करू कशाला तमा जगाची
मागू कशाला उगा क्षमा
प्रमाद माझा एकच झाला
शोधत गेलो मानवतेच्या पाऊलखुणा
ढळलो नाही वळलो नाही
वेचत गेलो काटे कुटे
शोधत होतो जळ मृगजळी अन
गर्द सावली फड्या (निवडुंगा) खाली
तमा न केली उगा कशाची
फुटलो मी जरी उरी
प्रमाद माझा एकच झाला
कधी न केले क्रंदन
कितीही शीणलो मी तरी
जरी लक्ष माझी सोनफुले
शोधत होतो रानी वनी
कधी न केले अवडंबर त्याचे
जरी हाती आली रानफुले.......
21-10-2021
प्रतिक्रिया
24 Oct 2021 - 10:10 pm | पाषाणभेद
जबरदस्त काव्य!!
तुम्हाला एक सॅल्यूट!!!
25 Oct 2021 - 6:35 am | प्रचेतस
क्या बात है..!
सुंदर
25 Oct 2021 - 7:36 am | सनईचौघडा
खूप सुरेख !
25 Oct 2021 - 11:19 am | रंगीला रतन
वाह. आवडली.
25 Oct 2021 - 9:09 pm | मदनबाण
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ye Zamin Gaa Rahi Hai... :- Teri Kasam [ Soundtrack Version ]
25 Oct 2021 - 9:17 pm | Bhakti
वाह!
आवडत गाणं आठवलं "यूही चला चल राही"
25 Oct 2021 - 9:35 pm | कर्नलतपस्वी
सर्वांचे मनापासून धन्यवाद
26 Oct 2021 - 5:56 pm | चौथा कोनाडा
खुप छान रचना, आवडली !
🌼