चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ४)

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
24 Aug 2021 - 11:13 am
गाभा: 

आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.

प्रतिक्रिया

ईशनिंदाच्या खोट्या आरोपामुळे सौदी अरेबियामध्ये २० महिने तुरुंगात घालवलेले हरीश बंगेरा भारतात परतले आहेत. उडुपी पोलिसांनी केलेल्या तपास असे उघडकीला आले की बनावट प्रोफाइलच्या मागे कर्नाटकातील मुदाबिद्री येथील अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ या दोन मुस्लिम व्यक्ती आहेत. त्यांनी काही वर्षांपुर्वी त्यांच्या नावाखाली एक फेसबुक प्रोफाईल तयार केले होते. आणि छायाचित्र ज्यावर मक्का येथे काबाच्या छायाचित्रासह एक पोस्ट प्रकाशित करण्यात आली. यामुळे हरीश बंगेरा यांना सौदी मध्ये ताब्यात घेण्यात आले व अटकेत टाकले गेले.

उडुपीच्या खासदार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या प्रयत्नाने बंगेरा परत आले आहेत. अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ यांना अटक झाली असली तरी कोर्टाने त्यांना २ दिवसात जामिनावर सोडून दिले आहे. हरीश बंगेरा जोपर्यंत त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही असे म्हणाले आहेत.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 11:36 am | रामदास२९

हरीश बंगेरा जोपर्यंत त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही असे म्हणाले आहेत.

भारत सरकारने लावून धरला पाहिजे नाहितर कोणीही काहिही करेल आणि तिकडे राहणार्यान्ना त्याचा त्रास होईल..

रात्रीचे चांदणे's picture

24 Aug 2021 - 12:21 pm | रात्रीचे चांदणे

भाजपाच्या नाशिक कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक. मुंबईही दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. सत्तेत आली तरी शिवसेनेची गुंडगिरी कमी झाली नाही. राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते, शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आवडो न आवडो त्या पदाचा मान ठेवायलाच पाहिजे. पोलिसांसमोर लोक दगडफेक करत आहेत, आणि पोलीस मात्र शांतपणे बघत आहेत. स्वतः च्या पक्षाची सत्ता असताना तरी कायद्यनुसार कारवाई करायला पाहिजे होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

म्हणजे भाजपचे नेते काहीही बोताल वक्तव्य करतील आणी त्यावर प्रतिक्रीया ऊमटली तर शिवसेना गुंड?? कशाला शिवसैनिकाना डिवचायचं??

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Aug 2021 - 12:42 pm | चंद्रसूर्यकुमार

राणेंचे वक्तव्य पूर्णपणे अनावश्यक होते. अमक्याला कानफाडीत मारायची, तमक्याला मारझोड करायची हीच शिवसेनेची मुळची संस्कृती आहे. राणे कुठेही असले तरी ३९ वर्षे शिवसेनेत असताना ते झालेले संस्कार कसे विसरणार?

तरीही या निमित्ताने उध्दव ठाकरेंना हे प्रकरण अधिक संयमितपणे आणि अधिक प्रगल्भपणे हाताळायची संधी आयती राणेंनी आणून दिली होती ती त्यांनी व्यर्थ दवडली असे दिसते. मोदी आणि ठाकरे यांच्यात कसली तुलना करायची असेल तर मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी एका राज्याचे मुख्यमंत्री होते तर उध्दव दुसर्‍या राज्याचे मुख्यमंत्री सध्या आहेत ही केवळ पदाची तुलना करता येऊ शकेल. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर किती घाणेरड्या शब्दात टीका झाली होती. गंदी नालीका किडा वगैरे त्यांना म्हटले गेले होते. मराठी साहित्यात मोठे योगदान असलेल्या एका विचारवंतांनी 'माझ्याकडे बंदूक असती तर मी पहिली गोळी नरेंद्र मोदींना मारली असती' असली मुक्ताफळे उधळली होती. तत्कालीन सुपर पंतप्रधान मोदींना 'मौत का सौदागर' म्हणाल्या होत्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. तरीही या सगळ्या घाणेरड्या टीकेकडे मोदींनी पूर्ण दुर्लक्ष केले होते. असल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस कारवाई सोडाच कधी एफ.आय.आर दाखल झाल्याचेही ऐकिवात नाही. कसे गुजरातमध्ये पाऊल ठेवता तेच बघतो असली भाषाही कधी असल्या लोकांविरोधात कधी मोदीच नाही तर त्यांच्या सहकार्‍यांनीही वापरलेली नव्हती. तर असल्या टीकेला मोदींनी भीकच घातली नाही.

अगदी तसे करायची नामी संधी राणेंनी उध्ववना न मागता दिली होती. पण अगदी प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट केलेच पाहिजे, सगळे महाराष्ट्राचा अपमान करायला टपले आहेत असल्या भ्रमात राहिलेले लोक असा विचार करू शकतील ही शक्यता अगदीच थोडी. कंगनासारखी फुटकळ अभिनेत्री काहीतरी बोलल्यानंतर लगेच महाराष्ट्राचा अपमान म्हणून चवताळून अंगावर जाणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून प्रगल्भतेची अपेक्षा कशी करायची?

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 12:57 pm | अमरेंद्र बाहुबली

सेना आणी भाजपात हाच तर फरक आहे. सेना स्वाभिमानी आहे , कूणी काहीही बोललेलं सेना सहण करत नाही. पण भाजपचं तसं नाही स्वाभिमान वगैरेंशी भाजपला काहीही घेणंदेणं नाही. सत्ता मिळत असेल तर भाजपला अपमान झालेलाही चालतो आणी सत्तेसाठी ते स्वाभिमान गहाण टाकायला ही तयार असतात. संघाला दहशतवादी म्हणणारे कृपाशंकर भाजपला चालले तसेच सावरकरांचा अपमान करनारे नितेश राणे ही, काश्मिरात महबूबा चालल्या.

सॅगी's picture

24 Aug 2021 - 1:07 pm | सॅगी

चांगला जोक होता...अजुन येऊ द्या :)

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली

ऊद्या जेव्हा सत्तेसाठी भाजप नेते सेना किंवा राष्ट्रवादीच्या पाया पडायला येतील तेव्हा तुम्हाला वाटनारा हा विनोद क्ती सत्य आहे ते कळेल. ;)

सॅगी's picture

24 Aug 2021 - 1:40 pm | सॅगी

शिवसेनेने स्वबळावरच सत्ता स्थापन केली आहे.... ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 1:46 pm | अमरेंद्र बाहुबली

जसं काही कर्नाटकात आणी मध्य प्रदेशात भाजपने हनवलंय तसं आमदार फोडूनच बनवलंय ;)

स्वाभीमान म्हणे... ;)

कर्नाटकात आणी मध्य प्रदेशात शिवसेना आली की त्यावर बोला... :)

Mufti बरोबर सत्ता मिळवण्यासाठी युती केली तेव्हाच स्वाभिमान बघितला.

आणि महाराष्ट्रात राजीनामे खिशात घेऊन सत्तेला चिकटलेल्या मुंगळयांचाही स्वाभीमान बघितला...

Mufti बरोबर सत्ता मिळवण्यासाठी युती केली तेव्हाच स्वाभिमान बघितला.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली

राज्यात ही सत्तेसाठी राष्ट्रवादीशी युती केली स्वाभिमान गहान टाकून.

सॅगी's picture

24 Aug 2021 - 2:09 pm | सॅगी

हाच आहे शिवसेनेचा "स्वाभिमान गहान" ... ;)

बादवे...काँग्रेसचे नाव टाकायचे विसरलात ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 2:11 pm | अमरेंद्र बाहुबली

पहाटे पहाटे, चोरून लपून ;)

सॅगी's picture

24 Aug 2021 - 2:14 pm | सॅगी

शिवाजी पार्क मध्ये जमिनीला डोकं लावण्याचे नाटक केले म्हणजे झाले असे थोडीच आहे ;)

सेना पूर्णपणे जाळ्यात अडकली.. स्वाभिमान कसला ?? राणेन्कडे दुर्लक्ष करून ..लोकान्च्या कामाकडे लक्ष द्या म्हणाव ..

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 3:27 pm | अमरेंद्र बाहुबली

अजून अनेक मंत्री आहेत भाजपकडे त्यानी अजून वक्तव्ये सेनेला असंच जाळ्यात अडकवावं.;)

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 5:04 pm | रामदास२९

हो.. सगळे मन्त्री लोकान्ची कामे करायलाच आहेत.. १०० कोटी गोळा करायला नाही...

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 5:29 pm | अमरेंद्र बाहुबली

ख्या ख्या ख्या. कोरोनानिधी कुठे गडप झाला?? हिशेब का देत नाहीत?? 100 कोटी वर बोलण्याआधी केंद्राकडे हिशेब मग कोरोनानिधी चा.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Aug 2021 - 6:22 pm | रावसाहेब चिंगभूतकर

फुकटची लस टोचून घेतलीत ना? ती त्या कोरोना निधी खर्च करूनच मिळवली होती.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 6:52 pm | अमरेंद्र बाहुबली

फूकट लस?? ख्या ख्या ख्या. पुर्ण बाराशे रूपयाला घेतलीय. हे काही काॅंग्रेस सरकार नाही फुकट लस द्यायला. पेट्रोल पंपावर बॅनर लावले म्हणजे लस फुकट होत नाही. पक्क व्यापारी सरकार आहे भाजपचं. बक्कळ कमावलेत लस विकून . फुकट लसीचे लिमीटेड स्लाॅट लगेच गायब होतात. पण विकत लस कितीही घ्या संपतच नाही.
आणी तसंही कोरोना निधीतून लस दिली असं कुठे लिहीलंय??? कोरोना निधीचा हिशेब कुठेय?? किती खर्च केले लसीसाठी?? सगळा कोरोना निधी गेला कुठे?? हिशेब का लपवला जातोय??

सॅगी's picture

24 Aug 2021 - 7:08 pm | सॅगी

हे काही काॅंग्रेस सरकार नाही फुकट लस द्यायला

महाविकार...आपलं ते...महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सरकारमध्ये नाही असे म्हणता??

ऐकावे ते नवलंच...

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Aug 2021 - 7:54 pm | रावसाहेब चिंगभूतकर

थोडक्यात, तुम्ही पेपर वाचत नाही. फुकट मिळणाऱ्या लसीचे तुम्ही 1200 रुपये का दिले आणि ते कुणाच्या खिशात गेले काय माहिती! केंद्र सरकारने तर राज्य सरकारला लशी मोफत पुरवलेल्या आहेत हे खरं. बाकी तुम्हाला लस मोफर हवी आहे असं असेल तर राज्य सरकारने त्या लशी का गडप केल्यात आणि हॉस्पिटल्स ना त्या का पुरवलेत ते विचारायला हवं. Health is, after all, a state subject.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2021 - 2:50 pm | श्रीगुरुजी

उद्धव आणि राणे एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यात तसूभरही फरक नाही.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 3:26 pm | रामदास२९

+१ योग्य प्रतिसाद ..

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2021 - 2:48 pm | श्रीगुरुजी

रस्त्यावर पडलेली घाण घरात आणून एखाद्या स्वच्छ भांड्यात ठेवली तरी सुवास न येता घरात दुर्गंधी पसरणारच. भाजपने महाराष्ट्रात इतर पक्षातील घाण भरण्याचा सपाटा लावला आहे. त्याचे परीणाम भाजपला भोगावे लागणारच. राणे कुटुंबियांची बेताल बरळ हा त्याचाच परीणाम आहे.

जो बेताल माणूस राजकारणात पूर्णपणे संपलेला होता त्याचा कोणताही उपयोग नसताना आधी भाजपने पक्षात आणले, नंतर त्याला खासदार केले, नंतर त्याच्या मुलाला आमदार केले आणि आता राणेला केंद्रीय मंत्री केले. या सर्वाचा भाजपला काही उपयोग आहे का? जो स्वतः निवडून येऊ शकत नाही तो काय डोंबल शिवसेनेला संपविणार?

२०१२ मध्ये नितेश राणेने मराठा संघटनांना उचकवून पुण्यातील गडकरींचा पुतळा तोडायला लावला कारण ते ब्राह्मण होते. पुतळा तोडणाऱ्यांना नितेशने ५ लाख रूपयांचे बक्षीस दिले होते. बहुसंख्य ब्राह्मण ज्या पक्षाला मत देतात त्या पक्षाने ब्राह्मणद्वेष्ट्याला पक्षात आणून मानाचे पाध देऊन काय साध्य केले? राणे भाजपला मते मिळवून देऊ शकणार नाही पण राणेमुळे काही ब्राह्मणांची मते भाजपविरोधात जातील.

राणे कुटुंबीय भाजपला डोकेदुखी होणार हे नक्की. परंतु ही नसती डोकेदुखी भाजपने स्वत:च ओढवून घेतली आहे. आता भोगा आपल्या कर्माची फळे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 2:56 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ शंबर टक्के सहमत श्रीगुरूजी.
एका बाजुला खडसे, तावडे, बावनकुळे, मुंडे अश्या हाडाच्या भाजप नेत्याना बाजूला फेकले नी बाहेरून आलेल्या राणेंना मंत्रीपद दिले. निष्टेला भाजपात हे फळ. मी २०१७ पर्यंत भाजप समर्थक होतो. पण भाजपचं हे लोकाना गृहीत धरणं पाहून आज दुर गेलोय. नितेश राणेंने सावरकरांचा आदर्श पुढील पिढीला देणार का वगैरे ट्विट केले होते. सावरकरांची माफी न मागता ही त्याना भाजपात प्रवेश मिळाला. काल कृपाशंकर सिंह ला घेतलं भाजपात. राज्यात भाजपचं नेतृत्व लवकर बदललं नाही तर भाजप पुन्हा पन्नास च्या खाली जायला जास्त वेळ लागनार नाही.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 3:29 pm | रामदास२९

याबाबतीत सहमत ..

कारण ते ब्राह्मण होते..
निखालस चुकीची माहिती. गडकरी मराठा नव्हते हे सत्य आहे. परंतू ते ब्राह्मणही नव्हते. दे फनच्या प्रभावामुळे किंवा प्रसिद्धीमुळे अनेक आडनावे ब्रह्मणांत ढकलण्याची/ओढण्याची चुकीची रीत सध्या बोकाळली आहे. बाजी प्रभू देशपांडेही ब्राह्मण होते अशी चुकीची माहितीही आताशा पद्धतशीरपणे पसरवली जात आहे.

साहना's picture

25 Aug 2021 - 1:22 am | साहना

> राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते,

लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना आदरानेच व्यक्तव्य केले पाहिजे हे आवश्यक नाही. मुख्यमंत्री काही भो पंचम जॉर्ज नाहीत. जास्त मनाला लावून घेत असतील तर राजकारण सोडून घरी बसावे. राणे ह्यांना तुरुंगांत वगैरे टाकणे हे बिहार लेव्हल चे राजकारण आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे ह्यांनी काही इतके गंभीर व्यक्तव्य केले नव्हते. उलट ह्यापेक्षा अत्यंत घाणेरडी भाषा इतर महाराष्ट्रीय राजकारणी वापरत आले आहेत. किंबहुना अशी भाषा "नारोबा" शिळ्या सेनेत शिकले असावेत.

साहना's picture

25 Aug 2021 - 1:22 am | साहना

> राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते,

लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना आदरानेच व्यक्तव्य केले पाहिजे हे आवश्यक नाही. मुख्यमंत्री काही भो पंचम जॉर्ज नाहीत. जास्त मनाला लावून घेत असतील तर राजकारण सोडून घरी बसावे. राणे ह्यांना तुरुंगांत वगैरे टाकणे हे बिहार लेव्हल चे राजकारण आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे ह्यांनी काही इतके गंभीर व्यक्तव्य केले नव्हते. उलट ह्यापेक्षा अत्यंत घाणेरडी भाषा इतर महाराष्ट्रीय राजकारणी वापरत आले आहेत. किंबहुना अशी भाषा "नारोबा" शिळ्या सेनेत शिकले असावेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 2:59 am | अमरेंद्र बाहुबली

शेवटी ते शिवसेनाप्रमुख आहेत आणी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देखील. त्यांचा मान आणी पद मोठंय. त्यांचा आदर करून त्यांच्या बद्दल जपूनच बोललं पाहिजे नाहीतर मग असे ऑफिस फुटतात नि पळता भुई थोडी होते.

जॅक द रिपर's picture

26 Aug 2021 - 2:03 am | जॅक द रिपर

उद्दाम ठाकरेनी आदित्यनाथांबद्दल जे काही अकलेचे तारे तोडले होते ते एका मुख्यमंत्र्याने दुसर्‍या मुख्यमंत्र्याबद्दल उधळलेली स्तुतीसुमने आहेत का?

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2021 - 9:36 am | श्रीगुरुजी

नारायण राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेनेने साळसुदाचा आव आणून धुडगुस घातला. मुळात उद्धव ठाकरे, बाळ ठाकरे, राऊत वगैरे यापेक्षाही अर्वाच्य अनेकदा बोलले आहेत. राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळ ठाकरेंनी सामनामधून राणेंबद्दल जितके असभ्य व अर्वाच्य लिहिले होते तितकी खालची पातळी आजवर कोणीही गाठलेली नाही. नाऱ्या, दीडफुट्या या शब्दांनी सामनात व जाहीर सभेत राणेंचा उद्धार केला होता. यापेक्षाही जास्त असभ्य व अर्वाच्य शब्द सामनातील अग्रलेखात वापरले होते. मी याला मोठा केला पण हा चड्डीत चिरकला असे लिहिल्याचे मी वाचले होते. काही शब्द इतके असभ्य होते की ते मी येथे सांगू शकत नाही. सोनिया गांधी, शरद पवार यांच्याबद्दलही सामनातून वारंवार अर्वाच्य शब्द वापरले होते.

आज राणेंच्या शब्दांवर टीकेचा भडीमार होतोय. परंतु यापेक्षाही कितीतरी वाईट शब्द सामनातून व जाहीर सभेत वापरले गेले, तेव्हा मात्र ठाकरी भाषा असे कौतुक होत होते. मग आता आक्षेप का?

काल एका मराठी वाहिनीवर याच विषयावर ३ मराठी पत्रकारांची चर्चा सुरू होती. राणेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाची पातळी खूप खाली गेली आहे, असे तीनही पत्रकार व आयोजकांनी सांगितले. यापेक्षाही खालच्या भाषेत वरीष्ठ ठाकरे, कनिष्ठ ठाकरे, राऊत मागील अनेक दशके अनेक नेत्यांचा उद्धार करीत होते, तेव्हा ही पातळी वर होती का? तेव्हा यांनी कधी आक्षेप घेतला होता का? तेव्हा यांनी त्या अर्वाच्च असभ्य भाषेचे ठाकरी भाषा, शिवसेनेची स्टाईल अशा शब्दात कौतुक केले होते.

जे पेरले तेच उगवले आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

26 Aug 2021 - 11:50 am | रावसाहेब चिंगभूतकर

उद्धव ठाकरेंविरोधात FIR UP मध्ये दाखल झाली आहे. हे क्रॉस स्टेट FIR प्रकरण नक्की कसं काम करतं?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Aug 2021 - 12:19 pm | अमरेंद्र बाहुबली

शेकडो एफ आय आर राज ठाकरेंविरूध्द युपी नी बिहार मध्ये दाखल आहेत. पण राज ठाकरे कधी तीकडे गेले नाहीत.एफ आय आर राजकीय हेतूने दाखल होतात आणी नंतर पळवाटा काढून बंद हेतात किंवा मागे घेतल्या जातात. कारण जास्त प्रकरण ताणलं तर त्याचा कायदा सुव्यवस्थएवर परिणाम होऊ शकतो.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

मोठी बातमी: शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या https://t.co/ekVWPtYeWd #ShivSena #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Pune

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 12:42 pm | Rajesh188

राणे केंद्रीय मंत्री आहेत किती जबाबदारी नी वक्तव्य करायला पाहिजेत.गल्ली मधील tinpat गुंडासारखी त्यांची भाषा असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 12:50 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
राणे ठाकरे वादात भाजपचा चुराडा होतोय.
असंगाशी संग प्राणांशी गाठ ही म्हण भाजपला लागू पडतेय.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 5:06 pm | रामदास२९

भाजपाचा नाही ..लोकान्च्या वेळेचा .. कशाला सारख सारख दाखवतात.. मीडीया वाले.. माहित नाही..

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 3:32 pm | रामदास२९

राणे आणि ठाकरे यान्नी दोघान्नीहि आपल्याला कोणती जबाबदारी आहे ते ओळखून वागाव.. वक्तव्य करावीत

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 3:36 pm | अमरेंद्र बाहुबली

मुळात केंद्रीय मंत्र्याने आपला कारभार सांभाळून आपल्या मंत्रालयाचा जनतेच्या विकासासाठी वापर करावा. पण केंद्रीय मंत्री ईथे भाजपचा प्रचार करायला वापरला जातोय. भाजपचाच प्रचार करायचा तर ईथे फडणवीस, दरेकर असे सध्या कुठलीही जबाबदारी नसलेले लोक आहेत ना?? केंद्रीय मंत्री जर गल्लोगल्ली आशिर्वाद मागत फिरेल तर जनतेची कामे कशी होनार??

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 3:49 pm | रामदास२९

केन्द्रिय मन्त्राने लोकान्मध्ये मिसळू नये अस तरी कुठे लिहिलय.. यात्रा काढल्या कि नकळत लोकान्च्या मध्ये मिसळून लोकान्ची काम होतात.. केन्द्रिय मन्त्राने फक्त प्रशासनिक काम करावीत, मन्त्रीमन्डळ बैठकीला हजर रहाव, अधिवेशनात खासदारान्च्या प्रश्नाना उत्तर द्यावीत एवढच नाही..

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 3:57 pm | अमरेंद्र बाहुबली

यात्रा काढल्या कि नकळत लोकान्च्या मध्ये मिसळून लोकान्ची काम होतात >>>>
प्रणाम घ्यावा. _/\_

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 4:06 pm | रामदास२९

प्रणामाचा स्वीकार केला.. नमस्कार .. _/\_

रात्रीचे चांदणे's picture

24 Aug 2021 - 1:34 pm | रात्रीचे चांदणे

मोदी सरकार ने infrastructure asset monetisation plan सादर केला आहे. सदर plan नुसार 2025 पर्यंत 6 ला करोड चा निधी उभारण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न असणार आहे. रेल्वे, विमानतळ आणि कोळसा उतख्तनं या पासून जास्तीत जास्त निधी मिळणार आहे.
शेखर गुप्तांनी cut the clutter मध्ये बऱ्यापैकी व्यवस्तीत समजावून सांगितला आहे.
https://youtu.be/2L2CnIS3XME

Nitin Palkar's picture

24 Aug 2021 - 8:05 pm | Nitin Palkar

6 लाख करोड..

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 2:07 pm | अमरेंद्र बाहुबली

कार्यालयांचे रक्षण करा. - फडणवीस.

कपिलमुनी's picture

24 Aug 2021 - 3:37 pm | कपिलमुनी

नारायण राणेंना अटक झाली आहे.

कोर्टात लगेच जमीन दिला जाईल.खरे तर ही अटकेची कारवाई करायला नको होती.उगाचच राणे ची प्रसिध्दी झाली ह्या अटके मुळे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 4:03 pm | अमरेंद्र बाहुबली

नाही. ह्यापुढे भाजपच्या लोकात जरब बसेल, येईल ते तोंडाला बोलण्याआधी चार वेळा विचार करतील. अटक केली ते बरेच केले. केंद्रीय मंत्र्याला अटक करून राज्याने केंद्राला आपली ताकद दाखवून दिलीय. मनात येईल त्याच्या मागे ईडीची चौकशी लावून त्रास द्यायचा केंद्राने सपाटा लावला होता. आपल्या हातात ताकद आहे हे दाखवण्याचा केंद्राचा प्रयत्न होता, राज्याकडेही ताकद असते आणी ते वापरू शकतात हे आता केंद्राला दिसेल. एकाच दगडात अनेक पक्षी मारल्या गेलेत.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 5:08 pm | रामदास२९

हहपुवा.. उद्याचा सामना , लोकसत्ता, मटा फक्त जास्त खपेल ..

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 5:09 pm | रामदास२९

बरोबर ..

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 5:10 pm | रामदास२९

बरोबर आहे..

कपिलमुनी's picture

24 Aug 2021 - 4:12 pm | कपिलमुनी

भाजप मतदार आणि कार्यकर्ते यांना राणे नकोच आहे.
त्यांना राणे अणि त्याची दोन मुले हे त्रासदायक वाटत आहेत. ताळतंत्र सोडून जी बोल बच्चन देत होते तो भोवला आहे.
त्यामुळे भाजप नेते अंतर ठेउन आहेत.

याउलट सेना मतदार आणि कार्यकर्ते खुष आहेत.
राणे ला एकदा तरि धडा शिकवला याबाबत ते कहि महिने खुष राहतील.

जे भाजपाला अपेक्षित होत तेच झाल. :)

मुख्यमंत्री यांच्या भाषणातील घोळ :-

राणे यांनी केलेले वक्तव्य ज्यामुळे आत्ता जे नाट्य घडतयं :-

जाता जाता :- पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असलेल्या व्यक्तीचा अमृत महोत्सव आणि हीरक महोत्सव यात १५ ऑगस्ट रोजीच गोंधळ उडावा हे या राज्याचे दुर्दैव !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kadhalikum Pennin... :- Kadhalan

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 5:43 pm | अमरेंद्र बाहुबली

डोनाल्ड ला डोलांड आणी नाईन्टीनट ट्वेन्टी ला नाईन्टीन ट्वेन्टीन बोलनारे पंतप्रधान ह्या देशाला लाभले हे या देशाचे भाग्य ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 5:47 pm | अमरेंद्र बाहुबली

आता ते राष्ट्रहीतासाठी बोलले असं कृपया कुणी बोलू नका ;)

भाषणातल्या चुका.. आणि सन्दर्भ माहित नसणे यात फरक आहे..

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 6:52 pm | रामदास२९

कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेल्या लोकान्ची चाकरी करणे, मन्त्रीमन्डळाचा निर्णय फाडून टाकल्यावर पण निमूटपणे दिवस ढकलणे.. हे खर दुर्दैव

कपिलमुनी's picture

24 Aug 2021 - 5:56 pm | कपिलमुनी

भाषणातील चुकासाठी एका केंद्रीय मंत्र्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायची भाषा करावी का ? 15 ऑगस्ट हा वर्धापनदिन आहे असे राणेंचे व्हिडीओ दाखवू का ? उगा चुकीच्या माणसाची पाठराखण करू नका. राणे आणि पिल्लांच्या शेकडो क्लिप्स आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 5:57 pm | अमरेंद्र बाहुबली

+१

उगा चुकीच्या माणसाची पाठराखण करू नका.
मुनी मी माझ्या प्रतिसादात राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही, मी फक्त दोन्ही व्यक्ती काय बोलले त्याचे व्हिडियो दिले आहेत.

हा दुटप्पीपणा सोडला पाहिजे!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kadhalikum Pennin... :- Kadhalan

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 6:47 pm | रामदास२९

हे बरोबर आहे..

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 6:56 pm | रामदास२९

कपिलमुनी - बरोबर .. दोघान्ची व्यक्तिगत भान्डणे चव्हाट्यावर आलेली आहेत आणि मिडिया TRP वाढविण्यासाठी त्याचा वापर करत आहे.. बाकि काही नाही..

चंद्रसूर्यकुमार's picture

24 Aug 2021 - 6:59 pm | चंद्रसूर्यकुमार

२०१८ मधील पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी विरारला आले होते तेव्हा त्यांनी सभेत शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालताना चप्पल काढली नव्हती असा दावा शिवसेनेने केला होता. आणि त्याच चप्पलेने योगींना बडवावे असे वाटले असे सामनात छापून आले होते. त्यावेळेस सामनाचे मुख्य संपादक कोण होते? कार्यकारी संपादकांनी काहीही लिहिले तरी मुख्य संपादक त्या जबाबदारीतून मुक्त होतात का?

https://www.newindianexpress.com/nation/2018/may/26/felt-like-hitting-yo...

तेव्हा योगींनी असे काही झाले होते याचेच खंडन केले. मुख्य संपादकांविरोधात एफ.आय.आर दाखल केला नाही की त्यांना ताब्यात घेतले नव्हते.

https://zeenews.india.com/maharashtra/dont-need-to-learn-from-them-yogi-...

खरोखरच भाजपवाल्यांनी सत्ता कशी राबवावी हे ठाकरे, ममता बॅनर्जी वगैरेंपासून शिकावे. फार मवाळपणा दाखवतात.

खर आहे.. बाकिच्या पक्षान्कडून शिकाव.. आधी दादागिरी करायची आणि पुन्हा लोकशाहीचे गोडवे..

स्वलिखित's picture

24 Aug 2021 - 10:35 pm | स्वलिखित

राहुल जसा गांधी या शब्दाचा अपमान आहे , तसेच शिवसेना ....
असो

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 10:41 pm | अमरेंद्र बाहुबली

मग ह्या प्रमाणे भारतीय शब्दाचा अपमान भाजप करते का?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:51 am | अमरेंद्र बाहुबली

आधी कानाखाली मारायची भाषा भाजपेयीं करतीलमग अंगावर आलं की8 थालरे सरकार गुंड आहे वगैरे बोलायचं. छापा दुटप्पीपणा आहे हा.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:52 am | अमरेंद्र बाहुबली

आधी कानाखाली मारायची भाषा भाजपेयीं करतीलमग अंगावर आलं की ठाकरे सरकार गुंड आहे वगैरे बोलायचं. छान दुटप्पीपणा आहे हा.

पण आता जे राजकारण bjp करत आहे तसे कधीच बघितले नाही.
ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे तेथे कायदा आणि सू व्यवस्था राहू नये म्हणून विविध बाटके त्या राज्यात सोडले जात आहेत.
अगदी नीच राजकारण bjp करत आहे.
बंगाल ला खूप बदनाम ह्या लोकांनी केले.
महाराष्ट्रात कंगना,अर्णव,आणि राणे हे बाटके इथे सोडून bjp स्वतः नामा निराळे राहून राज्यातील व्यवस्था बिघडवत आहेत.
Third क्लास राजकारण bjp करत आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 7:40 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
पण त्यांचा डाव त्यांच्यावरच ऊलटतोय. बंगालात ममताने मारलं तर पळ काढावा लागला. महाराष्ट्रात आज काय झाले ते पाहिलेच.

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 7:44 pm | रामदास२९

हायकोर्टाने बन्गाल सरकारला फटकारून सुद्धा ..भाजपाचाच डाव उलटत असेल तर .. हहपुवा

कपिलमुनी's picture

24 Aug 2021 - 7:43 pm | कपिलमुनी

असले धंदे केंद्र सरकर ईडी , सीबीआय मागे लावून करते तेव्हा भ़क्तंना चालते ,
आज लगेच सत्तेचा गैरवापर वगैरे आठवतात

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 7:47 pm | रामदास२९

भाजपचे लोक .. गैरवापर वगैरे काहिहि म्हणाले तरि काही उपयोग नाही.. त्यानी पण सन्धी येण्याची वाट बघावी.. सत्तेसाठी आता तडजोड नको.. कोणी कितीही मोदीन्ना जाऊन भेटल तरी..

जॅक द रिपर's picture

26 Aug 2021 - 2:06 am | जॅक द रिपर

पालघरचे साधू, मदनलाल शर्मा, अनंत करमुसे, कंगना रानावत, अर्णब गोस्वामी यांच्यामागे लागून थोबाड कोणी फोडून घेतले आहे?

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2021 - 7:51 pm | श्रीगुरुजी

आम्ही राणेंच्या विधानाचे समर्थन करीत नाही, पण आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजे नक्की काय? हे विधान सोडून राणेंच्या उर्वरित सर्व कृत्यांचे व विधानांचे समर्थन असा अर्थ आहे का?

राणेंना अटक करण्याचे अतिरेकी पाऊल उचलून ठाकरेंनी मोठी चूक केली आहे. राणेंवरील कलमे कोणत्याही न्यायालयात टिकणे अशक्य आहे. यातून राणेंनाच सहानुभुती मिळून फायदा होईल व सेनेचे नाक कापले जाईल. यामुळे भाजपत सुद्धा राणेंचे महत्त्व वाढून चंपा, शेलार, फडणवीस वगैरेंचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. फडणवीसानी आपले पक्षांतर्गत सर्व प्रतिस्पर्धी सहकारी संपविले आहेत. परंतु आता राणेंच्या रूपात एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होण्याची शक्यता आहे.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Aug 2021 - 8:04 pm | रावसाहेब चिंगभूतकर

सेना भाजपने लावलेल्या सापळ्यात अडकली आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. राणेंबद्दल प्रेम अजिबात नाही, पण त्यांना बहुधा याच कामगिरीवर पाठवण्यात आलं होतं. शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन, तेही हिंसक करणे, हे ही बहुधा अपेक्षित असावं. गृह खाते राष्ट्रवादी कडे आहे आणि पोलीस गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय कारवाई करणार नाहीत. बहुधा दोन्ही बाजूने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी चाली खेळल्या गेल्या आणि सेना अपेक्षेप्रमाणेच वागली. राणेंची प्रतिमा महाराष्ट्राबाहेर ठाकरे विरोधी नेता अशी झालीय आणि त्यांना याचा बहुधा फायदा मिळणार. बाकी law and order चा issue करून सरकार पाडायची किंवा पडायची वाट केंद्र पहात असणार आणि अशा गोष्टींनी त्यांना तसं करायची संधी मिळेल. निवडणुका होई पर्यंत शिवसेनेची प्रतिमा जनतेच्या मनात फारशी चांगली रहाणार नाही असं मला वाटतं. नको त्या गोष्टी उचलून सेना काट्याचा नायटा करते आणि तोंडावर पडते असं गेले कित्येक वेळा प्रमाणे याही वेळी घडणार बहुतेक.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 10:14 pm | अमरेंद्र बाहुबली

वा ईतका कल्पनाविस्तार भाऊ तोसरेकर त्यांच्या तुनळी विडीओत करत नाहीत. ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 10:20 pm | अमरेंद्र बाहुबली

आम्ही राणेंच्या विधानाचे समर्थन करीत नाही, पण आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजे नक्की काय? हे विधान सोडून राणेंच्या उर्वरित सर्व कृत्यांचे व विधानांचे समर्थन असा अर्थ आहे का?>>>>

समानार्थी वाक्ये.
"आम्ही त्या व्यक्तीच्या विधानाच्या पाठीशी नाही, पण त्या व्यक्तीच्या पाठीशी आहोत."
"आम्ही दंगलीचे समर्थन करत नाही, पण आम्ही दंगल घडवून आणणाऱ्याच्या पाठीशी आहोत."
"आम्ही हत्येचे समर्थन करत नाही, पण आम्ही हत्या करणाऱ्या झुंडीच्या पाठीशी आहोत."
आणि - - -
"आम्ही देश विकण्याचे समर्थन करत नाही, पण आम्ही देश विकणाऱ्याच्या पाठीशी आहोत।"
सुशील शुक्ल

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 10:31 pm | Rajesh188

काही ही झाले तरी आम्ही नालायक पना करणार.
मराठी असून सुद्धा महाराष्ट्र ल खड्यात गाडणार.
त्या साठी किती ही लाचारी पत्करणार .मोदी , शाह खुश झाले पाहिजेत .
ह्या साठी आम्ही जगात ज्याला सर्वात नालायक समजले जाते ते कार्य पण आम्ही करू
पाठी मागे सरकणार नाही.
अशा वृत्ती चे राज्यातील bjp नेते आहेत.

सॅगी's picture

24 Aug 2021 - 10:33 pm | सॅगी

इतका कल्पनाविस्तार तर सामनाकार कंपाऊंडरही करत नसतील.. ;)

सुक्या's picture

24 Aug 2021 - 11:39 pm | सुक्या

असला "नरो वा कुंजरो वा" पवित्रा सारे राजकीय लोक घेतात. भाजप किंवा फडवणीस याला अपवाद नाहीत. बाकी शिवसेने चा थयथयाट त्यांच्या वर्तनाच्या अगदी विरोधी आहे. म्हणजे आम्ही कुणालाही काहीही बोलु, आम्हाला मात्र कुणी काहीही बोलायचे नाही असला तद्दन बालीशपणा ह्या लोकांचा असतो. लगेच मग सार्‍या महाराष्ट्राचा अपमान होतो. आजही सामना चे अग्रलेख बघा ... अर्वाच्य म्हणजे काय असते याचा दाखला ह्या मुखपत्राचे संपादकीय पाहिले की मिळतो.

मेडीया ला चघळायला नवीन चारा ह्या पलिकडे या घटनेला काहीही महत्त्व नाही. बाकी फलतु बाबतीत डीजे लावुन डान्स करणे हे झोपडपट्टी शिवसैनीकाला शोभते. त्यामुळे कोंबड्या सोडणे, काचा तोडणे झाले की मग फु़कट वडापाव + चहा मिळतो. तेव्हडेच हाताला काम ..

रामदास२९'s picture

24 Aug 2021 - 11:57 pm | रामदास२९

एकदम योग्य..

Rajesh188's picture

25 Aug 2021 - 12:10 am | Rajesh188

आंदोलन झाले की पक्षाच्या खर्चाने ताज. हॉटेल मध्ये जातात का ?
जात पण असतील सरकारी फुकट ची संपत्ती विकून पैसे खूप आले आहेत त्यांच्या कडे.
विमानतळ पासून रेल्वे,lic, बँका,सर्व विकून खूप पैसे आले आहेत.
परत बँकाचे करोड रुपये फुकट चे कर्ज पण घेतले आहे ते कधीच परत करायचे नाहीत.
फुकट चेच आहे.
बाकी पक्षा कडे असे फुकट चे पैसे नाहीत.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:42 am | अमरेंद्र बाहुबली

+1
हिशेब न दिलेला कोरोनानिधी ही वापरत असावेत.

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 8:01 pm | Rajesh188

अशा काहीच किंमत नसलेल्या लोकांना सोडून धुरळा उढवायचा आणि त्या आडून स्व हित साधने,राष्ट्रीय संपत्ती मित्र ना दान करणे, असले उद्योग bjp करत आहे.
राष्ट्रीय संपत्ती ची लूट चालू आहे आणि त्या साठीच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.
Batik न्यूज चॅनल आहेत च साथ देण्यासाठी.

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 8:01 pm | Rajesh188

अशा काहीच किंमत नसलेल्या लोकांना सोडून धुरळा उढवायचा आणि त्या आडून स्व हित साधने,राष्ट्रीय संपत्ती मित्र ना दान करणे, असले उद्योग bjp करत आहे.
राष्ट्रीय संपत्ती ची लूट चालू आहे आणि त्या साठीच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.
Batik न्यूज चॅनल आहेत च साथ देण्यासाठी.

जॅक द रिपर's picture

26 Aug 2021 - 2:07 am | जॅक द रिपर

काय हो, नाही म्हणजे ऑटोमॅटीक होतं का कुंथावं लागतं?

असले धंदे केंद्र सरकर ईडी , सीबीआय मागे लावून करते .. पण ईडी आणि सीबीआय पासून पळण्याचं, लपण्याचं कारण काय? मोदी मुख्यमंत्री असताना खोंग्रेसच्या केंद्र सरकारने किती शुक्लकाष्ठे मागे लावली तरी ते घाबरले, लपले नव्हते. कर नाही त्याला डर कशाची?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Aug 2021 - 8:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राणेना भाजपात घेण्यामागचा मुख्य हेतु कोकणातुन शिवसेनेनेला आव्हान देणे हा होता. सेना नेत्यांना साजेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये करायची, शिवसेनेने मग कायदा हातात घेतला की मग भाजपा प्रवक्ते दिल्लित बसुन "हा तर लोकशाहीचा खून' म्हणायचे व राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा.
राणे जी भाषा वापरतात तशीच भाषा 'सामना'मध्येही छापुन येत असते. मोदी/शहा वगैरेंचा अपमानास्पद उल्लेख तर असतातच.
ह्यावर आवर घालणारा, 'ठकास महाठक' नेता भाजपाला हवा होता. तो राणेंच्या रुपाने मिळाला.

फक्त त्यांचा तालुका इतकेच आहे बाकी ते मोठे विचारवंत नेते आहेत,त्यांच्या कडे राज्याच्या विकास ची दूर दृष्टी आहे असे काही नाही
साध्या भोळ्या कोकणी लोकांना वेडे बनवून हा करोडो रुपयाच्या संपत्ती चा मालक आहे.
कोकण आहे तसे अजुन पण मागास च आहे.
पावसात दर वर्षी वाहून जात च आहे.आणि may महिन्यात पाण्यासाठी वन वन तेथील जनता भटकत च आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 10:12 pm | अमरेंद्र बाहुबली

राणे स्वत आमदार बनू शकले नाहीत ते सेनेला टक्कर देणार ;)
संपले होते राणे. राणेना मंत्रापद मिळून फक्त त्यांचा वयक्तिक फायदा झालाय. भाजपला ह्यातून शुन्य आभटपूट मिळेल.

हिंदू हिताच्या गप्पा मारणारे बीजेपी वालेच देशभर हिंदू हिंदू मध्ये भांडण लावत आहे. एकमेका विरूद्ध हिंसाचार करण्यास bjp च कारणीभूत आहे.
हे कसले हिंदू चे हित करणार

चालु घडामोडीच्या धाग्यावर "चालु धुमाकुळ" चालु झाला ..
:(

धर्मराजमुटके's picture

24 Aug 2021 - 9:50 pm | धर्मराजमुटके

मिपावरील "सुपर फास्ट सेंच्युरी" चा विक्रम या धाग्याचे नावे होणार बहुधा !

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 9:59 pm | Rajesh188

आरक्षण,हिंदू मुस्लिम वर,जाती जाती मध्ये वाद,अजुन बेसिक सुविधा पण कित्येक करोड लोकांस उपलब्ध नाहीत.
अजुन किती करोड जनता एक वेळ च जेवण करते.
नेते सर्व अती श्रीमंत आणि ते ज्या जनतेचे प्रतिनिधी आहेत ती जनता अत्यंत गरीब.
ब्रिटिश खरे च बोलले होते भारतीय राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत.
अतिशय हताश होवून खूप लोक आज पण बोलतात ब्रिटिश काळी काठी ला सोने लावून फिरले तरी भीती नव्हती.

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 12:02 am | रामदास२९

खरय.. जे लोक गान्धी घराण्याला .. ५०-५० वर्ष निवडून देतात.. त्यावरून हे सिद्ध होते कि भारतिय लोकान्ना कोणीही आज्ञेत ठेऊ शकतो..

स्वलिखित's picture

24 Aug 2021 - 10:12 pm | स्वलिखित

इंदिरा मोड ऑन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा आच्छादला होता

तिरंगा आच्छादला असताना त्यावर पक्षाचा झेंडा ठेवणे किती योग्य ? , असे करणे गरजेचे होते का ?

pahaa

अमरेंद्र बाहुबली's picture

24 Aug 2021 - 10:43 pm | अमरेंद्र बाहुबली

भाजपने झेंड्याचा अपमान केलाय. हे ह्यांचं राष्ट्रप्रेम.

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 11:01 pm | Rajesh188

15 ऑगस्ट ला राष्ट्र गीताची 1 ओळ पण तेथील प्रसिद्ध राजकीय पक्षाच्या झेंडा वंदन कार्यक्रमात गाता आली नाही.
पण योगी म्हणजे ह्यांचे तारणहार,मालक,शेठ .
त्या राज्यातील कोणत्या ही घटना ह्याव पवित्र च असतात असे bjp मधील लाचार नेत्यांना शिकवले गेले आहे

Rajesh188's picture

24 Aug 2021 - 11:27 pm | Rajesh188

विरोधीपक्ष म्हणून bjp नी आज पर्यंत एक तरी आंदोलन केले आहे का जे जनतेच्या अडचणी शी संबंधित आहे.
विरोधी पक्षाचे काम काय आहे सरकार ची धोरण जनतेच्या हिताची कशी राहतील ह्या वर नियंत्रण ठेवणे.
Bjp चे काय चालू आहे.
पाहिले सुशांत प्रकरण राज्याच्या हिताशी काहीच संबंध नाही.
नंतर ती नटी कंगना तिचे समर्थन करायला पूर्ण bjp सक्रिय.
राज्याच्या हिता शी काही संबंध नाही.
कधी पाकिस्तान,कधी मुस्लिम,कधी अफगाणिस्तान .
ह्यांचा राज्य शी काय संबंध.
त्या मुळे ह्या पक्षा विषयी नाराजी आहे.

गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही...

शिवसेनेनी हस करून घेतल स्वतःच..

शिवसेनेच्या हाताला काय लागले ..हेच कळत नाही.. राणेन्ना जामीन मन्जूर ..

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:43 am | अमरेंद्र बाहुबली

शिवसेनेला काय साधायचय ते साधलं गेलं, ह्या पुढे टरकून असातील सेनेला भाजप नेते

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 1:16 am | गॉडजिला

दिवसभरात १०० प्रतिसाद झाले हा १०१ वा प्रतिसाद....

शाम भागवत's picture

25 Aug 2021 - 8:04 am | शाम भागवत

दिवसभरांत नाही हो.
फक्त १४ तास ३ मिनिटांत!!
🙂

रावसाहेब चिंगभूतकर's picture

25 Aug 2021 - 8:09 am | रावसाहेब चिंगभूतकर

188 आणि भुजबळ साहेबांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात यावा

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 9:41 am | अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला आणी तुमच्या डूआयडी ला काय द्यावे?

नावातकायआहे's picture

25 Aug 2021 - 12:57 pm | नावातकायआहे

सहमत. आणि "पतांजलीचे" गिफ्ट कार्ड! :-)

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 2:28 pm | श्रीगुरुजी

म्हणजे या ह-याना-याच्या जोडीला शालजोडीतला आहेर आणि नारळ द्यावा असं म्हणायचंय का?

यातल्या एकाला २-३ महिन्यांपूर्वीच एकदा नारळ मिळाला होता आणि शालजोडीतला आहेर समजणे या दोघांच्याही आवाक्याबाहेर आहे.

त्यामुळे काहीतरी वेगळा आहेर सुचवा.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 2:39 pm | अमरेंद्र बाहुबली

गुर्जी यु टू?? ;)

रात्रीचे चांदणे's picture

25 Aug 2021 - 8:18 am | रात्रीचे चांदणे

आजच्या आग्रलेखतील काही शब्द. गँगस्टर', 'उपटसुंभ', 'सुपारीबाज', डराव डराव करणारा बेडूक.

रात्रीचे चांदणे's picture

25 Aug 2021 - 8:22 am | रात्रीचे चांदणे

आणि हे छापून आलय लोकसत्ता मध्ये. कालच गिरीश कुबेरानी एका विडिओ द्वारे राण्यांची वागणूक कशी चुकीची आहे हे सांगितले होत. राजकिय पक्षाचं एक वेळ ठीक आहे पण आपला मीडिया सुद्धा ठाकरी शैली म्हणून शिवसेनेच्या शिवराळ भाषेचं पहिल्या पासून समर्थन करत आला आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Aug 2021 - 9:40 am | चंद्रसूर्यकुमार

याकूब मेमन फाशीप्रकरणानंतर गिकुंनी जे काही तारे तोडले होते त्यानंतर ते पूर्णपणे मनातून उतरले. स्वतःला अगदी नि:पक्षपाती म्हणवत पी.चिदंबरमसारख्या अटकपूर्व जामीनावर असलेल्या आरोपीकडून लेखमाला लिहून आणायचा शाहजोगपणा त्यांच्याकडे होता. अ‍ॅन्ड्र्यु लिलिको म्हणून ब्रिटिश व्यक्तीच्या ब्लॉगवरील लेख भाषांतरीत करून स्वतःचा म्हणून खपवायचा घाणेरडा प्रयत्न गिकुंनी केला होता. अशी चोरी करणे हे अ‍ॅकॅडेमिक सर्कलमध्ये अगदी अक्षम्य गुन्हा समजला जातो. कोणी अशी चोरी करून पी.एच.डी मिळवली आणि ते नंतर उघडकीस आले तर पूर्वलक्षी प्रभावाने पी.एच.डी रद्द होऊ शकते. निदान जगातील चांगली विद्यापीठे ते करतात. चिदंबरमसारख्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या अशा चोराकडून काय अपेक्षा करणार?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 9:50 am | अमरेंद्र बाहुबली

मी तुमच्याशी सहमत नाही. पण मी तुमच्या पाठीशी आहे.
बोकड कापण्याचं मी समर्थन करत नाही. पण मी खाटकाच्या संपुर्णपणे पाठीशी आहे. :)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

25 Aug 2021 - 10:52 am | रावसाहेब चिंगभूतकर

दोन्ही अग्रलेख वाचले. सामना तर हिणकस भाषेचा नमुना म्हणून प्रसिद्धच होता तेव्हा त्यात गलिच्छ शब्दच फार आणि मुद्दे कमी. तो पूर्ण वाचवला नाही. पण लोकसत्ता ची अधोगती बघून आश्चर्य वाटलं.

खरे तर राणे यांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या चिंतन शिबिरास जास्त हादरा बसला असणार. श्रावणी सोमवारचा पवित्र उपवास सोडायच्या आशेने ताटावर बसावे तर यजमानाने पातेल्यातून एकदम नळीच वाढावी असे भाजपवासीयांस झाले असेल.

असली वाक्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या वार्ताहराना शोभा देतात, लोकसत्तेला नव्हे.

भारतीय मतदारांत एक लोकोत्तर कौशल्य आहे. स्वत:च्या गंडापोटी कोणास धडा शिकवण्याची भाषा करत रणमैदानात फुशारक्या मारणाऱ्या कित्येक नेत्यांवर नंतर टाचा घासत बसायची वेळ आली आहे, हे राजकीय इतिहासाकडे वरवर पाहणाऱ्यासही कळेल. येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.

मतदारांनी फडणाविसना नाकारलेले नाही. त्यांच्याकडे अजूनही सर्वात जास्त मते आणि 'शिटा' आहेत हे गिकु विसरलेले दिसतात.
अग्रलेख तसेही फार कमीच वाचले जातात पण बऱ्याच दिवसांनी वाचलेला लोकसत्ताचा अग्रलेख पहाता मटा बरा म्हणायची वेळ आली.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Aug 2021 - 11:00 am | चंद्रसूर्यकुमार

असली वाक्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या वार्ताहराना शोभा देतात, लोकसत्तेला नव्हे.

नाही. हल्ली लोकसत्ताची अवस्था अशी आहे की अशी वाक्ये (खरं तर अशी वाक्ये) लोकसत्तेलाच शोभतील. :)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

25 Aug 2021 - 11:28 am | रावसाहेब चिंगभूतकर

कोणे एके काळी मटा हा संपादकीय लेखनाचा मापदंड होता. त्यानंतर बहुधा सकाळ (जेव्हा तो पवार कुटुंबियांच्या मालकीचा नव्हता तेव्हा) आणि मग लोकसत्ता. पुढारी, केसरी, तरुण भारत आणि नंतर आलेले लोकमत हे त्या नंतर. नवाकाळ आणि तत्सम पेपर कधी वाचले नाहीत. सामना तर साहित्य या सदरात येत नसल्याने त्यात जे लिहिले जाते ते कायम संध्यानंद च्या कॅटेगरी मधले वाटत आले. लोकसत्ता चा दर्जा खालावत जातोय हे जाणवत आल्यानंतर मी रविवारची पुरवणी आणणे बंद केले. रेग्युलर मटा आणि रविवारचा सकाळ हे दोनच सध्या त्यातल्या त्यात ओके आहेत असे वाटतंय.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 11:50 am | अमरेंद्र बाहुबली

मटा वाईट, सामना वाईट, लोकमत वाईट, लोकसत्ता वाईट. (मोदी, फडणवीसांची स्तुती करत नाही म्हणजे काय?) पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे तुनळी व्हिडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ)

सॅगी's picture

25 Aug 2021 - 11:59 am | सॅगी

सगळ्या पेपरांनी कोथळा, मावळा, कावळा, खंजीर असे शब्द असलेल्या मुखपत्राचेच गुणगान गायले पाहीजे आणि त्याच पक्षाची स्तुती केली पाहिजे (बाकी राज्यात काही काशी का करेनात...), किंवा तसे हग्रलेख लिहीले पाहीजेत...तिच खरी पत्रकारीता...

बोला आवाज कुणाचा???

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली

मावळा, खंजीर कोथळा हे ऐतिहासिक शब्द आहेत. आणी ते महाराष्ट्रातील लोक आणी शिवसैनिकांना आवडतात.
मावळा कावळा बोलून तुम्ही मावळा शब्दाचा अपमान करत आहात. आणि वापरले ते शब्द तर काय बिघडले. शिवरायांच्या मावळ्यांच्या करामती मुळे आज भारत हिंदुस्थान आहे. शिवसेना त्यांच्या कार्यकत्यांना मावळा संबोधित असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय??
तुम्ही देखील स्वतःला गुज्जू लढवय्या किंवा गुजराती बाणा वगैरे विशेषण लावून घ्या ;)

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 12:27 pm | गॉडजिला

मावळा, खंजीर कोथळा हे ऐतिहासिक शब्द आहेत.

अगदी बरोबर, त्याकालातले जेंव्हा पत्रकारिता अस्तित्वात नव्हती... आणि त्यालोकांसाठी ज्यांनी सुराज्यास्तव बलिदानही दिले.

सॅगी's picture

25 Aug 2021 - 12:30 pm | सॅगी

वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे आणि आपण नेमके असे काय काम करतो ज्यामुळे ते शब्द स्वतःसाठी वापरावेत हे आधी ज्याचे त्याने तपासून पाहावे.
नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे हे तुम्हाला दिसत नसले तरी उभ्या महाराष्ट्राला चांगलेच दिसते.

बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;)

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:41 pm | अमरेंद्र बाहुबली

वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे >>>>
कोण देतं अधिकार?? की तुम्हाला विचारून वापरावे??

नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे >>>>
कधी लोटांगन घातले?? कोणी घातले??
पक्षाच्या नावात भारतीय शब्द वापरून मातोश्री समोर युती साठी लोटांगन घालनार्यांबद्दल काय मत?? तसेच सत्तेसाठी महेबूबासमोर लोटांगन घालनारे, कंधार वेळी अतिकयरेक्यांसमोर गुडघे टेकनारे भाजपेया भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का?? ऊभ्या महाराष्ट्राने पाहील सत्तेसाठी रात्री दोन वाजता राष्ट्रपती राजवट ऊठवून पहाटे घातलेलं लाोटांगन.

बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;) >>>>

गुज्जू लोकाना कोण शिव्या घालतंय?? पण ज्याना मावळा शब्दाने पोटशूळ ऊठतो त्याना स्वतला गुज्जू योध्दा किंवा मोशा योध्दा (कर्तृत्व नसले तरी) घोषीत करावे ;)

की आणखी कोणी मर्द मराठा ? तुमचा नेमका प्रॉब्लेम तरी तुम्हास आकलन होत आहे का ? नसेल तर हरकत नाही असेल तरीहि हरकत नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:47 pm | अमरेंद्र बाहुबली

मावळा शब्दाचा कावळआ म्हणून मजाक ऊडवनार्याना लिहीलंय ते. मावळा शब्दाने पोटशूळ ऊठत असलेल्या गुज्जू योध्दयांसाठी आहे ते ;)

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 12:50 pm | गॉडजिला

गेले ते कावळे राहिले ते मावळे इतका सुस्पश्ट फरक आहे दोन शब्दात तूम्ही कशाला गोंधळात पडताय

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 3:15 pm | श्रीगुरुजी

स्वतःला मावळे म्हणवून घेणाऱ्यांना कावळे म्हणणे हा कावळ्यांचा अपमान आहे. कावळे खूप बुद्धीमान असतात. यांना फार तर बावळे म्हणता येईल.

सॅगी's picture

25 Aug 2021 - 12:47 pm | सॅगी

सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील..

कधी लोटांगन घातले?? कोणी घातले??

सर्वाना माहीत आहे, तुम्हाला माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतोय...

अगणित घोटाळे करून वर "भारतीय" म्हणवणार्‍या राष्ट्रीय काँग्रेस भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का??
त्याच काँग्रेस समोर लोटांगण घालुन सत्तेत आलेले लोक मावळा शब्द वापरतात तेव्हा त्यांचा काय हारतुरे घालुन सन्मान करायचा काय?

रामदास२९'s picture

25 Aug 2021 - 12:32 pm | रामदास२९

@सॅगी
एकदम बरोबर.. ह्यान्ची चापलूसी करा.. म्हणजे खरी पत्रकारिता का काय..
जोकसत्ता वाल्यान्ना राज्यसभेच आश्वासन आहे म्हणे.. म्हणून एवढी तोन्ड फाटेस्तोवर स्तुती चालली असते..

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:44 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
लोकसत्ता वाईठ, सकाळ वाईट, सामना वाईट, मटा वाईट, नवाकाळ वाईट, लोकमत वाईट, टीवा नाईन वाईट, एबीपा माझा वाईट, झी २४ तास वाईट. खरी पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे युट्युब विडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ) ;)

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 12:48 pm | गॉडजिला

त्यांना ते सगळे तुमच्या पेक्षा वाईट वाटत असावेत तुमच्या लिखाणाची सर त्या पेप्राना नाहीं इतकाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अन् तूम्ही त्यांनाच विरोधक समजतात... कमोन बी स्पोर्ट तुमचे कौतुक करणार्याना असे बोल लावू नका हो

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 12:57 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ भाऊ तोसरेकरच खरे पत्रकार बाकी सब चाय कम पानी ;)

गॉडजिला's picture

25 Aug 2021 - 1:00 pm | गॉडजिला

तुम्हीं स्वताला असे कमी लेखू नका आम्हला तूम्ही जास्त चांगले वाटता... तोरसेकरांना जो तूम्ही मान देताय हा तुमचा विनम्रपणा समजायचा की काय तेच कळत नाहीये थोडे स्पष्ट कराल का

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 11:03 am | अमरेंद्र बाहुबली

१२२ वरून १०५ वर येणे तेही दणादण क्लीनचीट वाटत नि भरमसाठ भ्रष्ट लोक भाजपात भरूनही. म्हणजे फडणवीसना नाकारलेच आहे जनतेने. तसेच शिवसेनेला त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे आश्वासन दिले असावे त्यांचा इतिहास पाहता.
वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करणार नाही अशी शपथ त्यांनी खाल्ली होती तरी लग्न केले
राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही अशी ते एक चॅनल वर ओरडून सांगत होते पण पहाटे तमाशा घातला.
त्यामुळे फडणवीस ठाकरेंना आश्वासन देऊन नंतर गंडवू पाहत होते हे उभ्या महाराष्ट्र ला माहितीय.
पुढल्या निवडणुकीत ह्याचे परिणाम दिसतील.

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2021 - 2:42 pm | श्रीगुरुजी

येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.

या वाक्यांशी सहमत आहे.

राखीव जागा दिल्याने व इतर सवलतींचा वर्षाव केल्याने आपल्याला बाय डिफॉल्ट मराठे डोळे झाकून मते देतील हे फडणवीसांचे गृहितक फोल ठरले.

प्रगत मराठ्यांना मागास दाखवून राखीव जागा देताना आपण ब्राह्मणांवर अन्याय केला तरी ब्राह्मण आपल्यालाच मते देतील हे गृहितक सुद्धा चुकीचे ठरले.

इतर मागासवर्गीय नेत्यांना कारस्थाने करून संपविले तरी इतर मागासवर्गीय मतदार डोळे झाकून भाजपलाच मत देतील हे गृहीतक सुद्धा फोल ठरले.

देशात सर्वत्र भाजपला अनुकूल वातावरण असूनही महाराष्ट्रात २०१४ व २०१९ च्या तुलनेत मते कमी झाली व जागाही कमी झाल्या याचे कारण मतदारांना गृहीत धरणे.

एवढे करूनही १०५ शिटा आल्या याचे कारण आयारामांची खोगीरभरती व सेनेशी युती. २०५ पैकी २ मित्रपक्षांचे आहेत व १७-१८ जण आयाराम आहेत. सेनेशी युती नसती तर ६० चा सुद्धा आकडा गाठला नसता.

त्यामुळे कुबेर म्हणतात त्यात तथ्य आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 2:50 pm | अमरेंद्र बाहुबली

+१ सहमत श्रिगुरूजी

सुबोध खरे's picture

25 Aug 2021 - 9:32 am | सुबोध खरे

कोण कुणाला म्हणाले?

मैद्याचं पोतं

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 9:47 am | अमरेंद्र बाहुबली

ते सेनाप्रमुख होते. त्यांचा मान मोठा. त्यांचा हेवा करून गल्लीतील कुणीही भाजप गुंड काहीही बरळू लागला तर आणखी काय होनार?

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 10:45 am | अमरेंद्र बाहुबली

मी गावठी दारूच्या विरोधात आहे पण गुत्तेवाल्याच्या मी संपूर्ण पाठीशी आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 10:49 am | अमरेंद्र बाहुबली

मी हत्यांशी सहमत नाही पण माझा तालिबान ला पाठिंबा आहे ;)

रावसाहेब चिंगभूतकर's picture

25 Aug 2021 - 10:54 am | रावसाहेब चिंगभूतकर

मुद्दा कळला आता spamming बंद करा.

चंद्रसूर्यकुमार's picture

25 Aug 2021 - 10:58 am | चंद्रसूर्यकुमार

त्या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे अशी विनंती इतर सगळ्यांनाच करत आहे. त्या दोघांना कोणत्याही साधकबाधक चर्चेत स्वारस्य नाही उगीचच राळ उडवायची आहे हे स्पष्ट दिसतच आहे. जिथेतिथे जाऊन घाण करणार्‍या सदस्यांना पूर्ण वाळीतच टाकायला हवे- त्यांचे अस्तित्वच विचारात घेऊ नये असे मला तरी वाटते.

अमरेंद्र बाहुबली's picture

25 Aug 2021 - 11:08 am | अमरेंद्र बाहुबली

भाजपला विरोध केला तर घाण
भाजपला विरोध करतात ते साधक बाधक चर्चा करत नाहीत
भाजपला विरोध करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे
भाजपला विरोध करणार्यांना वाळीत टाकावे
~
आपलाच आकाशगंगा मंगळ बुध शनि कुमार

सुबोध खरे's picture

25 Aug 2021 - 11:19 am | सुबोध खरे

@चंद्रसूर्यकुमार

मी आपल्याशी २०० % सहमत आहे.