एक आर्त काव्य , सलील कुलकर्णी
( कवी माहित नाही बहुतेक संदीप खरे किंवा सुधीर मोघे )
https://www.youtube.com/watch?v=xyHtnZW0dNA
अजुन उजाडत नाही ग!
दशकामागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग!
ना वाटाचा मोह सुटे वा
ना मोहांच्या वाटा ग!
पथ चकव्याचा, गोल,
सरळ वा कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी!
पान जळातून वाही ग...
कधी वाटते 'दिवस'-'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे. गंध आंधळे भवताली वनराई ग
तमातली भेसुर शांतता... कानी कूजन नाही ग...
एकच पळभर एखादी कळ
अशी सनाणुन जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग!
ती कळ सरते... हूरहुर उरते अन् पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण काही आतून उमलत नाही ग…
प्रतिक्रिया
7 Sep 2021 - 8:29 pm | कुमार१
छान आहे
7 Sep 2021 - 9:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
संदिप खरे यांची कविता आहे हि, पण मला कळल नाही इथे का टाकलिये?
8 Sep 2021 - 3:04 pm | चौकस२१२
केवळ मिपाकरांबरोब्र वाटावी म्हणून ... मग कुठे असे दुवे द्यायला परवानगी आहे ? एक तर मिपावर नवीन धागा काढताना "लेखन करा " यात तो कोणतया शीषर्काखाली ताकाचे ते निवडताना काही तरी तांत्रिक गडबड होते .. असा ड्रॉप डाऊन मेनू नाहीये
7 Sep 2021 - 10:13 pm | Bhakti
संदिप खरे म्हणजे मोरपीस..
कानात अजून आवाज घुमतोय..
नोस्टालजिया....रात्र रात्र जागवल्या ह्या गीतांनी