आभाची सायकल फेरी

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
3 Jul 2021 - 1:23 pm

संध्याकाळच आकाश तांबूस झालं होत.पाखर घराकडे झेपावत असतांना त्यांचे पंख त्या तांबूस आकशात एखाद्या उडणाऱ्या सावलीसारखे भासत होते.इवलाश्या खिडकीतून आभा हे सगळ निरखून पाहत होती.शेवटच गणित सोडवून कधी सायकल घेऊन मस्त चक्कर मारायला जाते इतकी उताविळ ती झाली होती.झाल एकदाच गणित सोडवून स्वत:शीच बोलत आभा पटकन “आई मी येते चक्कर मारून”अस बोलून ती खाली पोहचली सुद्धा.सायकल सुसाट चालवत ती मुख्य रस्त्याला पोहचली.थोड अंतर गेलं कि उजव्या वळणावर वळाली. आता नवीनच ट्रक झाला होता.तशी इथे पूर्वी शेती होती.पण आता मोकळे प्लॉटस पाडून इथे विक्रीसाठी होते. मोकळ्या जागेत हिरवळ आणि मध्यभागी जाणारा नुकताच तयार केलेला डांबरी रस्ता होता. आजूबाजूला कोणीही नव्हत.एरवी फिरणाऱ्या लोकांमुळे परीसर गजबजलेला असायचा पण आज रविवार त्यात पावसाचा अंदाज म्हणून त्यांनी दडी मारली होती.
आभा त्या मोकळ्या रस्त्याहून आनंद घेत आभा चकरा मारत होती.आभाळ भरून आल होत.थेंब पाऊसही सुरु झाला होता.दूर एक चाफ्याचं फुलांनी बहरलेल झाड तिला खुणावत होत.मोकळ्या हिरव्या गवतातून सायकल चालवत आता तिथे पोहचू.असा विचार करत तिने त्या मोकळ्या प्लॉटमधून सायकल पुढे केली.थोड पुढे गेल्यावर चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे झालेल्या चिखलाट आभाची सायकल फसली.ती जोर लावत सायकलं पुढे ढकलत होती ती तेवढीच फसत होती .तिचे शूज ,सायकलच्या मडगार्ड यात चिखल भरला होता त्यामुळे जड झालेल्या पावलांमुळे तिचा जीवही जड होऊन रडकुंडीला आला होता.
“थांब मी तुला मदत करते “ एक आवाज आला.लाल सुती साडी नेसलेली,छानसा आंबाडा ,ठसठशीत कुंकू लावलेलीतिशीतली एक बाई तिच्याशी बोलत होती.तिने आभाची सायकल अलगद उचालून रस्त्यापाशी आणली.
“एवढ्या पावसात असे एकटीने फिरू नये ,साप -विंचू फिरत असतात.” मघाशी ज्या जागेवर तिची सायकल फसली होती तिथे बोट करत लांब जाणारा साप तिने आभाला दाखविला.आभाला आता आपण तिथे असतो तर या विचारने भीतीने गाळण उडाली.
“चल पलीकडे एक डबक आहे तिथून या मोकळ्या बाटलीत पाणी आण आणि सायकलचे चाक स्वच्छ करू”
आभा पळतच पाणी आणायची त्यांनी सायकलच्या मडगार्डमधला चिखल दूर केला.
“तुम्ही कुठे राहता ?”आभाने त्यांना प्रश्न केला.
“मी इथेच जवळ राहते”ती बाई म्हणाली.
“तुम्हाला सापांची भीती वाटत नाही ?किती मोठा होता तो..”आभा आश्चर्याने बोलत होती.
“आधी वाटायची आता सापानेच मला इथे ठेवलंय कायमचं”ती बाई पुटपुटली.
छोट्याशा आभाला तिचे हे बोलणे काही समजले नाही.सायकल आता नीट चालते की नाही हे बघायला तिने जोरात ती चालवली.पुढे गेल्यावर आपण काकूंना थंक्स म्हणालोच नाही म्हणून ती परत आली तर तिला कोणीच दिसेना.काकू कुठे गेल्या इतक्या लवकर?
ती इकडे तिकडे शोधू लागली.तोच तिला लांबून पुन्हा तो साप दिसला.आभा पटकन घरी पळाली.
घरी येऊन तिने आईला घडला प्रसंग सांगितला.
“ प्रभात फेरीला गेलेल्या तिशीतल्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यु झाला.” बातमी छोट्याशा टीव्ही स्क्रोलहून खाली जात होती.

-भक्ती

कथा

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

3 Jul 2021 - 2:11 pm | गुल्लू दादा

छान बाळबोध कथा. धन्यवाद.

गॉडजिला's picture

3 Jul 2021 - 3:35 pm | गॉडजिला

बालकथा असेल तर सुरेख आहे...

पण शक्यतो गूढ कथा या 18+ लोकांच्या आयुष्यात घडतात... असा पायंडा आहे

कंजूस's picture

3 Jul 2021 - 4:22 pm | कंजूस

भयानक.

कॉमी's picture

3 Jul 2021 - 5:22 pm | कॉमी

चांगली भुतं सगळ्यात बेष्ट असतात.

कुमार१'s picture

3 Jul 2021 - 6:09 pm | कुमार१

छान

Bhakti's picture

3 Jul 2021 - 6:10 pm | Bhakti

सर्वांचे आभार!
कॉमी
खरच मला लिहीतांना भूत अंकल सिनेमा आठवत होता.
आता खरं खरं सांगतेच जाऊ द्या ;)
मागच्या आठवड्यात संध्याकाळी फिरायला गेले होते.पाऊस सुरू झाला तर एक लहान १२ -१३ वर्षांची मुलगी एकटीच होती.तिची सायकल चिखलात फसली होती.कथेतल्या भूताप्रमाणे खरं म्हणजे मी तिला मदत केली :)
पण मी तिथे नसते तर काय केलं असत लेकराने विचार करवत नाही.इतका सामसूम भाग होता तो.

गॉडजिला's picture

3 Jul 2021 - 7:18 pm | गॉडजिला

“तुम्हाला सापांची भीती वाटत नाही ही चांगली बाब आहे की ;)

Bhakti's picture

3 Jul 2021 - 8:47 pm | Bhakti

हा हा हा
:)
खरच मला लिहीतांना भूत अंकल सिनेमा आठवत होता.
भूत अंकल ऐवजी भूतनाथ वाचावे.

ती मुलगी बालपणीच्या तुम्हीच आहात फक्त तिची मदत करायला भविष्यातून आला आहात अशी गोष्ट तिला सांगायला हवी होती...

Bhakti's picture

3 Jul 2021 - 9:30 pm | Bhakti

जबरदस्त
टिनेट..

Bhakti's picture

3 Jul 2021 - 9:33 pm | Bhakti

रचक्याने
नवा वंडर वुमन पाहिला,त्यात असच काहीतरी आहे भूतकाळातून ती मित्राला बोलावते.

गॉडजिला's picture

3 Jul 2021 - 9:50 pm | गॉडजिला

नवा वंडर वुमन हा blunder woman आहे ;) मला काहीच झेपलं नाही. त्यात तिच्या मित्राला दोन चेहरे का ? एकवेळ टेनेट, इन्सेप्शन मला डोळे मिटून बघितले तरी पहिल्या प्रयत्नात व्यवस्थित समजून जातील पण Wonder Woman 1984 च्या धक्क्यातुन बाहेर यायला मला अजून बराच काळ लागेल... तो पर्यंत माझे आयुष्य मला फार मोठ्या दहशती खाली घालवायचे आहे...

तुमचा प्रतिसाद वाचण्यापूर्वी मी अमेजॉन वर The Tomorrow War पाहिला त्यातून व हॅरी पॉटर आणी आझकबानचा कैदी आठवून तुम्हीच तुमची मदत करायला तिथे गेला होता हि कल्पना सुचली कारण तिथे तुम्ही(दोघी) सोडून आणखी कोणीच न्हवतं ना :)

बिपीन सुरेश सांगळे's picture

3 Jul 2021 - 11:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

छान चित्र उभं राहिलं समोर

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Jul 2021 - 2:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली गोष्ट

पैजारबुवा,

सांगळेजी, पैजारबुवा खुप धन्यवाद!

टर्मीनेटर's picture

6 Jul 2021 - 10:16 pm | टर्मीनेटर

सुटसुटीत भूतकथा आवडली!