१९ बंगले कुठे गेले? चौकशी करा -किरीट सोमय्या
https://www.loksatta.com/maharashtra/where-did-the-19-bungalows-go-inves...
रेवदंडा पोलिसांत FIR
19 बंगले चोरीला गेले...
| निघाले किरीट सोमय्या |
|राऊत करी ता था थैय्या ||
| त्यांच्या हाती पावती |
|मिरच्या झोंबती राऊती ||
|चालले पनवेल, पेण, पेझारी |
|शोधायला शुक्राचार्य अन झारी ||
|पोचले गाव कोरलई |
|म्हणाले बंगले चोर लई ||
|होते इथे 19 बंगले |
|बांधले ते खूप चांगले ||
|भरली होती घरपट्टी |
|सोमय्या ते फार हट्टी ||
|पोलीस बंदोबस्त छावणी |
|पोलीस VIP च्या दावणी ||
|केला रेवदंडा पोलिसांत FIR |
|तपासा कुणी केला फेरफार ||
| सोमय्या प्रवास पाहुनी मळमळले |
| उद्धव सरकार काहूनी डळमळले ||
प्रतिक्रिया
19 Feb 2022 - 11:18 am | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... ! भारीच !
😂
हसतच वाचत राहिलो !
19 Feb 2022 - 11:44 am | मुक्त विहारि
भारी आहे
19 Feb 2022 - 12:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
भारी आहे
माझे बंगले माझी जबाबदारी
पैजारबुवा,
19 Feb 2022 - 1:29 pm | कर्नलतपस्वी
आवडली, कोडे सोडवण्यासाठी ते ना ली राम हवा.
19 Feb 2022 - 1:37 pm | मदनबाण
हा.हा.हा... इतके सिम्पल आहे !
२०२१पर्यंत रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी घरपट्टी भरलेली आहे. हा व्यवहार झाला, तेव्हा ही घरं प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती. फक्त कागदावर होती.
[ कागदमुनी ] :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zoo Zoo Zoobie Zooby... :- Dance Dance
19 Feb 2022 - 1:42 pm | सरिता बांदेकर
मस्त.
19 Feb 2022 - 1:57 pm | यश राज
सत्ताधाऱ्यांचा थयथयाट बघून कळून येते की कुठे तरी पाणी मुरते आहे.