✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिंदू कधी एकत्र येणार?

म
मुक्त विहारि यांनी
Sun, 06/20/2021 - 17:49  ·  लेख
लेख
रेफरन्स: राजा शिवछत्रपती, लेखक, बाबासाहेब पुरंदरे (पान क्रमांक, 54,55,56) गाभा एक आणि गोष्टी अनेक, आदिलशहाचा दरबार संपला. सरदार आणि शिलेदार मंडळी बाहेर पडत होती. नेमके त्याच गडबडीत, खंडागळे यांचा हत्ती पिसाळला आणि हत्तीला आवर घालायला, छत्रपती शिवाजी महाराज यांचे मामा पुढे सरसावले, तर हत्तीचे रक्षण करायला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत काका पुढे सरसावले... पुढे झालेल्या धुमश्र्चक्रीत, जाधव आणि भोसले घराण्यातील कर्ती मंडळी बळी पडली... ह्याच्या पण आधी, सिकंदरला साथ देणारे हिंदूच होते.मागच्या आठवड्यात देखील, शिवसेना भवन येथे हीच घटना घडली ... गेल्या अडीच हजार वर्षांपुर्वी जे होत होते, तेच आजही होत आहे... हिंदू कधी एकत्र येणार?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
69267 वाचन

💬 प्रतिसाद (209)

प्रतिक्रिया

भारीच

प्रसाद गोडबोले
Tue, 12/14/2021 - 23:55 नवीन
=))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

१०५

चौकस२१२
गुरुवार, 12/02/2021 - 06:42 नवीन
वांड साहेब आपल्या यातना उद्वेग आणि त्यामागची कारण मीमांसा समजते आहे ... खास करून महाराष्ट्रात ... कौरव पांडव यांचे बाहेरील आक्रमण आले तर १०५ असे काहीसे आहे हे.. तेवहा आपण "हिंदू काज" पासून फार दूर जाणार नाही अशी अशा करतो ... एक समांतर उदाहरण देतो हिंदू शीख या बद्दल पण माझे असेच मत आता झालया .. मी जमेल तिथे शिखांना आपण भाऊ आहोत , हिंदूंचा द्वेष का क रता,, आम्हाला तुम्ही जवळचे असे विचार मांडण्याचा प्रयत्न केले आंतरजालावर .. पण त्यांच्यातील हिंदून विषयी द्वेष सध्या तरी वाढलेला दिसतोय ?( कृषी आंदोलन संदर्भात म्हणतोय) त्यामुळे मला हि " खड्यात गेली ती हिंदू शीख एकता " असे वाटायला लागलय ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

.

कॉमी
Wed, 12/01/2021 - 10:43 नवीन
बाकी, पॉप्युलेशन एक्सप्लोजनचे आंशिक का होईना, मिथबस्टिंग झाले आहे. कोणत्याही जोरजबरदस्तीच्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आवश्यकता नाही हे स्पष्ट झाले आहे. https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/india-fertilitaty-rate-declines-replacement-level-meaning-nfhs-survey-1880894-2021-11-25
  • Log in or register to post comments

दारुल-हरब को दारुल इस्लाम बनाना यह मक्सद समझे...

मदनबाण
Sat, 12/04/2021 - 19:12 नवीन

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ज़रूरी तो नहीं के शायरी वो ही करे जो इश्क में हो, ज़िन्दगी भी कुछ ज़ख्म बेमिसाल दिया करती है।
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मुक्त विहारि
Sat, 12/04/2021 - 20:48 नवीन
दार उल हरबची माहिती होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

अवांतरः

राघव
Mon, 12/06/2021 - 21:17 नवीन
अवांतरः बाणा, ती स्वाक्षरी कातिल आहे रे! एक नंबर! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

सद्यस्थितीत तरी कधीही नाही

वामन देशमुख
Mon, 12/06/2021 - 22:13 नवीन
हिंदू कधी एकत्र येणार?
सद्यस्थितीत तरी कधीही नाही. एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. मुळात हिंदू कुणाला म्हणावे याचेच सर्वमान्य निश्चित निकष नाहीत. कुणीतरी (योगी आदित्यनाथ?) पुढाकार घेऊन काही निकष ठरवले, ते सर्व हिंदूंनी मान्य केले, ते सर्व हिंदूंवर बंधनकारक केले, त्या निकषांची परिपूर्तता करणाऱ्यांना काही बक्षीस दिले, न करणाऱ्यांना पुरेशी शिक्षा दिली तर हिंदू ज्या उद्देशासाठी एकत्र यायला हवे आहेत ते साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल. तोपर्यंत... चर्चा करत राहुयात.
  • Log in or register to post comments

नमस्कार वामनराव

जेम्स वांड
Mon, 12/06/2021 - 22:43 नवीन
सर, योगी आदित्यनाथ वगैरे स्वप्नरंजन ठीक आहे पण हिंदूंचे स्टॅंडर्डायजेशन म्हणजे नेमके काय ? ह्यावर थोडा डिटेल प्रकाश टाकता येईल का सर ? म्हणजे बघा बेसिक मध्ये फरक असलेले लोक पण हिंदू म्हणून एकत्र असतात द्वैतवादी-अद्वैतवादी, विविध गोत्र, तर कुठं अजून काही पूजा पद्धतीत फरक, कोणाच्या पूजनात मांसाहारी नैवेद्य, कोणाला कांदालसूण वर्ज्य, आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील घाटावरील देशस्थ, आमच्याकडे तांदळाच्या कण्यांची खीर फक्त श्राद्ध पक्षाच्या जेवणाला, तेच आमच्या बंधुराजांच्या दाक्षिणात्य ब्राह्मण सौभाग्यवतींच्या घरी शुभकार्याला तांदळाचे पायसम मस्ट. हे वानगीदाखल उदाहरण देतोय वैयक्तिक पण जर उद्या ह्यातलं एक स्टँडर्ड केलं तर दुसऱ्यानं कुठं जावं बोंबलत चुना लावत ? कारण अश्याने एका फटक्यात त्याचं हिंदुत्वच रद्द होईल की हो. मुळात एक देव एक पुस्तक पॅटर्नमध्ये हिंदू ढाळले तर मला वाटतं त्याहून मोठं दुर्दैव हिंदूधर्माचे दुसरे नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

माझा अक्खा प्रतिसादच स्वप्नरंजन आहे.

वामन देशमुख
Mon, 12/13/2021 - 15:10 नवीन
हा प्रतिवाद या चर्चेत / मिपावरील इतर कोणत्याही चर्चेत सहभागी झालेल्या कुणा विशिष्ट सदस्याचा उपमर्द करण्याच्या हेतूने लिहिलेला नाही. नमस्कार
सर, योगी आदित्यनाथ वगैरे स्वप्नरंजन ठीक आहे
अहो माझा अक्खा प्रतिसादच स्वप्नरंजन आहे. योगी आदित्यनाथ हे त्यातील केवळ एक प्लेसहोल्डर आहेत.
म्हणजे बघा बेसिक मध्ये फरक असलेले लोक पण हिंदू म्हणून एकत्र असतात
एकत्र असतात? कुठे असतात? १९४७ साली पाकिस्तानातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? १९९० साली काश्मिरातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? २०२१ साली पश्चिम बंगालातल्या हिंदूंसोबत एकत्र होते? हो, जिहादी मुस्लिमांकडून जाळपोळ, हत्या, बलात्कार, सर्वनाश करून घेण्यात कदाचित एकत्र असतील.
वानगीदाखल उदाहरण देतोय वैयक्तिक पण जर उद्या ह्यातलं एक स्टँडर्ड केलं तर दुसऱ्यानं कुठं जावं बोंबलत चुना लावत ?
पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण येथील हिंदू जिथे बोंबलत चुना लावत गेलेत तिथे जावे.
अश्याने एका फटक्यात त्याचं हिंदुत्वच रद्द होईल की हो
अश्या असंख्य फटक्यांतून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इराण येथील हिंदूंचे, हिंदुत्वच नव्हे तर मनुष्यत्व रद्द झाले आहे.
मुळात एक देव एक पुस्तक पॅटर्नमध्ये हिंदू ढाळले तर मला वाटतं त्याहून मोठं दुर्दैव हिंदूधर्माचे दुसरे नसेल.
सामाजिक एकत्रीकरण करण्यासाठी धार्मिक एकत्रीकरण करणे आवश्यक असते हे हिंदूंनी इस्लामकडून शिकावे. हिंदूंचा देव एक आहे की तेहतीस प्रकारांचे देव आहेत, हिंदूंना देव आहेत का, हिंदू आस्तिक / नास्तिक राहू शकतात का आहेत ही चर्चा करण्यासाठी आधी हिंदूंना हिंदू म्हणून शिल्लक राहावे लागेल. शिल्लक राहण्यासाठी आधी एकत्र यावे लागेल... एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. मुळात हिंदू कुणाला म्हणावे याचेच सर्वमान्य निश्चित निकष नाहीत. कुणीतरी (प्लेसहोल्डर) पुढाकार घेऊन काही निकष ठरवले, ते सर्व हिंदूंनी मान्य केले, ते सर्व हिंदूंवर बंधनकारक केले, त्या निकषांची परिपूर्तता करणाऱ्यांना काही बक्षीस दिले, न करणाऱ्यांना पुरेशी शिक्षा दिली तर हिंदू ज्या उद्देशासाठी एकत्र यायला हवे आहेत ते साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल. तोपर्यंत... चर्चा करत राहुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

खालील वाक्य आवडले

मुक्त विहारि
Mon, 12/13/2021 - 15:45 नवीन
एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते. ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

एकत्र येण्यासाठी काहीतरी

Trump
Mon, 12/13/2021 - 16:16 नवीन
एकत्र येण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. त्यानंतर एकत्र येण्याची शक्यता निर्माण होते.
एकत्र येण्यासाठी कोणीतरी समान शत्रुसुद्धा चालतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

एकत्र येण्यासाठी कोणीतरी समान

वामन देशमुख
Mon, 12/13/2021 - 16:26 नवीन
एकत्र येण्यासाठी कोणीतरी समान शत्रुसुद्धा चालतो..
कदाचित.. हो म्हणता येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

सहमत आहे .....

मुक्त विहारि
Mon, 12/13/2021 - 16:41 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

फुकाचा वाद आणि चर्चा

चौकस२१२
Tue, 12/07/2021 - 07:49 नवीन
या " हिंदू कोण "असल्या व्याख्येत अडकून पाडण्यापेकशा ... सरळ याचे कडे एक सामाजिक प्रश्न म्हणून बहिताले तर , जो स्वतःला हिंदू समजतो आणि ज्याला देशात हिंदूंची उपेक्षा होऊ नये असे वाटतं असले तो हिंदू एवढे पुरे .. धार्मिक असलेच पाहिजे असे नाही ! हा फुकाचा वाद आणि चर्चा आहे ती टाळली तर उत्तम सर्वात महत्वाचे हे आहे कि १) भारतीय हिंदू हा असहिष्णू आहे वैगरे जो अप्र्रचर्र चालू आहे तो थांबवणे २) सर्वांनां सामान नागरी कायदा आणून कोणाचे हि लांगुनचालन थांबवणे आणि यातून देश उभारणी ला मदत करणे एवढया गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे जास्त महत्वाचे आहे मग तांदुळाची खीर मर्तिकाला कर्यायाची कि सणासुदीला हे गौण आहे असे वाटते स्वरकरांसारख्यानं बहुतेक हेच "हिंदुत्व" अभिप्रेत असावे असे राहून राहवून वाटते माझ्य सारखा अधार्मिक हिंदू ( मंदिरात जाणार नाही कदाचित पण मंदिर बांधण्याच्या हक्काला पाठिंबा ) सगळ्या प्रकरणाकडे केवळ एक सामाजिक प्रश्न म्हणून बघतो ... एकीकडे भारत हा सर्वधर्मसंभावी राहावा पण मुद्डमून हिंदूंची अवहेलना होऊ नये , खरा इतःस मुद्डमून पुसलं जातो आणि जात होता तो थांबवावा
  • Log in or register to post comments

सहमत आहे

मुक्त विहारि
Tue, 12/07/2021 - 18:43 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

नाय ना सर

जेम्स वांड
Wed, 12/08/2021 - 09:10 नवीन

असं नाय, पण एकंदरीत पाहता हा वाद फुकाचा नाही, जात हे अनवॉन्टेड असेल पण आजही भारतीय हिंदू समाजाचे वास्तव आहे, ते नाकारून चालणार नाही तर डोळसपणे पाहून ठामपणे हँडल करावे लागणार आहे. असे मला ठाम वाटते, अनुभवांती.

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

फुकाचा या अर्थाने कि "आधी

चौकस२१२
Mon, 12/13/2021 - 09:31 नवीन
फुकाचा या अर्थाने कि "आधी हिंदू म्हणजे काय ते ठरवा" असला ... त्यापेक्षा आहे तो हिंदू टिकवा असे .. जातीचा काही संधर्भ मला द्यायचा नव्हता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरताच का?; खासदार जलील यांचा

मुक्त विहारि
Sat, 12/11/2021 - 20:36 नवीन
मुस्लीम समाज केवळ निवडणुकांपुरताच का?; खासदार जलील यांचा राष्ट्रवादी, काँग्रेसला सवाल! https://www.loksatta.com/pune/why-muslim-society-only-for-elections-mp-jalils-question-to-ncp-and-congress-msr-87-kjp-91-2715854/ हे असेच, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी, हिंदू धर्मा बाबतीत केले आहे ....
  • Log in or register to post comments

मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा;

मुक्त विहारि
Sun, 12/12/2021 - 19:44 नवीन
मुस्लिमांनो, पॉलिटिकल सेक्युलॅरिझम धुडकावून लावा; ओवेसींचं मुसलमानांना आवाहन.... https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/asaduddin-owaisi-attacks-congress-and-ncp-over-secularism-594247.html ---------- मला तरी, भाजप शिवाय पर्याय नाही .....
  • Log in or register to post comments

मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?

मुक्त विहारि
Tue, 12/14/2021 - 19:33 नवीन
मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?, मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेवर गुन्हा दाखल https://www.loksatta.com/desh-videsh/religious-conversion-allegations-on-gujarat-missionaries-of-charity-mother-teresa-organization-hrc-97-2718647/lite/ गुजरातमध्ये ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या ख्रिश्चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतराप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या बालसुधारगृहात राहणाऱ्या मुलींना ख्रिश्चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल
  • Log in or register to post comments

मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?

वामन देशमुख
Tue, 12/14/2021 - 21:42 नवीन
मुलींचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर?, मदर तेरेसांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ संस्थेवर गुन्हा दाखल
...
आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष, यावर काय प्रतिसाद देतात? हे बघणे रोचक ठरेल
सहमत आहे. त्याशिवाय, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यावर काय प्रतिक्रिया देतात काय कृती करतात हे पाहणे रोचक ठरेल. ... अवांतर: मोदींना सत्तेत येऊन आठ वर्षे होत आलीत तरीही असे प्रकार सुरु आहेत असे दिसते. मोदी / भाजप / संघ त्यांची व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्यात खरोखरच सक्षम / सशक्त आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

८ वर्षात बदलून दाखवा हि अपेक्षा

चौकस२१२
Wed, 12/15/2021 - 08:28 नवीन
अवांतर: मोदींना सत्तेत येऊन आठ वर्षे होत आलीत तरीही असे प्रकार सुरु आहेत असे दिसते. मोदी / भाजप / संघ त्यांची व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्यात खरोखरच सक्षम / सशक्त आहेत का? सक्तीचे किंवा अमिश दाखवून धर्मांतर हा प्रश्न फक्त ४७ पासून नाही तर त्या कितीतरी आधीपासून आहे हे आपल्याला सर्वांनां माहित आहेच त्यामुळे "८ वर्षात बदलून दाखवा हि अपेक्षा जरा जास्त होते आहे असे वाटतेय. आणि सरकार कोणाचे का हि असेना आधी समाजाने खरी सर्वधर्मसमभावाचं खऱ्या आणि योग्य अर्थाने स्वीकार केलं तर पुढे सरक्कर हिंमत दाखवेल उदाहरण " समान नागरी कायदा" यातील नुसते " "स" हा शब्द कोणी उच्चारला तर काय कांगावा काँग्रेस आणि डावे करतात हे माहित नाही का? याशिवाय बाहेरून चे दबाव वेगळेच ( मदर तेरेसा आता "संत" असल्यामुळे त्याबद्दल हिंदु दःर्जिण्या भाजप ने काह्ही बोलले तरी देशातील आणि बाहेरील ख्रिस्ती आणि देशाबाहेरील विलिंग इडियट डावे हातात हात घालून "उजवया " फॅसिष्ट भाजप सरकार वॉर काय हलला चढवतात ते दिसतंय ना? तरी हि अपेक्षा कि ८ वर्षात का नाही केले बर केले तर लोक म्हणणार कि हे काय आधी महागाई हटवा , त्यावर लक्ष केंद्रित करा (धर्मांतर झाले तर काय एवढा फरक !) दुर्दैवाने त्या गांधी बाबाला एका उजव्या विचारसरणीचं माणसाने मारले त्यामुळे १०००० वर्षे तरी भाजप ला सुखाने सत्ता राबवू दिली जाणार नाही त्यापेकशा परत काँग्रेस ला आणुयात सत्तेवर आणि पुढील ५ वर्षात ते - समान मधील "स" उच्चारायची हिंमत दाखवतील अशी अशा करूयात , आणि तसे नाही केले तर सिहासन मधील दि काशटा च्या भाषेत " त्याचाच सरकार ला विधासभे समोर जोडे मारू " काय म्हणता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

गेल्या 1200 ते 1500 वर्षां पासून हिंदू गुलामच आहेत

मुक्त विहारि
Wed, 12/15/2021 - 08:57 नवीन
निदान आता तरी हे गुलामगिरीचे जोखड हिंदूंनी फेकून दिले पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

हो ना

जेम्स वांड
गुरुवार, 12/16/2021 - 12:39 नवीन
काही हिंदू १२००-१५०० तर काही मागील २००० वर्षांपासून गुलामगिरीचे मानेवर असलेले जोखड फेकून द्यायची भाषा करतात. जातीभेद नष्ट करण्याचं जोखड जोवर एकच समाजाची जबाबदारी मानलं गेलं आहे तोवर घंटा हिंदू एकत्र येतात हो मुवि सर, तुम्ही अजून लड लावा धाग्यांची, त्यानं काय फरक पडतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

प्रयत्न करत रहायचे

मुक्त विहारि
गुरुवार, 12/16/2021 - 14:03 नवीन
काहीच प्रयत्न न करता, दुसरा ते करेल, अशी अपेक्षा मी तरी बाळगत नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

तुमच्यासारखा

जेम्स वांड
गुरुवार, 12/16/2021 - 14:10 नवीन
अडाणी अशिक्षित माणूस फक्त सच्चा भावनांवर पर्वत हलवून सोडेल मुवि सर, त्याबाबतीत शंकाच नाही बघा, फक्त कसं आहे जे फॅक्ट आहे ते आहे, आमचे खरे सर म्हणतात तसं तुम्ही बसा प्रोसिजरनं तपास करत तसं काहीसं, फक्त आम्हीही म्हणतो की बुआ प्रोसिजर काहीतरी सेट हवी, तीच नाही तर आपण काय करू शकतो !.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सहमत आहे

मुक्त विहारि
गुरुवार, 12/16/2021 - 14:39 नवीन
दस की लकडी, एक का बोजा त्यामुळे, आपण आपला खारीचा वाटा उचलायचा अशिक्षित खार देखील, वेळ पडली तर, रामसेतू बांधायला मदत करतेच की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

यु दिसर्व टू बी कन्वर्टेड

चौकस२१२
Fri, 12/17/2021 - 19:44 नवीन
गरिबांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हे आकाशातील प्रेमळ प्रभुने सांगितले... हो १००/१०० गुण पण हि मदत करतांना त्यामागे त्यांचे धर्मांतर करणे (आज नाही तर उद्या) हा मुळ छुपा हेतू असतो हे आपल्यातीलच "अति उदारमतवादी हिंदूंना" जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत हिंदूंची अशीच कत्तल ( वैचारिक ) होत राहणार .. मरा लेको यु दिसर्व टू बी कन्वर्टेड .. तुमची तीच लायकी फक्त हे हिंदूंनो तुम्ही जेवहा येशूचं चरणी जाल तेवहा मग तिथे जाऊन जात हा शब्द विसरा .. तो रोग फक्त आम्हा नीच हिंदूंच्यातच आहे ! नाही का ! एकदा का ख्रिस्ती झालात कि मग जाट शीख नि दलित शीख नाही , ब्राह्मण ख्रिस्ती नाही कि मराठा ख्रिस्ती नाही .. ख्रिस्तस ते मान्य नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला ला

मुक्त विहारि
Wed, 12/15/2021 - 09:12 नवीन
“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत,” मोदींच्या काशी यात्रेवरुन शिवसेनेची टीका https://www.loksatta.com/maharashtra/shivsena-saamana-editorial-pm-narendra-modi-ganga-river-kashi-vishwanath-dham-sgy-87-2720154/ हीच का ती, हिंदूत्ववादी शिवसेना?
  • Log in or register to post comments

विषयच संपला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/15/2021 - 09:44 नवीन
>>>धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत. अगदी खरं आहे. विषयच संपला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हो का....

मुक्त विहारि
Wed, 12/15/2021 - 09:49 नवीन
मग, ही बाजू इतर धर्मियांना पण समजून घेतली पाहिजे ... टाळी एका हाताने वाजत नाही ... उदारमतवादी हे फक्त हिंदूंनीच असावे का? अद्याप तरी हिंदू उदारमतवादी आहेत, ह्यामुळेच, अफगणिस्तान मधला शीख समुदाय, भारतातच आला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदारमतवादी हे फक्त हिंदूंनीच

चौकस२१२
Fri, 12/17/2021 - 19:32 नवीन
उदारमतवादी हे फक्त हिंदूंनीच असावे का? अगदी योग्य प्रश्न पण याचे उत्तर टाळले जाईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

विषयच संपला.... नाही विषय

चौकस२१२
Fri, 12/17/2021 - 19:33 नवीन
विषयच संपला.... नाही विषय टाळला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती

Trump
गुरुवार, 12/16/2021 - 13:38 नवीन
“धर्म म्हणजे अफूची गोळी, ती वाटून लोकांना मूळ प्रश्न विसरायला लावू नयेत,” मोदींच्या काशी यात्रेवरुन शिवसेनेची टीका
शिवसेना ही बाटलेली काँन्ग्रेस आहे, त्यामुळे जास्तच कडवी आहे. सध्याची शिवसेना बघुन मला हे गाणे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मोदींच्या काशी यात्रेवरुन बोम्ब

चौकस२१२
Fri, 12/17/2021 - 19:52 नवीन
मोदींच्या काशी यात्रेवरुन बोम्ब पन पण कानडा अमेरिका आणि ऑस्ट्रलिया चे राष्ट्रप्रमुख ख्रिसमस अधिकृत रित्या साजरा करतात ते चालते ! इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चालते ,इंडोनेशिया चा राष्ट्रपती कुरणावर हात ठेऊन शपत घेतो ते चालते मलेशिया दूतावासाच्या आवारात मशीद चालते ! याला कारण दाव्याचा भोंदू पणा .. सेकुलर म्हणजे बहुसंख्याक असलेल्या हिंदूं चालीरितीनची कोणतीही छाप भारत सरकार वर पडू द्यायची नाही ( आणि एकीकडे श्रीमती वद्रा अगदी संस्कृत श्लोक सभेत म्हणतात , त्यांचे भाऊ राय अमी पण जनेऊ उधारी म्हणून मिरवतात .. ते चालते ...सगळे ढोंगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

“मुस्लिमांनी भारतावर राज्य करण्यासाठी जास्त मुलं जन्माला घालावीत

मुक्त विहारि
गुरुवार, 12/16/2021 - 12:32 नवीन
“मुस्लिमांनी भारतावर राज्य करण्यासाठी जास्त मुलं जन्माला घालावीत”; एमआयएम नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य https://www.loksatta.com/desh-videsh/give-birth-to-more-children-to-make-owaisi-pm-of-india-hrc-97-2721689/lite/ -------- उदारमतवादी हिंदूंना किती समजावून सांगणार?
  • Log in or register to post comments

बंदा सिंह बहादुर के बेटे का कलेजा मुंह में ठूस दिया था मुगलों ने

मुक्त विहारि
Fri, 12/17/2021 - 16:20 नवीन
https://www.thelallantop.com/bherant/tarikh-banda-singh-bahadur-was-captured-and-killed-by-mughal-emperor/amp/ देवगिरीच्या, यादव घराण्याचे पण असेच हाल केले होते ... इतकेच कशाला? छत्रपती संभाजी महाराज यांचे देखील असेच हाल केले होते .... आता तरी, हिंदूंनी, जातीभेद विसरून, एकत्र यायलाच पाहिजे...
  • Log in or register to post comments

हेच आज सकाळी

जेम्स वांड
Fri, 12/17/2021 - 16:42 नवीन
एका शीख माणसाला म्हणले, तो मला उलट म्हणाला की सगळ्यांनी शीख धर्म स्वीकारावा, जातीभेद विसरतो कश्याला मित्रा त्यागून टाक आणि जातीविहिन शीख धर्मात ये, त्यांच्यामते शीख आणि हिंदुधर्म वेगवेगळे आहेत एक नाहीत. काहीतरी अशिक्षित मार्गदर्शन करा ना त्याला काय सांगावे ह्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुमचे, एकूण प्रतिसाद वाचता.....

मुक्त विहारि
Fri, 12/17/2021 - 17:07 नवीन
मी तुमच्या प्रतिसादांवर, टिप्पणी देऊ शकत नाही.... तुमची विचारसरणी वेगळी आहे आणि माझी विचारसरणी वेगळी आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

अजिबात नाही हो मुवि सर

जेम्स वांड
Fri, 12/17/2021 - 17:57 नवीन
मी तर तुमचा खंदा समर्थक आहे, अशिक्षित असण्यात सुख अन राष्ट्रहित असल्याचे पण मला तहहयात मान्य असेल, मी फक्त आपला उदात्त हिंदू एकतेचा विचार लोकांना सांगितल्यावर येणारे प्रतिसाद तुमच्यापर्यंत पोचवतोय इतकेच. ह्या जनतेतून येणाऱ्या प्रतिसादांना काय उत्तर द्यावे ह्याचे मार्गदर्शन फक्त मी मागतो बापडा. तुमच्याइतके उत्तम ते कोणी देऊ शकणार नाही, त्यामुळे कृपया गैरसमज करून घेऊ नयेत ही नम्र विनंती &#128144 &#128144
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद ....

मुक्त विहारि
Fri, 12/17/2021 - 19:00 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

@जेम्स वांड

सुबोध खरे
Tue, 12/28/2021 - 10:31 नवीन
@जेम्स वांड जातीविहिन शीख धर्मात ये, त्याला सांगा थापा मारणे सोडून दे सध्याचा पंजाबचा मुख्यमंत्री "दलित" शीख आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

बांगलादेशात 1971 साली आम्हाला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावं ला

मुक्त विहारि
Fri, 12/17/2021 - 17:03 नवीन
बांगलादेशात 1971 साली आम्हाला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावं लागलं कारण.... https://www.bbc.com/marathi/international-59693984.amp
  • Log in or register to post comments

याच

गुल्लू दादा
Sun, 12/19/2021 - 12:15 नवीन
याच विषयावर तस्लिमा नसरीन यांची लज्जा आधारित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

घरवापसी संकल्प

Trump
Sun, 12/19/2021 - 01:14 नवीन
घरवापसी संकल्प
  • Log in or register to post comments

१२.५६ पासुन पहा.

Trump
Sun, 12/19/2021 - 01:14 नवीन
१२.५६ पासुन पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

आदर पण ...

प्रसाद गोडबोले
Sun, 12/19/2021 - 11:30 नवीन
मला भागवत काकांपासुन ते अगदी मुवी काकांपर्यंत , सर्वच लोकं ज्यांना मनापासुन हिंदुधर्माविषयी कळकळ वाटते, त्यांच्या विषयी मनःपुर्वक आदर आहे ... पण This is all in vain... हे सर्व निरुपयोगी आहे . मी इथं पश्चिम महाराष्ट्रात रहातोय, समाजातील , त्यातही एका विशिष्ठ समाजातील , काही लोकांच्या मनात किती पराकोटीचा ब्राह्मणद्वेष भरला आहे हे मी अगदी जवळुन पहात आहे. अनुभवही घेतलेला आहे ! तुमची हिंदु धर्माविषयी कळकळ कितीही जेन्युईन असली तरीही काहीही फरक पडत नाही, ते "भागवत" आहे इतकेच पुरेसे आहे त्यांचा द्वेष करायला ! इथे सातार्‍यात पुर्वी राजवाड्याच्या चौपाटी वर पोस्टर लागले होते , शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर चे मुंडके कापले आहे अन शेंडीला धरुन ते तुम्हाला ते दाखवत आहेत ! ह्यावरुन तुम्ही अंदाज घ्या कि ह्या द्वेषाची मुळे किती खोलवर गेलेली आहेत ! आणि ह्या विचारांची मुळे इतिहासात किती खोल गेलीत हे देखील शोधुन पाहिलं आहे . महाराष्ट्र सरकार ने प्रकाशित केलेले फुलेंचे समग्र साहित्य इंटरनेट वर उपलब्ध्द आहे ते वाचा - ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख धूर्त आर्यभट देशस्थ आळंदीकर ज्ञानोबा असा केलेला तुम्हाला आढळेल ! "अवघे विश्वचि माझे घर " असे म्हणाणार्‍या माऊलींचा ! "जे जे भेटे भूत | ते ते मानावे भगवंत | हाच भक्तियोग निश्चित | जाण माझा ||" असे म्हणणार्‍या ज्ञानदेवांचा !! ह्या असल्या द्वेषाला औषध नाही. तुमची हिंदु धर्माविषयीची कळकळ निरर्थक आहे , निरुपयोगी आहे ! ह्यावर मी शोधलेला , माझ्यापुरता शोधलेला उपाय म्हणजे - संपुर्ण हिंदु धर्म हे एक बामणी कारस्थान आहे , बामणांचे कसब आहे असा प्रचार आपणच करायचा जेणे करुन अन्य लोकं धर्मापासुन विन्मुख होतील , आणी जो काही धर्म उरेल तो फक्त आणि फक्त आपला असेल ! ह्या परंपरा , ही संस्कृती , हे साहित्य , रामायणापासुन महाभारतापर्यंत , ऋग्वेदापासुन ते अर्थवेदापर्यंत , उपनिषदांपासुन प्रस्थानत्रयीपरंत , ज्ञानोबा एकनाथ रामदासांपासुन ते गोंदवलेकर महाराज , टेंबे महाराज अन श्रीधरस्वामींपर्यंत , स्वतःला कट्टर वैदिक म्हणवुन घेणार्‍या सातवाहानांपासुन ते बाजीराव पेशवे , लोकमान्य टिळक, सावरकरांच्या पर्यंत, ही फक्त आपली धरोहर आहे , केवळ आपला वारसा आहे हा विचार मला सुखावुन जातो ! हा एवढा आनंद उर्वरित द्वेषाकडे दुर्लक्षित करायला पुरेसा आहे माझ्यासाठी !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Trump

सहीच

जेम्स वांड
Sun, 12/19/2021 - 12:15 नवीन
+ १०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

असा

गुल्लू दादा
Sun, 12/19/2021 - 12:22 नवीन
अश्याने हिंदू एकत्रित होईल तर झालाच म्हणून समजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

Social मीडियावर ब्राम्हण

रात्रीचे चांदणे
Sun, 12/19/2021 - 12:55 नवीन
Social मीडियावर ब्राम्हण समाजवर टीका केली जाते हे मान्य आहे, कारण ब्राम्हणवर टीका केली तर हिंसक प्रतिक्रिया मिळणार नाही हे टीका करणाऱ्याला माहीती असत. २०१४ ला जाऊ द्या पण २०१९ ला भाजपा सेने ला बहुमत मिळालं तर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे संपूर्ण राज्याला माहिती होत तरीही लोकांनी त्यांनाच मत दिली, त्यात सेना प्रमुखही ब्राम्हणच. याचदरम्यान फडणवीस वरती ब्राम्हण म्हणून Social मीडिया वरती टीकाही भरपूर झाली. म्हणजेच social मीडियावर जे चालू आहे तेच सत्य समजून Victim Card खेळण्यात काय अर्थ आहे? पण जाती जाती मध्ये एकदम बंधुभाव असे म्हणणेही चुकीचे आहे. जसा वेळ जाईल तशी जाती मधली कटुताही कमी होत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा