मुर्द्राक्षास...
मुरवि मनोहर द्राक्षालागी
सुधा मधुर अन् गंध केशरी
मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी
अशी चालली मधुरा-मधुरी
द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम्
पाकामधले केशर मधुरम्
द्राक्षरसासह मधुमद मधुरम्
द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम्
- कौस्तुभ आजगांवकर
*मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा
प्रतिक्रिया
28 Jan 2022 - 12:02 am | प्रसाद गोडबोले
लोकं कविता का करतात ?
29 Jan 2022 - 8:25 pm | nemake_va_mojake
त्यामुळे विनोदाखेरीज उत्तराची अपेक्षा नसावी असं वाटलं. पुढे आलेलं उत्तर पुरेसं करमणूकप्रधान असल्याने हा प्रश्न सत्कारणी लागला असं समजतोय.
28 Jan 2022 - 12:06 pm | राजेंद्र मेहेंदळे
लोक कविता का वाचतात?
माणसाच्या कानावर केस का असतात?
आपल्याला सासरचे नातेवाईक का असतात?
जाउ द्या ना बाळासाहेब
28 Jan 2022 - 12:20 pm | प्रसाद गोडबोले
बेक्कार हसतोय
=))))
28 Jan 2022 - 3:59 pm | Trump
मधुरम कविता आणि त्या गाण्याचा काही संबध आहे का?
29 Jan 2022 - 7:58 pm | nemake_va_mojake
मधुराष्टकम् या श्रीकृष्णस्तोत्राच्या छंदावर बेतलेलं आहे पण त्यापलीकडे काही संबंध नाही. त्या पवित्र स्तोत्राचं विडंबन वगैरे तर नक्कीच नाही.
हा विषय अगदी साध्या गप्पांमधून आलेला. पाककृती व त्याविषयी ऐकून या ओळी डोक्यात आल्या. निव्वळ करमणूक म्हणून. ही कविता नाही. हलकी पद्यरचना म्हणा हवं तर
29 Jan 2022 - 12:43 pm | चौथा कोनाडा
स.न.वि.नि.
आपली "द्राक्षाचा मुरांबा" ही कविता मिळाली.
समजावून घेण्यास तजज्ञांची मदत घेत आहे.
पुढील वेळी "द्राक्षाचा मुरांबा"ची पाकॄ टाकावी विनंती !
कळावे,
आवि,
- द्राक्षासवकुमार मद्यार्कवाडे
29 Jan 2022 - 7:52 pm | nemake_va_mojake
सौ. मृणाल आठल्ये यांच्या फेसबुक पेज वरून -
"द्राक्षारंबा"
पिकलेल्या हिरव्या द्राक्षांचा मोरंबा.
जसा पिकल्या आंब्याचा करतो तसाच करायचा.
* २ वाट्या द्राक्षं गोड पण मऊ नसलेली वेलचीचे दाणे घालून वाफवली. पाणी न घालता.
*३ वाट्या पाका साठी साखर घेतली. पाक थोडा जास्तच हवा होता. पक्का पाक केला.
*त्यात केशर आणि वेलची पूड घातली.
*वाफवलेली द्राक्षं पाकात घातल्यावर थोडं पाणी सुटतं. ते आटवून हव्या त्या consistency ला आल्यावर मोरंबा लगेच डब्यात काढला.
*महत्त्वाची टीप---शिजवलेल्या पातेल्याच्या गरमीमुळे मोरंबा, जॅम या पदार्थांची consistency बदलते. कोरडेपणा येतो.
-------------------------