाचा दिनु
वर्षे अमृताचा घनु
मेट्रो पाहिला रे मेट्रो पाहिला रे....
अजि सोनियाचा दिनु
प्रतिक्रिया
6 Mar 2022 - 10:13 pm | चामुंडराय
मस्त, आवडले :)
मात्र सोनियाचा ऐवजी मोदियाचा दिनु पाहिजे होतं का?
7 Mar 2022 - 11:34 pm | चामुंडराय
मोदियाचा दिनु म्हणजे "मोद" आनंदाचा दिनु असे आहे.
हे स्पष्ट केलेले बरे अन्यथा येथे सोनिया आणि मोदी समर्थकांमध्ये हतापाई व्हायची.
7 Mar 2022 - 9:49 am | बाजीगर
100 % सहमत.
धन्यवाद.
7 Mar 2022 - 12:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
चामुंडराय यांची सुचना सुध्दा लक्षात घेण्यासारखी आहे
पैजारबुवा,
7 Mar 2022 - 6:39 pm | कर्नलतपस्वी
आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी क्षणात चिंचवड
क्षणात पोहचेल रामवाडी कडे
आनंदी आनंद गडे
8 Mar 2022 - 10:16 am | बाजीगर
धन्यवाद पैजारबुआ
धन्यवाद कर्नलतपस्वी