मर्कट वंश

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
22 Sep 2021 - 8:50 pm

कपिकुळाला सांगणारा तोच माझा वंश आहे,
माझ्यातही थोडासा त्या मर्कटाचा अंश आहे

संथ पाण्या पाहूनि, मोहुनि जाई कुणी,
खडे त्यात फेकण्याची का मला ही खोड आहे?

विचित्र या शब्दातही , चिवित्र काही शोधतो मी,
शोधल्यावरी सापडे काही , हे मात्र गूढ आहे

माणसे ठेवती जपूनी धीर वा गंभीर चेहरे
मुखवटयांच्या खालती त्या एक मंद स्मित आहे

तेच थोड़े ओठी येण्या, करो वाटे मग खट्याळ चाळा
खोल गेल्या वात्रटाला साद घालता मजा आहे

भली भली माणसे असती आतून व्रात्य मुलांपरी
या मुलांच्या हातावरी टाळी देण्याची खाज आहे

मी नव्हे हो त्यातला अन मी नाही त्यातली
हेच जन त्वरे उठती कड़ी लावण्या आतली
विसंगति त्यांच्या मनीची त्यांच्या पुढे ठेवताना
अंदाज खरा करण्याचा फ़क्त हां विचार आहे

कविता

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2021 - 8:59 pm | श्रीरंग_जोशी

पहिल्या दोन ओळी गदिमांच्या खालील ओळींचे विडंबन आहे. उरलेली रचना स्वतंत्र आहे असे दिसते.

”ज्ञानियाचा वा तुक्याचा,तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात थोडा,ईश्वराचा अंश आहे”

स्वतंत्र रचना म्हणूनही ही कविता आवडली.

मका म्हणे's picture

22 Sep 2021 - 9:06 pm | मका म्हणे

अगदी बरोबर आहे, तुमचं . गदिमा यांचे संस्कार आपल्या सर्वांवर कळत नकळत झालेले आहेतच.

Bhakti's picture

22 Sep 2021 - 9:57 pm | Bhakti

उत्तम रचना!

विचार चांगलेत. कविता आणिक जरा मीटरमधे बसवली तर जास्त आनंद देईल. पुलेशु.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Sep 2021 - 8:05 am | ज्ञानोबाचे पैजार

मी नव्हे हो त्यातला अन मी नाही त्यातली
हेच जन त्वरे उठती कड़ी लावण्या आतली

हे विषेश आवडले,

पैजारबुवा,