चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ४)

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
24 Aug 2021 - 11:13 am
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

25 Aug 2021 - 12:25 pm | Rajesh188

पण आम्ही तुमच्याकडे पूर्ण लक्ष देणार.सर्वांचे विचार ऐकले पाहिजेत पटत नसतील तरी ,हीच लोकशाही ची शिकवण आहे.
आम्ही लोकशाही वादी आहोत हुकूमशाही समर्थक नाही
त्या मुळे कोणाकडे दुर्लक्ष करणार नाही .सर्वांच्या मताचा आदर करणार.

Rajesh188's picture

25 Aug 2021 - 12:25 pm | Rajesh188

पण आम्ही तुमच्याकडे पूर्ण लक्ष देणार.सर्वांचे विचार ऐकले पाहिजेत पटत नसतील तरी ,हीच लोकशाही ची शिकवण आहे.
आम्ही लोकशाही वादी आहोत हुकूमशाही समर्थक नाही
त्या मुळे कोणाकडे दुर्लक्ष करणार नाही .सर्वांच्या मताचा आदर करणार.

Rajesh188's picture

25 Aug 2021 - 12:19 pm | Rajesh188

मुद्धा असा लगेच BJP समर्थक लोकांना कळत नाही म्हणून अमरेंद्र ह्यांनी पाच सहा उदाहरणे दिली आहेत.
अजुन लक्षात येत नसेल तर अजुन पाच पन्नास उदाहरणे मी देतो.
शहाणे करून सोडावे सर्व जग.
असे संत सांगून च गेले आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

25 Aug 2021 - 12:39 pm | रावसाहेब चिंगभूतकर

शहाणे करून सोडावे सर्व जग.

गुरुवर्य, मी आपल्या पोस्ट ला कधी रिप्लाय देत नाही. परंतु हसू आवरेना म्हणून लिहितोय. जसे म्युन्सीपालटी चे लोक भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करतात, तद्वत लोकांना पकडून त्यांना "शहाणपणाचा" डोस द्यावा अशी जर आपली कल्पना असेल तर मला हे सांगायला दुःख होते की आपली कल्पना चुकीची आहे.

क्रॉसवर्डने दिल्ली दंगलीवरील गरुड प्रकाशनाचे पुस्तक काढण्यास नकार दिला आहे. कुप्रसिद्ध नक्षल समर्थक नलिनी सुंदर यांनी दिल्ली दंगलींवरील तथ्यांवर आधारित लिहिलेया गेलेल्या पुस्तकाला विरोध केला आहे. सीएए विरोधी आंदोलनांच्या नावाखाली दिल्लीतील दंगलीत हिंदूंवर जे अनेक भयंकर हल्ले झाले त्याचे सत्यचित्रण मांडणारे हे पुस्तक आहे. सुप्रीम कोर्टाच्या वकील मोनिका अरोरा यांनी लिहिलेले हे पुस्तक गरुड प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. दिल्ली दंगलीची तथ्ये समोर आणू नयेत यासाठी या लॉबीने प्रचंड प्रयत्ने केले आहेत.

आग्या१९९०'s picture

25 Aug 2021 - 12:42 pm | आग्या१९९०

इंधनावरील कर कमी करणार नाही - अर्थमंत्री
१.३ लाख कोटींच्या UPA ने काढलेल्या ऑईल बाँडचे व्याज भरण्यासाठी भाजप सरकारने पेट्रोलजन्य उत्पादनांवर २०२० - २१ मध्ये केवळ एक्साईज ड्युटीमधून ३.४५ लाख कोटींचा महसूल मिळवला. इतर टॅक्स मधून मिळालेला महसूल वेगळा.
भाजपा सरकारने बँकांच्या recapitalisation साठी ३.४ लाख कोटींचे PSB BOND काढले जे २०२८ नंतर मॅच्युअर होतील , ते पुढील सरकार २०३५ पर्यंत फेडेल .
ऑईल बाँड - १.३ लाख कोटी
PSB bond - ३.१ लाख कोटी.
दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 1:54 pm | अमरेंद्र बाहुबली

लूट चालवलीय केंद्राने ईंधनांच्या नावाखाली

आग्या१९९०'s picture

25 Aug 2021 - 2:01 pm | आग्या१९९०

ह्याला लूट नाही म्हणता येणार,कारण पैसे सरकारी तिजोरीत जमा होत आहेत. परंतू इंधन कर कमी न करण्यासाठी जे कारण सांगितले जाते तो खोटारडेपणा आहे. अर्थमंत्र्यांना शोभत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 2:08 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
शिक्षणाच्या नावाने ठणठण असलेल्या ह्या केंद्रातल्या लोकांकडून अजून काय अपेक्षा करनार??
ह्या वर्षी स्विस बॅंकेत सगळ्यात जास्त पैसे जमा झाले. काय योगायोग.

आग्या१९९०'s picture

25 Aug 2021 - 11:38 pm | आग्या१९९०

स्विस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा गेल्या सात वर्षात आणू शकले नाही हे जुमलेवाले. ह्या लोकांना खोटंही नीट बोलता येत नाही.

रात्रीचे चांदणे's picture

25 Aug 2021 - 1:00 pm | रात्रीचे चांदणे

राणेंचा कोथळा बाहेर काढू अशी सेनेच्या आमदाराची नारायण राणेंना धमकी. कानाखाली दिली असती पेक्षा कोथळा बाहेर काढू हा फार मोठा गुन्हा समजला गेला पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी कालच्या सारखीच कडक कारवाई करायला पाहिजे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/shiv-sena-mla-santosh-bangars-...

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 1:32 pm | रामदास२९

@रात्रीचे चांदणे
नाही हो.. हे चालत.. महाविकास आघाडी ने काहीही केल तरी चालत.. कारण बन्द खोलीत ल्या आश्वासनाच्या कान्गाव्यामुळे महाराष्ट्र भोगत रहाणार ..

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 1:53 pm | अमरेंद्र बाहुबली

ते माननीय मुख्यमंत्री आणी सेनाप्रमुख होते. राणे आणी त्यांची बरोबरी होईल का?? गल्लीतल्या दादाभाईत आणी मुख्यमंत्र्ता काही फरक आहे की नाही??

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 2:37 pm | गॉडजिला

माजी मुख्यमंत्री कोणीही बनू शकतो हो

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 2:48 pm | गॉडजिला

दोघांनाही एकाच व्यक्तीची पुण्याई कामी आली त्यामूळे... लगेच

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 2:53 pm | श्रीगुरुजी

अत्यंत फालतू कारणासाठी राणेला अटक करून सेनेने नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा आपलं तोंड काळं करून घेतलंय. राष्ट्रवादीने उठांना उचकवून राणेला अटक करायला लावली कारण भाजप व सेना यांच्यात कधीही भरून न येणारी दरी निर्माण होऊन वाढावी हीच राष्ट्रवादीची योजना आहे. हे दोघे परत कधीही युती करणार नाहीत ही खात्री झाली की राष्ट्रवादी पाठिंबा काढून मुदतपूर्व निवडणुक घ्यायला लावेल ज्यात राष्ट्रवादी+कॉंग्रेस वि. भाजप वि. सेना अशी तिरंगी लढत होऊन राष्ट्रवादी-कॉंग्रेस युतीचे सरकार स्थापन होईल.

सेनेची ही शेवटची इनिंग आहे. जर भाजपने सेनेशी पुन्हा युती करण्याचा गाढवपणा केला नाही तर पुढील निवडणुकीपासून मनसेप्रमाणेच सेना सुद्धा नगण्य होईल. अर्थात फडणवीसांच्या लाचारीला कोणतीही सीमा नसल्याने भाजप सेनेला युतीचा प्रस्ताव देणारच नाही असे १० टक्के खात्रीने म्हणता येणार नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 3:16 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ सहमत
पण शिवसेना नगण्य होईल ह्याच्याशी असहमत. शिवसेना पक्ष एकटा लढला तरी कोल्हापुर,ठाणे, मुंबई आणी अनेक ठिकाणी प्रबळ आहे. सेनै कसंही ३५- ४० जागा सहज जिंकू शकते. राष्ट्रवादी आणी काॅंग्रेस आघाडी करून लढले आणी सेना, भाजपा वेगळे लढले तरी सेना कमात कमी ३५~ ४० नी भाजप जास्तीत जास्त ६० जागा जिंकतील.
२०१९ वेळी मी वर्तवलेला भाजप ११० च्यावर जानार नाही हा अंदाज बरोबर आला होता.

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 3:21 pm | रामदास२९

खरय.. अपक्ष १०० आणि रा.का - ४०, कोन्ग्रेस -४० ..

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 3:19 pm | रामदास२९

खर .. पण २०१९ साली सेनेशी पुन्हा युती करणे हा सम्पूर्ण भाजपा चा चुकीचा निर्णय होता.. एकट्या फडणवीसान्चा नाही.. तुम्हाला फडणवीसान्चा फारच राग आहे.. :)

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 3:22 pm | अमरेंद्र बाहुबली

फडणवीसांच्या चुकीच्या निर्णयानेच भाजपची वाट लावलीय. फडणवीसांवर अनेकांचा राग आहे.
आज भाजपला पुन्हा राज्यात चांगले दिवस पहायचे असताल तर फडणवीसना हटवून गडकरीना मुख्यमंत्रीपद देऊन सेनेची अनुमती मिळवायला हवी (त्या साठी सेनेला १/२ वर्षे मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल) हे झालं नाही तर भाजप कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्य गमावेल.

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 3:56 pm | रामदास२९

वाट्टेल ते.. सत्ता नाही आली तरी चालेल.. पण आता कोणाबरोबर ही युती नको

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 3:37 pm | श्रीगुरुजी

मोदी-शहांनी महाराष्ट्रात फडणवीसांना मुक्तहस्त दिला आहे. ते म्हणतील ती पूर्वदिशा अशी परिस्थिती आहे. युती करण्यासाठी फडणवीसच अत्यंत कासावीस झाले होते व वारंवार मातोश्रीवर चकरा मारून व सेनेच्या सर्व अटी मान्य करून त्यांनीच उठांना युतीसाठी राजी केले होते. शहा फक्त अगदी शेवटी मम म्हणायला आले होते.

अजूनही तीच परिस्थिती आहे. फडणवीस सांगतील त्यालाच महाराष्ट्रात विधानपरीषद किंवा राज्यसभेची उमेदवारी दिली जाते. उदयन भोसलेंना पक्षात घ्यावे व निवडणुकीतील पराभवानंतर राज्यसभेत घ्यावे यासाठी फडणवीसांनीच दिल्ली दौरा केला होता. वंजारी समाजातील मुंडे भगिनींना डावलून त्याच समाजातील रमेश कराड, भागवत कराड पुढे आणले गेले ते फडणवीसांच्याच आग्रहाने. संभाजी भोसले, कृपाशंकर, पद्मसिंह पाटील वगैरेंना भाजपत आणण्याचा आग्रह फडणवीसांचाच होता.

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 3:55 pm | रामदास२९

बरोबर आहे.. काही प्रमाणात सहमत .. पण चूका सगळ्यान्च्याच होतात.. शिवसेनेला भाजपाने क्षमतेपेक्षा जास्त किम्मत दिलि हि एकट्या फडणविसान्ची चूक नाही

प्रदीप's picture

25 Aug 2021 - 8:12 pm | प्रदीप

इथे ह्या लेखकाने काही तथ्ये दिली आहेत.

#प्रदेशाध्यक्ष बदलताय....????

राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांपैकी पश्चिम महाराष्ट्राच्या पट्टयात ७० जागा येतात.. हा संपूर्ण भाग उद्योग, सहकार, शिक्षण आणि राजकारणात अग्रेसर असल्याने राज्याच्या राजकारणाची दिशा याच भागातून ठरते.. या ७० जागांवरील निकालच राज्यातील सत्तेचे परिमाण निश्चित करत आलाय..

ज्याला राज्यातील सत्ता हवी आहे त्याला राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या या भागात राजकीय यश मिळणे क्रमप्राप्त आहे.. हा भाग ज्याच्या पाठीशी राहिल तो मुंबईत सरकार चालवेल एवढं साधं, सोप्प आणि सरळ समीकरण आहे..

२०१९ विधानसभा निवडणुकीत या भागात नेमके काय चित्र होते याचे माझ्या परीने थोडक्यात केलेले विश्लेषण खालीलप्रमाणे :

पुणे जिल्हा = १०
राष्ट्रवादी - ७
काँग्रेस - २
शिवसेना - ०
भाजपा - १

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर = ११
राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - ०
शिवसेना - ०
भाजपा - ८

नगर = १२
राष्ट्रवादी - ६
काँग्रेस - २
शिवसेना - ०
भाजपा - ३
अपक्ष - १

सोलापूर = ११
राष्ट्रवादी - ४
काँग्रेस - १
शिवसेना - १
भाजपा - ५

सातारा = ८
राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - १
शिवसेना - २
भाजपा - २

कोल्हापूर = १०
राष्ट्रवादी - २
काँग्रेस - ४
शिवसेना - १
भाजपा - ०
जनसुराज्य - १
अपक्ष - २

सांगली = ८
राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - २
शिवसेना - १
भाजपा - २

एकूण जागा = ७०
भाजपा = २१

या भागात एकूण ७० जागा आहेत.. पैकी भाजपाने २१ जागा जिंकल्या आहेत..

या ७० जागां मध्ये फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांत ११ जागा आहेत आणि त्यापैकी भाजपा कडे ८ जागा आहेत..

ही दोन शहर वगळता इतर ५ जिल्हे आणि पुणे जिल्ह्याचा उर्वरित ग्रामीण भाग यात ५९ जागा आहेत.. यापैकी भाजपाकडे १३ जागा आहेत..
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड सोडून पुण्याचा उर्वरित ग्रामीण भाग आणि ५ जिल्ह्यात मिळून ५९ पैकी तब्बल २५ जागा आहेत..

पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे पुर्ण जिल्हे यात राष्ट्रवादीची ताकद भाजपाच्या जवळपास दुप्पट आहे..
शिवाय गेल्या वर्षभरात याच पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीने चारी मुंड्या चित केलेले आहे..

सांगली मनपात भाजपाचे बहुमत असून राष्ट्रवादीने आपला महापौर करून पुन्हा भाजपाला धोबीपछाड दिलेला आहे..

एकूणच पश्चिम महाराष्ट्राला भाजपा पक्षीय पातळीवरून कोणी जास्त गांभीर्याने घेत नाही असेच चित्र वारंवार दिसत आहे..

भविष्यात विधानसभा निवडणुकीत या पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकल्या तरच भाजपाला राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करने सोप्पे जाणार आहे.. आज भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा ऐकली आणि त्यासाठीच हा लेखन प्रपंच करावा लागला..

भाजपाने आत्ताचे प्रदेशाध्यक्ष बदलायचेच असतील तर जे कोणी नवे प्रदेशाध्यक्ष येतील ते नियोजनबद्ध रित्या पश्चिम महाराष्ट्रात विशेष लक्ष घालणारे असावेत.. इथल्या मातीतल्या राजकारणाची पक्की नस निदान थोडीफार तरी माहिती असणारे,रणनीति आखण्यात माहिर, राजकीय डावपेचात तरबेज असेच असावेत एवढी माफक अपेक्षा आहे..

- मयूर कुपाडे

ह्यावरून असे दिसते की महाराष्ट्रात, स्वतःहून निवडून येण्याची भाजपाची शक्तिच नाही. तेव्हा पुढल्या निवडणूकीत किंवा तदनंतर, त्यांना जर शिवसेनेला दूर ठेवायचे असेल, तर राष्ट्रवादीशी तडजोड करावी लागेल. अन्यथा, आताप्रमाणेच बाहेर राहून कुल्ले आपटत बसावे लागेल.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 8:54 pm | श्रीगुरुजी

पश्चिम महाराष्ट्रात ७० जागा आहेत, तशाच विदर्भात ६२ जागा आहेत. २०१४ मध्ये विदर्भात भाजपने एकट्याने ४४ जागा जिंकल्या होत्या व महाराष्ट्रात एकूण १२३ जागा जिंकल्या होत्या.

भाजपने २०१८-२०१९ मध्ये अनेक चुका केल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मोदींची लोकप्रियता शिखरावर पोहोचली असूनही महाराष्ट्रात भाजपची मते घटली कारण फडणवीसांनी फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी अनेक चुकीचे निर्णय घेऊन पक्षाचे व स्वत:चेही नुकसान केले.

भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर नक्कीच बहुमत मिळू शकते. परंतु त्यासाठी नेतृत्वबदल करणे आवश्यक आहे. अनेक अत्यंत नालायक आयाराम पक्षात आणणे, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांना पाठीशी घालणे यामुळे कट्टर भाजप समर्थक नाराज आहेत. प्रगत मराठ्यांना लबाडी करून मागास ठरवून राखीव जागा देऊन ब्राह्मणांवर अन्याय केल्यामुळे ब्राह्मण नाराज आहेत, सर्व इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविल्यामुळे इतर मागासवर्गीय मते विरोधात गेली आहेत. फडणवीसांची कारस्थाने अजूनही सुरू आहेत. जोपर्यंत फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत व त्यांचे शेपूट चंपा महाराष्ट्र भाजप अध्यक्ष आहे, तोपर्यंत महाराष्ट्रात भाजपची घसरण थांबणार नाही. अर्थात या जोडीने भाजपचे इतके नुकसान केले आहे की या दोघांना हटवून सुद्धा भाजपला गेलेली मते परत आणण्यासाठी किमान दोन निवडणुका लागतील.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 9:31 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
ज्या व्यक्तिला स्वतचा मतदारसंघ नाही. आपल्या जिल्ह्यातून जो माणूस एक आमदार निवडून आणू शकत नाही. असा व्यक्ति फडणवीसानी आपल्या सोयी साठी प्रदेशाध्यक्ष ठेवलाय.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 9:46 pm | श्रीगुरुजी

जयकुमार गोरे, विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, बबन पाचपुते, संभाजी भोसले, उदयन भोसले, शिवेंद्रसिंह भोसले असे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बलदंड नेते भाजपने पक्षात आणूनही भाजपला २०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रात फारसे यश मिळाले नाही. याउलट हे नेते २०१४ मध्ये पक्षात नसूनही त्या निवडणुकीत भाजपला जास्त यश मिळाले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे.

आनन्दा's picture

25 Aug 2021 - 3:19 pm | आनन्दा

बाकी माहीत नाही.
पण भाजप सेनेची युती झाली तर पुढच्या निवडणुकीत भाजपचे अस्तित्व पण नगण्य होईल
नपेक्षा ते लारजेस्ट पार्टी नक्की बनू शकतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 3:25 pm | अमरेंद्र बाहुबली

शिवसेनेशी किंवा राष्ट्रवादी कुणाशीही युती केली तर भाजप समर्थकाना कुठे तोंड दाखवायला जागा राहनार नाही. भाजप पक्ष वाईट फसलाय.
माझ्या मते पुढील निवडणूक सेनेने राष्ट्रवादी आणी काॅंग्रेस बरोबर लढवावी आणी राज्यातून भाजपचा संपुर्ण नाश करून मग सेनेने विरोधी पक्षात बसावे. पुढे फक्त सेनाच राज्यात विरोधी पक्ष म्हणून ऊरेल.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 3:38 pm | श्रीगुरुजी

भाजप सेनेची युती झाली तर पुढच्या निवडणुकीत भाजपचे अस्तित्व पण नगण्य होईल

सहमत

Bjp नी सेने शी युती केली नाही तर bjp किती जागा जिंकू शकते.
महाराष्ट्रात कोण कोणत्या पक्षाचे मतदार आहेत हे जरा क्लिष्ट गणित आहे.
इथे जातीवर आधारित सरळ विभाजन होत नाही.जसे यूपी ,बिहार मध्ये होते.
हिंदू ,मुस्लिम असे धार्मिक विभाजन जरी झाले तरी पूर्ण हिंदू हे bjp ल मतदान करत नाहीत.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी,काँग्रेस ह्यांचे पारंपरिक मतदार आहेत.
ते धार्मिक आधारावर फुटत नाहीत.
Bjp विकास च्या नावावर मत मागू शकतं नाही कारण त्याचा जन्म ह्यांच्या राज्यात झालाच नाही.
फक्त धार्मिक आधारावर त्यांना मतदान होईल.
Bjp कडे स्व कर्तृत्वाने निवडून येतील अशा व्यक्ती नाहीत .
Bjp ची पण काही कमजोरी आहे.
त्या साठी सेने शी युती करावी असाच दबाव केंद्रीय नेतृत्व कडून असेल.
खाचखोचा त्यांना चांगल्या माहीत आहेत.
भावनिक विचार न. करता प्रॅक्टिकल विचार राजकीय पक्ष करतात.
कार्यकर्ते भावनिक विचार करत असतात.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 4:31 pm | अमरेंद्र बाहुबली

नवा धागा काढायची वेळ आलीय.

Rajesh188's picture

25 Aug 2021 - 10:06 pm | Rajesh188

Ram मंदिर,बाबरी मशीद ह्याचा भावनिक फायदा घेवून निवडणूक जिंकली म्हणजे तो फॉर्म्युला नेहमी चालत नाही.
राज ठाकरे नी सुद्धा 13 आमदार निवडून आणले होते .खूप मोठे यश होते.
भावनिक प्रश्न तात्पुरते असतात .
कायम स्वरुपी विजय हवा असेल तर तळागाळात काम पाहिजे.
आर्थिक संस्था उभ्या केल्या पाहिजेत. infrastructure उभे केले पाहिजे.
लोकांच्या जीवनात बदल दिसून येईल असे काम पाहिजे.
Bjp फक्त भावनिक प्रश्न उभे करत आहे काम काहीच नाही.
ह्या पक्षाला भवितव्य नाही.
काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होती त्यांची काम आहेत.
असंख्य एज्युकेशनल संस्था,असंख्य बँका,कारखाने,धरण,दूध उत्पादन संस्था त्यांनी गावातून उभ्या केल्या .
लोकांच्या आयुष्यात बदल घडवून दाखवला .
असे काही bjp नी केले नाही.
भविष्य अंधारमय आहे त्यांचे.

Rajesh188's picture

25 Aug 2021 - 10:07 pm | Rajesh188

Ram मंदिर,बाबरी मशीद ह्याचा भावनिक फायदा घेवून निवडणूक जिंकली म्हणजे तो फॉर्म्युला नेहमी चालत नाही.
राज ठाकरे नी सुद्धा 13 आमदार निवडून आणले होते .खूप मोठे यश होते.
भावनिक प्रश्न तात्पुरते असतात .
कायम स्वरुपी विजय हवा असेल तर तळागाळात काम पाहिजे.
आर्थिक संस्था उभ्या केल्या पाहिजेत. infrastructure उभे केले पाहिजे.
लोकांच्या जीवनात बदल दिसून येईल असे काम पाहिजे.
Bjp फक्त भावनिक प्रश्न उभे करत आहे काम काहीच नाही.
ह्या पक्षाला भवितव्य नाही.
काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होती त्यांची काम आहेत.
असंख्य एज्युकेशनल संस्था,असंख्य बँका,कारखाने,धरण,दूध उत्पादन संस्था त्यांनी गावातून उभ्या केल्या .
लोकांच्या आयुष्यात बदल घडवून दाखवला .
असे काही bjp नी केले नाही.
भविष्य अंधारमय आहे त्यांचे.

काँग्रेस इतके वर्ष सत्तेत होती त्यांची काम आहेत.
असंख्य एज्युकेशनल संस्था,असंख्य बँका,कारखाने,धरण,दूध उत्पादन संस्था त्यांनी गावातून उभ्या केल्या .

या संस्थांची सद्य परिस्थीती काय आहे ? महाराश्ट्र शिखर बन्केची परिथीती काय आहे ? या सगळ्या संस्था आपल्या पोत्तुंची सोय लावण्यासाठी उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यांनी पिळुन पिळुन खाल्ले आणी आता त्या गाळात गेल्या आहेत

हा भयंकर विनोद आहे .

एकुलता एक डॉन's picture

2 Sep 2021 - 6:54 pm | एकुलता एक डॉन