ताज्या घडामोडी- फेब्रुवारी २०२२ - भाग ३

मदनबाण's picture
मदनबाण in राजकारण
11 Feb 2022 - 7:33 pm

सध्या हिजाब वरुन मुद्दामुन बवाल केला जात आहे, यात राजकारण आहे हे देखील उघड आहे. याच विषयावर शबनम शेख हीने तिचे विचार मांडले आहेत.

मालेगाव आणि कुत्ता गोळी यांचा घनिष्ठ संबंध का आहे?गंभीर गुन्हे करताना आरोपी कुत्ता गोळीच्या नशेत होते असे पोलिसांना आठळुन आलेले आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करण्यासाठी सुनियोजित दंगल घडवुन आणण्याचे प्रयत्न होत आहेत का ? अश्या दंगलखोरांना कुत्ता गोळी देऊन मोठ्या प्रमाणात रक्तपात घडवला जाऊ शकतो का ? असे काही प्रश्न मनात उद्भवले आहेत.

प्रतिक्रिया

कॉमी's picture

11 Feb 2022 - 10:20 pm | कॉमी

गुगल प्रमाणे कुत्ता गोळी म्हणजे alprazolam उर्फ zanax असते, tranquilizer.

Many people who take Xanax recreationally, or without a prescription, describe the feeling as sedating or calming. Unlike some drugs, such as cocaine, that produce a “high” or euphoric feeling, Xanax users describe feeling more relaxed, quiet, and tired

मदनबाण's picture

12 Feb 2022 - 10:55 am | मदनबाण

गुगल प्रमाणे कुत्ता गोळी म्हणजे alprazolam
या गोळ्यांची नावे वार्ता़कन करताना मिडिया प्रतिनिधींनी देवु नयेत तसेच या गोळ्यांचे नावा सकट फोटो देखील बातमीत उघड करु नयेत, कारण यामुळे ज्यांना या गोळ्यां बद्धल माहित नाही त्यांना देखील माहिती मिळते अणि यामुळे अधिक लोक व्यसनाकडे ओढले जाऊ शकतात. कॉमन सेन्स हा कॉमन नसतो हेच खरे.
असो...
बुरखा प्रकरणात अचानक अनेकांना वाचा फुटली आहे, त्यांची स्वतःचीच आधीची विधाने त्यांनाच आठवत नाहीत किंवा त्याचा सोयिस्कर विसर पाडला जातो.

Wearing a burqa is like walking inside a big fabric shuttlecock with only a grille to see through and on hot days it's like an oven.
From Book :- I Am Malala

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

ते पुस्तक नक्कीच तीने लिहीले असेल का?

Wearing a burqa is like walking inside a big fabric shuttlecock with only a grille to see through and on hot days it's like an oven.
From Book :- I Am Malala

ते पुस्तक नक्कीच तीने लिहीले असेल का?
पुस्तकातील अनुभव तीचेच असावेत ना ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

कॉमी's picture

12 Feb 2022 - 11:21 am | कॉमी

असे असेल तर उगाच tranquilizer गोळ्या घेऊन रक्तपात होईल असे निराधार स्पेक्युलेशन करू नये.

मदनबाण's picture

12 Feb 2022 - 11:57 am | मदनबाण

असे असेल तर उगाच tranquilizer गोळ्या घेऊन रक्तपात होईल असे निराधार स्पेक्युलेशन करू नये.
जितके मला वाचुन समजले त्या नुसार या गोळ्या मनोविकार, आणि अन्य विकार इं.इं.इं. वर दिल्या जातात, या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्यावर व्यक्ती अनियंत्रित आणि हिंसक होतो / होऊ शकतो.
एक संदर्भ :- नागपूरात कुत्ता गोळी सेवनानं गुन्हेगारी वाढली

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

प्रदीप's picture

12 Feb 2022 - 12:32 pm | प्रदीप

ट्रॅन्क्विलायझर घेण्याची जरूर तथाकथित पुरोगाम्यांना आहे. ह्या सगळ्या प्रकारांत, त्यांची जी केविलवाणी फरफट चालली आहे, तिच्यापसून त्यांना तात्पुरती का होईना, सुटका मिळेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Feb 2022 - 10:02 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आमच्या सेक्युलर मंडळीना नक्की कोणाची बाजू घ्यायची तेच कळत नाही आहे. गणवेशाचा नियम हा पाळायलाच हवा. फ्रांसमध्ये शाळांमध्ये हिजाबला बंदी आहे असे ऐकले होते. शिवाय तेथील खाजगी कंपन्या/संस्थाना बंदी घालण्याची/न घालण्याची परवानगी आहे.

सर टोबी's picture

12 Feb 2022 - 11:50 am | सर टोबी

सेक्युलर मंडळींना तुम्ही किंवा मिपावरील संबित पात्रा, ज्यांना स्वतःला मौखिक अतिसार झाला आहे, यांनी का येता जाता झोडपावं हे मला कळले नाही. मिळालंय ना तुम्हाला पाशवी बहुमत? करताय ना त्याच्या बळावर अल्पसंख्यांकावर अत्याचार? न्यायालय पण मदतीला धाऊन आलेच आहेत.

तुम्हालाच याची बोच वाटते आहे का?

ंम्हणजे शाळेमध्ये एकच गणवेश म्हणजे अत्याचार?

करताय ना त्याच्या बळावर अल्पसंख्यांकावर अत्याचार?

म्हणजे नक्की काय?

न्यायालय पण मदतीला धाऊन आलेच आहेत.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Feb 2022 - 12:17 pm | रावसाहेब चिंगभूतकर

श्री. मुक्त विहारी यांच्याबद्दल वापरलेल्या टिकेतील अश्लाघ्य शब्दांबद्दल मी संपादक मंडळाकडे तक्रार केली आहे.

कॉमी's picture

12 Feb 2022 - 12:28 pm | कॉमी

10.07 वाजता सेम तेच शब्द असलेली कमेंट आहे बघा.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Feb 2022 - 12:43 pm | रावसाहेब चिंगभूतकर

कॉमी सर, नाही. ती कुणा एकाला टार्गेट करून लिहिलेली पोस्ट नाही. माझा आक्षेप व्यक्तिगत होण्याला आहे. जर सगळ्या राईट विंग ला टार्गेट करून लिहिलेली पोस्ट असती तर काही प्रॉब्लेम नव्हता (अशा बऱ्याच पोस्ट्स आहेत). पण व्यक्तिगत हल्ला आणि तो ही असे शब्द वापरून ही गोष्ट आक्षेपार्ह आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Feb 2022 - 12:49 pm | रावसाहेब चिंगभूतकर

जस्ट सो दॅट वी आर क्लिअर, कम्युनिझम बद्दल आणि कम्युनिस्ट लोकांबद्दल माझे विचार तुम्हाला माहीत आहेत . पण समजा जर कॉमी हे कम्युनिस्ट असतील आणि एखाद्या राईट विंग व्यक्तीने कॉमी यांचा अपमान केला किंवा त्यांना शिवी दिली किंवा त्यांना धमकी दिली तर मी तीही पोस्ट रिपोर्ट करेन.

कॉमी's picture

12 Feb 2022 - 1:24 pm | कॉमी

धन्यवाद.

कॉमी's picture

12 Feb 2022 - 10:32 pm | कॉमी

व्यक्तिगत आणि समूह टीका यामध्ये तुम्ही आखलेली रेष तकलादू आहे असे वाटते.

एखाद्या संस्थळावर अ विचारसरणीचे ५ लोक आहेत आणि ब विचारसरणीचे २ लोक आहेत.

जर अ विचारसरणीचे लोक म्हणाले-
"ब विचारसरणीचे लोक अगदी बकवास, मूर्ख, अतार्किक, गटारी तोंडाचे, xxx, xxx, xxx, डायरिया ईई असतात" तर ब विचारसरणीच्या दोन लोकांना ती टीका नुसती लागूच नाही तर त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्यासाठीच दिली आहे हे समजावे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

13 Feb 2022 - 12:15 pm | रावसाहेब चिंगभूतकर

कॉमी साहेब, माझ्या व्यक्तिगत मताबद्दल म्हणाल तर फक्त एखाद्या समूहग्रुप बद्दल काही टिप्पणी न करता सुद्धा मुद्यांआधारे चर्चा करता येते. पण अगदी आंतरराष्ट्रीय ग्रुप्स मध्ये चर्चा करतानाही अनुभवाला हे येते की लोक चर्चेत आपले पूर्वग्रह, द्वेष आणि अनुभव घेऊन येतात. या सगळ्यापलीकडे जाऊन चर्चा करायची असेल तर आपण तेवढे प्रगल्भ अजून झालेलो नाही. किंबहुना माझ्या मते संसदेमधल्या आधीच्या पिढीतल्या चर्चा आता होणाऱ्या चर्चेपेक्षा जास्त मुद्देसूद आणि भरीव होत्या. संसदेत पुराव्याने शाबीत होणारी गोष्ट च बोलायची असते हे विसरून श्रीमान राहुल गांधी बिनबुडाचे आरोप करतात आणि श्रीमान मोदी त्या आरोपांना उत्तरे देत आणि टोमणे मारत बसतात. श्रीयुत उध्वस्त ठाकरे यांच्याबद्दल तर बोलावे अशी परिस्थितीच नाही. मुद्दा असा की तुम्ही कितीही नियम बनवा, लोक एक दुसर्यांना किंवा दुसऱ्या ग्रुप ला मूर्ख म्हणणे, टोमणे मारणे या गोष्टी करणार. उघड नसेल, तर आडून करणार. या सगळ्यात जर कुठली लॉजिकल रेषा आखायची असेल तर व्यक्तिगत टीका ही ती रेषा असावी असे माझे व्यक्तिगत मत आहे. असे मत प्रत्येकाचेच असावे असा आग्रह नाही.
आता तुम्ही सांगितलेल्या मुद्द्या बद्दल. याला नाईलाज आहे. माझ्या मते त्या एक दोन लोकांनी आपल्या ग्रुप मध्ये जास्त लोक ओढावे आणि संख्या 5 पर्यंत न्यावी. किंवा मग संपादक मंडळाकडे ही रेषा अगदी पूर्णपणे सोवळी ठेवण्यासाठी पाठपुरावा करावा. या दुसऱ्या गोष्टीला माझा तरी तुम्हाला पाठिंबा असेल. पण तुमच्या मूळ प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही आणि व्यक्तिगत टिकेकडे वळणे हे ते उत्तर असेल हे मला पटत नाही.

कॉमी's picture

13 Feb 2022 - 7:21 pm | कॉमी

साहेब वैगेरे नको हो. मी तुमच्यापेक्षा in all likelihood बराच लहान आहे वयाने.

बाकी स्पेसिफिक मुद्द्यांवर चर्चा करताना समूहाची लेबले चर्चेमध्ये काहीही अर्थपूर्ण वाढ करत नाहीत असे वाटते. अर्थात, तरी ही लेबले सगळ्यांकडून (मी सुद्धा) लावली जातातच. कमी करायला हवे खरं तर ते.

मुक्त विहारि's picture

12 Feb 2022 - 1:35 pm | मुक्त विहारि

योग्य बोललात ...

सर टोबी's picture

12 Feb 2022 - 1:49 pm | सर टोबी

खाली सरफिरे झोंबी म्हणून माझ्यावर टिका झाली त्याची केली का तक्रार संपादक मंडळाकडे? सरसकट विचारसरणीवर टिका केली तर चालते पण त्या टीकेचा चेहरा म्हणून कोणी समोर असला तर लगेच टिका झोंबते?

फार निःस्पृह असण्याचा अभिमान असेल तर आपण इतरांवर काय टिप्पणी केलीत ते ही जरा बघून घ्या.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

12 Feb 2022 - 2:38 pm | रावसाहेब चिंगभूतकर

टोबी साहेब,
1. माझ्या वाचनाच्या सवयी प्रमाणे माझं लक्ष मेसेज कडे जातं, हेडिंग कडे नाही. त्यामुळे हे शब्द मी वाचलेच नव्हते. तुम्ही हे सांगितलं नसतं तर असं लिहिलेलं माझ्या लक्षात ही आलं नसतं. हे शब्द चुकीचे आहेत हे ही माझं मत आहे हे सुद्धा मी स्पष्ट करू इच्छितो.
2. तुम्हाला हे शब्द टोचले तेव्हा तुम्ही तक्रार का केली नाही? अजूनही तुम्ही तक्रार करू शकता. तुम्ही केली नाही, कारण त्यापूर्वीच तुम्ही मुविंवर खालच्या शब्दात टीका करून झाली होती.
3.

सरसकट विचारसरणीवर टिका केली तर चालते पण त्या टीकेचा चेहरा म्हणून कोणी समोर असला तर लगेच टिका झोंबते?

टीका ही विचारसरणी वर करायला काहीही हरकत नाही पण मिपा वापरकर्त्यांना अनावश्यक रित्या टार्गेट करण्यात काय हशील आहे? तुम्ही किंवा मी त्यांना व्यक्तिगत ओळखत नाही. त्यांचे विचार हे त्यांचे स्वतः चे आहेत, आणि तुम्ही स्वतःला डिफेन्ड करायला त्यांनी तुम्हाला असं काहीच बोललेलं नाही. व्यक्तिगत टीका आणि चिखलफेक करणे हा जर मिपा चा स्थायीभाव असता तर तसं मिपा ने क्लीअर केलं असतं. ते तसे नाहीये याचा अर्थच असा की टीकेला चेहरा असणे हे अभिप्रेत नाही आणि त्याचे स्वागत ही नाही.

फार निःस्पृह असण्याचा अभिमान असेल तर आपण इतरांवर काय टिप्पणी केलीत ते ही जरा बघून घ्या

मग करा तुम्ही तक्रार. माझे काहीच म्हणणे नाही.

प्रदीप's picture

12 Feb 2022 - 12:37 pm | प्रदीप

करताय ना त्याच्या बळावर अल्पसंख्यांकावर अत्याचार? न्यायालय पण मदतीला धाऊन आलेच आहेत.

कोण कुणावर, मताधिक्याच्या बळावर, कसले अत्याचार करताहेत, हे जरा सोदाहरण स्पष्ट कराल का?

न्यायालय पण मदतीला धाऊन आलेच आहेत.

अलेलेलेले,.... आत कसं व्हायचं बुवा?

प्रदीप's picture

12 Feb 2022 - 10:13 pm | प्रदीप

सर्वप्रथम, माझ्या मते थोडीफार वैयक्तिक टीका, जोंवर शिव्या दिल्या नाहीत तोंवर, सहन करता यावी. मी तरी ती करतो. रावसाहेबांसारखा, ह्या बाबतीत मी सोंवळा व हळवा नाही.

तुम्ही निव्वळ उडती विधाने करता व नंतर चर्चेच्या त्या धाग्यातून गायब होता. हे आताच, ह्या दोन चर्चांच्या दरम्यान झालेले पाहिले आहे. तेव्हा असल्या सभासदाच्या विधानांना कितपत गांभिर्याने घ्यायचे? रावसाहेबांच्याच शब्दांत सांगायचे, तर पपलू- टपलू मधे अजून एक भर, बाकी काही नाही.

सेक्युलर मंडळीना बौद्धिक बद्ध कोष्ठ आणि मौखिक अतिसार असतो ( intellectual constipation and verbal diarrhoea)

मुक्त विहारि's picture

12 Feb 2022 - 10:58 am | मुक्त विहारि

विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यास विरोध; मुलींच्या अधिकारासाठी पुढाकार घेण्याचे ‘आयआयएम- बंगळुरु’मधील प्राध्यापकांचे आवाहन

https://www.loksatta.com/desh-videsh/take-initiative-for-the-rights-of-g...

----

काही शाळांमध्ये, पर्यूषण काळात देखील, अनवाणी यायला परवानगी देत नाहीत.... तेंव्हा ही मंडळी आवाज का उठवत नाहीत?

उदारमतवादी धोरण फक्त इतर धर्मियांनाच बंधनकारक आहे का?

आता पुर्वीसारखे ह्या निवडणुकीआधी पत्र लिहीणार्‍यांना कोणी गंभीर घेत नाही.

रात्रीचे चांदणे's picture

12 Feb 2022 - 11:25 am | रात्रीचे चांदणे

सहमत, उत्तर प्रदेश सारक्या महत्त्वाच्या राज्यात निवडणूक असूनही तुलनेने प्रकार कमी होत आहेत. बिहार व लोकसभा निवडणुकीपूर्वी अगदी ऊत आला होता. कदाचित ह्या असल्या प्रकारचा भाजपला नुकसान होण्याऐवजी फायदाच होत आहे हे लक्षात आल्यावर स्वतःहुन कमी केलं असेल.

एका मिशनरी शाळेद्वारे हिंदू मुलीला अपमानित केले गेले, छळले गेले आणि तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले - हे सगळे होतांना कुठे होते हेच लिबरल?
त्यावेळी वेगळा न्याय आणि हिजाबच्या वेळी वेगळा असे का?

मुक्त विहारि's picture

13 Feb 2022 - 9:25 am | मुक्त विहारि

उदारमतवादी हिंदूच आहेत ....

सोमनाथ मंदिराची तोडफोड ते पाकिस्तान मधील हिंदू मंदिराची तोडफोड...

एका झेंड्याखाली हिंदू कधीच एकत्र येणार नाहीत...

शासकीय जमीन स्वत:च्या मालकीची दाखवल्या प्रकरणी, मंत्री भुमरेंसह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका

-----
https://www.loksatta.com/maharashtra/shiv-sena-minister-sandipan-bhumare...
-----

ही गोष्ट खरी आहे का?

मुक्त विहारि's picture

12 Feb 2022 - 11:43 am | मुक्त विहारि

जमीन घोटाळ्याप्रकरणी ठाकरे सरकारमधील मंत्री भुमरेंविरोधात तक्रार घ्या, न्यायालयाचे आदेश

https://www.google.com/amp/s/maharashtratimes.com/maharashtra/aurangabad...

--------
ह्याच बाबतीत, दुसरी बाजू असेल तर, वाचायला आवडेल...

sunil kachure's picture

12 Feb 2022 - 4:21 pm | sunil kachure

हिजाब प्रकरणात मार्ग कसा काढला पाहिजे आणि कोण काढणार मार्ग.
की हा प्रश्न कधीच सुटणार नाही.
कोणत्या ही प्रश्नावर सरकार नी उत्तर शोधणे गरजेचे आहे
पण आज काल कशी झाले की खूप लोकांना खोड आहे कोर्टात जायचे.
मग ते कोर्टात दळण चालू होते .
कायदा एकच असून पण प्रतेक कोर्टात वेगळेच निर्णय लागतात.
आणि प्रश्न कधीच सुटत नाही..
त्या पेक्षा सरकारी पातळीवर सर्वांची मत विचारात घेवून कायदा करावा आणि तो स्पष्ट असावा.
युनिफॉर्म की धार्मिक पेहराव.
आज च एक बातमी वाचली शिवाजी पार्क वर उठून पुढे एक पण अंत विधी होवू नये म्हणून कोण तरी हायकोर्टात गेले आहे.
राज्य कोण चालवत आहे राज्य सरकार चालवत ना ज्यांना लोकांनी निवडून दिले आहे.
कोर्टाचा काय संबंध धोरणात्मक निर्णय घेण्यात.
Hijab पण तसेच झाले आहे जो उठतो तो कोर्टात जातो
सरकार लं निर्णय घेवू ध्या .लोकनियुक्त सरकार आहेत देशात.

https://www.bbc.com/marathi/international-60346256

आणि वरील देशांत मुस्लिम मंडळी रहात देखील आहेत...

कुठल्याही देशांत, समान नागरी कायदा हवाच, हे माझे वैयक्तिक मत आहे....

मुकेश अंबानींच्या घरा बाहेर उभ्या केलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारमुळे हे प्रकरण आता इतपर्यंत पोहचले आहे, परंतु अंबानींच्या घरा बाहेर कार उभी करण्याचा "आदेश" कुणी दिला ? [ हा मूलभूत प्रश्न आत्ता पर्यंत कोणत्याच मिडियाने टिव्हीवर का विचारला नाही ? ] त्याचे नाव येत्या काळात माहितीचा साक्षिदार वाझे सांगेल का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे हात कापून टाकू”; सपा नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

https://www.loksatta.com/desh-videsh/chop-hands-that-try-to-touch-hijab-...

हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात कापले जातील असे सपा नेत्या रुबिना खानुम यांनी म्हटले आहे....

----------

पाकिस्तान मध्ये हिंदू मंदिर तोडले, तेंव्हा, ह्या काही बोलल्या नाहीत....

राघव's picture

16 Feb 2022 - 11:45 am | राघव

आले शेवटी पहाडाखाली.

हे सर्व सेक्युलर मुद्दे खास निवडणुकी आधी उठवणे, त्यांना मिडीयाने उचलणे, तेवढी गरज नसतांना पुन्हा-पुन्हा प्रक्षेपीत करून डोकी भडकवणे हे नॉर्मल झालेले आहे.
निवडणूक कुठेही असो, काही खास राज्यात ह्या प्रकारांची सुरुवात होते आणि देशभर त्याची चर्चा होते/करवली जाते. निवडणूक झाल्यावर ही चर्चा बंद पडेल आपोआप.
मागच्या अनेक निवडणुकींच्या वेळेस असे झालेले आहे. लोकं मेले तरीही यांना काहीही फरक पडत नाही/पडणार नाही.

बजाज ऑटोचा आधारवड काळाच्या पडद्याआड ; ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचं पुण्यात निधन

https://www.loksatta.com/pune/senior-industrialist-rahul-bajaj-passes-aw...

------

अतिशय वाईट बातमी....

-----

माझी पहिली स्कूटर, प्रिया होती आणि पहिले प्रशिक्षण देखील, सुपर मुळे शक्य झाले...

---

तिरकी करा आणि किक मारा ...

जामयांग सेरिंग नामग्याल यांचे एक गाजलेले भाषण इथे दिलेले आहे. असेच अजुक एक हल्लीच दिलेले अजुन एक प्रभावी आणि माहितीपूर्ण भाषण !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Happy... :- Pharrell Williams

उद्योगपती आणि बजाज ऑटोचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे शनिवारी, १२ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले . गेल्या अनेक दशकांत त्यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांत पसरलेल्या समूहाचा व्यवसाय भरभराटीला आला होता. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याच्या जवळ असलेल्या बजाज समूहाला त्यावेळी भारत सरकारच्या संरक्षणवादी धोरणांचा प्रचंड फायदा झाला होता.

बरेचदा जुने उद्योजक नवीन धोरणांवर टिका करत असतात. बजाज समुहाने स्वत:च्या रिक्षा आणि दुचाकी खपासाठी पुण्यामध्ये बी आर टी आणि मेट्रोला विरोध केल्याचा बरेचदा आरोप केला जातो.

निनाद's picture

14 Feb 2022 - 3:38 am | निनाद

फक्त बजाज तिन चाकी बनवणार इतर कुणाला बनवण्याचा परवानाच नाही! हे जमू शकले कारण गांधींशी जवळीक अजून काय?
मग स्पर्धा आल्यावर धाबे दणाणले होते.

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2022 - 5:40 pm | चौथा कोनाडा

अशी टिप्पणी सर्रास केली जायची.
असू शकेल.
पण एकंदरीत विविध घटकांच्या साह्याने पुण्याच्या कारभाऱ्यांनी पुणे बस वाहतुकीची वाट लावली !

जारा शरद पवार आणी सुरेश कलमाडी हे देखील त्यांचे जवळचे मित्र होते. सुरेश कलमाडी यांच्याकडे बजाजची महत्वाची डीलर शिप होती !

अंमलबजावणी संचालनालयाने राणा अय्युबची 1.77 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त! राणा अय्युबने केट्टोवर तीन निधी उभारणी मोहिमेद्वारे भरीव रक्कम गोळा केली होती. पण ती तिच्या वडिलांच्या आणि बहिणीच्या बँक खात्यांमध्ये रक्कम का जमा करण्यात आली!

मुक्त विहारि's picture

13 Feb 2022 - 9:22 am | मुक्त विहारि

दिगू कधीच वेडा झाला ....

नमस्कार मुक्तविहारी,
दिगू म्हणजे नक्की कोण? हा संदर्भ समजला नाही.

दिगू कधीच वेडा झाला ....

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2022 - 5:46 pm | चौथा कोनाडा

‘सिंहासन’ चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस. भवताळची परिस्थिती सहन न झाल्याने चित्रपटाच्या सरते शेवटी ते याच गाण्यांमध्ये वेडे होतात.

https://www.youtube.com/watch?v=ALzsboC_qt4

मुक्त विहारि's picture

18 Feb 2022 - 8:11 pm | मुक्त विहारि

सामना आणि सिंहासन, हे चित्रपट बघणे, अनिर्वार्य आहे...

चौथा स्तंभ काय करू शकतो? ह्याची एक झलक, सामना मध्ये मिळते.. मारूती कांबळेचे काय झाले? हा प्रश्र्न धसास लावायला, वृत्तपत्रांची भुमिका महत्वाची होती

पण, पत्रकारांनाच खिशांत ठेवले तर? ह्याची झलक, सिंहासन मध्ये मिळते. चौथा स्तंभ सडला तर, लोकशाहीच लयाला जाईल. राजकारणी लोकांच्या भीकेवर जगणे, हे जनतेला वेडे करूनच सोडणार ....

सामना ते सिंहासन, खूप मोठा पट आहे....

तेंव्हा मारूती कांबळे, ह्या प्रकरणा वरून, एक मुर्दाड नेता गजाआड गेला

पण, सध्याच्या काळांत मात्र, निवृत्त नौसैनिकाला मारहाण केली, तरी घराणेशाहीच्या पाईकांना, काहीच वाटत नाही...

https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://maharasht...

देशात मोठमोठ्या उद्योग पती कडून बँकेची फसवणूक करून जनतेच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या उद्योग चालू च आहे.
अजून मल्ल्या,मोदी नी लुटलेला जनतेचा पैसा सरकार वसूल करू शकले नाही
राष्ट्रीय संपत्ती वर दरोडा उद्योगपती च टाकतं आहेत.
आणि भांडवल शाही समर्थक सामान्य लोकांच्या पाच दहा हजार कर्जाला भीक दिली म्हणत आहेत.
ते बिचारे कर्ज बुडवत पण नाहीत.

प्रदीप's picture

13 Feb 2022 - 7:20 pm | प्रदीप

पण काही लोकांच्या दुर्दैवाने, सदर कंपनीचे तिही तत्कालिन संचालक गुजराती नाहीत. आता काय बरे करावे?

एबीजी शिपयार्डचे तत्कालीन संचालक ऋषी अग्रवाल, संथनम मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल या तिघांसह कंपनीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.