प्रथम आमच्या परमस्नेही विसोबा खेचरांचे आणि समस्त मिसळपाव पंचायतिचे हे संकेत स्थळ चालू केल्याबद्दल मनापासुन आभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..
आम्ही सभासद व्हायच्या आधीच आमच्या नावांने इथे शिमगा चालू असलेला बघून आम्ही धन्य झालो..असो..
सध्या जालावर आम्हाला फारसा चांगला कच्चा माल मिळत नसल्यामुळे आमची गोची झाली आहे..म्हणून वेळ काढायला .. जालावर मराठी गाणी ऐकत होतो . तेव्हा शांताबाई शेळक्यांचे रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी हे सुरेख गाणे ऐकायला मिळाले आणि आम्हाला ते 'प्रसव' का काय म्हणतात त्या वेदना सुरू झाल्या
जित्याची खोड मेल्याशिवाय कशी जाणार
रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाबा म्होऱ्यात
आणि माझ्या नरडीला धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
केशवसुमार
प्रतिक्रिया
20 Sep 2007 - 12:31 am | विसोबा खेचर
आणि आम्हाला ते 'प्रसव' का काय म्हणतात त्या वेदना सुरू झाल्या
अच्छा! म्हणजे आपलं मराठी आंतरजालीय वाचन साईनऑफ स्थितीत राहूनसुद्धा बर्यापैकी सुरूच असतं वाटतं! की अलिकडेच कधी विल्मिंगटनच्या काकांकडे च्चक्कर टाकली होतीत? :)
असो!
'रेघांनी' च्या जागी 'बाबांनी' हा शब्द फार आवडला. तसेच 'हात नगा लावू माझ्या बॉडिला' ही ओळ इतकी चित्रदर्शी वाटली की ती वाचताना, संजोपरावांच्या बंगल्यावर भेटलो असताना टीशर्ट आणि लुंगी या पेहेरावात पाहिलेली तुमची बेताची (!) बॉडीही डोळ्यासमोर आली! :)
जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाबा म्होऱ्यात
ह्यातला 'बाबा' हा शब्द फार आवडला. जवानीत आम्ही ज्या पोरीवर जिवापाड लाईन मारत होतो तिचा खत्रूड चेहेर्याचा जन्मदाता डोळ्यासमोर आला! व्वा, फारच चित्रदर्शी विडंबन..:)
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
सुंदर..:)
केशवराव, मिसळपाववर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपली उत्तमोत्तम विडंबने आणि कविता आम्हाला येथे वाचावयास मिळोत हीच सदिच्छा! 'कच्चा माल' हवा असेल तर तूर्तास आम्ही अशोक गोडबोले या आमच्या कवीमित्रास येथे आणलेले आहे. त्यांना जमल्यास एखाददा ट्राय करा! :)
आपाला,
(परमस्नेही व आडनांवबंधू!) तात्या.
20 Sep 2007 - 6:49 am | बेसनलाडू
'रेघांनी' च्या जागी 'बाबांनी' हा शब्द फार आवडला. तसेच 'हात नगा लावू माझ्या बॉडिला' ही ओळ इतकी चित्रदर्शी वाटली
सहमत आहे. त्याचबरोबर तुमच्या घोडीला ताई म्हणेन, हे तर खल्लास!!! विषयात तोचतोचपणा असला, तरी फिट्ट बसणारी शब्दयोजना लेखनाला वेगळाच स्वाद प्राप्त करून देते, याचे हे विडंबन उत्तम उदाहरण म्हणता येईल.
की ती वाचताना, संजोपरावांच्या बंगल्यावर भेटलो असताना टीशर्ट आणि लुंगी या पेहेरावात पाहिलेली तुमची बेताची (!) बॉडीही डोळ्यासमोर आली! :)
याबाबत काही मत मांडणे तूर्तास शक्य नाही.
जवानीत आम्ही ज्या पोरीवर जिवापाड लाईन मारत होतो तिचा खत्रूड चेहेर्याचा जन्मदाता डोळ्यासमोर आला! व्वा, फारच चित्रदर्शी विडंबन..:)
पुन्हा सहमत!!!
केशवराव, मिसळपाववर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपली उत्तमोत्तम विडंबने आणि कविता आम्हाला येथे वाचावयास मिळोत हीच सदिच्छा! 'कच्चा माल' हवा असेल तर तूर्तास आम्ही अशोक गोडबोले या आमच्या कवीमित्रास येथे आणलेले आहे. त्यांना जमल्यास एखाददा ट्राय करा! :)
बापरे!! अनेक होतकरू विडंबनकारांसाठी 'मिसळपावचे सदस्यत्त्व घेतल्यास कच्चा माल आणि तो पुरवणारे दोन्ही फ्री' छापाची जाहिरात तर नाही ना वाटत ही? सावधगिरी बाळगा हो तात्या; उद्या कविता/गीते/गझलाबिझला लिहिणारे कच्चा माल म्हणून विडंबने आणि केशवसुमार वा तत्सम कुणीतरी ट्राय करायला मागायचे ;) :)
(सावध) बेसनलाडू
20 Sep 2007 - 7:04 am | सन्जोप राव
संजोपरावांच्या बंगल्यावर भेटलो असताना टीशर्ट आणि लुंगी या पेहेरावात पाहिलेली तुमची बेताची (!) बॉडीही डोळ्यासमोर आली!
दोन चुका तात्या. बंगला सन्जोप रावांचा नाही (जशी सर्किटला तुम्ही जीतून फिरवले ती गाडी तुमची नाही!) आणि केशवाची बॉडी बेताची? हां अर्थात तुमच्या आमच्या तुलनेत बेताचीच, पण तरीही आज उद्या नंबर तपासून घ्या. (चाळीशी आली आता!)
सन्जोप राव
21 Sep 2007 - 6:42 pm | केशवसुमार
देवगडच्या तात्यांनू अन कोल्हापूरच्या रावांनू
विषय माझ्या बॉडीचा का काढीला
नजर नगा लावू माझ्या बॉडीला..
चूक झाली माझी लाखमोलाची
दाखिवीली बॉडी तुम्हा बेताची
विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला
नजर नगा लावू माझ्या बॉडीला !
भीड काही ठेवा आल्यागेल्याची
वाकडी ही नजर तुम्हा मेल्यांची
घाबरून असतो "केश्या" , तात्या तुमच्या जाडीला
नजर नगा लावू माझ्या बॉडीला !
21 Sep 2007 - 6:48 pm | विसोबा खेचर
ख ल्ला स !!!
अरे केशवा, लेका किती कविता आणि विडंबनं प्रसवशील?! :)
21 Sep 2007 - 9:42 pm | सर्किट (not verified)
घाबरून असतो "केश्या" , तात्या तुमच्या जाडीला
हा हा हा !!!
केशवसुमारजी, साष्टांग दंडवत !
दुसरे शब्दच नाहीत !
आपल्याला एक आयडीया देतो. एकाच कवितेची शंभर विडंबने करून त्याचा संग्रह प्रकाशित करावा. मराठीत तार काय, कुठल्याही भाषेत आजवर असा प्प्रयोग झाला नाही.
- सर्किट
22 Sep 2007 - 12:15 pm | केशवसुमार
काय राव गमज्या करताय का गरीबाची..
बाकी सर्किटशेठ आयडीयेची युक्ती बेस्टच आहे..
केशवसुमार
20 Sep 2007 - 12:51 am | सर्किट (not verified)
मागील पानावरून पुढे चालू !
मस्तच !
- सर्किट
20 Sep 2007 - 2:20 am | गुंडोपंत
सहर्ष स्वागत आहे!
आपला
गुंडोपंत
20 Sep 2007 - 6:34 am | सहज
दिवसाची सूरवात तर छान झाली!!
20 Sep 2007 - 8:20 am | आजानुकर्ण
धमाकेदार सुरुवात.
20 Sep 2007 - 11:20 am | विसुनाना
वा! वा! सुस्वागतम्म!
तुमच्या विडंबनामुळेच लोकांना (केवळ कुतुहलापोटी) मूळ कविताही वाचणे भाग पडते.
तुम्ही आलात.. आता लिहायला हरकत नाही. ;)
20 Sep 2007 - 11:50 am | स्वाती दिनेश
तुमच्या विडंबनामुळेच लोकांना (केवळ कुतुहलापोटी) मूळ कविताही वाचणे भाग पडते.
असेच...
स्वाती
20 Sep 2007 - 11:32 am | सुरेखा पुणेकर
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
यिडांबान फरमास हाये. आनकी यखाद्या लावनीचं यिडांबान द्या की आमास्नी करून. नका जाऊ पावनं जरा थांबा ....
20 Sep 2007 - 11:45 am | झकासराव
जवानीत आम्ही ज्या पोरीवर जिवापाड लाईन मारत होतो>>>>>>>>..
तात्या मग आता खरच म्हातार झालात की काय?
आता लायनी मारण बंद केल की काय?
तात्या तुमच्या एका वाक्यातुन दोन प्रश्न तयार झाले आहेत. :)
केसु तुझ विडंबन आवडल रे.
20 Sep 2007 - 12:25 pm | प्रमोद देव
केशवसुमारांचे इथले आगमन अगदी झोकात झालेले आहे. पहिल्याच चेंडूवर सणसणीत षटकार ठोकलाय त्यांनी.
ह्यापुढेही त्यांची झंझावाती टोलंदाजी आम्हा सगळ्यांना पाहायला मिळेल अशी आशा करतो.
20 Sep 2007 - 2:19 pm | उग्रसेन
रेशमाच्या भावांनी,रेशमाच्या काकांनी
तब्येतीने ठोकीले हो बॉडीला
हात नग लावू या येड्याला.
अश्या वळी घूसाडायला होत्या,
बाकी जोरदार लिव्हले बरं का.
20 Sep 2007 - 10:32 pm | जगन्नाथ
हहलोपो!
21 Sep 2007 - 2:06 am | धनंजय
हा माणूस बिन-विडंबनाच्या कविता कुठल्या आयडीखाली लिहितो ते कोणी सांगा मला. कारण लिहीत असलाच पाहिजे!
21 Sep 2007 - 11:58 pm | सर्किट (not verified)
माझ्या माहितीप्रमाणे केशवसुमारांच्या मेंदूत बिन-विडंबनाच्या कविता करण्याच्या राखाडी पेशीच नाहीत. आणि तेच बरे आहे :-)
- सर्किट
22 Sep 2007 - 12:01 am | बेसनलाडू
तात्यांचे हे आडनावबंधू त्यांच्या मूळ नावानेही छान कविता लिहितात आणि यापूर्वीही लिहिल्या आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण सध्या त्यांना स्वतःला त्यांच्या या प्रतिभेचे मोल कवडीमोल वाटते, असे खात्रीलायकरित्या समजते ;)
22 Sep 2007 - 12:01 pm | केशवसुमार
बेशनशेठ, हा अंतरजालाच्या आचारसंहितेचा भंग आहे.. लोकांची गुपिते अशी चावडीवर बोलू नये.. पण छान का काय ते म्हणालात ना म्हणून निषेध नाही करत..;)
पण तुमचे बातमीदार तुम्हाला खरच खात्रीलायक बातम्या देतात का ते बघा बुवा..
(लाडूप्रेमी) केशवसुमार
23 Sep 2007 - 1:06 am | बेसनलाडू
छे हो, कसले बातमीदार बितमीदार!!! हा आमच्या 'संशोधनाचा' निष्कर्ष आहे. नाहीतरी इकडे बरेच 'संशोधन' चालू असतेच; म्हटले आपणही करावे थोडे ;) काय?
(संशोधक!)बेसनलाडू
22 Sep 2007 - 8:32 am | आजानुकर्ण
केशवसुमार जेव्हा पांढरा शर्ट घालतात तेव्हा बिनविडंबनाच्या कविता लिहितात. आणि काळा शर्ट घालतात तेव्हा विडंबनाच्या.
(शिष्योत्तम) आजानुकर्ण ;)
22 Sep 2007 - 9:30 am | प्रमोद देव
आजानुकर्ण हा आधुनिक एकनाथ दिसतोय. संजोप राव,केशवसुमार वगैरे ह्याचे बरेच (२१)गुरु दिसताहेत.
22 Sep 2007 - 9:38 am | विसोबा खेचर
आजानुकर्ण हा आधुनिक एकनाथ दिसतोय. संजोप राव,केशवसुमार वगैरे ह्याचे बरेच (२१)गुरु दिसताहेत.
तुम्हाला एकनाथ ऐवजी एकलव्य असं म्हणायचंय का प्रमोदकाका? अहो बिचार्या आमच्या नाथांना कशाला उगाच मध्ये आणताय? :))
आपला,
(भागवतधर्मी) तात्या.
22 Sep 2007 - 11:28 am | प्रमोद देव
कारण एकनाथांनी २१ गुरु केले होते असे नुकतेच कुठे तरी वाचल्याचे स्मरते. आजपर्यंत तू रावसाहेबांना आपला गुरु मानत होतास(भले ते तुला त्यांचा शिष्य मानोत अथवा न मानोत.... अस्सल पुणेकर...इति.पुलं).पण आज केशवसुमारांचेही पट्टशिष्यत्व पत्करलेस तेव्हा शंका आली. म्हटले हा देखिल नाथांचा आधुनिक अवतार दिसतोय (गुरु बनवण्याच्या बाबतीत).
22 Sep 2007 - 11:27 pm | धनंजय
पावसाळ्यात सुळकेबिळके चढून "आम्ही मराठी माणसं मनात आणलं तर असं वाटेल ते करू शकतो" म्हणायला आम्हाला जागा ठेवतात. उद्या बिन-अंगठ्यांनी एकलव्यांनी हेच पराक्रम केलेत आमच्या आळशी स्वाभिमानाचा पुरताच चंदामेंदा होईल.
22 Sep 2007 - 9:38 am | सहज
बघा देव साहेब केलात घाया. घ्या आता राहिलेल्या १९ सीट भरायला गुरूंची ही तारांबळ उडणार आहे की एखादा शिष्यच जाणे..
शिवाय ही बातमी सुटीच्या दिवशी जाहीर केलीत, लांब गावच्या भावी गुरूंना नाराज केलत.
22 Sep 2007 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे
बोर्डात आलेल्या विद्यार्थ्याच्या नावावर इतके क्लास वाले आपला विद्यार्थी, असा शिक्का मोर्तब करतात कि हा आपले शाळा कॉलेज संभाळून किती क्लासला एकाच वेळी जात होता असा प्रश्न पडतो.
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे
22 Sep 2007 - 11:53 am | केशवसुमार
प्रमोदशेठ,
काय हे तुम्ही तुमच्या आवडत्या लेखकाचे आमच्याबद्दलचे हे वाक्य कस काय विसरलात? बर जाऊदे ते वाक्य इथे वाचा .
बाकी अजानूकर्णशेठ तुम्ही खरोखरच शिष्योत्तम आहात.. गुरुची सगळी वाक्ये तुम्हाला तोडंपाठ दिसतात..
केशवसुमार
29 Sep 2007 - 7:50 pm | अनिला
आहो, एवधे सुन्दर विड्म्बन अवघ्या त्रिख्डात वाचले नव्ह्ते.
30 Sep 2007 - 8:33 am | विकास
फारच मस्त विडंबन आणि पुढे अजून उस्फुर्त काव्य! अशा लोकांबद्दल आदर आणि अचंबा वाटतो!
"रेशमाच्या बाबांनी" या ओळी वाचल्यावर एकदम "गंगा-यमुना डोळ्यात उभ्या का? " या गाण्याच्या या पहील्याच ओळींवरून मला वाटते वि.आ. बुवांनी विनोद केल्याचे आठवते की, "कवीला खरे तर आपल्या शेजारातील दोन मुलींच्या वागण्यावरून प्रश्न पडला आहे - गंगा यमुना बोळात उभ्या का?" याची आठवण झाली!
2 Oct 2007 - 9:03 am | सुमीत
मस्तच आहे विडंबन काव्य, तात्यांचे प्रतइसाद आणी तुमचे उत्तरे वाचून तर ह ह पु वा
5 Oct 2007 - 3:16 pm | लिखाळ
सुंदर विडंबन !
सर्व प्रतिसाद सुद्धा मजेदार.
आगमन झोकात झाले आहे. अजून येवू द्या !
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
29 Mar 2008 - 10:38 am | gavacha patil
aaplyala kavita laei aavadli.......baba.......
reshmacha baap ani maza sasara ekcha kulatle....
tyacha mayala ...
maza sashatang namskar.
gavacha patil..
13 Dec 2008 - 7:25 pm | बाकरवडी
असेच एक विडंबन मी कुठेतरी ऐकले होते
रेशमाच्या बाबांनी,काळ्या काळ्या हातांनी,
रेशमाच्या कानाखाली वाजवली,
रेशमा आमची घाबरली....
पुढचे काही माहीत नाही.
(हे विडंबन माझे नाही! अधिच सान्गतो. )
19 Jun 2012 - 2:42 pm | बॅटमॅन
ऐला काय खत्रा विडंबन!! उत्खननसत्रात नजरेतून कसं काय सुटलं काय माहिती. गणपांचे अनेक धन्यवाद या धाग्याच्या पॉइंटरबद्दल :)
19 Jun 2012 - 5:09 pm | चौकटराजा
असे असावे विडंबन . मिपावरील उत्खनन पटूस धन्यवाद !
19 Jun 2012 - 10:44 pm | जाई.
मस्तच आहे हे
28 Dec 2014 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा
@हात नगा लावू माझ्या बॉडीला ! =)))))
अफाssssssssssट आहे हे! =))
28 Dec 2014 - 7:19 pm | मुक्त विहारि
आज खूप दिवसांनी मनापासून हसलो.
28 Dec 2014 - 7:33 pm | टवाळ कार्टा
अप्रतिम...कोणीतरी यावर व्हिडो रेकॉर्डिंग करायला हवे :)