कोणाकडुन काय घ्याल?
माझे बरेचदा देशी - विदेशी लोकांशी गप्पा, चर्चा होतात. मग त्यावेळी त्यांच्या मुळ देशात कसे काय चालले आहे? येथे का आलात इ. इ. त्यांनतर मी त्यांना शेवटी विचारतो.
जर तुम्हाला येथुन एकच गोष्ट तुमच्या देशात किंवा समाजात न्यायची असेल ती कोणती असेल ? मी स्त्रोत म्हणुन युरोपियन देश आणि तेथील समाजजीवन वापरले.
मला मिळालेली उत्तरे
भारतीय विद्यार्थी : तोंडावर स्पष्ट बोलणे.
मोरक्कोची विद्यार्थीनी: हिजाब, बुरखा न घालण्याची सक्ती
इराणची विद्यार्थीनी: तांत्रिक प्रगती
इजिप्तचा विद्यार्थी: सुबत्ता
भारतीय विद्यार्थी : सार्वजनिक सोयी सुविधा
भारतीय विद्यार्थी : पटापट सरकारी कामे, लाच न देता होणे.
भारतीय विद्यार्थी : शांतता
लेबॅनॉनची विद्यार्थीनी: खाजगीपणा, दुसर्याच्या कामात नाक न खुपसणे.
पाकिस्थानी विद्यार्थी: व्यवहारीकता
आफ्रिकेतील विद्यार्थी: उद्याची चिंता नसणे.
अर्थात वरती दिलेली उत्तरे त्यांच्यादृष्टीने बरोबर आहेत. त्यामुळे लोकांना भावते ह्याचा अंदाज येतो.
मला जर भारतात जर एकच गोष्ट दुसर्या देशातून किंवा समाजातून आणायची असेल तर
जर्मनी: कर्तव्ये आणि अधिकार यांची सांगड. जर कर्तव्ये पार पाडली नाहीत तर आपोआप अधिकार कमी होतात.
फ्रान्सः लेंगिक मोकळेपणा
पुर्व युरोप (पोलंड, चेक, स्लोवेनिया इ.) साधेपणा
रशिया: विपरीत परीस्थीतीमध्ये सुद्धा देशप्रेम
चिन: आपण भले आणि काम भले. स्वतःच्या देशावर टिका न करणे.
इंग्रजः इतरांचा वापर करुन नामनिराळे राहणे.
ईसाई पंथः संस्था उभारण्याची चिकाटी
ईस्लामः जकात
ज्यु: विपरीत परिस्थितीत प्रगती करणे.
----------
जर तुम्हाला एकच गोष्ट तुमच्या देशात किंवा समाजात न्यायची किंवा आणायची असेल ती कोणती असेल ?
प्रतिक्रिया
27 Dec 2021 - 5:28 pm | कुमार१
पाश्चिमात्य व अन्य प्रगत देशांमध्ये जो 'चांभारचौकशा न करणे' हा गुण आहे (काय मग, आता नोकरी लागली आता छोकरी कधी आणणार ? , अनोळखी माणसाला, "तुमचे लग्न झालेय का आणि तुम्हाला मुलं किती आहेत"... वगैरे वगैरे)
तो मला इकडे आणावा असं वाटेल.
27 Dec 2021 - 5:31 pm | Trump
ओळख झाली कि पगार किती आहे हे विचारणे भारतील उपखंडातील लोकांमध्ये मला बरेच पहायला मिळते.
27 Dec 2021 - 5:34 pm | Trump
काय मग, आता नोकरी लागली आता छोकरी कधी आणणार ? , अनोळखी माणसाला, "तुमचे लग्न झालेय का आणि तुम्हाला मुलं किती आहेत"... वगैरे वगैरे
१. मला तुम्ही किती मुले जन्माला घालणार असे माझ्या मोलकरणीने मला विचारले होते, ती म्हणाली की मुस्लीमांमध्ये कमीतकमी ३ चा नियम आहे, तुमच्याकडे आहे का तसेच?
२. असाच प्रश्न एका रेल्वेमध्ये भेटलेल्या बाईने विचारला होता.
28 Dec 2021 - 7:51 am | उपयोजक
लाख वेळा सहमत
27 Dec 2021 - 8:55 pm | कंजूस
१) एकदा शब्द दिला की पाळणे.
२) बाहेरच्या सर्व मोकळ्या जागा **दारीसाठी न वापरणे.
27 Dec 2021 - 8:59 pm | Trump
नक्की कोणत्या देशातुन, समाजातुन किंवा पंथातुन?
27 Dec 2021 - 10:12 pm | चित्रगुप्त
युरोपीय संस्कृतीतून भारतीयांना शिकण्यासारखी महत्वाची बाब म्हणजे 'जुने'' असोशीने - कसोशीने जपणे. मग ती वास्तु असो, कलाकृती, संगीत, साहित्य, जुन्या वस्तु ... काहीही असो.
28 Dec 2021 - 10:23 am | चौथा कोनाडा
या वरून "हिंदू: एक समृद्ध अडगळ" या शिर्षकाची आठवण झाली !
27 Dec 2021 - 10:34 pm | बोलघेवडा
अमेरिकेत राहून अनुभवलेल्या गोष्टी
1. खासगीत राजकारणावर कधीही चर्चा न करणे. हातात असलेल्या वेळेत खेळ, छंद, कला जोपासणे.
2. कोणत्याही धार्मिक गोष्टींचे रस्त्यावर प्रदर्शन न करणे.
3. कोणत्याही प्रकारचे काम करणाऱ्या माणसाची प्रतिष्ठा जपणे. उदा. मॅनेजर आणि पोस्टमन, किंवा जेनिटर (शॉचालय साफ करणारा) यांना समान वागणूक देणे.
28 Dec 2021 - 12:20 am | सौन्दर्य
सध्या अमेरिकेत वास्तव्य असल्याने इथली स्वच्छता भारतात नेण्याची इच्छा आहे.
28 Dec 2021 - 5:20 am | कंजूस
चांगला धागा.
28 Dec 2021 - 2:01 pm | Trump
धन्यवाद. परदेशी गेल्याने आत्मपरीक्षणाची संधी मिळते.
28 Dec 2021 - 7:54 am | सर टोबी
भारतीय माणूस हसू शकतो असं काहीसं, ज्याला गुण म्हणावा की अवगुण असा प्रश्न पडावा, एका भारतीय मित्रानेच सांगितलं.
एका All Hands Meeting मध्ये एका अमेरिकन माणसाने त्याच्या भारत भेतिविषयी सांगितलं की त्याच्या आयुष्याचे आता दोन ठळक भाग आहेत. एक भारताला भेट देण्यापूर्वीचा आणि दुसरा भारत भेटीनंतरचा.
एक असाच अमेरिकन भारतात येऊन कपडे शिवून घ्यायचा आणि भरपूर मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायचा.
वरील कुठल्याही प्रसंगात मन अभिमानाने भरून येईल असा अनुभव आला नाही.
28 Dec 2021 - 1:57 pm | Trump
त्यातला कोणता अनुभव चांगला आहे?
28 Dec 2021 - 4:37 pm | सर टोबी
तुमच्या प्रश्नामुळे मी पन्नास वर्ष मागे गेलो. माझ्या डोळ्यासमोर आल्या शाळेत होणाऱ्या सभा आणि त्या सभांना येणारी पाहुणे मंडळी. त्या पाहुण्यांची भाषणं चालू असतांना समोरच्या आणि बाजूच्या मुलांना त्रास देणं, मैदानातील वाळूचे छोटे गोटे फेकून मारणे, पुढच्या रांगेतील मुलांचे इन शर्ट बाहेर खेचणं असे प्रकार चालू असायचे. हा सर्व प्रकार पर्यवेक्षक आणि पाहूण्यांनाही दिसत असायचा. परंतु आभार प्रदर्शन करताना पर्यवेक्षक हमखास शेवटी आम्हा मुलांचे कौतुक करायचे. "आणि सर्वात शेवटी हा सर्व कार्यक्रम तुम्ही शांत चित्ताने ऐकला त्या बद्दल तुम्हा मुलांचे पण आभार." त्या वयात देखील हे सगळं कौतुक तोंड देखलं आहे हे कळायचं.
भारतातील सामाजिक स्थिती बघता वरील वाक्य म्हणजे देशाची प्रशंसा आहे असं समजायला खूपच निरागस असावं लागतं.
28 Dec 2021 - 4:52 pm | Trump
मला तसाच अनुभव एकदा विमानात आला होता. एक लहान मुलगा पाठीमागुन शेपुट लावण्याचा प्रयत्न करत होता आणि आई-बाप कौतुकाने बघत होते.
नक्की असे का होत असावे?
28 Dec 2021 - 7:55 am | उपयोजक
विज्ञान/तंत्रज्ञान यातील संशोधनाला पुरक वातावरण
कमी लोकसंख्या
भारताच्या तुलनेत कमी भ्रष्टाचार
चांगले रस्ते
राजकारणी/गुंड यांना मनमानी न करता येणे
हे आणेन
28 Dec 2021 - 2:00 pm | Trump
राजकारणी/गुंड यांना मनमानी न करता येणे
भारतात हे खुप आहे. सरळमार्गी माणसाचा टिकाव लागणे मुश्कील.
28 Dec 2021 - 8:18 am | कर्नलतपस्वी
नुकत्याच पार पडलेल्या अमेरीका भेटीत शिस्त आणि मर्यादा ह्या गोष्टी आयुष्यात किती अमुलाग्र बदल करू शकतात ते प्रकर्षाने जाणवले.
28 Dec 2021 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे
जरा लिव्हा ना त्यावर. कर्नल साहेब. तुमच्याकडे अनेक गोष्टींचा खजाना आहे.
28 Dec 2021 - 1:48 pm | कर्नलतपस्वी
मला तेथील वाईल्ड लाईफ आणी निसर्गरम्य परीसराचे फोटो शेअर करायचेत पण तंत्रज्ञानातील मागासवर्गीय असल्यामुळे आंधारात चाचपडतोय.
28 Dec 2021 - 2:29 pm | Trump
मी बर्याच जणाकडुन ऐकले आहे. भारतीय माणसे एक संघ म्हणुन काम करायला कमी पडतात. स्वतःचा फायदा हा एकत्रित (सांघिक) फायद्यापेक्षा जास्त महत्वाचा होउन, पुढे सांघिककार्याला अडचण होउन जाते.
28 Dec 2021 - 4:02 pm | मुक्त विहारि
खरंतर, परमार्थ साधत गेलो की आपले काम होत असतेच...हा माझा तरी अनुभव आहे ...
28 Dec 2021 - 5:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
मी या गोष्टी घेउन येइन
१. सार्वजनिक शिस्त --उदा. नियमानुसार वाहन चालविण्याची, रस्त्यात न थुंकण्याची,फूटपाथवरुन(च) चालण्याची, रांगेत उभे राहण्याची, दिलेली वेळ पाळण्याची
२. स्वच्छतेच्या सवयी- उदा. घराभोवतीचे लॉन,बर्फ साफ ठेवणे, पाळीव प्राण्यांची घाण उचलणे
३.कायदेपालन- मोठ्मोठया आवाजात गाणी न लावणे, रस्त्यात फटाके न फोडणे, पार्किंग मॅनर्स,सिग्नल पाळणे
४. वर दिलेल्या ईतर गोष्टी- दुसर्याच्या भानगडीत विनाकारण नाक न खुपसणे
काही काळ परदेशात घालवल्यावर भारतात परत आल्यानंतर हे सर्व फारच जाणवते. गरिबी,बेकारी,लोकसंख्या, कितीही कारणे दिली तरी स्वभावातील बेशिस्तीचे समर्थन करता येत नाही.
29 Dec 2021 - 12:17 pm | अनिंद्य
विषय आणि प्रतिसाद भारी आहेत !
युरोपातून घरी नेण्यासारखे म्हणजे भरभरून जीवन जगण्याची असोशी. यांच्या साठीतल्या स्त्रीपुरुषांकडे बघितले की आपण जेमतेम पन्नाशीतच 'काकू-काका' कॅटेगिरीत का ढकलले जातो याचे वाईट वाटते :-)
भारतातून इतर लोकांनी शिकण्यासारखे म्हणजे कमी गरजा / स्वल्पसंतुष्टी.
29 Dec 2021 - 1:02 pm | चौथा कोनाडा
अगदी !
29 Dec 2021 - 1:41 pm | चौकस२१२
१) घरच्या पुरुषाने स्वयंपाक आणि घरची डागडुजी करणे मग तो जनरल मॅनेजर असो कि कामगार
२) स्पष्टपना " नसेल होत काम तर तसे आधीच स्पष्ट सांगणे "
३) शिक्षण पद्धती तील एक सूत्री पण
29 Dec 2021 - 1:44 pm | चौकस२१२
भारतातून इतर लोकांनी शिकण्यासारखे म्हणजे
द२ माणशी किती प्लास्टीक वापरले जाते तो दर
29 Dec 2021 - 5:42 pm | सर टोबी
जगात प्लास्टिकचा वापर होणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक हा खालून पहिला असला तरी ती आपण आपली पाठ थोपटून घ्यावी अशी कामगिरी नाहीय. खुद्द पुण्यासारख्या शहरात वारजे उड्डाण पूल, मुळशी रस्ता, बंगलोर बायपास येथे पुनर्वापर न झालेल्या प्लास्टिकचा खच दिसतो. जेथे प्लास्टिक पुनर्वापर करण्याची यंत्रणा आहे अशा शहरात हि परिस्थिती तर दुसऱ्या गावांमध्ये काय परिस्थिती असेल. त्यातही खास करून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी तर प्लास्टिक वेष्टने आणि प्लास्टिक बाटल्यांचा खच दिसतो.
29 Dec 2021 - 4:28 pm | चंद्रसूर्यकुमार
अमेरिकन लोकांकडून शिकायच्या गोष्टी:
१. रहदारीची शिस्त- लेनची शिस्त पाळणे सगळ्यात महत्वाचे. भारतात गाडी शिकत असताना माझ्या ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टरने सांगितले होते की रस्त्यावर पांढर्या रंगाचे पट्टे दिसले तर उजवीकडची दोन चाके त्या पट्ट्यांच्या उजव्या बाजूला आणि डावीकडची दोन चाके त्या पट्ट्यांच्या डाव्या बाजूला हवीत :) :) , लेन बदलताना पहिल्यांदा इंडिकेटर देऊन मागे वळून बघून ब्लाईंड स्पॉटमध्ये कोणती गाडी नाही हे बघून मगच लेन बदलायची, विनाकारण हॉर्न न वाजविणे, रात्री कितीही वाजले असतील आणि रस्त्यावर दुसरी वाहने नसतील तरी लाल सिग्नलचा मान राखणे वगैरे वगैरे
२. कॉपी न करणे- हे विद्यार्थ्यांना लागू होते. कॉपी नुसती परीक्षेत करायची नाही असे नाही तर होमवर्कसाठीही करायची नाही. अनेकदा अमेरिकन विद्यार्थी एखादे गणित येत नसेल तर नुसता प्रश्न क्रमांक लिहून ती जागा मोकळी सोडतात. अगदी लहानसहान असाईनमेन्टमध्येही इतर कोणतीही कल्पना वापरली तर ती कल्पना माझी नाही तर मी अमुकतमुक ठिकाणाहून घेतली आहे हा संदर्भ देतात. तर आपल्याकडे मात्र आघाडीच्या वर्तमानपत्राचे संपादकही परदेशी प्रोफेसरच्या ब्लॉगवरील लेख त्या ब्लॉगचा संदर्भ न देता स्वतःचा म्हणून खपवायचा प्रयत्न करतात आणि नंतर पकडले गेल्यावर काहीतरी मल्लिनाथी करतात.
अमेरिकन्सनी भारतीया़ंकडून शिकाव्यात अशा गोष्टी:
१. व्यवस्थित आणि टापटीप ठेऊन लिहिणे: बहुतेक अमेरिकन विद्यार्थी लिहिताना अत्यंत गचाळ लिहितात. आपल्याकडे शाळेत व्यवस्थित लिहायला आणि हस्ताक्षरावर जेवढा भर देतात तेवढा तिथे बहुदा देत नसावेत. आपल्याला लिहिताना त्यामानाने खूप व्यवस्थित लिहायची सवय त्यामुळे लागते ती त्यांना लागत नसावी.
30 Dec 2021 - 7:32 pm | Bhakti
२. कॉपी न करणे:चांगले मुद्दे आहेत.
31 Dec 2021 - 2:19 pm | Trump
भारतामंध्ये रस्त्याच्यामधे दिशादर्शक बाण असतात. जर तसे असेल तर, त्याबाबतीच तुमच्या वाहन शिक्षकाचे मत बरोबर आहे.
29 Dec 2021 - 11:03 pm | रावसाहेब चिंगभूतकर
कोरिया: ९ ला ऑफिसात पोचणे म्हणजे ९ ला किंवा ९ च्या आधी. फार फार तर २ - ५ मिनिटे उशीर, तो ही लिफ्ट मुळे.
इटली: आपली पूर्वापार पुतळे, artifact's वगैरे कसे जतन करावे
जर्मनी: कामातली शिस्त. अगदी काटेकोर काम.
युरोप: काम आणि आयुष्याचा समतोल
अमेरिका: वाखाणण्यासारखी शिस्त आणि व्यक्तिस्वातंत्र्य
चीन: नवीन गोष्टी शिकण्यातील तळमळ
इंग्लंड: राणी बद्दल आदर, इतरांबद्दल चा आदर, रांग लावणे, पूर्वापार परंपरा जिवंत ठेवणे
साऊथ आफ्रिका: प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा टिकून राहण्याची वृत्ती जिवंत ठेवणे
ऑस्ट्रेलिया: काम आणि आयुष्याचा समतोल, ऑस्ट्रेलियन स्पिरीट (Authenticity, optimism, hard working, easy going)
* हे सगळे देश जिथे मी कामानिमित्त गेलो आहे / राहिलो आहे
31 Dec 2021 - 2:23 pm | Trump
भारतामध्ये बरेचदा सहकार्याचा / सहकारीचा वाढदिवस कामच्या वेळेत साजरा करतात. जर्मनीमध्ये तो कामाच्या वेळेनंतर करतात.
2 Jan 2022 - 1:07 pm | साहना
लोकांच्या भानगडीत आपले नाक विनाकारण खुपसू नये हा जो गुण इतर अनेक देशांत आहे तो भारतात यावासा वाटतो. काही ठिकाणी कायद्याने गुन्हा असून सुद्धा मंडळी निर्लज्ज पणे लोकांच्या भानगडीत नाक खुपसतात. ओळखीच्या SBI मॅनेजरला विचारून अमाख्याच्या खात्यांत महिन्याला किती पैसे येतात वगैरे विचारण्याची भारतात बरीच सवय झाली आहे असे ऐकून आहे.
2 Jan 2022 - 1:13 pm | Trump
अशी माहीती देणे कायदेशीर आहे का? तुम्ही त्या मॅनेजरविषयी तक्रार करायला हवी.