चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ६)

निनाद's picture
निनाद in राजकारण
28 Aug 2021 - 3:05 pm

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ पाचवा भाग १५०पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने - भाग ६

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2021 - 7:17 pm | श्रीगुरुजी

आता अनिल परबांना ईडीने नोटीस पाठविली आहे. ईडीने आतापर्यंत पाठविलेल्या सर्व ५ नोटिसा अनिल देशमुखांनी नातवंडांची शी पुसायला वापरून कमोडमध्ये फ्लश करून टाकल्या आहेत. अनिल परब सुद्धा काही वेगळे करण्याची शक्यता नाही. ईडीच्या नोटीसला साधे चिलट सुद्धा घाबरत नाही कारण ईडीची नोटीस फक्त राजकारण करण्यासाठीच असते हे तान्हे बाळ सुद्धा सांंगेल. त्यामुळे हा मूर्खपणा आता ईडीने थांबवावा कारण यातून त्यांचंच हसं होतंय.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ed-issued-notice-to...

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 7:20 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 7:32 pm | अमरेंद्र बाहुबली

कोंग्रेस सीबीआय चा गैर वापर करायची अशी बोंब मारनारे भाजप समर्थक आता ईडी च्या गैरवापरा बद्दल चूप का???
भाजप पक्ष आणी कार्यकर्त्यांचा दुटप्पी पणा असे मुद्दे आले का सिध्द होतो.

जॅक द रिपर's picture

30 Aug 2021 - 1:01 am | जॅक द रिपर

गैरवापर हा शब्द तुम्हाला माहीत आहे हे पाहून परम संतोष जाहला!

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 3:01 am | अमरेंद्र बाहुबली

गैरवापर शब्द कमी पडावा इतका वापर भाजप इडी चा करतेय. खालच्या दर्जाचे राजकारण हे भाजपलाच शोभते. आणी प्रचार पार्टी विथ दिफ्रान्स चा. अर्थात शीर्ष स्थानापासूनच खोटे बोलणे नी मोठमोठ्या थापा मारणे सुरु आहे तर त्या खालचे तरी काय करणार.

सामान्यनागरिक's picture

31 Aug 2021 - 11:52 am | सामान्यनागरिक

एवढं काय वाटुन घेता?

गरीबी हटाओ ...................ही थाप आपण पचवलीच ना ? मग हे पण पचवुन्/पटवुन घ्या

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Aug 2021 - 7:40 pm | चंद्रसूर्यकुमार

अनिल देशमुखांना सीबीआयने क्लिन चीट दिलेली नाही असे आता स्पष्ट होत आहे. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते.

सीबीआयने अनिल देशमुखांना क्लिन चीट दिली म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादीचे काहीतरी शिजत आहे या कल्पना करून भाजप समर्थकांनी आपल्या पक्षाला शिव्या घालूनही झाल्या. पण दुसरीकडे बघितले तर काय चित्र दिसते?

नेहरूंनी चीनच्या प्रश्नामध्ये घोळ घालून ठेवला होता, स्वप्नाळू परराष्ट्रधोरण अवलंबले होते आणि भारताचे कधी भरून न येणारे नुकसान केले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? आता 'इन्स्टिट्यूशन्स'च्या पावित्र्याच्या गमज्या मारणारे काँग्रेस समर्थक इंदिरा गांधींनी संसद, न्यायालये, रिझर्व्ह बँक वगैरे प्रत्येक इन्स्टिट्यूशनच्या पावित्र्याची पायमल्ली केली होती हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? देशात आणीबाणी लादून या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सच्या माहेरघराला इंदिरा गांधींनी आग लावली होती, भ्रष्टाचाराची गटारगंगा घरोघरी पोहोचवून भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनवला होता, सत्ताधारी माजणे म्हणजे काय याचे मूर्तीमंत उदाहरण १९७० च्या दशकातला काँग्रेस पक्ष होता- ते करून दाखवले इंदिरा गांधींनी हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? उठल्यासुटल्या राष्ट्रीयीकरण करून स्वतःच्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला अ‍ॅनेमिक बनवायचे काम इंदिरा गांधींनी केले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? १९७१ च्या युध्दात आपल्या सैन्याने केलेल्या पराक्रमावर सिमला करार करून इंदिरा गांधींनी पाणी फेरले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? पंजाबमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा भस्मासूर इंदिरा गांधींच्या आशिर्वादातूनच उभा राहिला होता आणि त्यातून नंतर पंजाब दशकभर जळत होता आणि हजारो लोक विनाकारण मारले गेले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात?राजीव गांधींची श्रीलंका तसेच शाहबानो आणि अयोध्या प्रश्नात भूमिका संशयास्पद होती हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? मनमोहनसिंगांच्या काळात पंतप्रधान या अत्यंत महत्वाच्या 'इन्स्टिट्यूशन'चे पोतेरे झाले होते हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? स्वतःच्या मतांची झोळी भरायला काँग्रेसच्या राज्यात हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे केले होते आणि सगळा हिंदू समाज दहशतवादी आहे असे चित्र उभे करायचा अश्लाघ्य प्रयत्न केला गेला होता हे काँग्रेस समर्थक मान्य करतात? कम्युनिझम या तथाकथित विचारांतून जगात लाखो-करोडो लोकांची हत्या झाली हे कम्युनिस्ट समर्थक मान्य करतात की दरवेळेस 'it was not real communism' चे पालूपद चालू ठेवतात? भारतातही जास्तीतजास्त राजकीय हिंसाचार घडवायचे पाप हे कम्युनिस्टांचेच आहे हे कम्युनिस्ट समर्थक मान्य करतात? दिल्लीत दिवसाला २० हजार+ कोरोना केसेस येत असताना आपण कोरोनाला कसे हरवले याच्या गमजा केजरीवाल करदात्यांच्या खिशाला कात्री लावून वेगवेगळ्या चॅनेल्सवर जाहिराती दाखवून मारत होते हे अयोग्य होते हे आपसमर्थक मान्य करतात? उगीचच कोणावरही पुराव्याशिवाय बेताल आरोप करणे ही मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतील एक जबाबदारी नाही हे जगजाहीर असतानाही तसे आरोप करायचे आणि मग इतरांनी बदनामीचे खटले ठोकल्यावर राम जेठमलानींसारखा कोर्टातील एकेका हिअरींगसाठी २०-२२ लाख घेणारा महागडा वकील करायचा आणि त्याचे बिल दिल्ली सरकारला म्हणजे करदात्यांना लावायचे हे करणे अयोग्य होते हे आपसमर्थक मान्य करतात? कोरोनाच्या भयंकर अशा दुसर्‍या लाटेत गरजेपेक्षा तिप्पट-चौपट ऑक्सिजन मागून घेऊन मग इतर राज्यांना ऑक्सिजन कमी पडला आणि ऑक्सिजनच्या अभावी तिथे लोक मरण पावले की आपोआप त्याचा द्वेष मोदीसरकारवर येईल असला घाणेरडा प्रकार केजरीवालांनी केला तो अश्लाघ्य होता हे केजरीवाल समर्थक मान्य करतात? तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या नावावर दिल्लीत २६ जानेवारीला झालेला धुडगूस किळसवाणा होता हे सगळे जमात-ए-पुरोगामी मान्य करतात?

हे सगळे झाले भारतात. जगातही काही वेगळी गोष्ट नाही. एकीकडे शांततेचे नोबेल घेऊन फुकाचे शांततेचे ढोल बडविणार्‍या ओबामांनी सिरीयात अल कायदाविरोधात मदत करून आयसिस हा नवा भस्मासूर उभा केला हे लिब्बू लोक मान्य करतात? आता तर बायडन महाशयांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. आता त्याच आयसिसविरोधात परत तालिबानशी सहकार्य करायची भाषा सुरू झाली आहे ती अयोग्य आहे हे लिब्बू लोक मान्य करतात?

म्हणजे दुसरीकडे काय चित्र आहे तर आपण ज्याचे झेंडे मिरवतो त्याने कितीही मोठी चूक केली तरी हे लोक त्याविरोधात काहीही म्हणजे काहीही बोलत नाहीत तर उलट आपले झेंडे मिरवणे चालूच ठेवत असतात. त्याउलट महाराष्ट्रात राष्ट्रवादी किंवा शिवसेना यांच्याबरोबर भाजप हातमिळवणी करणार या कल्पनेनेही आम्हाला वरखाली व्हायला लागते आणि आम्हीच आमच्या पक्षाला शिव्या घालायला लागतो. नोटबंदीच्या निर्णयामागे नक्की काय कारण होते याची कल्पना नाही पण तो निर्णय चुकीचा होता किंवा निर्णय बरोबर असला तरी अंमलबजावणी फसली हे बोलणारे किती भाजप समर्थक दाखवू? आणि तरीही दुसरीकडचे लाचार गुलाम लोक आम्हाला मात्र भक्त म्हणत असतात.तसेच ती गोष्ट झाली ही कल्पना करून त्या (याक्षणी) काल्पनिक असलेल्या गोष्टीवर आमची प्रतिक्रिया काय असेल हे विचारायचा शाहजोगपणा बाळगणारे लोक त्यांच्या बाजूकडून इतक्या गोष्टी प्रत्यक्षात (काल्पनिक नाही) झाल्या तरी त्याविरोधात हु की चू करत नाहीत.

तेव्हा एक गोष्ट ठरवली आहे. भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करायचा निर्णय घेतला तर त्याचे समर्थन नक्कीच नाही. जी गोष्ट आपल्याला मान्य नाही त्याचे समर्थन करण्यासाठी आपला आत्मा विकावा लागतो तो आम्ही विकलेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मत त्या परिस्थितीत देणार नाही. असा निर्णय घेतला तर राष्ट्रीय स्तरावरही भाजपवर दोन डाग नक्कीच पडतील. पण दोन डाग पडलेले आवडत नाहीत म्हणून दुसर्‍या बाजूवर शंभर डाग असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून भाजपला विरोध करू- हे होणे नाही. निदान माझ्याकडून तरी नाही.

रात्रीचे चांदणे's picture

29 Aug 2021 - 8:04 pm | रात्रीचे चांदणे

पण दोन डाग पडलेले आवडत नाहीत म्हणून दुसर्‍या बाजूवर शंभर डाग असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून भाजपला विरोध करू- हे होणे नाही. निदान माझ्याकडून तरी नाही
सहमत..

सॅगी's picture

29 Aug 2021 - 8:09 pm | सॅगी

सहमत आहे.

सुक्या's picture

29 Aug 2021 - 10:59 pm | सुक्या

आज बोंबा मारणारे .. आपल्या पुर्वजांनी काय पचका करुन ठेवला आहे याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करतात. महागाई च्या नावाने शिमगा ५० वर्षांपुर्वी पण होत होता आजही होतो आहे. पुढेही होत राहील. लोकांना आपले पगार वाढुन हवे असतात परंतु बाकी बाजारात किंमती कमीच असाव्या असा अट्टहास असतो.

बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट आनी असंख्य डाग असलेला शर्ट यापैकी कुठला घालायचा असेल तर मी पण २ /३ डाग वाला शर्ट घालीन. उगीचच नवीन फॅशन आहे म्हनून असंख्य डाग असलेला शर्ट घालुन मिरवनार नाही ...

तस्मात जोवर भारत एक खंबीर राष्ट्र म्हणुन वाटचाल करत राहील तोवर खंबीर असलेल्या नेत्यालाच माझे मत.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2021 - 11:08 pm | श्रीगुरुजी

बाकी दोन/तीन डाग असलेला शर्ट आनी असंख्य डाग असलेला शर्ट यापैकी कुठला घालायचा असेल तर मी पण २ /३ डाग वाला शर्ट घालीन. उगीचच नवीन फॅशन आहे म्हनून असंख्य डाग असलेला शर्ट घालुन मिरवनार नाही ...

माझ्या दृष्टीने या शर्टावर फक्त २-३ डाग नसून बरेच जास्त डाग आहेत व रोज एक नवीन डाग पडतोय.

बाकी मी असंख्य डाग असलेला किंवा फक्त २-३ डाग असलेलाही शर्ट वापरणार नाही. मी एखादा डाग विरहीत शर्ट शोधेन व तसा मिळेपर्यंत वाट पाहीन.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 2:44 am | अमरेंद्र बाहुबली

+१
भाजपने शंभर घोटाळे केले म्हणून काय झाले इतरांनी १०१ केले आहेत म्हणून मी भाजपलाच मत देईन अश्या प्रकारचा आविर्भाव आहे हा.

प्रदीप's picture

30 Aug 2021 - 10:39 am | प्रदीप

अनेक आशिर्वाद.

आपण श्रीगुरुजी असलांत तरी, माझे वय व त्यानुसार उघड्या डोळ्याने भंवताल पाहून, तसेच वाचून, माहिती करून घेऊन, व हाडामासांच्या माणसांच्या जगांत राहिल्याने माझी ज्येष्ठता आहे, असे मी म्हणू शकतो. तर अशा ह्या वडिलकीच्या नात्याने हे लिहीत आहे.

आपणांस डाग विरहीत शर्ट शोधून मग तो अंगात घालावयाचा आहे, तर माझे अनुमान मला सांगते की भारतवर्षांत, निदान पुढील १००- १५० वर्षे तरी अशक्य आहे. कारण आपण चोखाळलेली लोकशाहीची व्यवस्था, ज्या युरोपमधे रूजली व बहरली, तिथेच तिला काही अशा तर्‍हेची प्रगल्भता येण्यासाठी दोन शतकेतरी लागली होती. अमेरिकेतही परिस्थिती फार वेगळी नाही. तेव्हा आपल्या देशाला तसे डाग- विरहित शर्ट्स मिळवण्यासाठी अजून १००- १२५ वर्षे तरी कमीतकमी जावी लागतील.

आणि तेही मधल्या काळांत, कुठल्यातरी पराकोटीच्या धर्मांध व्यवस्थेने ही लोकशाहीची चौकट उधळून टाकली नाही, तरच हे शक्य आहे. नाहीतर मधल्यामधे सगळेच शर्ट्सच नाहीशी होण्याची भीति आहेच.

तेव्हा

१. आपणांस उदंड - म्हणजे अजून निदान १२५ वर्षाचे- आयुष्य मिळो व
२. त्यानंतरही आपली लोकशाहीची चौकट अशीच अबाधित राहो.

मग आपला डागविरहीत शर्टाचा यूटोपिया आपणांस अंमलांत आणता येवो.

असे दोन आशिर्वाद मी आपणांस येथे देतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 10:44 am | अमरेंद्र बाहुबली

केजरीवाल हे नाव ऐकलंय का??

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2021 - 11:25 am | श्रीगुरुजी

हरकत नाही. मी वाट पाहीन, पण कोणत्याही परिस्थितीत डागाळलेल्यांना मत देणार नाही. १०० डाग पडलेल्यापेक्षा २-३ डाग पडलेला कमी वाईट हा तर्क वरपांगी चपखल वाटत असला तरी जेव्हा २-३ डाग पडलेला १०० डाग पडलेल्यांना डोक्यावर घेऊन त्यांचा उदो उदो करतो, तेव्हा २-३ डाग पडलेल्यावरही लत्ताप्रहार करावा लागतो.

शाम भागवत's picture

30 Aug 2021 - 11:48 am | शाम भागवत

प्रदीपभौ,
जाऊ द्या हो.
काही जणांचा राग फडणवीसांवर आहे. खडसे हे स्वच्छ चारित्र्याचे असूनही केवळ फडणवीसांमुळे खडसे यांची गोची झाली अस कोणाला वाटत असेल तर आपण हरकत घेणारे कोण?
थोडक्यात, फडणवीस बदलले की भाजपाचा शर्ट एकदम स्वच्छ होईल असे काहीसे आहे. फक्त मोदी शहांना त्याच्या बरोबर उलटे वाटते त्याला कोण काय करणार?
यावर काळ हाच एकमेव उपाय आहे.

या काळात रागाच्या भरात जाणारा, छोट्याश्या मोहापाही आणखी वाहवत जाणार आहे. तर जो शांत डोक्याने काम करेल तो तरून जाणार आहे. मला वाटते सध्या २ वर्षे महाराष्ट्रात हेच चालू आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक (पुढे ढकलली न गेल्यास) झाल्यावरच सगळं चित्र स्पष्ट व्हायला लागेल तो पर्यंत .....
ॐ शांती ॐ

सुक्या's picture

30 Aug 2021 - 12:29 pm | सुक्या

हा आपला भाबडा आशावाद आहे. आजवर १००% शुद्ध चारीत्राचा राजकारणी माझ्या तरी पाहण्यात नाही. उडदामाजी काळे गोरे असतातच. त्यामुळे सगळेच खराब असतील तर त्यातल्यात्यात कमी खराब असलाच नेता शोधावा लागेल ...

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2021 - 1:26 pm | श्रीगुरुजी

उडदामाजी काळे गोरे असतील. पण २-३ डाग असलेल्याने शर्टावर १०० डाग असलेल्यांंची टोळी जमा केली तर याचा शर्टही डागांनी भरून जाईल.

राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे, मधुकर पिचड, नितेश राणे, पद्मसिंह पाटील, हर्षवर्धन पाटील, बबन पाचपुते, कृपाशंकर सिंह इ. जर मंत्रीमंडळात असतील तर फडणवीस मुख्यमंत्री असूनही ते मंत्रीमंडळ महाभ्रष्टाचारी असेल. हे मंंत्रीमंडळ भाजपचे की राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे असा संशय निर्माण होईल.

त्यामुळे अशा डागाळलेल्यांना गणंगांना डोक्यावर घेणाऱ्यांना 'इंद्राय स्वाहा । तक्षकाय स्वाहा ।' या नीतिने खाली आपटावे लागेल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

31 Aug 2021 - 8:00 am | अनिरुद्ध.वैद्य

बसाव लागेल गुर्जि :प

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 3:16 am | अमरेंद्र बाहुबली

आज बोंबा मारणारे .. आपल्या पुर महागाई च्या नावाने शिमगा ५० वर्षांपुर्वी पण होत होता आजही होतो आहे. -------
२०१४ साली बहोत हुई महंगाई की मार अबकी बार मोदी सरकार असा प्रचार करणाऱ्या भाजपेयींची अक्कल कुठे गेली होती. महागाई वाढणारच ही अक्कल तेव्हा भाजपेईना नव्हती का??

तस्मात जोवर भारत एक खंबीर राष्ट्र म्हणुन वाटचाल करत राहील तोवर खंबीर असलेल्या नेत्यालाच माझे मत~~~
एकेकाळी चीनला टक्केर देण्याची भाषा करणारे भाजपचे लोक आता आपली परिस्थिती अफगाण पेक्षा चांगली म्हणताहेत. नेमक राष्ट्र खंबीर असल्याची वाटचाल कुठे दिसतेय??

नेमक राष्ट्र खंबीर असल्याची वाटचाल कुठे दिसतेय??

तुम्हाला नाही दिसणार .. तेव्हा जास्त टेंन्शन घेउ नका ...
आपला अजेंडा चालु ठेवा ..

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 12:38 pm | अमरेंद्र बाहुबली

बरोबइ आहे तुमचं. मी अंधभक्त नसल्याने वास्तविकतेत जगतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2021 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनिल देशमुखांच्या क्लीनचिटबदल वाचता वाचता मधेच पंडित नेहरू, इंदिरा गांधी.अरविन्द केजरीवाल... प्रचंड भक्तीय विचारांनी भरलेला प्रतिसाद वाचला. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते कसेही वागायला लागले की भक्त म्हणून त्रास होतोच. भाजप आणि त्यांच्या वागणुकीचा सच्च्या कार्यक्रत्याला त्रास हा होणारच आपला प्रतिसाद वाचता वाचता माझेही डोळे भरून आले.

माझे डोळे असेच लालकृष्ण अडवांणींना एका अडगळीत टाकले तेव्हा डबडले होते. ज्या संघाची धावसंख्या केवळ दोन होती, तेव्हा त्यांनी चिवटपणे फलंदाजी करून सत्तेची मजा दिली. ज्यांनी कष्ट करून शेती केली त्या शेतात जोमाने पिक आल्यावर थेट 'लॉ ऑफ़ डिमिनिशिंग रिटर्न्स' सिंद्धान्तावर थेट मालकच बदलून टाकले तेव्हा हंबरडा फुटला होता. इतका दगाबाज हाच पक्ष असू शकतो ही कल्पना आजही सहन होत नाही.

-दिलीप बिरुटे
(आठवणींनी व्याकूळ) :)

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2021 - 1:09 pm | श्रीगुरुजी

लालकृष्ण अडवाणींंना अडगळीत वगैरे अजिबात टाकलं नव्हतं. २००९ मध्ये ते भाजप व रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते व त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजप व रालोआने निवडणुक लढली होती. परंतु त्या निवडै भाजपची अजून घसरण झाली होती.

भाजपने २०१४ ची निवडणुक मोदींच्या नेतृत्वाखाली लढून जिंकली होती. त्या निवडणुकीत ८६ वर्षीय अडवाणी सुद्धा खासदार म्हणून निवडून आले होते. पंतप्रधान म्हणून मोदींचेच नाव सुरूवातीपासूनच जाहीर झालेले असल्याने निकालानंतर अडवाणींना पंतप्रधान करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता व मंत्रीपदाचा ताण घेण्यासाठी त्यांचे उतारवय योग्य नव्हते. त्यामुळे त्यांना एखादे मंत्रीपद देणे योग्य नव्हते.

२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी त्यांचे वय ९१ वर्षे होते व इतक्या उतारवयात त्यांना खासदारकी किंवा इतर कोणतेही पद देणे हा अन्याय ठरला असता.

अडवाणींना २०१४ किंंवा त्यानंतर एखादे पद देणे म्हणजे सुनील गावसकरला २०२१ मध्ये आयपीएल सामन्यात खेळायला लावल्यासारखे ठरले असते.

कपिलमुनी's picture

30 Aug 2021 - 1:21 pm | कपिलमुनी

अडवाणींना २०१७ मध्ये राष्ट्रपती करता आले असते.
पण नंतर त्यांनी यशवन्त सिन्हा सारख्या करामती केल्या असत्या तर सरकार गोत्यात आले असते.

अडवाणीं बद्दल वाईट वाटले तरी त्यांचे टायमिंग प्रत्येक वेळी चुकले . नियती !

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 1:26 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजप मध्ये खर्या निष्टावंतांना फक्त वापरून फेकून दिले जाते.

रात्रीचे चांदणे's picture

30 Aug 2021 - 1:36 pm | रात्रीचे चांदणे

नाही , मोदी सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांला भाजपा सारख्या पक्षातुनच पंतप्रधान पद मिळू शकते. मोदींच्या खानदानतून कोणीही राजकारणात नव्हते. तीच गोष्ट अमित शाहांची. भाजपचे अध्यक्ष असूनही अडवणींनी आपल्या मुलांना कोणतेही मोठे पद दिल नाही फक्त सामान्य कार्यकर्त्यांना च पुढे केलं हे फकस्त भाजपातच होऊ शकतय.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

30 Aug 2021 - 1:55 pm | रावसाहेब चिंगभूतकर

फारच सहनशील लोक बा तुम्ही. फालतू पोस्ट्स ना इतकं व्यवस्थित उत्तर द्यायचं आणि मग तो डू आयडी ते सोडून तिसरच काही तरी चिखलफेक करणार.

सुबोध खरे's picture

30 Aug 2021 - 7:15 pm | सुबोध खरे

फालतू पोस्ट्स ना इतकं व्यवस्थित उत्तर द्यायचं आणि मग तो डू आयडी ते सोडून तिसरच काही तरी चिखलफेक करणार.

वैचारिक बद्धकोष्ठाला उपाय नसतो.

तेंव्हा त्यांना कुंथावे लागणारच

तुम्ही त्यांच्या निम्न दर्जाच्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करणे सोडावे हि विनंती.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 1:56 pm | अमरेंद्र बाहुबली

हे फकस्त भाजपातच होऊ शकतय.>>>
मनमोहन सिंग, लाल बहादूर शास्त्री हे राजकीय खानदाणातून होते??
अमित शहाचा मुलगा बीसीसीआय च्या छाचड्यावर जाऊन बसलाय हे फकस्त भाजपातच होऊ शकते.
आमदार गंगाधर फडणवीस ह्यांचा मुलगा, दाळ घोटाळा फेम शोभा फडणवीस ह्यांचा पुतण्या आपली घराणेशाहा वापरून भाजपातच मुख्यमंत्री होऊ शकतो. बाकी कार्यकर्त्यानी फक्त संतरंज्याच ऊचलाव्यात.

नावातकायआहे's picture

30 Aug 2021 - 5:30 pm | नावातकायआहे

जवाहर,,इंदिरा, राजीव, सोनीया ,राहुल (देशाचे नशीब अजुन तरी युवराजांना (जाहिर) वारस नाही), प्रियांका, "जिजाजी", मीराया, रेहन
छ्या.... कुठेय राजकिय खानदान? हे तर मान ना मान मै तेरा महेमान!

सोनीया मायनो-गांधी (वरील लायनीत "डावीकडुन चौथी") यांना अध्यक्षपदाची निवडणुक तर घेउ द्या मग बोला!

बाकी कार्यकर्त्यानी फक्त संतरंज्याच ऊचलाव्यात.>>> त्यांना काही प्रोब्लेम नसेल तर?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 6:20 pm | अमरेंद्र बाहुबली

राणे पिता पुत्र, विखे पाटील पिती पुत्र, शहा पिता पुत्र, फडणवीस पिता पुत्र काकू, राजनाथ सिंह पिता पूत्र, सिंधीया घराणं आणी अनेक ह्याना ते भाजपात असल्याने घराणे शाहीचा नियम लागू होत नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2021 - 2:14 pm | श्रीगुरुजी

मोदी सारख्या एका सामान्य कार्यकर्त्यांला भाजपा सारख्या पक्षातुनच पंतप्रधान पद मिळू शकते. मोदींच्या खानदानतून कोणीही राजकारणात नव्हते. तीच गोष्ट अमित शाहांची. भाजपचे अध्यक्ष असूनही अडवणींनी आपल्या मुलांना कोणतेही मोठे पद दिल नाही फक्त सामान्य कार्यकर्त्यांना च पुढे केलं हे फकस्त भाजपातच होऊ शकतय.

+ १

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 1:23 pm | अमरेंद्र बाहुबली

८६ व्या वर्षी अडवाणी मंत्रीपद देणे अयोग्य ठरते पण ८९ वर्षांच्या श्रिधरण ह्याना केरळचा मुख्यमंत्री पदाचा ऊमेदवार घोषीत करणे योग्य ठरते. :)

चंद्रसूर्यकुमार's picture

30 Aug 2021 - 4:07 pm | चंद्रसूर्यकुमार

अगदी खुश्शाल. तुमचे कितीही डोळे डबडबून आले किंवा डोळ्यातून पॅसिफिक महासागर धबधब्यासारखा कोसळला तरी त्याची पर्वा मी तरी करणार नाही. आता पुरोगाम्यांसारखा आणि काँग्रेस समर्थकांसारखा कोडगेपणा अंगी बाणवायला हवा. एकीकडे आम्हाला अमुक एक मूल्ये प्रिय आहेत असे म्हणायचे पण तीच मूल्ये पायदळी तुडविणार्‍यांचे झेंडे नाचवायचे आणि परत इतरांना प्रश्न विचारायचे हे करायला पराकोटीचा कोडगेपणा असावा लागतो. तसा भाजप समर्थकांनी अंगात बाणवावा असे वाटते. कारण दुसर्‍या बाजूला आम्ही जे कोणी आहोत ते आहोत म्हणून आमचा द्वेष करणारे लोक भरले अपसतील तर त्याविरोधात आपली बाजू अगदी १००% धुतल्या तांदळासारखीच हवी असा आग्रह मी तरी धरणार नाही. कारण तसे केल्याने त्याच विरोधी बाजूला बळ प्राप्त होणार असते.

जाताजाता अडवाणींचा विषय काढला आहेतच म्हणून एक गोष्ट लिहितो- अडवाणी (आणि वाजपेयींनी सुध्दा) बलराज मधोकांना काय वागणूक दिली होती हे जरा माहित करून घ्या. पेरावे ते उगवते किंवा गुरूची विद्या गुरूला हा निसर्गाचाच न्याय आहे. जे बीज अडवाणींनी पेरले त्याचे परिणाम स्वतः अडवाणींवर होणे क्रमप्राप्त होते. तरी नशीब अडवाणींना मोदींनी पक्षातून हाकलले नाही. बलराज मधोकांबरोबर नेमके तेच अडवाणींनी केले होते. बलराज मधोक हे सुध्दा वाजपेयींसारखेच एक कुशल संघटक आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते, तितकेच तळमळीचे कार्यकर्ते होते. भविष्यात ते आपल्याला स्पर्धक होतील हे जाणून अडवाणींनी १९७३ मध्ये त्यांना पक्षातून हाकलले होते. तेच मधोक कायम जनसंघाच्या विचारांशी एकनिष्ठ राहिले. पक्षाने काढले, पक्षाबरोबर मतभेद झाले म्हणून कधीही पक्षाची जी ध्येयधोरणे होती त्याबरोबर त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. आपण आणीबाणीच्या काळात अनिश्चितकाळासाठी बंगलोरला तुरूंगात खितपत पडलो होतो हे विसरून २०१५ मध्ये देशात सध्या आणीबाणीसदृश वातावरण आहे हे म्हणायचे ढोंग अडवाणींमध्ये होते ते मधोकांमध्ये नव्हते. तुम्ही जे इतरांबरोबर करता ते कोणीतरी भविष्यात येऊन तुमच्याबरोबरच करणार हा पण काळाचा न्याय आहे. त्यात तक्रार करण्यासारखे काही नाही. तरीही आता आपला काळ सरला, आपले वय झाले तेव्हा आपण स्वतःहून बाजूला व्हावे आणि नव्या नेतृत्वाला पुढे येऊ द्यावे हे समजून घेऊन अडवाणी वागले असते तर त्यांच्यावर ती वेळ आली नसती. पण टिपीकल भारतीय कुटुंबातल्या खाष्ट सासूप्रमाणे त्यांची वागणूक होती. एकीकडे भारतीय संस्कृतीचे ढोल बडवायचे आणि त्याच भारतीय संस्कृतीत वानप्रस्थाश्रम ही संकल्पना नेमकी त्याच उद्देशाने सांगितली आहे हे सोयीस्करपणे विसरून कसे चालेल?

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2021 - 8:12 pm | श्रीगुरुजी

अनिल देशमुखांना सीबीआयने क्लिन चीट दिलेली नाही असे आता स्पष्ट होत आहे. या निमित्ताने एक गोष्ट लिहाविशी वाटते.

सामाजिक माध्यमातून फिरत असलेल्या पीडीएफ संदर्भात सीबीआयने खुलासा केलेला नाही. अनिल देशमुखांवर एक अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे असे सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. अदखलपात्र गुन्हा हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे.

जेथे धूर दिसतो तेथे आग असतेच, एवढेच मी सांगू इच्छितो व उद्या खरोखरच अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळाली तरी त्यात अजिबात आश्चर्य वाटणार नाही. ईडी ज्या त-हेने अनिल देशमुखांना फक्त नियमित नोटीस पाठविण्याची औपचारिकता पार पाडून थंड बसून आहे, हे पाहता हा वेळ काढण्यामागे त्यामागे नक्कीच काहीतरी विशिष्ट हेतू आहे असा संशय येतोय.

असो. काय होईल ते पुढील काही आठवड्यात समजेलच. अनिल देशमुखांवर पुढे काही कारवाई होणार की अधिकृत क्लिन चिट मिळून ते फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होणार ते लवकरच समजेल.

काही गोष्टींंचे पुरावे नसतात ते खटले लढवले जात नाहीत. तोंडावर पडायला होतं.
मालमत्ता बेनामी असल्यास ज्याच्या निवावर आहे त्यावर जबाबदारी पडते पैसे कुठून आणले दाखवण्याची.

कंजूस's picture

29 Aug 2021 - 8:54 pm | कंजूस

ईडीच्या नोटीसला साधे चिलट सुद्धा घाबरत नाही कारण ......

मागचे एक प्रकरण पाहा. केंद्रिय मंत्री आणि इतर आहेत. अमुक तमुक ठिकाणी आम्ही भेटलो हे सांगितले तर हॉटेलच्या विजिटर नोंदवहीतील पानेच गायब.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2021 - 10:29 pm | श्रीगुरुजी

प्रताप सरनाईक, संजय राऊतची बायको, एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल देशमुखांचा मुलगा व बायको आणि आता अनिल परब अशांना ईडीची नोटीस मिळाली आहे.

यातील प्रताप सरनाईक व संजय राऊतची बायको एकदा ईडीसमोर जाऊन आले, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. एकटे खडसे नोटीस न टाळता नियमित चौकशीसाठी जातात. कदाचित इतक्या वर्षांचे भाजपचे संस्कार असतील किंवा आपल्यावर केल्या गेलेल्या आरोपातून पळवाट न काढता कायदेशीर मार्गाने सुटका हवी असेल, पण ते चौकशी टाळत नाहीत. अनिल देशमुख व कुटुंबियांना ५ वेळा नोटीस पाठवूनही त्यांनी नोटीसीला आणि ईडीला सातत्याने धुडकावून लावले आहे.

नोटीस पाठविण्यात आलेले सर्वजण शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे आहेत. चौकशीला घाबरून या दोनपैकी एक पक्ष आपल्याला पाठिंबा देईल या भ्रमात भाजप असावा. पण तसे होताना दिसत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 10:47 pm | अमरेंद्र बाहुबली

राज्य सरकार कडे ही यंत्रणा आहेत पण त्या वापरताना राज्य सरकार दिसत नाही, ह्याचा अर्थ असा नाही की राज्यातील भाजप नेते धूतल्या तांदळाचे आहेत ह्याचा अर्थ हा की केंद्रासारखं गलिच्छ वागणं ह्या पक्षाना पटत नसावं. डूकराबरोबर कूस्ती करून आपल्या अंगाला घाण न लागू देण्याचं धोरण राज्य सरकारने स्विकारलंय. राज्य सरकार निश्चीतच मॅच्युरीटी दाखवतंय ह्यात. पण हे किती दिवस चालेल?? केंद्राचा असाच त्रास सुरू राहीला तर मात्र राज्यातील भाजप नेत्यांचे प्रकरणं बाहेर येतील नी एका दिवसात ईडी सर्वाना क्लिनचीट देईल.

तसेच ह्या मागे आणखी एक कारण असावं मोदी २०२४ किंवा जास्तीत जास्त २०२९ पर्यंत राहतील. त्यांच्या नंतर कोण? ह्या साठी भाजपात स्पर्धालहोऊ शकते. केंद्रात आपल्याला स्पर्धक तयार होऊ नये म्हणून अमित शहा मुद्दाम राज्यात फडणवीसला मुख्यमंत्री बनन्यापासून रोखत असावेत. पण आपण राज्यात सत्ता येण्यासाठी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी ह्या ईडीच्या चिठ्ठ्यांचा खेळ मांडला असावा. असं असेल तर अमित शहा खरंच चाणक्य म्हणायला हवे.

जॅक द रिपर's picture

30 Aug 2021 - 1:36 am | जॅक द रिपर

कोणतीही माहिती नसताना बरळण्यात तुमचे तोंड धरणे अशक्य आहे.
राज्य सरकार यंत्रणा वापरत नसती तर १०० कोटींच्या वसूलीच्या प्रकरणात अनिल देशमुख लपूनछपून का फिरत आहेत?
सचिन वाझे आणि परमवीर सिंग हे काय केंद्र सरकारचे काम करत होते का?

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 2:53 am | अमरेंद्र बाहुबली

कोणतीही माहिती नसताना बरळण्यात तुमचे तोंड धरणे अशक्य आहे.~~~~~
सगळी अक्कल नी माहिती मलाच आहे जे मी बरळेल तेच खर. मी जर गंजोडी सुशांत ला चांगला म्हणेल तर तो गंजोडी नाही. असा जो तुमचा आविर्भाव आहे ना तो सुधारणा होण्या पलीकडे आहे.

राज्य सरकार यंत्रणा वापरत नसती तर १०० कोटींच्या वसूलीच्या प्रकरणात अनिल देशमुख लपूनछपून का फिरत आहेत?
सचिन वाझे आणि परमवीर सिंग हे काय केंद्र सरकारचे काम करत होते का? ~~~

ते आरोप सिद्ध व्हायचे आहेत कोर्टात अजून. भाजपच्या विकृत आयटी सेल चे फॉरवर्ड म्हणे न्याय नसतो. अनिल देशमुखाना क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या आहेतच काही दिवसांनी वाझे क्लिनचीट सह बाहेर येतील तेव्हा तुमच्या सारखे लोक तोंडावर आपटलेले असतील.

थंड घ्या मस्त वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघून घ्या तुमचा संताप नक्की नाहीसा होईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 7:11 pm | अमरेंद्र बाहुबली

वाट बघतो रिक्षावाला ह्या गाण्याशी मी सहमत नसलो तरी मी तुमच्या पाठीशी आहे. :)

दिसत नाही, अहो थंड घ्या मस्त गाणे बघा बरे वाट बघतोय रिक्षावाला... तुमचे सर्व प्रश्न संपून जाते ल

नावातकायआहे's picture

30 Aug 2021 - 9:12 pm | नावातकायआहे

उसाचा रस घ्या https://www.youtube.com/watch?v=8VsX101-Ysg

आणि ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट हे ऐका!

https://www.youtube.com/watch?v=MnK_HQQg00I

:-)

श्रीगुरुजी's picture

30 Aug 2021 - 7:06 am | श्रीगुरुजी

कोणतीही माहिती नसताना बरळण्यात तुमचे तोंड धरणे अशक्य आहे.

+१८८

दुसरी बाजू तुम्हा लोकांना बिलकुल माहीत नाही.
देश चुकीच्या दिशेने जात आहे,सामान्य लोकांचे जीवन पुढे खडतर आहे.
त्या विषयी कोणी लिहले की त्याला बरळणे असे संबोधने हे आधुनिक अंधश्रद्धा चे उत्तम उदाहरण आहे.
अमरेंद्र बाहुबली योग्य तीच बाजू मांडत आहेत.फक्त बुद्धीवर चढलेली जळमटे बाजूला केली की त्यांचे बोलणे योग्य आहे हे पटेल.

जॅक द रिपर's picture

30 Aug 2021 - 1:02 am | जॅक द रिपर

खडसेना तीन वेळा करोना झाला नोटीस आली की लगेच.

अमरेंद्र बाहुबली's picture

30 Aug 2021 - 2:55 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपात चाळीस वर्षे निष्ठेने काम केल्याचं चांगलचं फळ मिळतय खडसेंना. आज जे भाजपत निष्ठेने काम करताहेत त्यांनी ह्यातून बोध घ्यावा.