विठ्ठल नाम

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
20 Jul 2021 - 9:46 am

अभंगाची गोडी
चिपळाची जोडी
विठ्ठल नाम माळी
भक्ती फुले भाबडी...

अगम्य भिंती तोडी
शरीर झोला सांडी
चराचर चैतन्य बहू
मना सुख जोडी...

वेल वाढती वाकडी
शोधे आधार बापुडी
नाही बांडगुळ हे जाण
तू बांध नामाची झोपडी...

वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...
-भक्ती

जीवनमान

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

20 Jul 2021 - 2:07 pm | गॉडजिला

वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग
डोळ्यांत सूर्य बुडी...

याचा अर्थ काय ?

मोक्ष मिळेल म्हणून वाट पाहून जीव थकलाय पण अजूनही तो मिळाला नाहीये. रोज रोजच सूर्यास्त पाहावा लागतोय म्हणजे अजूनही हे दैनंदिन जीवन चालूच आहे. मोक्षाची वाट बघणे सुरुच आहे असे काहीसे म्हणावयाचे आहे असे वाटते.

गॉडजिला's picture

20 Jul 2021 - 3:04 pm | गॉडजिला

धन्यवाद

Bhakti's picture

20 Jul 2021 - 5:34 pm | Bhakti

जिलाजी धन्यवाद
धन्यवाद प्रचेतस!
थोडासा वेगळा अर्थ ,
मोक्ष हा आहे पण तीचे रूप अजूनही साजिरे झाले नाही असे रोजच्या दिनक्रमात वाटते,ऐहिक जीवन सोडून आपल्या​लाही मोक्षाची आस आहे..त्याने जीव थकतो.पण सायंकाळी सुंदर सूर्य बुडताना वाटतं ना कधी कधी आज दिवस खरोखर सुंदर होता,असाच उद्याही सुंदर दिवस व्हावा आणि असाच रोज रोज सूर्य बुडताना पाहावा...हाही ऐहिक जीवनातला त्या दिवसातला मोक्ष आहे.
विठ्ठल विठ्ठल _/\_

प्रचेतस's picture

22 Jul 2021 - 2:11 pm | प्रचेतस

हाही अर्थ वेगळाच, आवडला.

तुषार काळभोर's picture

22 Jul 2021 - 2:27 pm | तुषार काळभोर

एकदम छान!

गॉडजिला's picture

22 Jul 2021 - 2:43 pm | गॉडजिला

वाट पाहून थकली
येईल मोक्ष कावडी
रोज रोज का मग(?)
डोळ्यांत सूर्य बुडी...

इथे का मग (?) वाक्याने गोंधळ उडतो इतके सगळे व्यवस्थित काव्य शेवटी प्रश्न कसा पाडून संपले ते काही झेपले न्हवते. अगदी प्रत्यक्ष प्राच्यविद्या संशोधक संस्थेकडून जरी सकारात्मक स्पष्टीकरण आले होते तरीही...

पण शेवटच्या ओळी प्रश्न न्हवे तर समाधान दाखवत आहेत हा उलगडा आपण केल्याने.
अब सब ठीक..._/\_

पुष्कर's picture

22 Jul 2021 - 2:57 pm | पुष्कर

अन्वय लावायचा झाला तर, सूर्य रोज रोज डोळ्यात का बुडे - असा होईल. सूर्य बुडे असं पाहिजे ना? सूर्य बुडी असं क्रियापद होणार नाही. सूर्याने बुडी मारली - इथे बुडी हा शब्द बरोबर आहे, पण तो इथे क्रियापद नाही. फक्त 'डे' तुमच्या वरच्या डीकारान्त वाक्यांशी यमक साधणार नाही ही समस्या आहे खरी!

Bhakti's picture

22 Jul 2021 - 6:16 pm | Bhakti

पण एवढा विचार नाही केला मी, तरीही तो शब्द समर्पक वाटला आणि लिहीला.

पुष्कर's picture

23 Jul 2021 - 5:01 am | पुष्कर

हरकत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jul 2021 - 2:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रचना आवडली. लिहिते राहा.

संत नामदेवांची सहज आठवण आली-

मुख्य मातृकांची संख्या | सोळा अक्षरे नेटक्या
समचरणी अभंग | नव्हे ताळ छंदो भंग ||

-दिलीप बिरुटे

विठ्ठल विठ्ठल
सर्वांना _/\_