शालेय जीवनाची गतस्मृती बाबत कविता

एस.बी's picture
एस.बी in जे न देखे रवी...
20 Aug 2020 - 3:19 am

मला आज शाळेत परत जायचं आहे

त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे..
पूर्वी वाहून न्यायचो पुस्तकाने भरलेले दप्तर ...
फुटके ढोपर आणि गुडघे घेऊन....
आज त्याच वाटेवर अनुभवाची फाटकी बोचकी घेऊन थकलेली पावलं ओढत चालायचं आहे..

धूळ जमलेला फळा...आणि कट्टी करून गप्प झालेल्या त्या घंटेला..
शाळेच्या बाहेरचे प्रश्न विचारायचे आहे...
माझ्या भूगोलाच्या अभ्यासक्रमात ,"पृथ्वी गोल असते"
पण ," हे माणसाचं जग नक्की कसं असतं ? " हे का नाही शिकवलं?? ते विचारायचं आहे....
त्यासाठी आज मला त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे..

शाळेच्या मैदानावर .....
उडणारी धूळ आणि घामाने भिजलेला तो सदरा..
आणि लोकल मधली धूळ आणि घामापेक्षा कशी वेगळी आहे ते पाहायचं आहे....

खेळाच्या तासाला दगाबाजी करणाऱ्याला शिक्षा असायची..
कमीत कमी ५-६ पोरं तरी अंगठे धरून वाकलेली दिसायची...
पण आज इकडे आजूबाजूने एकाहून एक दगाबाज आपल्यालाच अंगठे नाचवून कसं काय दाखवतात ते एकदा विचारायचं आहे...
त्यासाठी आज मला त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे..

शाळेच्या आवारात उन्हाळा आला की धग लागू नये म्हणून पाण्याचा सडा मारणारा तो चपराशी शोधून..
," शाळेच्या बाहेरचं जग आहे ना त्यात एवढे निखारे पसरवले असताना तुम्ही कुठं गायब झाला होता ??? "
एवढं तरी विचारायला आज मला त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे..

पडक्या शाळेच्या आजुबाजूलाच कुठेतरी आडोशाला ..
बे एक बे....अशा खड्या आवाजात पाढे गर्जवून सोडणारे गुर्जी
आज मात्र शाळेसारखंच पडके दातांच बोळकं घेऊन निशब्द पणे शून्यात नजर लावून माझ्याकडे पाहतील...

त्यांना फक्त," पूर्वी अभ्यासात चुकारपणा केला की....भिंतीकडे तोंड करून उभे करायचे तुम्ही आम्हाला...
आयुष्यात आमचं एवढं काय चुकलं असावं...
की हर एक घराच्या भिंतीने आम्हालाच का नाकारलं?...."
एवढं तरी विचारायला आज मला त्या गावातल्या पडक्या शाळेत आज मला परत जायचं आहे..
एस बी

कविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

28 Apr 2021 - 4:04 pm | रंगीला रतन

कल्पनेत तरी श्रीमंती दाखवावी म्हणतो मी!
केवढी ती नकारात्मकता आणि कीती तो नसत्या उठाठेवींचा सोस?
माफ करा पण नाही आवडली कविता

एस.बी's picture

1 Dec 2021 - 12:30 am | एस.बी

असं ठरवून करत नसतात रंगीला रतन...तुमच्या लेखी सगळंच चांगल चालले आहे असाच दिखावा करणारं लिहायचं का....मग जेवणात सगळे घास गोड घासच खाता का तुम्ही???
असो मला पण माफ करा...मला ही तुमची कुपमंडूकीय प्रतिक्रिया मला ही आवडली नाही!

गॉडजिला's picture

28 Apr 2021 - 4:10 pm | गॉडजिला

रोजचेच हे प्रश्न आहेत पण जाणिवा बोथट झाल्याने कोणी आता यावर विचार करत नाही, ती बोथट जाणीवेची धुळ आपण नेंमकी झटकली आहे.

एस.बी's picture

1 Dec 2021 - 12:31 am | एस.बी

धन्यवाद!!!!!