चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ६)

निनाद's picture
निनाद in राजकारण
28 Aug 2021 - 3:05 pm

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ पाचवा भाग १५०पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने - भाग ६

प्रतिक्रिया

२०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने राबवलेली जनधन योजन अपार यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. सुमारे ४३.०४ कोटी लाभार्थी आजवर या योजनेचे आहेत. या शिवाय रु. १४६,२३०.७१ कोटी ठेवींमध्ये आहेत. योजना सुरू झाल्यापासून योजनेंतर्गत खात्यांच्या संख्येत २.३ पट आणि या खात्यांमध्ये जमा केलेल्या रकमेमध्ये ५.७ पट वाढ झाली. सरकारी मदत गरिबां पर्यंत पोहोचण्यात ही योजना प्रमुख आधार बनली आहे.

विविध राज्यांमध्ये जाताना पुन्हा नोंदणीची गरज दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन बीएच मालिका वाहन नोंदणी सुरू केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन नोंदणीची नवीन मालिका सादर केली आहे. ही नोंदणी संपूर्ण देशात वैध असेल. नवीन मालिका BH (भारत मालिका) अशी आहे. वाहन मालकांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना त्यांच्या वाहनांची नोंदणी बदलावी लागणार नाही. ज्यांना नोकरीच्या बदल्यांमुळे विविध राज्यांमध्ये स्थलांतरित होणे आवश्यक आहे अशा लोकांना याचा फायदा मिळेल.
सध्या, बीएच सीरीज अंतर्गत ही वाहन नोंदणी सुविधा संरक्षण कर्मचारी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य पीएसयूचे कर्मचारी आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि संघटनांना स्वैच्छिक आधारावर उपलब्ध असेल.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

28 Aug 2021 - 4:54 pm | रावसाहेब चिंगभूतकर

संपूर्ण देशात एकच रजिस्ट्रेशन, तेही सेंट्रल एजन्सी द्वारे करण्याची गरज आहे. देशात कुठेही वाहन घेतलं की परत परत त्याचं रजिस्ट्रेशन करायला लागता कामा नये. रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस नावाची संस्था मोडीत काढून सेंट्रल ट्रान्सपोर्ट ऑथोरिटी तयार करावी.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Aug 2021 - 5:40 pm | अमरेंद्र बाहुबली

“२६/११ RSS की साजीश“. हे पुस्तक प्रकाशीत करनारे कोंग्रेस मध्ये हयात घालवलेले कृपाशंकर भाजपचे ऊपाध्यक्ष.
शिवसेना, कोंग्रेस मध्ये हयात घालवलेले सावरकरांचा अपमान करनार्या नितेश राणेंचे वडील नारायण राणे केंद्रीय मंत्री.
आणी हे लोक स्वतला हिंदूत्ववादी म्हणवतात.
भाजपात हयात घालवलेले खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे घरी बसलेत. भाजपात निष्टेला फळ मिळतं हे पुन्हा एकदा सिध्द झाले.
जेव्हा भाजपला सत्ता नव्हता तेवेहा खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे विरोधात बसून लढले. सत्ता येऊन “अच्छे दिन” आले तर कृपाशंकर नी राणे मजा मारताहेत. कार्यकर्त्याना वार्यावर सोडून फक्त सत्तेसाठा कुठलीही तडजोड करनार्या कणाहीन भाजपपेक्षा शिवसेना कधीही बरी.

अनन्त अवधुत's picture

29 Aug 2021 - 2:20 pm | अनन्त अवधुत

म्हणजे ज्याप्रमाणे मुंबईतील शिवसैनिकांना प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांच्या उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचे ऐकावे लागते तसेच आहे की हे.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Aug 2021 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली

खडसेंच्या मागे ईडी लागलीय. जो भाजप सोडेल त्याच्या मागे आम्ही ईडी लावू, तसेच विरोधी पक्षांच्या मागेही ईडी लावू. भाजप सोडून सर्व पक्षातील नेत्यांच्या मागे ईडी लावू. केंद्रीय संस्थांचा ईतका गैरवापर??? दानवेंच्या जावयाने दानवेंची संपत्ती १० हजार करोड आहे असा आरोप केला होता. पण ईडीला ते दिसनार नाही. काकण दानवे भाजपात आहेत. “नाॅटी” ईडी. :)
आणी लोकाना भाजप हा पक्ष भ्रष्ट नाही असं वाटतं.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 12:21 am | अमरेंद्र बाहुबली

अर्णब गोस्वामीच्या मागे लागणारे >>>>
अर्नब गोस्वानी म्हणजे काय संत महात्मा होता का?? त्याच्या नावाने चिठ्ठी लिहून एकाने आत्महत्या केली. कितीतरी लाख बूडवले त्याने एका मराठी माणसाचे. आता शांत बसलाय. :)

सामान्यनागरिक's picture

31 Aug 2021 - 11:35 am | सामान्यनागरिक

खांग्रेस ची सत्ता होती तेंव्हा सुद्धा त्यांनी वेगेवेगळ्या प्रकारे विरोधी पक्षांना त्रस्त केले.

आत भाजपनेही ते केले तर गैर काय ? ज्या लोकांच्या मागे ईडी लागली आहे त्यांनी गैर्व्यवहार केलेत हे ही तितकेच खरे आहे.
आपल्या माणसांना वाचवणे यातही काही गैर नाही.

खांग्रेस कुठल्याही मार्गाने सत्ता काबीज करत होती. आज भाजपही तेच करत आहे. मार्गही तेच अवलंबत आहे. आणी खांग्रेस प्रमाणेच आम्ही गांधीवादी /स्वच्छ असल्याचा आव आणत आहे. राजकारणात हे चालायचेच.

राजीव गांधी म्हणाले होते की ८५% सरकारी पैसा भ्रष्टाचारात जातो. आज हे प्रमाण बर्यापैकी कमी आहे हे ही नसे थोडके.

ज्या देशातील मतदार मेंढरांप्रमाणे मतदान करतात, दारुसाठी आपली मते विकतात त्या देशात फार अपेक्षा ठेवता येत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Aug 2021 - 7:22 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीस कितीही वेळा ठाकरेना भेटले तरी आता माफी नाही म्हणजे नाही. :)

जॅक द रिपर's picture

28 Aug 2021 - 11:50 pm | जॅक द रिपर

सुप्रिम कोर्टात किती वेळा थोबाड फोडून घेतलंय उद्दाम ठाकरे सरकारने?

कंगना रानावत केस - हायकोर्टाने थोबाड फोडले.
अर्णब गोस्वामी केस - सुप्रिम कोर्टाने वाजवली
अनिल देशमुख - हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्ट दोघांनीही सरकारला कानफटवले.
रश्मी शुक्ला टॅपिंग केस - सुप्रिम कोर्टाने थोबाड फोडले पद्धतशीरपणे
नारायण राणे - हायकोर्टाने वाजवले
बांद्रा टर्मिनस केस - हायकोर्टाने फोडले.

आणखीन किती थोबाड फोडून घ्यायची इच्छा आहे उद्दाम सरकारला?

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 12:12 am | अमरेंद्र बाहुबली

कंगना रानावत केस >>> तीचं अतिक्रमणातील घर कायदेशीर मार्गाने तोडलं. भाजपवाल्यांचा बेकायदेशीर कामाना पाठींबा असला तरी महाराषट्रात ते चालनार नाही.
अर्णब गोस्वामी केस >>> एका मराठी माणसाचे पैसे डूबवून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलेय त्याने. (सध्या कुठे असतो काय माहीत. चांगलाच धसका घेतलाय मुंबई पोलीसांचा) :)
नारायण राणे >>> आता ह्यापुढे काहीही बोलायच्या आधी चार वेळा विचार करतील :)

सुक्या's picture

29 Aug 2021 - 12:46 am | सुक्या

हे वाचा .. https://www.hindustantimes.com/mumbai-news/demolition-of-kangana-ranaut-...

बाकी हाच न्याय इतर बेकायदेशीर बांधकामावर दाखवायला हवा निघुन जाते काय? तुम्हाला लोकांनी कितीही कान्फाटवले तरी चालुच आहे ... कठीण आहे ..

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 12:57 am | अमरेंद्र बाहुबली

अजून बाकीच्या बांधकामावर कारवाई केली नाही म्हणून कंगनाच्या अतिक्रमनावरील कारवाई समर्थनीय ठरते का??

सुक्या's picture

29 Aug 2021 - 12:58 am | सुक्या

कधी करणार ते सांगा ..

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 1:12 am | अमरेंद्र बाहुबली

काय वेळ आलीय नाही भाजप समर्थकांवर ऐकेकाळी नशेत डूबलेली कंगना नी तीच्या अतिक्रमनाचं समर्थन करावं लागतंय. काय वेळ आणलाय भाजप समर्थकांवर पवार साहेब आणी ठाकरे साहेबानी. ख्या ख्या ख्या.

वाट बघतोय रिक्षावाला गाणे बघून घ्या तुमच्या विचारत फरक नक्की पडेल

इतके नाचु नका हो. त्याची गरज नाहीये ..
फक्त "मुंबईतील बाकी अनधिक्रुत बांधकामावर" कधी कारवाई करणार ते सांगा. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात तेव्हा ते माहीत असेल्च.
कुठले बांधकाम -- कुठली तारीख ... ते सांगा डीटेलवार ..

मग नाचा हवे तेव्हडे ...

सुक्या's picture

29 Aug 2021 - 1:04 am | सुक्या

वरुन .. मुबैत अनधिक्रुत झोपडपट्या उभ्या राहत आहेत गेले कित्येक वर्षे ते कसे काय? तिथे बुलडोझर चालत नाही काय ? की हवा जाते चाकातली ?

Nitin Palkar's picture

31 Aug 2021 - 7:27 pm | Nitin Palkar

कहना कया चाहते हो भाई .... तुम्हाला असमर्थनीय म्हणायचं असावं

सामान्यनागरिक's picture

31 Aug 2021 - 11:39 am | सामान्यनागरिक

नारायण राणे >>> आता ह्यापुढे काहीही बोलायच्या आधी चार वेळा विचार करतील :)

आता जेंव्हा नारयण राणे बोलतील्/कृती करतील तेंव्हा जबअरदस्त परिणाम होईल. ठाकरे पक्षाची सगळी ताकद मुंबई महापालिकेत आहे. ( जशी गोष्टीतील राक्षसाचा जीव पोपटात असायचा ). आता नारयण राणे मुंबै महापालिकेत प्रहार करतील. तेंव्हा ठाकरे पक्ष कसा सटपटतो ते पहायचंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Aug 2021 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण आंदोलन करुन लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले मात्र केंद्र सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत.जनताच कुंभकर्णासारखी झोपली असून मी एकटा काय करू ? जनतेने आवाज उठवून सरकार बदलन्याची ताकदउभी केली पाहिजे- जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे.

मिपावर यांच्यावर स्वतंत्र धागा काढावा लागेल, थोर व्यक्तिमत्व.

-दिलीप बिरुटे

जॅक द रिपर's picture

29 Aug 2021 - 12:02 am | जॅक द रिपर

तुम्ही कोणत्या आंदोलनात भाग घेतला होता आणि त्यातून कोणते कायदे करुन घेतलेत याचे काही डिटेल्स द्याल का प्लीज?

तारीख वार सकट आणि कायद्याच्या नोटीफिकेशन्स सकट दिलेत तर उत्तम.

सुक्या's picture

29 Aug 2021 - 12:08 am | सुक्या

खिक्क !!!

त्यांचं नोटबंदी विरोधी आंदोलन चालू आहे आजून.

निनाद's picture

30 Aug 2021 - 4:27 am | निनाद

केंद्र सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर - म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार जाहिरनाम्यात दिलेली आश्वासने पाळत असेल तर ते चुकीचे असते का?

प्रा.डॉ. अचानक जागे झाले आहेत याचा अर्थ युनियन आणि त्यांचे बोलविते धनी कम्युनिस्ट पक्ष यांचा - आता कामाला लागा - असा आदेश आलेला दिसतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Aug 2021 - 8:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मन की बाते : च्यायला, ज्या सरकारच्या धोरणांमुळे शिक्षण मिळाले, नोक-या मिळाल्या आयुष्य स्थिरास्थावर झालं त्या सरकारच्या ऋणात राहण्याऐवजी बाकी काहीही होवो, सद्य सरकारच्या पालख्या उचला असा आदेश संघम दक्षम कडून आलेला दिसतो...!

-दिलीप बिरुटे

हा सफेद विनोद म्हणायचा की ब्ल्याक ह्युमर ?
अण्णा हजारे एक स्प्रिंग्बोर्ड आहेत. त्यावर पाय देउन उसळी मारुन आपल्याला पाहिजे तिथे जाता येतं !

किती नावं सांगु?

गॉडजिला's picture

28 Aug 2021 - 9:26 pm | गॉडजिला

जनतेने आवाज उठवून सरकार बदलन्याची ताकदउभी केली पाहिजे

महान विचार म्हंटले पाहिजेत कारणं अजूनही त्यांचे आंदोलने नुसती सरकार बदलायला वापरली जातात हे दुर्लक्षित होतेय...

आंदोलन सरकारला बदलायला न्हवे बेजबाबदारपणा सोडायला करायला हवीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2021 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> कारणं अजूनही त्यांचे आंदोलने नुसती सरकार बदलायला वापरली जातात.

कॉंग्रेसरकारविरुद्ध दिल्लीत केलेल्या एका मोठ्या आंदोलनामुळे भाजपा सरकारला फायदा झाला, त्या आंदोलनाने देशभर काँग्रेसरविरुद्ध जनतेमधे एक जनमत निर्माण करायला एक वातावरण मदत झाली होती. बाकी, आता अण्णांनी सद्य सरकारविरुद्ध कितीही शंखानाद केला तरी अण्णांनी काही ना काही कारणांमुळे (सेटींग) माघार घेतली. जसे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नेमून त्यामार्फत सहा महिन्यांत निर्णय घ्यावा म्हणून जानेवारीत २०२१ आंदोलनाची हाक दिली होती. केंद्रसरकारने त्यांच्या मागण्यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते, त्याबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच लोकपाल, लोकायुक्त आणि निवडणूक सुधारणा या मागण्यांवरही त्यांना केंद्रसरकारने आश्वासने दिली होती आणि त्यांच्या आंदोलनाची हवा काढून घेतली. कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्यातूनही ते हलकेच बाहेर पडले. आता अण्णा एकटे पडले आहेत. आंदोलन करायला सर्वाअर्थाने बळ कमी पडत आहे. कार्यकर्ते, पक्षीय समर्थन, नियोजन आणि घेतली जाणारी दखल याहीबाबतीत अण्णा मागे पडले आहेत. म्हणून अण्णा म्हणतात मी एकटा काय करु. जनतेने पुढे यावे.

अण्णांच्या विविध जनआंदोलनाचा सरकारवर जेव्हा प्रभाव पडत होता तेव्हा तेव्हा आंदोलनाच्या माध्यमातून विविध कायदे मंजूर करुन घेतले. माहितीचा अधिकार आंदोलनामुळे माहिती अधिकार कायदा लागू झाला. २००५, भारतीय संसदेतही हा कायदा पुढे अस्तिवात आला. लोकपाल विधेयक आंदोलन तर देशभर गाजले. अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव होता, आता तो प्रभाव उरला नाही.

>>> आंदोलन सरकारला बदलायला न्हवे बेजबाबदारपणा सोडायला करायला हवीत.

आपापली प्रत्येकाची मतं असतात, पटायला पाहिजेत असे काही नाही. परंतु जनतेची जवाबदारी केवळ मतदान करुन संपत नाही. तर, सरकारवर जनतेचा विविध आंदोलनाच्या माध्यमातून एक जनरेटा असला पाहिजेत, नाही तर निगरगट्ट सरकार केवळ बहुमत आहे, म्हणून वाट्टेल तसा कारभार करते हे अण्णांचे मत पटायला लागते. सरकारच्या बेजवाबदार विरोधात विरोधी पक्षांनी संसदेतले कामकाज बंद पाडले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही, असे दिसते. सरकारच्या बेजवाबदार वर्तनाबद्दल जनतेमधे तीव्र भावना असतात. सरकार बदलायला केवळ मतदानावर अवलंबून न राहता सरकारने जनतेच्या भावनेचा विचार केला पाहिजे, यासाठी लक्ष वेधून घेतले पाहिजे. सद्य महागाईकडे जसे सरकार दुर्लक्ष करुन अगा काहीच घडलेच नाही असे दाखवत आहे. अशावेळी सरकारच्या बेजवाबदारपणाबद्दल जाब विचारला पाहिएज.

जाता जाता : कालच एका कार्यक्रमात '' एकाधिकारवादी सरकारे सतत असत्यावर अवलंबून असतात असे भाष्य करीत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड म्हणाले की'' सरकारी संस्था मजबूत करण्यासाठी सरकारला प्रश्न विचारणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, सत्तेशी सत्य बोलण्याचे धाडस नागरिकांनी दाखवले पाहिजे. हे काम केवळ बुद्धीवंतांचेच नव्हे तर, महिला, दलित, वंचित यांनीही सत्तेला जाब विचारले पाहिजे.

-दिलीप बिरुटे

रात्रीचे चांदणे's picture

29 Aug 2021 - 10:47 am | रात्रीचे चांदणे

अण्णांच वय अत्ता ८४ आहे, ह्या वयात अण्णां कडून आंदोलनाची अपेक्षा करणं चुकीचं वाटतंय. सध्या ते आंदोलन करत नाहीत ह्याचा अर्थ त्यांनी सरकार बरोबर सेटींग केली आहे हा निष्कर्ष पण योग्य वाटत नाही.
केंद्रसरकार जर खरोखरच चुकीचं वागत असेल तर जनता आज ना उद्या जागी होईलच, कदाचित मोठी आंदोलन होणार नाहीत परंतु मतदानाद्वारे व्यक्त होईल. इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता पहिल्यांदाच बऱ्यापैकी कमी झालेली दिसत आहे. करोना च्या दुसऱ्या लाटेची हाताळणी, वाढलेले पेट्रोल चे भाव ह्या मुळे लोक नाराज आहेत, पण जर २०२४ ला परत मोदी सरकारच जिंकले तर मात्र EVM, जाहिरतबाजी मुळेच जिंकलं ह्याला काहीही अर्थ नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Aug 2021 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सद्य सरकार काही अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेलं नाही. महागाई, बेकारी, रोजगार आणि इतर प्रश्नांच्या संदर्भात आणि गेल्या पंधरावर्षात भाजपा सरकारांनी काय केले हे समजायला भारतीय जनतेला अजून काही वेळ लागू शकेल. कधी तरी हे सरकार अल्पमतात येऊ शकते, इतर पक्षांच्या कुबड्या लागू शकतात ही भारतीय लोकशाही राजकारणाची जगरहाटी आहे, इव्हीएम वगैरे या सर्व बोलायच्या गोश्टी आहेत. जनता हेच सर्वात मोठं इव्हीएम आहे. आत्ता तर कुठे लोकांनी सरकारविरुद्ध बोलायला हळुहळु सुरुवात केली आहे. पंडित नेहरुंनी काय केलं आणि काँग्रेस आणि इतर पक्षांनी काय केलं हे सांगून त्यांच्यावर टीका करुन फार काळ पोट भरणार नाही. कधी तरी आपल्या कामावरही बोलावे लागेल.

व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांचं व्यंगचित्र बोलकं आहे.

-दिलीप बिरुटे

जॅक द रिपर's picture

30 Aug 2021 - 1:34 am | जॅक द रिपर

गेल्या १५ वर्षात भाजपा सरकार होते?
२००६ पासून?
मनमोहन सिंग भाजपाचे पंतप्रधान होते का?

इंडिया टुडे च्या सर्वेक्षणात मोदींची लोकप्रियता पहिल्यांदाच बऱ्यापैकी कमी झालेली दिसत आहे. ....................हा हा हा.हा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हा...

हे लोक विश्वासार्ह कधीपासून झाले ? इतके की त्यांचे मत कोट केले जाते ?

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2021 - 8:36 am | श्रीगुरुजी

राष्ट्रवादी व भाजप यांच्यातील डील फायनल झालं असावं.

https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/home-minister-anil-...

कॉमी's picture

29 Aug 2021 - 9:09 am | कॉमी

मग आता ?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

29 Aug 2021 - 9:40 am | रावसाहेब चिंगभूतकर

किंवा गृहखात्या अंतर्गत असणारी काही गुपिते देशमुखांनी केंद्र सरकारच्या हवाली केली असावीत. कदाचित शिवसेनेच्या मुळावर येणारी गुपिते.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2021 - 9:47 am | श्रीगुरुजी

ही बातमी खरी असेल तर आता काही दिवसातच आपले लाडके कार्यसम्राट मा. श्री. रा. रा. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार. अजितदादा किंवा सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री असतील.

भाजपकडून नितेश राणे, कृपाशंकर सिंह, राधाकृष्ण विखे पाटील, पद्मसिंह पाटील, जयकुमार गोरे, हर्षवर्धन पाटील, शिंवेंद्रसिंह भोसले, चंपा, गिरीश महाजन, मधुकर पिचड, गोपीचंद पडळकर तर राष्ट्रवादीकडून नबाब मलिक, छगन भुजबळ, रोहीत पवार, अदिती तटकरे, विद्या चव्हाण, अमोल मिटकरी असे दिग्गज मंत्रीमंडळात असतील.

महाराष्ट्राचे भाग्यविधाता आदरणीय मा. श्री. रा. रा. शरदचंद्रजी पवारसाहेब मंत्रीमंडळाचे मेंटॉर कम पॅट्रन असतील व २०२२ मध्ये ते उपराष्ट्रपती पदावर विराजमान होतील.

कॉमी's picture

29 Aug 2021 - 11:42 am | कॉमी

भाजप समर्थकांची यावर प्रतिक्रिया काय असेल ?

जर असं झालं तर भाजप ने शेण खाल्लं असं नि:संदिग्धपणे म्हणता येइल.

राणे आणि कृपाशंकर ला पक्षात घेणं हा निर्णय सुद्धा मूर्खपणाचा होता हे मा वै म.

आणि तरीही अन्य राजकीय पक्ष भाजप पेक्षा घाणेरडे असल्यालाने मत नाइलाजाने भाजप लाच

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 1:50 pm | अमरेंद्र बाहुबली

जर असं झालं तर भाजप ने शेण खाल्लं असं नि:संदिग्धपणे म्हणता येइल. >>> पुन्हा एकदा शेण खाल्लं असं हव

चंद्रसूर्यकुमार's picture

29 Aug 2021 - 12:41 pm | चंद्रसूर्यकुमार

बरेचसे भाजप समर्थक त्या निर्णयाचा विरोध करतील, अगदी शिव्या घालतील हे इथे मिपावरही बघायला मिळेल.

गोरगरीबांच्या आणि समतेच्या नावावर लाखो लोकांना ठार मारून, देशोधडीला लावूनही परत 'ती आमची मुळातील आयडियोलॉजी नाहीच' असे म्हणणाऱ्या लोकांमध्ये असतो तो कोडगेपणा आमच्याकडे नाही. जे चूक असेल त्याला आम्ही चूकच म्हणतो.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

29 Aug 2021 - 1:14 pm | रावसाहेब चिंगभूतकर

भाजप समर्थक कोण असतील ते उत्तर देतीलच. पण वैतकटिकदृष्ट्या विचाराल तर कुठल्याही पक्षाचा समर्थक एका विशिष्ट मर्यादेअलिकडे मत सहसा बदलत नाही. पेट्रोल चे भाव प्रचंड वाढले, कुणी कुठला पक्ष जॉईन केला, कोण कुणाला काय म्हणाले, कोण कुणावर कसल्या केसेस दाखल केल्या आणि कोण कुणाशी कसली युती केली यावर ते ठरत नाही. माझ्या मते मतदारांची बांधिलकी पक्षाशी नसतेच मुळी. ती विचारांशी असते आणि त्या विचारानुसार कोणता पक्ष चालतो किंवा त्या विचारांशी सलगी दाखवतो यावर ते अवलंबून असते. शिवाय काही पूर्वसमजुती ही असतात. उदाहरणार्थ,
1. भाजप हा पूर्वी ब्राम्हण आणि शेटजींचा पक्ष म्हणून प्रसिद्ध होता. त्यांचे पाठबळ RSS कडून यायचे. ही समजूत अजूनही आहे आणि म्हणून आंबेडकरी जनतेचा या पक्षावर राग आहे. रामदास आठवले या पक्षाशी निगडित आहेत म्हणून फारसं काही बदलत नाही.
2. राष्ट्रवादी मराठा पक्षाशी संबंधित आहे. भुजबळ आणि तत्सम ओबीसी नेते असले तरी तो मराठ्यांचा म्हणून च ओळखला जातो.
अशा पूर्वसमजुती मुळे ब्राम्हण सर्वसाधारणपणे भाजप लाच मतदान करतात आणि जोपर्यंत भाजप मुसलमानांचे लांगुलचालन करत नाही तोपर्यंत ते मत फारसे बदलत नाही.
शिवसेनेने घोडचूक अशासाठी केली की त्यांनी पालघरचे साधू, "जनाब" बालासाहब ठाकरे अशा गोष्टींमधून आपल्या इमेज च्या 180 अंशामध्ये आपल्या प्रतिमेत बदल केला. शिवाय राष्ट्रवादी बद्दल भाजप मतदारांमध्ये राग असला तरी तो काँग्रेसवरच्या रागाइतका मोठा नाही. भ्रष्टाचार आणि मुस्लिम लांगुलचालन या मध्ये निदान भाजप चे कार्यकर्ते भ्रष्टाचार निवडतील असे वाटते. प्रत्येक छोट्या गोष्टींनी मतदार राजाचे मत फारसे बदलत नाही. कृपाशंकर सिंग असेल ही भ्रष्टाचारी, पण तो मतदारांसाठी कितपत मोठा मुद्दा ठरेल ते शंकास्पद आहे. माझ्या मते शिवसेनेच्या भाजप मतदारांना शिवसेनेबद्दल किती राग आहे आणि भाजपच्या शिवसेना मतदारांना भाजप बद्दल किती राग आहे यावर हे सगळं ठरेल.

प्रदीप's picture

29 Aug 2021 - 4:45 pm | प्रदीप

पटला.

बरे ते सारे राहूंद्यात.

कॉमी, आपण अनेक दिवस येथे दिसत नव्हतात, आता गेल्या आठवड्यांत ऑपेर्‍याचा धागा काढलात तेव्हा जरा बरे वाटले. आपल्या प्रोफाईलमधे आपण केरळांत रहाता असे लिहीली आहे, तेव्हा जरा धाकधूक वाटत होती.

तर, केरळ्मधे अजून कोव्हिडचे जोरदार थैमान का सुरू आहे, ह्याविषयी काही माहिती? आणि त्या जगप्रसिद्ध केरळ- कोव्हिड 'मॉडेल' चे काय झाले, त्याविषयीही तुमची माहिती, शक्य झाल्यास द्यावी.

व काळजी घ्यावी.

कॉमी's picture

29 Aug 2021 - 5:41 pm | कॉमी

धन्यवाद.
नाही हो, मी काय केरळात राहत नाही. याआधी पत्ता बेगुसराई असा दिला होता :)
बरेच दिवस बातम्या वाचणे वैगेरे पूर्ण बंद आहे, केरळ बद्दल पण. तरी एकदा बघतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 1:13 pm | अमरेंद्र बाहुबली

कदाचित पवार साहेब पुढील राष्ट्रपती ही असू शकतात. शेवटी मोदींचे गुरू आहेत ते.

वाट बघाच !. २०२२ मधे कोणी दुसरीच व्यक्ती राष्ट्रपती होईल. साहेब परत पुढच्या निवडणुकीची वाट बघत राहतील.
सध्या त्यांना मधाचं बोट दाखवलं जातंय . काम झाल्यावर तोंडघशी पाडलं जाइल.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 12:39 pm | अमरेंद्र बाहुबली

अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी सरळ सत्ता पालट होईल ही शक्यता नाही वाटत. काहीतरी "घेऊन" "सेटलमेंट" केली असावी.
सत्ते साठी तसही पवार साहेब नाहीतर ठाकरे साहेबांचे पाय भाजपला धरावेच लागणार आहेत. पाहू कुणाचे धरतात :)

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 2:51 pm | अमरेंद्र बाहुबली

मोदींनी आपले गुरू पवार साहेबाना पुढील राष्ट्रपती बनवावे. आपल्याला बोट धरून राजकारणात आणनार्या पवार साहेबांचे कर्ज फेडण्याची संधी आहे मोदींना. पवार साहेबांच्या बुध्दीमत्तेचा फायदा देशाला करून घेता येईळ तयेच मोदी आपल्या गुरूंबद्दल किती संवोदनशील आहे हा संदेश देखील जनतेत जाईल.

अमरेंद्र बाहुबली's picture

29 Aug 2021 - 6:58 pm | अमरेंद्र बाहुबली

*संजय राऊत यांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणे यांचा इशारा*
https://pudhari.news/latest/29203/संजय-राऊत-यांचा-करेक्ट-कार्यक्रम-करू-निलेश-राणे-यांचा-इशारा/ar

सूंभ जळाला तरी पीळ जाईना.