सखी मी ....पावसाची

प्रज्ञादीप's picture
प्रज्ञादीप in जे न देखे रवी...
28 Sep 2021 - 10:18 am

सखी मी ...पावसाची
घनदाट काळ्या मेघाची
लख्ख कडकडणाय्रा दामीनीची
आतुरतेने वाट पाहणाय्रा चकोराची

सखी मी ... उनाड वाय्राची
दणकट रांगड्या डोंगराची
वेलीवरल्या फुलांची पानांची
अंगणात नाचणाय्रा चिमण्यांची

सखी मी...टिपुर चांदण्याची
शीतल साजय्रा चंद्राची
काळोखात भिजलेल्या रजनीची
सखी मी ...माझ्या सजणाची

कविता

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

30 Sep 2021 - 4:25 pm | गॉडजिला

ग्लोबल जाणवत आहे..

आणी नेमका हाच सखी शब्दाशी विरोधाभासाहे… असं ग्लोबल सख्यत्व करणे फक्त श्रीकृष्णच जाणो. इतर मानव ते शिवधनुष्य पेलु शकत नाहीत.

प्रज्ञादीप's picture

30 Sep 2021 - 7:04 pm | प्रज्ञादीप

अचुक ओळखलंत

पाषाणभेद's picture

12 Oct 2021 - 5:33 pm | पाषाणभेद

आपल्याला जाणवणे हे नंतर आले. पहिल्यांदा त्यांना जाणवणे हे महत्वाचे आहे.