चिंब

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
27 Dec 2021 - 3:08 pm

वृक्ष जसा -
अंकुरण्या आधी
बीजस्वरूपी
अस्फुट असतो

बाण जसा-
सुटण्याच्या आधी
प्रत्यंचेवर
सज्ज राहतो

मंत्र जसा -
स्फुरण्याच्या आधी
बीजाक्षरी
निद्रिस्त राहतो

अर्थ तसा
उलगडण्या आधी
शब्दांच्या
निबिडात राहतो

ओथंबून मग
येतो अवचित
कोसळतो अन्
चिंब भिजवितो

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2021 - 3:35 pm | ज्ञानोबाचे पैजार

सुरेख,
आवडली
पैजारबुवा,

राघव's picture

27 Dec 2021 - 5:02 pm | राघव

आवडली रचना. शेवट किंचित तुटक वाटतोय. आणिक एखादं कडवं हवं होतं असं वाटलं.

चांदणे संदीप's picture

27 Dec 2021 - 5:19 pm | चांदणे संदीप

अगदी हीच भावना मलापण आली. शेवटचा झोका कसा उंच गेला पाहिजे.

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

27 Dec 2021 - 5:17 pm | चांदणे संदीप

कविता आवडली.

सं - दी - प

कर्नलतपस्वी's picture

27 Dec 2021 - 10:34 pm | कर्नलतपस्वी

शेवटच्या कडव्याने ना धो महानोर यांची " घन ओथंबून येती " आठवले
पिडी ते ब्रह्माडीं

श्रीगणेशा's picture

27 Dec 2021 - 11:07 pm | श्रीगणेशा

कविता आवडली. साधी सरळ सोपी.

प्रसाद गोडबोले's picture

27 Dec 2021 - 11:40 pm | प्रसाद गोडबोले

+१

अगदी हेच म्हणतो !

कवितेतील अगम्यता , अनाकलनीयता , अव्यावहारिक शब्द जाऊन त्या ऐवजी आलेला साधेपणा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे ! ही कविता वाचुन कष्टाचं चीज बटर पनीर झाल्यासारखं वाटलं !

पुढील कवितेसाठी शुभेच्छा !

प्राची अश्विनी's picture

28 Dec 2021 - 8:23 am | प्राची अश्विनी

वाह!

पाषाणभेद's picture

29 Dec 2021 - 4:28 pm | पाषाणभेद

छान आहे.

अनन्त्_यात्री's picture

29 Dec 2021 - 9:01 pm | अनन्त्_यात्री

सर्व कवितारसिकांना धन्यवाद.