चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ५)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
14 Mar 2021 - 7:28 pm
गाभा: 

https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corpor...

आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

17 Mar 2021 - 2:10 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन

जर इतकी माणसं करोनामुळे मारताहेत, तर करोना विषाणूचा अस्सल नमुना का अस्तित्वात नाहीये?

आ.न.,
-गा.पै.

टीप : या मुद्द्यावर चर्चा झाल्यास हा धागा बंद पडेल. याकरिता तुमच्याकडून उत्तर आलं तरीही मी गप्प बसेन.

Rajesh188's picture

17 Mar 2021 - 3:29 pm | Rajesh188

कथित covid टेस्ट positive pan मृत्यू दुसऱ्याच आजाराने अशी प्रकरण खूप आहेत.
पण सर्व मृत्यू corona वर ढकलले गेले.
लोकांची pm पण केले गेले नाही.

शा वि कु's picture

17 Mar 2021 - 3:36 pm | शा वि कु

संसर्गजन्य रोगाची साथ चालू असताना, रुग्णांशी कमीत कमी संपर्क कसा येईल ह्याची काळजी घेत असताना, शवविच्छेदन का बरे होत नसावे ? अगदी गहन कूटप्रश्न आहे म्हणायचा.

सुबोध खरे's picture

17 Mar 2021 - 7:26 pm | सुबोध खरे

गा पै
साहेब

करोना विषाणूचा अस्सल नमुना का अस्तित्वात नाहीये?

आपण हा पक्का गैरसमज (DELUSION) का करून घेतला आहे हे समजत नाही

हा विषाणू या विषयात संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांना फुकट उपलब्ध आहे.

मागे पण एकदा मी तुम्हाला हाच दुवा दिला होता.

SARS-CoV-2 strains supplied by CDC and other researchers can be requested, free, from the Biodefense and Emerging Infections Research (BEI) Resources Repository external icon by established institutions that meet BEI requirements.

https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/lab/grows-virus-cell-culture.html

First isolation of SARS-CoV-2 from clinical samples in India

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7366528/

आपण हे स्वीकारायचेच नाही असे ठरवले असेल तर माझा नाईलाज आहे.

गामा पैलवान's picture

17 Mar 2021 - 11:59 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

मी मुद्देसूद प्रतिसाद दिला तर हा धागा खस्त होईल. त्यामुळे मी अतार्किक प्रतिसाद देतो. कृपया गोड मानून घ्या.

PCR चाचणीचा जनक केरी म्युलीस याला याच शोधानिमित्त नोबेल मिळालं होतं. त्याची मुलाखत इथे आहे : https://twitter.com/LegendaryEnergy/status/1369720747313098753

हिच्यात त्याने फौचीची बिनपाण्याने हजामत केली आहे. काय समजायचंय ते कृपया समजून घ्या.

मी अधिक काही लिहू शकंत नाही. खरंतर तुम्हाला प्रश्नंच विचारायला नको होता. भावनेच्या भरात चूक झाली.

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : याच केरी म्युलीसचा २०१९ साली मृत्यू झाला. किती सोयीस्कर, नाहीका?

मग मृत्यू corona नीच झाला आहे हे कसे ठरवले फक्त रुग्ण positive आहे म्हणून.

शा वि कु's picture

17 Mar 2021 - 5:04 pm | शा वि कु

म्हणजे कोरोनामुळे न्यूमोनिया झाल्यास तो कोरोनाचा बळी नाही, तर न्यूमोनियाचा बळी मानायला पाहिजे. कोरोनाच्या लक्षणांमुळे झालेला मृत्यू कोरोना नव्हे तर सर्दी, पडसे, कफ, ताप ईईई. मध्ये विभागला पाहिजे.
पॉईंट योग्य आहे.
मी तर म्हणतो डॉक्टरने कोरोनाबळी म्हणून लिहिलं कि लगेच सीबीआयचा तपास व्हायला हवा मृत्यूचे कारण शोधण्यासाठी.

मृत्यू नक्की कशामुळे झाला हे कन्फर्म करण्याची काय पद्धत आहे.
खरे साहेबांनी ह्या वर भाष्य करावे.

सुबोध खरे's picture

17 Mar 2021 - 7:09 pm | सुबोध खरे

खरे साहेबांनी ह्या वर भाष्य करावे.

छे छे आपल्या पुढे भाष्य करण्याची माझी काय टाप आहे.

Recent research reported that the sensitivity of computed tomography in diagnosing COVID-19 is 98% while RT-PCR sensitivity is 71%.

म्हणजेच CT SCANNING ने ९८ % रुग्णांमध्ये मृत्यू पूर्वी निदान करता येते. ( वैद्यकशास्त्रात १०० % कधीच नसते)

हे CT SCANNING मी ज्या विषयात वैद्यक निष्णात ( MD)म्हणून पदवी मिळवली आहे त्यातच येते. त्यामुळे मला थोडेसं त्यातील समजू लागलंय असं वाटतं आहे.

पण आपल्या अगाध ज्ञानापुढे मी म्हणजे सूर्यापुढे काजवा

हेच म्हणतो .....

अफाट ज्ञानी व्यक्तीमत्व आहे ....

बापूसाहेब's picture

17 Mar 2021 - 8:40 pm | बापूसाहेब

हाहाहा.. सरकास्टिक प्रतिसाद मस्तच..

अर्थातच त्यांना काहीही फरक पडणार नाही..!!!

चौकटराजा's picture

17 Mar 2021 - 3:59 pm | चौकटराजा

माझ्या महितीनुसार कारणाचे मूळ डेथ सर्टीफिकेट मधे लिहिले जात नाही. काही उदाहरणे मी स्वतः पाहिलेली .. माझे वडील .. कारण मधुमेह .. लिहिलेले कारण हेपॅटिक फेल्युअर माझा भाउ -- कारण मधुमेह -- लिहेलेले कारण रेस्पीरेटरी फेल्यर. माझ्या एका मित्राचे वडील लिहिलेले कारण कार्डिअ‍ॅक फेल्युअर ई . अपघातात मेलेला माणूस अपघाताने मेला असे लिहित नाहीत तर शॉक ड्यू यू मल्टीपल इन्जरी असे लिहितात.

आनन्दा's picture

17 Mar 2021 - 4:51 pm | आनन्दा

150 पूर्ण करतो, नवीन धागा काढा चंद्रसूर्यकुमार..