हिंदू कधी एकत्र येणार?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
20 Jun 2021 - 5:49 pm
गाभा: 

रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56)

गाभा एक आणि गोष्टी अनेक,

आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले...

पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली...

ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ...

गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे...

हिंदू कधी एकत्र येणार?

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

20 Jun 2021 - 6:11 pm | गॉडजिला

बसुन त्यात ठरवु, कसे एकत्र आणायचे ते.

फक्त सेना भाजप संबंधि बोलत असाल तर... त्याची शक्यता नाकारता येत नाही.

हिन्दुस्थान चे गजवा ए हिन्द झाल्या नन्तर

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 Jun 2021 - 7:37 pm | अनिरुद्ध.वैद्य

दर्बार होता हो ;)

गॉडजिला's picture

21 Jun 2021 - 4:24 pm | गॉडजिला

आदिलशाहीचा दरबार होता की विषय संपला. त्यापेक्षात्यांचे म्हणणे ऐका, मैत्री करा, कट्टे करा, चिल कराना भाऊ... कशाला वादविवाद करायचे आपापसात ?

Rajesh188's picture

20 Jun 2021 - 8:10 pm | Rajesh188

हिंदू धर्मात राहून माझी आर्थिक उन्नती होत आहे.
हिंदू धर्मात राहून मला समाजात संरक्षण मिळत आहे.
हिंदू धर्मात राहिल्या मुळे माझ्या अडचणी च्या वेळी मदत मिळत आहे.
असे वातावरण जेव्हा निर्माण होईल तेव्हा हिंदू एकत्र येतील ,त्यांच्यात दुरावा असणार नाही.
भले त्यांची राजकीय मत वेगळी असली तरी.हिंदू हित हीच प्राथमिकता असेल.

समाधान राऊत's picture

20 Jun 2021 - 9:02 pm | समाधान राऊत

(。ŏ﹏ŏ)

मी काय म्हणतो, सर्वजण एकत्र येउन मानव धर्माचे पालन कसे करता येइल असा विचार केला तर बरे होइल का?

धर्म ही आपली संकल्पना Religion च्या खूप वरच्या level ची आहे.

चौकस२१२'s picture

21 Jun 2021 - 10:45 am | चौकस२१२

तिता...
हो अगदी करूयात ना पण एक समाज म्हणून बघितले जातेच कि
मी भले मंदिरात जात नसेन.. कर्मकांडाला आणि अंधश्रेधला कडाडून विरोध करीत असें पण आवडो ना आवडो माझी ओळख समाजात " अमुक धर्माचा"
मग जर उगाचच माझया "सामाजिक ओळखीवर " अन्याय होत असेल तर मी त्या धर्मासाठी उभा राहणारच .. किती उदाहरणे द्यायची ! आणि खास करून एकीकडे "सर्वधर्म समभाव " जप करणाऱ्यांना त्याची व्याख्या हि " सगळ्यांना पाहिजे ते नियम " अशी करावयाचा "शातीर " / चापलुसी करावीशी वाटते तेवहा.

मंदिर गेला खड्यात . काह्ही फरक नाही ," शाळा आणि वयैद्यकीय उपचार हेच माझे मंदिर" असे असले तरी पण "मंदिर व्हावे" या भावनिक हक्क साठी मी भलावण करणारच ... मग भले "धर्मांध" म्हणून लेबल चिकटले तरी चालेल

अगदी सगळेच एका धर्माचे असले तरी १२ मैलावर जर भासहा आणि पद्धती बदलत असणार तर तेढ होणार ..
तेवहा अगदी मानवता वैगरे सगळे बरोबर असले तरी रोजचे प्रश्न आहेतच कि
एक क्षण असे धरुयात कि देशात सगळे खाऊन पिऊन सुखी आहेत , रोग नाही पण तरी तेढ आणि भांडणे थांबतील का? निसर्ग नियम आहे

कपिलमुनी's picture

21 Jun 2021 - 11:37 am | कपिलमुनी

हिंदू ची व्याख्या ठरल्यावर एकत्र येतील .
आधी हिंदू ची व्याख्या ठरवू या

कॉमी's picture

21 Jun 2021 - 12:02 pm | कॉमी

हिंदू ची पण आणि एकत्र येण्याची पण.

जगातील सर्वात प्राचीन असलेला धर्म((संस्कृती) हिंदू आहे.
जगातील कोणत्याच धर्मात झाले नाही त्याच्या पेक्षा किती जास्त आणि उत्तम दर्जा चे अनेक ग्रंथ हिंदू धर्मात आहेत.
योगा ,तंत्व ज्ञान,आरोग्य,कामजीवन,जीवनाचे सार,सर्व काही हिंदू धर्मात आहे.
आणि हिंदू हा असे सर्व विषयात ज्ञानदेणारा एकमेव धर्म आहे.
जे हिंदू देवदेवता, मानतात,सर्व प्राचीन ज्ञान चा आदर करतात ते सर्व हिंदू.

कॉमी's picture

21 Jun 2021 - 7:17 pm | कॉमी

जे हिंदू देवदेवता, मानतात,सर्व प्राचीन ज्ञान चा आदर करतात ते सर्व हिंदू.

हिंदूची लोकसंख्या एकहाती कमी करून टाकली की !

प्रसाद गोडबोले's picture

21 Jun 2021 - 11:36 pm | प्रसाद गोडबोले

१९४८ साली हिंदुबांधवांनी आमच्या " तत्वनिष्ठ गांधीवादी" आजोबांचा वाडा जाळला आणि सणसणीत कानाखाली लाऊन गाढ झोपेतुन कोणीतरी जागं करावं तसं काहीसं झालं. त्याच दिवशी आमचा हिंदु धर्माशी असलेला संबंध संपला. आता हिंदु म्हणुन कोणाविषयी आत्मीयता वाटत नाही. त्यामुळे हिंदु म्हणुन एकत्र यायची गरज वाट्त नाही.

मुक्त विहारि's picture

22 Jun 2021 - 11:09 pm | मुक्त विहारि

पण आता जुन्या गोष्टी विसरून, एकाच झेंड्याखाली यायला लागणारच आहे...

प्रसाद गोडबोले's picture

22 Jun 2021 - 11:49 pm | प्रसाद गोडबोले

पण आता जुन्या गोष्टी विसरून, एकाच झेंड्याखाली यायला लागणारच आहे...

आता तुम्ही कोणतातरी झेंडा हातात घ्यायचा आग्रहच करत असाल तर आमचा झेंडा आहे !!

cpi

Let the revolution begin !

बघूया लेखक मार्कसजींची यशस्वी मनधरणी कशी करतो ते.. लेखकाच्या स्टान्स वर हिंदू कसे एकत्र येऊ शकतात याचे भवितव्य दडलेले आहे आणि

मिपाकट्ट्याला सदस्य एकत्र आणायचा अनुभव मुळातच पुरेसा गाठी असल्याने मुव्ही काका हे ही आव्हान लीलया पार करतील असा मला विश्वास वाटतो.

रोचक धागा अन प्रतिसाद.

मुक्त विहारि's picture

23 Jun 2021 - 8:43 am | मुक्त विहारि

डोळ्यासमोर आले ...

गॉडजिला's picture

23 Jun 2021 - 1:47 pm | गॉडजिला

आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा।
माझिया सकला हरिच्या दासा।। १।।
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी।
ही संत मंडळी सुखी असो।। २।।
अहंकाराचा वारा न लागो राजसा।
माझ्या विष्णुदासा भाविकांसी।। ३।।
नामा म्हणे तया असावे कल्याण।
ज्या मुखी निधान पांडुरंग।। ४।।

नामदेवरायांची प्रार्थनापण किती गोड. ते काय मागतात तर
हरिच्या दासांनी कल्पनेची बाधा, संशय पिशाच्छाचा संसर्ग आपल्या तन-मनाला होणार नाही याची दक्षता बाळगावी. या राजस आणि राजयोगी भाविकांना अहंकाराचा थोडाही वारा लागू नये. मनातील संशय हा देवाजवळ, सद्गुरूजवळ जाण्यापासून रोखतो, कारण संशय भ्रम वाढवतो आणि भ्रमामुळे दृष्टी अंध होते. अंधासमोर साक्षात परमेश्वर उभा असला तरी त्याला तो कसा दिसणार, शक्यच नाही. तद्वत संशय आत्मज्योतीला झाकोळून टाकतो. तीच गोष्ट अहंकाराची. एकदा का अहंकाराचा झंझावात सुटला की, भले-भले योगी तपस्वी यांचा संयम अंगावरील उपरण्याप्रमाणे उडून जातो. त्यामुळे संशय आणि अहंकार या दोन गोष्टीपासून तुम्ही दूर रहा, तर तुम्हाला हरिच्या कुळामध्ये चांगले स्थान लाभेल असे नामदेवरायांचे आश्वासन आहे

गॉडजिला's picture

23 Jun 2021 - 2:01 pm | गॉडजिला

वरील प्रतिक्रीया वाट्सप मधुन सभार

सॅगी's picture

25 Jun 2021 - 1:36 pm | सॅगी

गडचिरोलीच्या जंगलातील दहशतवाद्यांचाही असाच झेंडा असतो ना?

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Jun 2021 - 8:18 am | अनिरुद्ध.वैद्य

हा झेंडा नक्कीच नको!

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Jun 2021 - 10:37 pm | अनिरुद्ध.वैद्य

जितक्या लवकर पसरेल तितकं चांगलं.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2021 - 10:17 am | प्रसाद गोडबोले

मुवी हे पहा :

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/in-fraud-case-famous-...

डी.एस.के झाले , आता परांजपेंचा नंबर ... चितळे गाडगीळ वगैरे लाईन मध्ये आहेत !

भांडारकर तो झांकी है, बालगंधर्व अभी बाकी है !

आता तुम्हीच ठरवा कोणता झेंडा घ्यायचा हातात ते =))))

अवांतर : बाकी इस्रायल मध्ये " गेर तोशाव" नावाची एक संकल्पना आहे , कधी वेळ मिळातर जरुर वाचा त्या विषयी !

मुक्त विहारि's picture

25 Jun 2021 - 11:30 am | मुक्त विहारि

हिंदू तितका मेळवावा...

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2021 - 12:34 pm | प्रसाद गोडबोले

मेळवा मेळवा , आमच्या कडून शुभेच्छा !

इत्यलम !

लेखनसीमा !

_____________________________________________________________________________

मुक्त विहारि's picture

25 Jun 2021 - 3:32 pm | मुक्त विहारि

धन्यवाद ....

रात्रीचे चांदणे's picture

26 Jun 2021 - 8:46 am | रात्रीचे चांदणे

अविनाश भोसलेंच्या घरावर पण ED ने छापा मारून 40 कोटीची मालमत्ता जप्त केली. चुकीचं वागला तर भरपाई करावीच लागणार, मग चितळे असो नाहीतर भोसले असो.
भुजबळांना अटक झाल्यावर आपण OBC चे नेते आहोत म्हणूनच कारवाही झाली अशीच ओरड त्यांनी केली होती.

क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/up-man-marries-woman-after-fak...
-------

हिंदू तितका मेळवावा ....

लोकसभेत ३०१ जागा त्या मुळे तर मिळाल्या.
हिंदू नी एकत्र येवून हिंदुत्व वादी सरकार केंद्रात स्थापन केले ना.
५५.७४% मत bjp ला मिळाली आहेत.
हिंदू नी एकत्र येवून त्यांची जबाबदारी पार
पाडली आहे.
आता सरकार नी हिंदू हिताचे निर्णय घेवून त्यांची जबाबदारी पार पाडावी.

चौकस२१२'s picture

5 Jul 2021 - 6:41 am | चौकस२१२

आता सरकार नी हिंदू हिताचे निर्णय घेवून त्यांची जबाबदारी पार पाडावी.
येथे आपण भाजपचं पाठीशी असलेल्या रा स्व संघाच्या विचारसरणीची थोडी ओळख करून घेणे अवयषयक आहे असे वाटते
- त्याना देशाचे हित अभिप्रेत आहे "त्यात हिंदूंचे आपोआप येते" मग असे देशाचे हित हे भाजप कि काँग्रेस राखते याने संघाला फार फरक पडत नाही असे म्हणले जाते ( हंम रहे ना रहे भारत ये रहना चाहिये" या "मनकर्णिका " या चित्रपटातील गीत आणि त्याचा अर्थ आठवा )

- दूर पल्याचा विचार ( आणि तो तसा फारच दूर पाल्याचा आहे अस हि मतप्रवाह आहे संघाच्या पाठीराख्यात , "आधी जनमानसाची मने वळवू सत्ता महत्वाची नाही" हा एक विचार आणि दूसरा "सत्ता आधी मग कार्यक्रम राबवू आणि मग मने वळतील " असे हे अंतर्गत द्वंद्वव

गॉडजिला's picture

28 Jun 2021 - 2:43 pm | गॉडजिला

आले का सर्व एकत्र ? कुठे भेटायचं वगैरे ठरलं का ?

काश्मीर: १८ वर्षीय मुलीचं जबरदस्ती धर्मांतर?; शीखांचं श्रीनगरमध्ये आंदोलन.....

https://www.loksatta.com/desh-videsh-news/conversions-marriages-sikh-lea...
---------

शीख समुदाय लगेच एकत्र आला...

गॉडजिला's picture

29 Jun 2021 - 12:52 pm | गॉडजिला

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीनं कुटुंबियांनी केलेल्या आरोपांविरुद्ध भूमिका न्यायालयात मांडली. आपण स्वतःच्या मर्जीने विवाह केला असल्याचं तिने न्यायालयात सांगितलं ???

कॉमी's picture

30 Jun 2021 - 4:45 pm | कॉमी

ह्या बद्दल सतत मुस्लिमद्वेष्टा टिव्हीटीवाट करणाऱ्या ट्विटर आयडीने आपला भंपक पणा उघड झाल्यावर वक्तव्ये बदलली. मुलीचे वय १८ नव्हते, २६ होते. जबरदस्ती धर्मांतर झाल्याचे पोलिसांनी सुद्धा फेटाळले आहे. तरी त्या मुलीचे लग्न दुसऱ्या शीख व्यक्तीशी लावण्यात आले.

https://www.thequint.com/amp/story/news/india/jk-sikhs?__twitter_impress...

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 4:56 pm | गॉडजिला

तुम्हाला व मुविकांकाना मी निर्मळ मनाचे माझे चांगले मित्रच मानतो त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन कोणीतरी त्यांना मेनूपुलेट केल्यानेच त्यांनी घाईघाईत शहानिशा न करता प्रतिसाद दिला असावा ???

आपण तिघेही एक कट्टा करू व ज्यात कॉफी आणि मद्याची रेलचेल ठेवू अन गप्पागोष्टी करू ज्यावर मी इथे एक फोटो सकट धागाही काढेन असे मी आता सुचवतो.. काय म्हणता मित्राहो?

कॉमी's picture

30 Jun 2021 - 5:11 pm | कॉमी

जरूर ! जुलै नंतर कधीपण तयार.

मुविकाकांची यात चूक नाही आहे, ज्यांनी ही बातमी खोटे बोलून पसरवली त्यांची चूक आहे. शहानिशा करणे त्या पॉइंटला मुवींच्या पण हातात नव्हते. त्यापुढे ते तरी काय करणार ? त्यांनी वाचलं आणि टाकलं. शेवटचं वाक्य वाचायचं राहिलं असेल कदाचित. आपल्या मताशी जुळणारी घटना झाली की एकंदर चित्राच्या विरोधात जाणाऱ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष भल्याभल्यांचे होते (Including me.)

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 6:03 pm | गॉडजिला

शहानिशा करणे त्या पॉइंटला मुवींच्या पण हातात नव्हते. त्यापुढे ते तरी काय करणार ?

हम्म खरं आहे... आपण यासाठी मुविना दोष दिला नाही पाहिजे तसेच मिपाचे अथवा भारताच्या धोरणात अफवा पसरवणे अथवा शहानिशा न करता नेटवर बातमी पेरणे अक्षम्य गुन्हा जरी ठरू शकत असेल तरीही मूवी काका नी त्यांचे विधान करताना क्वेश्चन मार्कचा खुबीने वापर केल्यामुळे ते कोणत्याही कायद्यात सकृतदर्शनी चूक ठरणार नसावेत.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2021 - 5:55 pm | मुक्त विहारि

https://youtu.be/Jya24IjYpHY

---------

ही बातमी भारतात कुठल्या वर्तमान पत्रांत आली?

नावातकायआहे's picture

30 Jun 2021 - 7:28 pm | नावातकायआहे

हिन्दुस्तान टाईम्स.

सोमालीयन रेफुजी होता आणि त्याला मानसोपचार चालू होता.

https://www.hindustantimes.com/world-news/germany-three-dead-several-inj...

द हिंदू, इंडिया टुडे इथे पण आली आहे बातमी.

पण गुगल सर्च करणे हा गुड फेथ मार्ग वापरतील तर ते मुक्त विहारी कसले ! मुक्तपणे दाणकन मिपावरच येणार ते :)), आणि बॅड फेथने असे सुचवतील कि ही बातमी कोणत्याच पेपरात आली नाही.

तसे ते मनाने अत्यन्त निर्मळ व सरवांचेच चांगले मित्रही आहेत. पूर्वी ते मिपाकर जोडण्यात पुढे होते असे त्यांचे धागे व प्रतिसाद वाचून दिसते आहे सध्या त्यांनी थोडा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे आणि तो म्हणजे हिंदूना त्यांचे क्षात्रतेज परत मिळवून देणे, जागृती करणे हे हि त्यांचे रिसेंट प्रतिसाद वाचूनच समजून येते आहे आणि मिपाकर म्हणून त्यांच्या या उद्योगाचा आपण अर्थातच मान राखणे आवश्यक आहे... कारण शेवटी ते जोडायचे काम करायचा प्रयत्न करतात लोकांना विभागायचा नाही...

त्यामुळे त्यांच्या योग्य त्या सर्व कृतींना पाठिंबा होता व पुढेही राहील आणि इतरांनी हीच कृती अनुसरावी ही माझीही वैयक्तिक अपेक्षा आहे

मुक्त विहारि's picture

30 Jun 2021 - 10:21 pm | मुक्त विहारि

छापील बातमी येऊनही, आपल्या देशातील, मानवाधिकारवाल्यांनी काही टिप्पणी केली नाही...

----------

मानसोपचारांची मदत ऐनवेळी लागतेच.....

https://youtu.be/2FmWzeUGV8c

मुक्त विहारि's picture

30 Jun 2021 - 5:58 pm | मुक्त विहारि

धाग्याचे नाव हिंदू कधी एकत्र येणार पेक्षा मुस्लिमविरोधी अनेकडोट्स असे ठेवावे, सार्थ होईल.

Rajesh188's picture

30 Jun 2021 - 7:20 pm | Rajesh188

आताच एक लोकसत्ता मध्ये बातमी वाचली.भारतात सर्वात जास्त धर्मांतर हिंदू धर्मातून होत आहे.
धर्मांतर करणारे अनुसूचित जाती आणि जमाती मधील लोक जास्त आहेत. ओबीसी मधील पण लोक आहेत.
धर्मांतर करण्याचे महत्वाचे कारण हिंदू धर्मात त्यांना भेदभाव ला समोर जावे लागते.
म्हणजे हे धर्मांतर होण्याला हिंदू पण जबाबदार आहे.
सर्वात जास्त हिंदू Christan धर्मात जात आहेत.
दक्षिण भारत हे प्रकार जास्त घडतात.
पण तरी सुद्धा हिंदू च्या एकूण लोकसंख्येत जास्त फरक पडलेला नाही ,आणि पडणार पन नाही.
अगदी आणीबाणी ची स्थिती नाही.

पण तरी सुद्धा हिंदू च्या एकूण लोकसंख्येत जास्त फरक पडलेला नाही ,आणि पडणार पन नाही.
अगदी आणीबाणी ची स्थिती नाही.

टक्का इतरांचा वाढतो आहे की नाही याचा अभ्यास आपण ऑप्शनला टा़कला असावा ?

कॉमी's picture

30 Jun 2021 - 8:19 pm | कॉमी

त्या वाढत्या टक्क्यावरून काय निर्णय घ्यावा ?
(असाच प्रश्न विचारला आहे. मला व्यक्तिष: फारशी माहिती नाही. S.Y.QURESHI (पूर्व EC अध्यक्ष) यांचे या विषयावरचे सरकारी डेटावर आधारित पुस्तक लाईन अप करून ठेवले आहे.)

त्या वाढत्या टक्क्यावरून काय निर्णय घ्यावा ?

हाच कि ज्याला कमी टक्के मिळतात त्याचा नंबर खालचा असतो. त्यामुळे आपला टक्का वाढो न वाढो इतरांचा तो वाढत असेल तर एक दिवस तुम्हाला तो मागे टाकेल ही काळ्या दगडावरील रेघ

इथे ते खरे नाहीये. तो पॉईंट येणार नाही. Fear-Mongering. तात्पुरते हे वाचा, पॉप्युलेशन मिथ वाचून सविस्तर लिहिणार आहे.
https://www.livemint.com/Opinion/5bsICkXvl4t4hXSewk8bkN/Four-out-of-five...

रात्रीचे चांदणे's picture

1 Jul 2021 - 8:09 am | रात्रीचे चांदणे

एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात 60-70 वर्षाचा काळ म्हणजे फार मोठा आहे परंतु देशासाठी 60-70 वर्ष म्हणजे काहीच नाही. त्यामुळे तुम्ही जे पॉप्युलेशन मिथ वरती सविस्तर लिहिणार आहेत त्यासाठी पुढच्या 300 -400 वर्षात जर अशीच लोकसंख्या वाढ होणार असेल तर काय होईल ह्याबद्दल लिहिले तर बरं होईल. वरच्या लेखा मध्ये पुढील 60 -70 वर्षे नंतर काय होईल हेच लिहिले आहे. परंतु भारता सारख्या देशासाठी हा काही मोठा कालखंड नाही.

कॉमी's picture

1 Jul 2021 - 8:29 am | कॉमी

जरूर.

कॉमी's picture

1 Jul 2021 - 8:33 am | कॉमी

तुमचं याकडे दुर्लक्ष झाले दिसतेय
But this ignores the fact that growth in Muslim population is actually falling faster than the Hindu population growth rate.

रात्रीचे चांदणे's picture

1 Jul 2021 - 1:39 pm | रात्रीचे चांदणे

दुर्लक्ष नाही झालं, परंतु ह्यात काय चुकीचं आहे असं वाटतं नाही. मुळात मुस्लिम लोकसंख्या वाढ ही हिंदू लोकसंख्या वाढी पेक्षा भरपूर जास्त होती आणि अजूनही आहे. जो काही लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे तो फक्त 2001 ते 2011पुरताच आहे. 1991 ते 2001 व 1981 ते 1991 मध्ये तो हिंदू लोकसंख्या वाढीच्या दरा पेक्षा जास्तच होता.

ट्रेंड महत्वाचा नाहीये का ? फॅमिली प्लॅनिंग हळू हळू वाढणे आणि लोकसंख्या वाढदर हळू हळू कमी होत जाणे हे बदल ट्रेंडच्या रुपात दिसत आहेत. मुद्दा हा कि आत्ता उपलब्ध माहितीनुसार मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल ही हिंदुत्ववाद्यांच्या डोक्यातली आणि पसरवलेली हॉरर-फँटसी कल्पना आहे. त्याला माहितीच्या जोरावर शून्य आधार आहे. हिंदू-मुस्लिम लोकसंख्या वाढदरातला फरक घटतानाच दिसला आहे.

पॉप्युलेशन मिथ वाचून सविस्तर लिहिणार आहे.

सविस्तर लिहाच, अवश्य चर्चा करू लेखातील काही मुद्दे पटले नाहीत तेंव्हा एक धागा काढावा यावर आपण अवश्य चर्चा करूया...

धन्यवाद कॉमी एक चांगला विषय चर्चेला येऊदे

इतक्यात नाही, दोन महिने किमान.

लेखात मुद्दे नाहीत, तथ्य आहेत हे नमूद करतो.

तथ्ये असतील तर तथ्येच उरतील

लेखाची वाट पहात आहे...

प्रसाद गोडबोले's picture

30 Jun 2021 - 8:14 pm | प्रसाद गोडबोले

भारतात सर्वात जास्त धर्मांतर हिंदू धर्मातून होत आहे.

ह्यात वाईट काय आहे हे मला कळत नाही. लोकं धर्मांतर करुन जीवनमान सुधारेल ह्या आशेने अन्य धर्मात जात असतील तर त्यात चूक काय ?

उलट जितके जास्त लोकं हिंदु धर्म सोडून अन्य धर्मात जातील तितकेच हिंदु धर्मासाठी उत्तम असेल . मंदिरात असणारी गर्दी कमी होईल , भोंदु बाबा महाराजांचा रेव्हेन्यु घटल्याने त्यांचा धंदा बसेल , सण समारंभ उत्सव साजरे करण्याच्या नावाने सार्वजनिक ठिकाणी चालणारा उन्माद , रस्त्यात फटाके ऊडवणे, खड्डे खोदुन मांडव घालणे, , कमी होईल .

आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे - ज्या लोकांचा मुळातच हिंदु धर्मावर विश्वास नाही, त्यातील परंपरांचा अभिमान नाही, त्यातील तत्वज्ञानाविषयी आदर नाही , असे लोकं धर्मात राहुन काय उपयोग , उलट अशा लोकांनी धर्मांतर केले तर उर्वरित हिंदु धर्म हा जास्त चांगला असेल ह्यात शंका नाही !

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 8:31 pm | गॉडजिला

भलतेच लोक हिंदू धर्म सोडत आहेत हा असावा ?

जे लोक हिंदुत्व सोडल्याने हिंदूंचे कल्याण होईल ते अजून हिंदुत्व सोडतच नसावेत ?

Rajesh188's picture

30 Jun 2021 - 8:47 pm | Rajesh188

ह्याला दोषी कोण?
ह्या प्रश्नांचे उत्तर शोधणे गरजेचे आहे.रोगाचे मूळ माहीत पडले तर च उपाय करता येतील.
पण अतिशय दुर्दैव नी हे सत्य आहे अजुन हिंदू धर्म जाती पाती मध्ये विभागला गेलेला आहे.
महाराष्ट्रात अनेक महापुरुषांनी,संतांनी ,समज सुधारक लोकांनी जन्म घेतल्या मुळे जाती जाती मध्ये संघर्ष होत नाही .पण जातीभेद अजुन आहे.
रोटी, बेटी व्यवहार हिंदू मध्ये जाती च्या पलीकडे जावून होणे गरजेचे आहे.

उत्तर भारतात अजून पण जाती भेदाच्या भिंती मजबुत आहेत त्या अजुन ठिसूळ होणे गरजेचे आहे.
पण हिंदू राजकारणी च तसे होवून देत नाहीत.
आरक्षण चे गाजर सर्व जाती ना दाखवून संघर्ष निर्माण झाला पाहिजे हीच त्यांची रण निती आहे.
कसा होणार हिंदू एक?

चौकस२१२'s picture

5 Jul 2021 - 6:29 am | चौकस२१२

आरक्षण चे गाजर सर्व जाती ना दाखवून संघर्ष निर्माण झाला पाहिजे हीच त्यांची रण निती आहे.
"ते" राजकारणी म्हणजे नक्की कोण
बारामती कि नागपूर ?
टीका करायाची तर सगळ्यांवर करा ना
का फक्त नागपूर वाले जातीभेद करतात ( तरी बरं मोदी, शाह आणि योगी "जनेउधारी" नाहीत ) मग बारामती चे "जाणते राजे
" कडून जागीर सभेत "पगडी नको पागोटे" असले चाळे होतात त्याच काय? का त्याच्याकडे सुमडीत कानाडोळा !

हिंदू धर्म जाती पाती मध्ये विभागला गेलेला आहे.
हेच उगाळत राहायचं आणि म्हणून "हिंदू एकत्र व्हावा " या प्रयातनांना असा धोशा लावून एक प्रकारचा छुपा विरोध करावयाचा !

रात्रीचे चांदणे's picture

30 Jun 2021 - 8:48 pm | रात्रीचे चांदणे

.ह्यात वाईट काय आहे हे मला कळत नाही.
जर हे असेच होत राहील तर भारतात एक दिवस मुस्लिम कायदा लागू होईल, 1990 साली जी परिस्तिथी काश्मीर मधील उरलेल्या हिंदूंवर आली तीच इतर राज्यातील हिंदूंवर होईल.

Rajesh188's picture

30 Jun 2021 - 9:05 pm | Rajesh188

आधुनिक काळात कोणत्या देशात मुस्लिम कायदा लागू झाला आहे का?

चौकस२१२'s picture

5 Jul 2021 - 11:27 am | चौकस२१२

भाऊ तोरसेकरांचे एक तर्क म्हणून विचार करण्यासारखे विधान
https://www.youtube.com/watch?v=Io3pf7z7diA&t=84s

हिंदू एकत्रित नसल्यमुळे फार मोठया संख्येने एकदम हिंदूंचे धर्मांतर होणे अवघड आहे
म्हणजे असे कि ज्याला हिंदूंना मोठ्याप्रमाणात धर्मांतर घडवून आणण्याचे आहे त्याने अगदी शंकराचार्यांना जरी धर्मांतराला राजी केलं तरी याचा अर्थ हिंदू सगळे खाली मान घालून त्यान्चा मागे जातील असे नाही !

जसे मानव प्रगत होतील धर्म कमजोर होत जातील .
पुढे जास्त वर्ष धर्म टिकणार नाहीत.
पण प्राचीन ज्ञान ,संस्कृती,आहार,विहार हे धार्मिक कारणाने तो पर्यंत नष्ट झाले नाही पाहिजेत.तो मानवाच्या प्रगती ची इतिहास आहे.

Rajesh188's picture

30 Jun 2021 - 9:34 pm | Rajesh188

हे महाभारत मध्ये आहे सर्व श्रेष्ठ धनुर्धर , दाणी व्यक्ती का .
सूत पुत्र म्हणून हीनवून त्याचा अपमान करणाऱ्या हिंदू धर्मात धर्मांतर का नाही होणार.
अजुन पण ती चूक सुधारली जात नाही
टिप.
मी मागासवर्गीय नाही हिंदू धर्मात समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित जाती मधील आहे.आणि हिंदू धर्माच्या अनेक गोष्टींचा अभिमानी आहे.

गॉडजिला's picture

30 Jun 2021 - 9:41 pm | गॉडजिला

सर्व श्रेष्ठ धनुर्धर , दाणी व्यक्ती का .

श्रेष्ठ धनुर्धर ठीक आहे दाणी व्यक्ती कसा ? माझ्या अंगातून फुकट सोने निर्मार होऊ लागले तर मी हि ते जगभर वाटत सुटेन कि...

मदनबाण's picture

3 Jul 2021 - 1:19 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - twenty one pilots - Heathens ( Lyrics )

जगात हिंदुत्व सोडून बाकी काही अस्तित्वातच नाही असे मानणाऱ्या हिंदूंना इतर धर्म हि गोष्टच आउट ऑफ सिल्याबस आहे याची अजूनही जाणीवच झालेली नाही... त्यामुळेच मुळात हिंदुत्व म्हणजे काय याचाच गोंधळ उडालेला दिसतो

बरं इतर धर्मानचा उगम भारतभूमीत झाला असता तर काही ना काही जुगाड मारून ते शेवटी हिंदूच असं तरी ठसवता आले असते पण आता तेही शक्य नाही...

त्यामुळे जेवढ्या लवकर शहाणपण येईल तेव्हडे बरे असे म्हणण्या खेरीज अन्य काहीच तूर्त शक्य नाही

प्रसाद गोडबोले's picture

4 Jul 2021 - 9:18 pm | प्रसाद गोडबोले

पर्फेक्ट २ !

गॉडजिला's picture

4 Jul 2021 - 9:51 pm | गॉडजिला

पर्फेक्ट २

म्हणजे काय ?

प्रसाद गोडबोले's picture

5 Jul 2021 - 1:06 am | प्रसाद गोडबोले

बरं इतर धर्मानचा उगम भारतभूमीत झाला असता तर काही ना काही जुगाड मारून ते शेवटी हिंदूच असं तरी ठसवता आले असते पण आता तेही शक्य नाही...त्यामुळे जेवढ्या लवकर शहाणपण येईल तेव्हडे बरे असे म्हणण्या खेरीज अन्य काहीच तूर्त शक्य नाही

तुमचा हा प्रतिसाद पाहुन आमच्या आधीच्या अनुमानाला दुजोरा मिळाल्याचा आनंद झाला .
तुमची भाषा शैली आणि लेखनातील विचार पाहुन तुम्ही गट क्र. २ चे पर्फेक्ट रीप्रेझेंटेशन करता असे म्हणायचे होते . सारखं सारखं लिहित बसायचा कंटाळा आलाय , आता मी फक्त " २ " इतकाच प्रतिसाद देत जाईन आपल्या विचारसरणीच्या प्रतिसादांवर !

इत्यलम

हरकत नाही तुम्हाल आनंद मिळणार असेल तर हे वास्तव नसूनही स्त्रीहट्ट व बालहट्ट पुरवला पाहीजे या सवयीने मी आनंदाने वाचेन... कंटाळा करू नकोस, लिहते राहा...

Rajesh188's picture

4 Jul 2021 - 9:52 pm | Rajesh188

असे आव्हान केले की संबंधित व्यक्ती ना ते बरोबर समजते.बरोबर सर्व हिंदू समाज एकत्र येतो.
एकत्र येण्या अगोदर तो धर्म म्हणजे काय,हिंदू धर्म आहे का?
असल्या फालतू प्रशांचे उत्तर शोधत बसत नाही.
आपण कोणाशी जास्त जवळचे आहोत हे त्यांना बरोबर समजतो.
धर्म म्हणजे काय,हिंदू म्हणजे कोण.
हे असले प्रश्न फक्त अती विद्वान लोकांना पडतात.
सामान्य लोकांना नाही

गॉडजिला's picture

4 Jul 2021 - 9:54 pm | गॉडजिला

असे आव्हान केले की संबंधित व्यक्ती ना ते बरोबर समजते.बरोबर सर्व हिंदू समाज एकत्र येतो.
एकत्र येण्या अगोदर तो..

इतर बाबींनी विखुरलेला असतो...

योग्य वेळी एकत्र येतो.
उदा .९३ ची दंगल.
जेव्हा हिंदू धर्मावर संकट येते तेव्हा सर्व विखुरलेला समाज एक होतो.
धार्मिक बंधनात न राहता मत मांडण्याचा अधिकार,स्वतंत्र फक्त हिंदू धर्मात आहे .हिंदू हे हिंदू धर्मावर टीका करू शकतात त्यांना धर्मातून तीव्र विरोध होत नाही.
बाकी धर्मात हे स्वतंत्र नाही.
उदा.
Tasleema.
रश्दी.
बाकी गुपचूप घडामोडी घडणाऱ्या खतरनाक धर्मा विषयी माहीत नाही.
पण हिंदू आणि मुस्लिम हे दोनच धर्म कधीच काही लपवत नाहीत.
जे असते ते स्पष्ट असते.

गॉडजिला's picture

4 Jul 2021 - 10:06 pm | गॉडजिला

तर धागा लेखकाला हा धागा काढायची गरजच का निर्माण झाली असावी ?

जग पालथे घातले असते तर त्यांना जगात इतरत्र काय चालू आहे ते नक्की समजले असते अन एक दिवस खाडकन मुस्काटात मारून झोपेतून जागे केल्याप्रमाणे अवस्था झाली नसती... आजही हिंदूंनी

स्वतः चा निष्पक्ष अभ्यास करायची तयारी केली तर ते कोणत्याही आक्रमणाला तोंड द्यायला सिद्ध होऊ शकतात..

(काही बालगोपाळ आम्हाला नक्कीच गट क्रमांक एक अथवा दोन असे काही लेबल चिटकवतील, त्यांचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून स्वागत करत आहे)

इस्लामिक ट्रस्टकडून शेकडो हिंदू मुलींचे धर्मांतर, पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा

https://www.lokmat.com/national/conversion-hundreds-hindu-girls-islamic-...

https://www.esakal.com/maharashtra/nilesh-rane-criticism-on-supriya-sule...

कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष हिंदू हितवादी नाहीत, हे माझे वैयक्तिक मत आहे....

जेम्स वांड's picture

29 Nov 2021 - 10:44 pm | जेम्स वांड

राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण करणे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणे (अर्थातच भाजपात यायच्या अगोदर) हे पण त्यांची हिंदूंच्या विषयी असलेली कळकळ मानावी काय ?

कारण आजतागायत त्यांनी त्या विषयात माफी मागितलेली ऐकिवात नाही, का त्यांचा त्या त्या विषयातील स्टँड पक्षाला (हल्ली त्यांनी बस्तान मांडलेल्या पक्षाला) मंजूर आहे म्हणायचं ?

का अखिल हिंदू एकत्रीकरण कार्यक्रमाला ब्राह्मणद्वेषाची झालर असलेली चालेल म्हणता ?

जाता जाता

ह्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं आली की एक हिंदू म्हणून मी तुमच्याशी जो बंधुभाव शेअर करतो तो द्विगुणित होईलच, हा हिंदू एकत्र येणारच, कारण जर हुकूमशाहीत जगण्याचा प्रश्न असला तर मी कधीही एखाद हिंदू हुकूमशाहीच प्रेफर करीन !

(कन्फ्युज द्विज ब्राह्मण) वांडो.

स्वाभिमानी कर्तृत्व

त्यामुळे, अशा गोष्टींवर मी वाद घालत नाही ....

उडदामाजी काळे-गोरे असायचेच, काळे उदीड पण आपलेच असतात...

कपिलमुनी's picture

30 Nov 2021 - 12:31 pm | कपिलमुनी

ब्राह्मण हिंदू आहेत का ?

मुक्त विहारि's picture

30 Nov 2021 - 5:57 pm | मुक्त विहारि

पण, जातीभेद पाळणारे आणि आडनावा वरून माणसाची पारख करणारे, अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो ....

पण, जातीभेद पाळणारे आणि आडनावा वरून माणसाची पारख करणारे, अशा लोकांपासून मी जरा दूरच राहतो ....
>> +१
जन्मावरुन ज्या वेळी वर्ण सुरु झाले त्या वेळेपासुनच हिंदु धर्माची अधोगती चालु झाली.

जेम्स वांड's picture

30 Nov 2021 - 7:53 pm | जेम्स वांड

विषय वेगळा नाहीए ना हो खरंच, बघा म्हणजे मी प्रयत्न करतो तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे ते, शेवटी काय आपण दोघे साधी माणसे,

म्हणजे बघा सिम्पल आहे,

आमचे मुवि किंवा आम्ही बसणार हिंदू तेतुका मेळवावा टाईप कढ काढत, पण जर त्या मोबदल्यात, त्या सदिच्छेच्या अगेंस्ट मला फक्त

"धूर्त भटूरडा" "कृष्णाजी भास्करची औलाद" "बामने सगळे हलकटच" ऐकायला मिळत असेल, किंवा

दरेक बाधक घटनेचे पडसाद अन कार्यकारणभाव माझ्या जातीशी जोडताना दिसत असले तर

मी का हिंदू सगळे एकत्र करण्याचे काम करू ?

हा धर्म ब्राह्मणेत्तर हिंदूंचा पण आहे न ? मग घ्यावे की त्यांनीही तितकेच यत्न धर्मरक्षणाला, धर्मसाठी कळकळ बाळगून जर शेवटी मला जातीशी संलग्न विखारच मिळणार असेल तर मी किती दिवस हा व्यस्त व्यवहार चालवायचा अन का ? मी का माझे ब्राह्मणी संस्कार अन आयडेंटिटी जपत ज्यु लोकांप्रमाणे स्वतःची वांशिक ओळख बनवून जपू नये ? कारण एवीतेवी आजकाल ब्राह्मणांचे शिरकाण (ज्यूंचे झाले होते तसे) करायच्या कामना तर रोजच ऐकायला मिळतायत ना

मुक्त विहारि's picture

30 Nov 2021 - 10:14 pm | मुक्त विहारि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच... खूद्द छत्रपती शिवाजी महाराज, यांना देखील, त्यांच्या नातेवाईकांनी कूठे मदत केली? छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यात, गणोजी राजेशिर्के यांनी मदत केली..

चुका दोन्ही बाजूंनी झाल्या आहेत...

आता तीच चूक परत परत किती वेळा करायची?

इतिहास मला एक गोष्ट सांगतो की, विजयनगर साम्राज्य
नष्ट झाले, देवगिरी नष्ट झाली, ... आता तरी आपण एकत्र यायला पाहिजे...

मुविंसाठी हिंदू असणे म्हणजे एखादी विचारधारा असणे नसावे. जन्मलेला हिंदू म्हणजे हिंदू, किंवा शिक्का बदललेला हिंदू म्हणजे हिंदू.

मग तो हिंदूनमधल्या सबग्रुपचा द्वेष का करत असेना- तो हिंदूच.

मुक्त विहारि's picture

1 Dec 2021 - 9:42 am | मुक्त विहारि

एखाद्या जातीचा सरसकट द्वेष करणारे, आज किंवा उद्या बदलतील किंवा बदलणार नाहीत ....

पण, पाकिस्तान आणि बांगलादेश, मधील घटते हिंदू बघता, मी तरी जाती-भेदात अडकू शकत नाही ....

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 10:14 am | जेम्स वांड

जातीभेदाच्या बंधनात न अडकण्याचे "ऑप्शन" नाही ना आमच्याकडे, कारण ब्राह्मण म्हणून आम्ही कितीही जातीभेद पाळत नसल्याचे कंठशोष करून ओरडलो तरीही आम्ही तो पाळत नाही ह्यावर ब्राह्मणेतर हिंदू बांधव भरवसा ठेवत नाहीत ना !

एका कृष्णाजी भास्कर, मंबाजीच्या मागे एक मुरारबाजी देशपांडे अन एक बाजीराव पेशवे असल्याचे मान्य नाही लोकांना, दादू कोंडदेव (उच्चारी विखार ब्राह्मणेत्तर पद्धतीचा) अन गडकरी मंजूर नाही लोकांना.

आपण मला सांगावेत मी ब्राह्मण म्हणून किती दिवस ह्या स्वप्नात जगावे ? नकोय आपण इतर जातीय लोकांना हे वास्तव आहे का नाही ?

धर्मराजमुटके's picture

1 Dec 2021 - 3:45 pm | धर्मराजमुटके

जातीभेदाच्या बंधनात न अडकण्याचे "ऑप्शन" नाही ना आमच्याकडे

दुर्दैवाने खरे आहे. "बामना" विरुद्ध चा द्वेष शहरांपेक्षा खेड्यांत जाणिवपुर्वक जोपासला जातोय.

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 4:15 pm | जेम्स वांड

कमी आहे असेही समजणे खूपच मोठ्ठा गैरसमज असेल सर.

शहरात कमी आहे असेही समजणे खूपच मोठ्ठा गैरसमज असेल सर.

तुम्ही म्हणता तसेही असेल पण शहरात तो इतका प्रकर्षाने जाणवत नाही हे खरे. कदाचित धकाधकीच्या वातावरणात आपल्याला तितके निरिक्षण करायला वेळ नसेल असेही असू शकेल. मात्र टोकदारपणा कमी असावा.

वैयक्तिक अनुभव दोन्ही प्रकारचे मिळाले...

पण, इतर जातीतल्या मित्रांचे सकारात्मक अनुभव जास्त मिळाले.

विशेषतः सर्वांगीण वाचन करणारे, वैयक्तिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर जातीभेद मानत नाहीत.....हाच अनुभव आला ...

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 6:19 pm | जेम्स वांड

आपण हिंदू एकतेबद्दल तर वैयक्तिक पातळीवर नाही चर्चा करत आहोत ना. आपण सम्यक विचार करतोय, नाहीतर "वैयक्तिक" विचार करता १९४७, १९७१ इत्यादी काळातच ज्या हिंदूंनी पाकिस्तान अन बांगलादेशात राहायचा आत्मघातकी निर्णय घेतला त्यांच्या लोकसंख्या वाढो का कम होवो आपल्यास तोषीस लागण्याचे कारण नाही ना.

सम्यक पातळीवर मुटके सर म्हणतात तसेच चित्र आहे.

@ धर्मराज मुटके सर,

शहरे म्हणजे जर मुंबई पुणे म्हणत असाल तर दैनंदिन जीवन धकाधकीचे असल्यामुळे ब्राह्मणद्वेष जाणवत नाही, पण इतर शहरे पक्षी अगदी नाशिक, नागपूर, औरंगाबाद टाईप शहरांत पण हा प्रकार जोरात जाणवतो. संघटनांची नावे मी लिहीत नाही पण कित्येक जातींच्या संघटना ह्या आपापल्या मेळावे अधिवेशनात असा स्टँड क्लिअर घेत असतात, कधी कधी वाटते ब्राह्मण असे नेमके काय चुकत असावेत बरे ? पण असो, तूर्तास प्रश्न इतकाच आहे की अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उमटायला सुरुवात व्हायच्या ह्या काळात ब्राह्मण लोकांनी तरी हिंदू एकता, धर्मरक्षण, नीतिमत्ता, राजकारण इत्यादी सारखी बिनफायद्याच्या बाळंतपणात सुईण असल्याची भूमिका का अन कश्याला वठवावी ?

मुक्त विहारि's picture

1 Dec 2021 - 6:56 pm | मुक्त विहारि

खिळ्या साठी नाल गेली,

नालेपाई घोडा गेला

घोड्यापाई स्वार गेला

अन् स्वारापाई राज्य गेले

मी तरी असा खिळा होऊ इच्छित नाही ...

शिवाय, असा जातीद्वेष करणार्या माणसांमुळे, माझे आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांचे काहीही नुकसान झाले नाही.

जातीभेद पाळणारे, स्वतःचेच मानसिक आरोग्य, खराब करत असतात.

जेम्स वांड's picture

1 Dec 2021 - 7:00 pm | जेम्स वांड

असं नाही पण नम्रपणे सांगू इच्छितो की हा तुम्हाला वैयक्तिक आलेल्या अनुभवांचा प्रश्न नाही ना सर, प्रश्न वैयक्तिक नाही ना पण,

विस्मरण झाले असल्यास आदरपूर्वक आठवण करून देऊ इच्छितो की विषय आहे

हिंदू कधी एकत्र येणार?

आय होप तुम्ही आता तरी समजून घ्याल

ब्राह्मण विरुद्ध इतर हा विषयच धारदार मुळात. त्यात मागच्या १००/१२५ वर्षांपासून हळूहळू हे बीज फोफावत गेलंय. नंतर आपल्या राजकीय पक्षांनी फोडा आणि राज्य करा ही नीती पुन्हा पुन्हा वापरली आणि हा आता विषवृक्ष झालाय. असो. ब्राह्मण असल्यामुळे असे अनुभव जाणवले आहेत हेही खरंय.

अवांतरः श्री गोंदवलेकर महाराजांनी यावर एक सुंदर भाष्य केलंय. त्यांना जेव्हा कुणी विचारलं की हा विषय कसा संपेल, तेव्हा ते म्हणतात - "ब्राह्मणांनी अभिमान सोडावा आणि ब्राह्मणेतरांनी द्वेष. यानं हा विषय संपण्यास मदत होईल."

"ब्राह्मणांनी अभिमान सोडावा आणि ब्राह्मणेतरांनी द्वेष.

मराठी मनात कायम ब्राह्मण द्वेष पसरवणारी असे अनेक लांडगे,कोल्हे, तरस...इ.इ.इ यांची कमी नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Muza - Noya Daman (ft. Tosiba & Meem Haque) | Official Lyric Video

प्रसाद गोडबोले's picture

14 Dec 2021 - 11:55 pm | प्रसाद गोडबोले

=))))

चौकस२१२'s picture

2 Dec 2021 - 6:42 am | चौकस२१२

वांड साहेब आपल्या यातना उद्वेग आणि त्यामागची कारण मीमांसा समजते आहे ... खास करून महाराष्ट्रात ... कौरव पांडव यांचे बाहेरील आक्रमण आले तर १०५ असे काहीसे आहे हे.. तेवहा आपण "हिंदू काज" पासून फार दूर जाणार नाही अशी अशा करतो ...
एक समांतर उदाहरण देतो
हिंदू शीख या बद्दल पण माझे असेच मत आता झालया .. मी जमेल तिथे शिखांना आपण भाऊ आहोत , हिंदूंचा द्वेष का क रता,, आम्हाला तुम्ही जवळचे असे विचार मांडण्याचा प्रयत्न केले आंतरजालावर .. पण त्यांच्यातील हिंदून विषयी द्वेष सध्या तरी वाढलेला दिसतोय ?( कृषी आंदोलन संदर्भात म्हणतोय) त्यामुळे मला हि " खड्यात गेली ती हिंदू शीख एकता " असे वाटायला लागलय ..

कॉमी's picture

1 Dec 2021 - 10:43 am | कॉमी

बाकी, पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे आंशिक का होईना, मिथबस्टिंग झाले आहे. कोणत्याही जोरजबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आवश्यकता नाही हे स्पष्ट झाले आहे.
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/india-fer...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ज़रूरी तो नहीं के शायरी वो ही करे जो इश्क में हो, ज़िन्दगी भी कुछ ज़ख्म बेमिसाल दिया करती है।

मुक्त विहारि's picture

4 Dec 2021 - 8:48 pm | मुक्त विहारि

दार उल हरबची माहिती होती

राघव's picture

6 Dec 2021 - 9:17 pm | राघव

अवांतरः

बाणा, ती स्वाक्षरी कातिल आहे रे! एक नंबर! :-)

वामन देशमुख's picture

6 Dec 2021 - 10:13 pm | वामन देशमुख

हिंदू कधी एकत्र येणार?

सद्यस्थितीत तरी कधीही नाही.

एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते.

मुळात हिंदू कुणाला म्हणावे याचेच सर्वमान्य निश्चित निकष नाहीत. कुणीतरी (योगी आदित्यनाथ?) पुढाकार घेऊन काही निकष ठरवले, ते सर्व हिंदूंनी मान्य केले, ते सर्व हिंदूंवर बंधनकारक केले, त्या निकषांची परिपूर्तता करणाऱ्यांना काही बक्षीस दिले, न करणाऱ्यांना पुरेशी शिक्षा दिली तर हिंदू ज्या उद्देशासाठी एकत्र यायला हवे आहेत ते साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल.

तोपर्यंत... चर्चा करत राहुयात.

जेम्स वांड's picture

6 Dec 2021 - 10:43 pm | जेम्स वांड

सर, योगी आदित्यनाथ वगैरे स्वप्नरंजन ठीक आहे पण हिंदूंचे स्टॅंडर्डायजेशन म्हणजे नेमके काय ? ह्यावर थोडा डिटेल प्रकाश टाकता येईल का सर ?

म्हणजे बघा बेसिक मध्ये फरक असलेले लोक पण हिंदू म्हणून एकत्र असतात द्वैतवादी-अद्वैतवादी, विविध गोत्र, तर कुठं अजून काही पूजा पद्धतीत फरक, कोणाच्या पूजनात मांसाहारी नैवेद्य, कोणाला कांदालसूण वर्ज्य, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील घाटावरील देशस्थ, आमच्याकडे तांदळाच्या कण्यांची खीर फक्त श्राद्ध पक्षाच्या जेवणाला, तेच आमच्या बंधुराजांच्या दाक्षिणात्य ब्राह्मण सौभाग्यवतींच्या घरी शुभकार्याला तांदळाचे पायसम मस्ट.

हे वानगीदाखल उदाहरण देतोय वैयक्तिक पण जर उद्या ह्यातलं एक स्टँडर्ड केलं तर दुसऱ्यानं कुठं जावं बोंबलत चुना लावत ? कारण अश्याने एका फटक्यात त्याचं हिंदुत्वच रद्द होईल की हो. मुळात एक देव एक पुस्तक पॅटर्नमध्ये हिंदू ढाळले तर मला वाटतं त्याहून मोठं दुर्दैव हिंदूधर्माचे दुसरे नसेल.

हा प्रतिवाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही.

नमस्कार

सर, योगी आदित्यनाथ वगैरे स्वप्नरंजन ठीक आहे

अहो माझा अक्खा प्रतिसादच स्वप्नरंजन आहे. योगी आदित्यनाथ हे त्यातील केवळ एक प्लेसहोल्डर आहेत.

म्हणजे बघा बेसिक मध्ये फरक असलेले लोक पण हिंदू म्हणून एकत्र असतात

एकत्र असतात? कुठे असतात?

१९४७ साली पाकिस्तानातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? १९९० साली काश्मिरातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? २०२१ साली पश्चिम बंगालातल्या हिंदूंसोबत एकत्र होते?

हो, जिहादी मुस्लिमांकडून जाळपोळ, हत्या, बलात्कार, सर्वनाश करून घेण्यात कदाचित एकत्र असतील.

वानगीदाखल उदाहरण देतोय वैयक्तिक पण जर उद्या ह्यातलं एक स्टँडर्ड केलं तर दुसऱ्यानं कुठं जावं बोंबलत चुना लावत ?

पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण येथील हिंदू जिथे बोंबलत चुना लावत गेलेत तिथे जावे.

अश्याने एका फटक्यात त्याचं हिंदुत्वच रद्द होईल की हो

अश्या असंख्य फटक्यांतून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण येथील हिंदूंचे, हिंदुत्वच नव्हे तर मनुष्यत्व रद्द झाले आहे.

मुळात एक देव एक पुस्तक पॅटर्नमध्ये हिंदू ढाळले तर मला वाटतं त्याहून मोठं दुर्दैव हिंदूधर्माचे दुसरे नसेल.

सामाजिक एकत्रीकरण करण्यासाठी धार्मिक एकत्रीकरण करणे आवश्यक असते हे हिंदूंनी इस्लामकडून शिकावे. हिंदूंचा देव एक आहे की तेहतीस प्रकारांचे देव आहेत, हिंदूंना देव आहेत का, हिंदू आस्तिक / नास्तिक राहू शकतात का आहेत ही चर्चा करण्यासाठी आधी हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहावे लागेल. शिल्लक राहण्यासाठी आधी एकत्र यावे लागेल...

एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते.

मुळात हिंदू कुणाला म्हणावे याचेच सर्वमान्य निश्चित निकष नाहीत. कुणीतरी (प्लेसहोल्डर) पुढाकार घेऊन काही निकष ठरवले, ते सर्व हिंदूंनी मान्य केले, ते सर्व हिंदूंवर बंधनकारक केले, त्या निकषांची परिपूर्तता करणाऱ्यांना काही बक्षीस दिले, न करणाऱ्यांना पुरेशी शिक्षा दिली तर हिंदू ज्या उद्देशासाठी एकत्र यायला हवे आहेत ते साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल.

तोपर्यंत... चर्चा करत राहुयात.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 3:45 pm | मुक्त विहारि

एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते.

---

एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते.

एकत्र येण्यासाठी कोणीतरी समान शत्रुसुद्धा चालतो..

वामन देशमुख's picture

13 Dec 2021 - 4:26 pm | वामन देशमुख

एकत्र येण्यासाठी कोणीतरी समान शत्रुसुद्धा चालतो..

कदाचित.. हो म्हणता येऊ शकेल.

मुक्त विहारि's picture

13 Dec 2021 - 4:41 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

चौकस२१२'s picture

7 Dec 2021 - 7:49 am | चौकस२१२

या " हिंदू कोण "असल्या व्याख्येत अडकून पाडण्यापेकशा ... सरळ याचे कडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बहिताले तर , जो स्वतःला हिंदू समजतो आणि ज्याला देशात हिंदूंची उपेक्षा होऊ नये असे वाटतं असले तो हिंदू एवढे पुरे .. धार्मिक असलेच पाहिजे असे नाही !
हा फुकाचा वाद आणि चर्चा आहे ती टाळली तर उत्तम

सर्वात महत्वाचे हे आहे कि
१) भारतीय हिंदू हा असहिष्णू आहे वैगरे जो अप्र्रचर्र चालू आहे तो थांबवणे
२) सर्वांनां सामान नागरी कायदा आणून कोणाचे हि लांगुनचालन थांबवणे
आणि यातून देश उभारणी ला मदत करणे एवढया गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्वाचे आहे
मग तांदुळाची खीर मर्तिकाला कर्यायाची कि सणासुदीला हे गौण आहे असे वाटते
स्वरकरांसारख्यानं बहुतेक हेच "हिंदुत्व" अभिप्रेत असावे असे राहून राहवून वाटते

माझ्य सारखा अधार्मिक हिंदू ( मंदिरात जाणार नाही कदाचित पण मंदिर बांधण्याच्या हक्काला पाठिंबा ) सगळ्या प्रकरणाकडे केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून बघतो ...
एकीकडे भारत हा सर्वधर्मसंभावी राहावा पण मुद्डमून हिंदूंची अवहेलना होऊ नये ,
खरा इतःस मुद्डमून पुसलं जातो आणि जात होता तो थांबवावा

मुक्त विहारि's picture

7 Dec 2021 - 6:43 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

जेम्स वांड's picture

8 Dec 2021 - 9:10 am | जेम्स वांड

असं नाय,

पण एकंदरीत पाहता हा वाद फुकाचा नाही, जात हे अनवॉन्टेड असेल पण आजही भारतीय हिंदू समाजाचे वास्तव आहे, ते नाकारून चालणार नाही तर डोळसपणे पाहून ठामपणे हँडल करावे लागणार आहे. असे मला ठाम वाटते, अनुभवांती.

चौकस२१२'s picture

13 Dec 2021 - 9:31 am | चौकस२१२

फुकाचा या अर्थाने कि "आधी हिंदू म्हणजे काय ते ठरवा" असला ... त्यापेक्षा आहे तो हिंदू टिकवा असे
.. जातीचा काही संधर्भ मला द्यायचा नव्हता

मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरताच का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल!

https://www.loksatta.com/pune/why-muslim-society-only-for-elections-mp-j...

हे असेच, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी, हिंदू
धर्मा बाबतीत केले आहे ....

मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं मुसलमानांना आवाहन....

https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/asaduddin-owaisi-attacks-c...

----------

मला तरी, भाजप शिवाय पर्याय नाही .....

मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?, मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेवर गुन्हा दाखल

https://www.loksatta.com/desh-videsh/religious-conversion-allegations-on...

गुजरातमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या ख्रिश्चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतराप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलींना ख्रिश्चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल

मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?, मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेवर गुन्हा दाखल

...

आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल

सहमत आहे.

त्याशिवाय, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यावर काय प्रतिक्रिया देतात काय कृती करतात हे पाहणे रोचक ठरेल.
...

अवांतर: मोदींना सत्तेत येऊन आठ वर्षे होत आलीत तरीही असे प्रकार सुरु आहेत असे दिसते. मोदी / भाजप / संघ त्यांची व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्यात खरोखरच सक्षम / सशक्त आहेत का?

अवांतर: मोदींना सत्तेत येऊन आठ वर्षे होत आलीत तरीही असे प्रकार सुरु आहेत असे दिसते. मोदी / भाजप / संघ त्यांची व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्यात खरोखरच सक्षम / सशक्त आहेत का?

सक्तीचे किंवा अमिश दाखवून धर्मांतर हा प्रश्न फक्त ४७ पासून नाही तर त्या कितीतरी आधीपासून आहे हे आपल्याला सर्वांनां माहित आहेच त्यामुळे "८ वर्षात बदलून दाखवा हि अपेक्षा जरा जास्त होते आहे असे वाटतेय.

आणि सरकार कोणाचे का हि असेना आधी समाजाने खरी सर्वधर्मसमभावाचं खऱ्या आणि योग्य अर्थाने स्वीकार केलं तर पुढे सरक्कर हिंमत दाखवेल

उदाहरण " समान नागरी कायदा" यातील नुसते " "स" हा शब्द कोणी उच्चारला तर काय कांगावा काँग्रेस आणि डावे करतात हे माहित नाही का?

याशिवाय बाहेरून चे दबाव वेगळेच ( मदर तेरेसा आता "संत" असल्यामुळे त्याबद्दल हिंदु दःर्जिण्या भाजप ने काह्ही बोलले तरी देशातील आणि बाहेरील ख्रिस्ती आणि देशाबाहेरील विलिंग इडियट डावे हातात हात घालून "उजवया " फॅसिष्ट भाजप सरकार वॉर काय हलला चढवतात ते दिसतंय ना? तरी हि अपेक्षा कि ८ वर्षात का नाही केले
बर केले तर लोक म्हणणार कि हे काय आधी महागाई हटवा , त्यावर लक्ष केंद्रित करा (धर्मांतर झाले तर काय एवढा फरक !)

दुर्दैवाने त्या गांधी बाबाला एका उजव्या विचारसरणीचं माणसाने मारले त्यामुळे १०००० वर्षे तरी भाजप ला सुखाने सत्ता राबवू दिली जाणार नाही
त्यापेकशा परत काँग्रेस ला आणुयात सत्तेवर आणि पुढील ५ वर्षात ते - समान मधील "स" उच्चारायची हिंमत दाखवतील अशी अशा करूयात ,
आणि तसे नाही केले तर सिहासन मधील दि काशटा च्या भाषेत " त्याचाच सरकार ला विधासभे समोर जोडे मारू "

काय म्हणता !

निदान आता तरी हे गुलामगिरीचे जोखड हिंदूंनी फेकून दिले पाहिजे

जेम्स वांड's picture

16 Dec 2021 - 12:39 pm | जेम्स वांड

काही हिंदू १२००-१५०० तर काही मागील २००० वर्षांपासून गुलामगिरीचे मानेवर असलेले जोखड फेकून द्यायची भाषा करतात.

जातीभेद नष्ट करण्याचं जोखड जोवर एकच समाजाची जबाबदारी मानलं गेलं आहे तोवर घंटा हिंदू एकत्र येतात हो मुवि सर, तुम्ही अजून लड लावा धाग्यांची, त्यानं काय फरक पडतोय.

मुक्त विहारि's picture

16 Dec 2021 - 2:03 pm | मुक्त विहारि

काहीच प्रयत्न न करता, दुसरा ते करेल, अशी अपेक्षा मी तरी बाळगत नाही ...

जेम्स वांड's picture

16 Dec 2021 - 2:10 pm | जेम्स वांड

अडाणी अशिक्षित माणूस फक्त सच्चा भावनांवर पर्वत हलवून सोडेल मुवि सर, त्याबाबतीत शंकाच नाही बघा, फक्त कसं आहे जे फॅक्ट आहे ते आहे, आमचे खरे सर म्हणतात तसं तुम्ही बसा प्रोसिजरनं तपास करत तसं काहीसं, फक्त आम्हीही म्हणतो की बुआ प्रोसिजर काहीतरी सेट हवी, तीच नाही तर आपण काय करू शकतो !.

मुक्त विहारि's picture

16 Dec 2021 - 2:39 pm | मुक्त विहारि

दस की लकडी, एक का बोजा

त्यामुळे, आपण आपला खारीचा वाटा उचलायचा

अशिक्षित खार देखील, वेळ पडली तर, रामसेतू बांधायला मदत करतेच की...

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 7:44 pm | चौकस२१२

गरिबांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे आकाशातील प्रेमळ प्रभुने सांगितले... हो १००/१०० गुण पण हि मदत करतांना त्यामागे त्यांचे धर्मांतर करणे (आज नाही तर उद्या) हा मुळ छुपा हेतू असतो हे आपल्यातीलच "अति उदारमतवादी हिंदूंना" जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत हिंदूंची अशीच कत्तल ( वैचारिक ) होत राहणार .. मरा लेको यु दिसर्व टू बी कन्वर्टेड .. तुमची तीच लायकी

फक्त हे हिंदूंनो तुम्ही जेवहा येशूचं चरणी जाल तेवहा मग तिथे जाऊन जात हा शब्द विसरा .. तो रोग फक्त आम्हा नीच हिंदूंच्यातच आहे ! नाही का ! एकदा का ख्रिस्ती झालात कि मग जाट शीख नि दलित शीख नाही , ब्राह्मण ख्रिस्ती नाही कि मराठा ख्रिस्ती नाही .. ख्रिस्तस ते मान्य नाही

“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत,” मोदींच्या काशी यात्रेवरुन शिवसेनेची टीका

https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-saamana-editorial-pm-naren...

हीच का ती, हिंदूत्ववादी शिवसेना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2021 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत.

अगदी खरं आहे. विषयच संपला.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

15 Dec 2021 - 9:49 am | मुक्त विहारि

मग, ही बाजू इतर धर्मियांना पण समजून घेतली पाहिजे ...

टाळी एका हाताने वाजत नाही ...

उदारमतवादी हे फक्त हिंदूंनीच असावे का?

अद्याप तरी हिंदू उदारमतवादी आहेत, ह्यामुळेच, अफगणिस्तान मधला शीख समुदाय, भारतातच आला...

उदारमतवादी हे फक्त हिंदूंनीच असावे का?
अगदी योग्य प्रश्न पण याचे उत्तर टाळले जाईल !

चौकस२१२'s picture

17 Dec 2021 - 7:33 pm | चौकस२१२

विषयच संपला.... नाही विषय टाळला !

“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत,” मोदींच्या काशी यात्रेवरुन शिवसेनेची टीका

शिवसेना ही बाटलेली काँन्ग्रेस आहे, त्यामुळे जास्तच कडवी आहे.

सध्याची शिवसेना बघुन मला हे गाणे आठवते.

मोदींच्या काशी यात्रेवरुन बोम्ब पन
पण कानडा अमेरिका आणि ऑस्ट्रलिया चे राष्ट्रप्रमुख ख्रिसमस अधिकृत रित्या साजरा करतात ते चालते ! इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चालते ,इंडोनेशिया चा राष्ट्रपती कुरणावर हात ठेऊन शपत घेतो ते चालते
मलेशिया दूतावासाच्या आवारात मशीद चालते !

याला कारण दाव्याचा भोंदू पणा .. सेकुलर म्हणजे बहुसंख्याक असलेल्या हिंदूं चालीरितीनची कोणतीही छाप भारत सरकार वर पडू द्यायची नाही ( आणि एकीकडे श्रीमती वद्रा अगदी संस्कृत श्लोक सभेत म्हणतात , त्यांचे भाऊ राय अमी पण जनेऊ उधारी म्हणून मिरवतात .. ते चालते ...सगळे ढोंगी

“मुस्लिमांनी भारतावर राज्य करण्यासाठी जास्त मुलं जन्माला घालावीत”; एमआयएम नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

https://www.loksatta.com/desh-videsh/give-birth-to-more-children-to-make...

--------

उदारमतवादी हिंदूंना किती समजावून सांगणार?

https://www.thelallantop.com/bherant/tarikh-banda-singh-bahadur-was-capt...

देवगिरीच्या, यादव घराण्याचे पण असेच हाल केले होते
... इतकेच कशाला? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील असेच हाल केले होते ....

आता तरी, हिंदूंनी, जातीभेद विसरून, एकत्र यायलाच पाहिजे...

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 4:42 pm | जेम्स वांड

एका शीख माणसाला म्हणले, तो मला उलट म्हणाला की सगळ्यांनी शीख धर्म स्वीकारावा, जातीभेद विसरतो कश्याला मित्रा त्यागून टाक आणि जातीविहिन शीख धर्मात ये, त्यांच्यामते शीख आणि हिंदुधर्म वेगवेगळे आहेत एक नाहीत.

काहीतरी अशिक्षित मार्गदर्शन करा ना त्याला काय सांगावे ह्यावर.

मुक्त विहारि's picture

17 Dec 2021 - 5:07 pm | मुक्त विहारि

मी तुमच्या प्रतिसादांवर, टिप्पणी देऊ शकत नाही....

तुमची विचारसरणी वेगळी आहे आणि माझी विचारसरणी वेगळी आहे...

जेम्स वांड's picture

17 Dec 2021 - 5:57 pm | जेम्स वांड

मी तर तुमचा खंदा समर्थक आहे, अशिक्षित असण्यात सुख अन राष्ट्रहित असल्याचे पण मला तहहयात मान्य असेल, मी फक्त आपला उदात्त हिंदू एकतेचा विचार लोकांना सांगितल्यावर येणारे प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोचवतोय इतकेच.

ह्या जनतेतून येणाऱ्या प्रतिसादांना काय उत्तर द्यावे ह्याचे मार्गदर्शन फक्त मी मागतो बापडा. तुमच्याइतके उत्तम ते कोणी देऊ शकणार नाही, त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नयेत ही नम्र विनंती

&#128144 &#128144

मुक्त विहारि's picture

17 Dec 2021 - 7:00 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

सुबोध खरे's picture

28 Dec 2021 - 10:31 am | सुबोध खरे

@जेम्स वांड

जातीविहिन शीख धर्मात ये,

त्याला सांगा थापा मारणे सोडून दे

सध्याचा पंजाबचा मुख्यमंत्री "दलित" शीख आहे

बांगलादेशात 1971 साली आम्हाला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावं लागलं कारण....

https://www.bbc.com/marathi/international-59693984.amp

गुल्लू दादा's picture

19 Dec 2021 - 12:15 pm | गुल्लू दादा

याच विषयावर तस्लिमा नसरीन यांची लज्जा आधारित आहे.

Trump's picture

19 Dec 2021 - 1:14 am | Trump

घरवापसी संकल्प

Trump's picture

19 Dec 2021 - 1:14 am | Trump

१२.५६ पासुन पहा.

प्रसाद गोडबोले's picture

19 Dec 2021 - 11:30 am | प्रसाद गोडबोले

मला भागवत काकांपासुन ते अगदी मुवी काकांपर्यंत , सर्वच लोकं ज्यांना मनापासुन हिंदुधर्माविषयी कळकळ वाटते, त्यांच्या विषयी मनःपुर्वक आदर आहे ...
पण
This is all in vain...

हे सर्व निरुपयोगी आहे .

मी इथं पश्चिम महाराष्ट्रात रहातोय, समाजातील , त्यातही एका विशिष्ठ समाजातील , काही लोकांच्या मनात किती पराकोटीचा ब्राह्मणद्वेष भरला आहे हे मी अगदी जवळुन पहात आहे. अनुभवही घेतलेला आहे ! तुमची हिंदु धर्माविषयी कळकळ कितीही जेन्युईन असली तरीही काहीही फरक पडत नाही, ते "भागवत" आहे इतकेच पुरेसे आहे त्यांचा द्वेष करायला !
इथे सातार्‍यात पुर्वी राजवाड्याच्या चौपाटी वर पोस्टर लागले होते , शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर चे मुंडके कापले आहे अन शेंडीला धरुन ते तुम्हाला ते दाखवत आहेत ! ह्यावरुन तुम्ही अंदाज घ्या कि ह्या द्वेषाची मुळे किती खोलवर गेलेली आहेत ! आणि ह्या विचारांची मुळे इतिहासात किती खोल गेलीत हे देखील शोधुन पाहिलं आहे .
महाराष्ट्र सरकार ने प्रकाशित केलेले फुलेंचे समग्र साहित्य इंटरनेट वर उपलब्ध्द आहे ते वाचा - ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख धूर्त आर्यभट देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा असा केलेला तुम्हाला आढळेल ! "अवघे विश्वचि माझे घर " असे म्हणाणार्‍या माऊलींचा ! "जे जे भेटे भूत | ते ते मानावे भगवंत | हाच भक्तियोग निश्चित | जाण माझा ||" असे म्हणणार्‍या ज्ञानदेवांचा !!
ह्या असल्या द्वेषाला औषध नाही.
तुमची हिंदु धर्माविषयीची कळकळ निरर्थक आहे , निरुपयोगी आहे !

ह्यावर मी शोधलेला , माझ्यापुरता शोधलेला उपाय म्हणजे - संपुर्ण हिंदु धर्म हे एक बामणी कारस्थान आहे , बामणांचे कसब आहे असा प्रचार आपणच करायचा जेणे करुन अन्य लोकं धर्मापासुन विन्मुख होतील , आणी जो काही धर्म उरेल तो फक्त आणि फक्त आपला असेल !
ह्या परंपरा , ही संस्कृती , हे साहित्य ,
रामायणापासुन महाभारतापर्यंत , ऋग्वेदापासुन ते अर्थवेदापर्यंत , उपनिषदांपासुन प्रस्थानत्रयीपरंत ,
ज्ञानोबा एकनाथ रामदासांपासुन ते गोंदवलेकर महाराज , टेंबे महाराज अन श्रीधरस्वामींपर्यंत ,
स्वतःला कट्टर वैदिक म्हणवुन घेणार्‍या सातवाहानांपासुन ते बाजीराव पेशवे , लोकमान्य टिळक, सावरकरांच्या पर्यंत,

ही फक्त आपली धरोहर आहे , केवळ आपला वारसा आहे हा विचार मला सुखावुन जातो !

हा एवढा आनंद उर्वरित द्वेषाकडे दुर्लक्षित करायला पुरेसा आहे माझ्यासाठी !!

जेम्स वांड's picture

19 Dec 2021 - 12:15 pm | जेम्स वांड

+ १०००००

गुल्लू दादा's picture

19 Dec 2021 - 12:22 pm | गुल्लू दादा

अश्याने हिंदू एकत्रित होईल तर झालाच म्हणून समजा.

रात्रीचे चांदणे's picture

19 Dec 2021 - 12:55 pm | रात्रीचे चांदणे

Social मीडियावर ब्राम्हण समाजवर टीका केली जाते हे मान्य आहे, कारण ब्राम्हणवर टीका केली तर हिंसक प्रतिक्रिया मिळणार नाही हे टीका करणाऱ्याला माहीती असत. २०१४ ला जाऊ द्या पण २०१९ ला भाजपा सेने ला बहुमत मिळालं तर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे संपूर्ण राज्याला माहिती होत तरीही लोकांनी त्यांनाच मत दिली, त्यात सेना प्रमुखही ब्राम्हणच. याचदरम्यान फडणवीस वरती ब्राम्हण म्हणून Social मीडिया वरती टीकाही भरपूर झाली. म्हणजेच social मीडियावर जे चालू आहे तेच सत्य समजून Victim Card खेळण्यात काय अर्थ आहे? पण जाती जाती मध्ये एकदम बंधुभाव असे म्हणणेही चुकीचे आहे. जसा वेळ जाईल तशी जाती मधली कटुताही कमी होत जाईल.