शून्याशी गाठ

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
17 Sep 2021 - 4:38 pm

शून्यातून​ पाय फुटल्यासारखे
आकडा भराभर धावतात...
खुप खुप दमल्यावर
शुन्याच्या मागे सामावतात...

भोपळा भोपळा हिणवले
पहिल्यांदा हाच तर गिरवला...
डोळ्यांची भाषा झाली क्लिष्ट
जेव्हा शून्य नजरेने गोंधळ घातले...

कधी असंच पुढं आल्यावर
तो 'पूज्य' राहत नाही
कुठल्याशा वळणावर अचानक
शून्याशी गाठ सुटत नाही...

त्याला पाठीवर घेऊन चालतांना
छातीवरल्या आकड्यांंच ओझ
कधी जाणवत नाही की
अनायसे कुबड भासत नाही...

-भक्ती

जिलबीफ्री स्टाइलरतीबाच्या कवितामुक्तककैच्याकैकविता

प्रतिक्रिया

उंहूं... शप्पथ, काय म्हंजे कायबी कल्ला नाय... :-)

Bhakti's picture

17 Sep 2021 - 5:50 pm | Bhakti

डोक्यातला कल्ला , कधी कल्लातर कलतो तर नायतर नुसता कल्ला करतो

गॉडजिला's picture

17 Sep 2021 - 6:17 pm | गॉडजिला

तसं बरचं गहन आहे आणि म्हटलं तर सोपं अन सुटसुटीतही...

ज्याला शून्य समजलें त्याला सगळे समजलें... सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही... शुन्य समजणे इतके सोपे नाही. आणि तितके अवघडही नाही

सर्वकाही शून्यातून निर्माण होते, शून्यात विलय होते.शुन्य ही सुरुवात आहे शून्य हा शेवटही..

हे वाचून "पूर्णमदं पूर्णमिदं..." हा श्लोक आठवला. पूर्ण आणि शून्य दोन्ही एकच असावे काय? ;-)

गॉडजिला's picture

21 Sep 2021 - 11:14 am | गॉडजिला

पूर्णत्व फक्त आणि फक्त शून्याकडे आहे. बाकी सर्वच आकडे फक्त अपूर्णत्व मोजायला निर्माण झाले.

राघव's picture

21 Sep 2021 - 9:50 pm | राघव

उत्तर आवडले! :-)

Bhakti's picture

17 Sep 2021 - 6:52 pm | Bhakti

_/\_

प्राची अश्विनी's picture

20 Sep 2021 - 2:25 pm | प्राची अश्विनी

वाह! आवडली.

धन्यवाद प्राची अश्विनी ताई!

सरिता बांदेकर's picture

21 Sep 2021 - 11:37 am | सरिता बांदेकर

त्याला पाठीवर घेऊन चालतांना
छातीवरल्या आकड्यांंच ओझ
कधी जाणवत नाही की
अनायसे कुबड भासत नाही...

हे पटलं.
छान आहे कविता.अर्थपूर्ण आहे.

Bhakti's picture

21 Sep 2021 - 2:06 pm | Bhakti

धन्यवाद सरिता ताई!

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2021 - 9:54 am | श्रीरंग_जोशी

कविता आवडली.

Bhakti's picture

22 Sep 2021 - 11:06 am | Bhakti

धन्यवाद श्रीरंग!

रंगीला रतन's picture

22 Sep 2021 - 10:15 am | रंगीला रतन

कैच्याकैकविता हा टॅग लै आवडला :)
समजाला वेळ लागला पण कविता छान वाटली.

Bhakti's picture

22 Sep 2021 - 11:07 am | Bhakti

=) धन्यवाद