गाभा:
https://m.timesofindia.com/city/amaravati/ysrc-wins-all-municipal-corpor...
आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाने १७५ पैकी जवळपास १५० जागा जिंकल्या होत्या ती लाट अजूनही कायम आहे. कॉंग्रेस, तेलगू देसम व भाजप या सर्व पक्षांची पुन्हा एकदा पूर्ण वाट लागली आहे.
प्रतिक्रिया
14 Mar 2021 - 10:18 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/pune-news/it-is-just-the-beginning-one-part-is-...
सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबित होते. ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो आणि माझ्याकडे गृह खातं होतं, त्यावेळी अशाप्रकारचा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांनी धरला होती की, त्यांना पुन्हा घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळी मी अॅडव्हकेट जनरल यांना बोलवून ती फाईल दाखवली होती आणि त्यावेळी मला असा सल्ला दिला गेला होता की, उच्च न्यायालयाच्या आदेशाने ते निलंबित झालेले असल्याने त्यांना घेणं योग्य होणार नाही, तो उच्च न्यायालयाचा अपमान होईल. मात्र हे सरकार आल्यानंतर त्यांनी करोनाचं कारण दाखवून करोनात आम्हाला निलंबित अधिकारी हवे आहेत, असं कारण दाखवून त्यांना पुन्हा घेतलं.....
15 Mar 2021 - 2:30 am | Rajesh188
फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना देशांत हजारो घडतात..
फडणवीस सांगत आहेत ते खरे जरी असले तरी त्यांचा हेतू स्वार्थी आहे..
सरकार ल अडचणीत आणणे हा त्यांचा हेतू आहे निःपक्ष प्रशासन असावे हा त्यांचा हेतू नाही.
देशातील राजकीय पक्षांची पातळी खालावली आहे.
आणि त्याला कारण स्व बुध्दी न वापरता भावनीक निर्णय घेणारी जनता.
काँग्रेस नालायक असेल तर BJP सुद्धा नालायक च आहे आणि सेना,राष्ट्रवादी सुद्धा नालायक च आहेत.
कारण जनताच त्यांचे प्रतिनिधी योग्य निवडत नाही
15 Mar 2021 - 11:58 am | सुबोध खरे
फडणवीस जे सांगत आहेत तशा घटना देशांत हजारो घडतात..
कशाला थापा मारताय?
मला फक्त पाच अशा १७ वर्षांनी नोकरीत परत सामावून घेतलेल्या माणसांची उदाहरणे दाखवून द्या.
16 Mar 2021 - 10:35 pm | बापूसाहेब
झाले गायब..!!!
दावा हजाराचा करायचा पण 5 उदाहरणे पण द्यायची नाहीत.. !!
17 Mar 2021 - 7:54 am | मुक्त विहारि
यांच्या अभ्यासात व्यस्त असतील ...
14 Mar 2021 - 10:27 pm | Rajesh188
लोकसत्ता लोकप्रिय paper झाला वाटत.
अर्णव नी लोकसत्ता मालकंस यशाचा मंत्र दिला.
14 Mar 2021 - 11:30 pm | उपयोजक
आंध्रप्रदेशातील स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा वाय एस आर कॉंग्रेसने जबरदस्त कामगिरी केलीये. :(
दु:खद बातमी. ख्रिश्चन धर्मांतरणाला पुन्हा वेग येणार अांध्रात.
14 Mar 2021 - 11:37 pm | श्रीगुरुजी
जनतेला त्यांच्या लायकीचे सत्ताधारी मिळतात.
16 Mar 2021 - 10:31 pm | मुक्त विहारि
सहमत आहे
15 Mar 2021 - 2:33 am | गामा पैलवान
उपयोजक,
स्थानिक लोकप्रतिनिधी वायेसारचे चालतील. आमदार व खासदार नकोत. अर्थात, स्थालो एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर निवडून येणं ही धोक्याची घंटा आहेच. बहुधा छुपा ख्रिश्चन टक्का खूप वाढलेला असावा.
आ.न.,
-गा.पै.
15 Mar 2021 - 2:37 am | Rajesh188
राष्ट्रीय पक्ष कोणत्याच लोकांना नको आहेत.
प्रादेशिक पक्ष स्थानिक प्रश्न नीट समजून घेवू शकतात असे लोकांना वाटते.
प्रथम देश हा सुविचार आहे
फक्त फळ्यावर लिहायचं .
इतकेच त्याचे महत्व आहे
16 Mar 2021 - 10:32 pm | मुक्त विहारि
आम्ही तरी, प्रथम देश असेच समजतो...
15 Mar 2021 - 2:34 am | Rajesh188
देश हित करणारी उत्तम दर्जा ची माणसं निवडून ध्या.
धर्म हा बाजूला ठेवा .
हिंदू निवडून दिला म्हणून तो हिंदू चे भले करणार नाही.
आणि मुस्लिम निवडून दिलं म्हणजे तो मुस्लिम लोकांचे भले करणार नाही.
कोणत्या ही धर्माचा सभ्य व्यक्ती निवडून दिला तर तो मानव हित नक्की च करेल.
15 Mar 2021 - 9:49 pm | NiluMP
Good Joke.
16 Mar 2021 - 7:13 am | मुक्त विहारि
खिलाफत चळवळ, रझा संघटने बद्दल काहीही माहिती नाही...
तसेही त्यांना, दक्षिण कोरिया बद्दल पण काहीही माहिती नाही...
16 Mar 2021 - 10:18 am | सुबोध खरे
अहो थापाडेरावांचे काय ऐकताय?
16 Mar 2021 - 10:46 am | मुक्त विहारि
माहिती न घेता लिहित असतात...
16 Mar 2021 - 7:35 pm | राघव
अनभिज्ञता नाही ही. हे जाणीवपूर्वक लिहिणं आहे.
बाकी खुसपटं काढणं, उगाच काहीही बाता ठोकणं हे सर्व शिवसेनेचं लक्षण आहे. ते आता दिसतंच आहे मागच्या ६-७ आठवड्यांपासून.
हे सर्व सो कॉल्ड चांगल्या भाषेत लिहिलं म्हणजे प्रतिसाद देखील उडवल्या जात नाहीत.
चिथावणीखोर लिहिणं हे अनभिज्ञता नाही तर धागे हायजॅक करण्याची मानसिकता दर्शवतं. कोणतीही चांगली चर्चा होऊच द्यायची नाही असं काहिसं धोरण वाटायला लागलं आहे हे. असो.
16 Mar 2021 - 8:00 pm | मुक्त विहारि
आणि हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे...
आमच्या डोंबिवली येथील पत्रीपुलाचे जास्तीत जास्त काम आधीच्या सरकारने केले आणि श्रेय उपटायचा प्रयत्न, ह्या सरकारने केला...
15 Mar 2021 - 2:40 am | Rajesh188
नावा वर राजकारण करणारी लोक मला सर्वात मोठे भामटे वाटतात.
त्यांच्या हातून देश हित कधीच होणार नाही.
15 Mar 2021 - 7:32 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/mumbai-news/up-to-90000-patients-in-a-week-in-t...
15 Mar 2021 - 8:01 am | Rajesh188
Corona हे थोतांड आहे ह्याची खात्री पटत चालली आहे.
लोक पण आता ह्या बातम्या गंभीर पने घेत नाहीत
महाराष्ट्र सोडून बाकी राज्यात लोक गर्दी करत नाहीत,सर्वच्या सर्व मास्क वापरतात ,आरोग्य व्यवस्था चांगली असहे,लोक शिस्त प्रिय आहेत,
तर बिलकुल नाहीत
तरी आकडे येथीलच कसे वाढतात.
टेस्ट पण एक थोतांड च आहे.
१००० गुणिले लोकसंख्या हा चावटपणा चालू आहे .
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.
17 Mar 2021 - 1:21 am | अनन्त अवधुत
तुमच्या माहितीतले कोणिही गंभीर आजारी न पडो ह्या सदिच्छा!
17 Mar 2021 - 12:08 pm | सुबोध खरे
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.
आपण स्वतःला सर्वज्ञ किंवा बुद्ध समजता काय?
आणि आपले लाडके मुख्यमंत्री आरोग्य मंत्री जनतेला अंतर ठेवा, मुखवटा घाला, काळजी घ्या म्हणून आवाहन करतात ते काय गांजा पिऊन बोलतात का?
17 Mar 2021 - 12:25 pm | सुबोध खरे
एक पण गंभीर आजारी व्यक्ती माझ्या माहिती मध्ये नाही.
देशाच्या कानाकोपर्यात चौदा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणुका , त्यातही नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन झाल्याने पोटनिवडणुका.
थापाडेराव राव काहीही वाचत नाहीत काहीही ऐकत नाहीत
सर्व गोष्टींचे ज्ञान त्यांना बोधीवृक्षाखाली बसून आपोआप होतच असते
तेंव्हा त्यांना सर्व मिपाकरांनी शरण जावे हे उत्तम.
17 Mar 2021 - 3:02 pm | Rajesh188
पण क्षय रोगांनी भारतात covid पेक्षा जास्त लोक मरण पावतात.(रुग्ण आणि होणारे मृत्यू असे बघा)
Covid काळात अनेक रोगांवर उपचार च झाले नाहीत.
किंवा बाकी रोगाच्या चाचण्या च झाल्या नाहीत हे पण सत्य आहे.
एक लाख ५९ हजार covid मुळे मृत्यू झाले असे सरकारी रेकॉर्ड सांगते पण ह्या मृत्यू झालेल्या लोकात बाकी आजारांनी मरण आलेल्या लोकांचा पण सहभाग आहे .
Covid positive pan मृत्यु दुसऱ्याच आजाराने हीच लोक जास्त आहेत.
तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते
आम्हाला सांगायला लागत आहे.
देशाची लोकसंख्या १३० कोटी.
Covid रुग्ण सव्वा कोटी पण नाहीत .
आणि एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार.
आणि क्षय रोगाचा आकडा तुम्हाला माहीतच असेल.
Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात.
मग covid ची भीती प्रमाण पेक्षा जास्त दाखवून बाकी आजारांना दुर्लक्षित केले जात आहे.
17 Mar 2021 - 3:02 pm | Rajesh188
पण क्षय रोगांनी भारतात covid पेक्षा जास्त लोक मरण पावतात.(रुग्ण आणि होणारे मृत्यू असे बघा)
Covid काळात अनेक रोगांवर उपचार च झाले नाहीत.
किंवा बाकी रोगाच्या चाचण्या च झाल्या नाहीत हे पण सत्य आहे.
एक लाख ५९ हजार covid मुळे मृत्यू झाले असे सरकारी रेकॉर्ड सांगते पण ह्या मृत्यू झालेल्या लोकात बाकी आजारांनी मरण आलेल्या लोकांचा पण सहभाग आहे .
Covid positive pan मृत्यु दुसऱ्याच आजाराने हीच लोक जास्त आहेत.
तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते
आम्हाला सांगायला लागत आहे.
देशाची लोकसंख्या १३० कोटी.
Covid रुग्ण सव्वा कोटी पण नाहीत .
आणि एकूण मृत्यू १ लाख ५९ हजार.
आणि क्षय रोगाचा आकडा तुम्हाला माहीतच असेल.
Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात.
मग covid ची भीती प्रमाण पेक्षा जास्त दाखवून बाकी आजारांना दुर्लक्षित केले जात आहे.
17 Mar 2021 - 7:01 pm | सुबोध खरे
तुम्ही डॉक्टर आहात हे सर्व तुम्हाला माहीत असायला हवं होते
माहिती आहे.
मग काय शनिवार वाड्यावर लाऊड स्पीकर लावून बोंबलू?
आजच माझ्या वर्ग मित्राच्या आईच्या स्तनाच्या कर्करोगाची चाचणी केली चौथ्या स्टेज मध्ये आहे ६ महिन्यापासून असलेली गाठ. कोवीड मुळे त्यांनी कुणाला सांगितले नाही.
असे रुग्ण रोज पाहतो आहे.
आम्हाला सांगायला लागत आहे.
आपल्यासारखे बोधीवृक्षाखाली बसून ज्ञान मिळालेले नाही
गेली ३७ वर्षे शिकतो आहे .आपल्या ज्ञानाच्या अगाध पातळीला पोहोचायला बहुतेक सात जन्म लागतील
Covid पेक्षा जास्त मृत्यू क्षय रोगांनी होतात.
हे ज्ञान मला नाही.
The India TB Report 2020 stated that 79,144 deaths due to tuberculosis were reported in 2019.
पण क्षय रोगाने चालता फिरता माणूस चार दिवसांत कैलासवासी होत नाही. बरीच वर्षे उपचार नीट न मिळाल्याने /केल्याने जातात.
ज्यांचे धडधाकट नातेवाईक असे गेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना तुमचे असले अफलातून लॉजिक सांगणार का?
17 Mar 2021 - 7:33 pm | मुक्त विहारि
ह्यांचे प्रतिसाद मी जास्त मनावर घेत नाही ....
अफाट ज्ञानी व्यक्तीमत्व आहे ....
17 Mar 2021 - 7:54 pm | Vichar Manus
Dr साहेब तुमचे अगदी बरोबर आहे पण इथे अजून एक व्यक्ती आहे जी म्हणते केव covid च नाही तर सगळ्या लसी थोतांड आहे, त्यांना पण थोडे ज्ञान दया
17 Mar 2021 - 9:10 pm | श्रीगुरुजी
या दोघांचेही प्रतिसाद वाचणे मी फार पूर्वीच थांबविले आहे.
1 Apr 2021 - 1:15 pm | राघव
डॉक्, हे सगळे त्यांना सांगून उपयोग होणार नाही. स्वतः एकांगी विचार ठेवायचे आणि अख्या जगाला निष्पक्ष विचाराचे ज्ञान द्यायचे हे यांचे लॉजिकल तत्वज्ञान.
तर्क हा मुळातच निष्पक्ष ठेवावा लागतो, एकाच विषयाला अनेक कंगोरे असू शकतात हे बेसिक फंडेच यांना माहित नाहीत. किंवा वेड पांघरण्याचा प्रकार आहे. असो.
आपल्या प्रतिसादांमधील माहिती आवडते. लिहिते रहा.
15 Mar 2021 - 8:02 am | Rajesh188
तरी त्याला महाराष्ट्र च दोषी आहे अशी समजणारी सुशिक्षित aadani लोक प्रचंड आहेत.
15 Mar 2021 - 10:20 am | अनन्त अवधुत
तरी त्याला केंद्रच दोषी आहेत अशी समजणारी अशिक्षित गुलाम लोक पण भरपुर आहेत. :)
15 Mar 2021 - 8:12 am | मदनबाण
Amravati: विजय भाजपचा, पण चर्चा शिवसेना-एमआयएम युतीची
‘आताची शिवसेना ही नक्कीच हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असूच शकत नाही’
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)
15 Mar 2021 - 2:03 pm | Rajesh188
तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका.
ज्यांचे व्हिडिओ तुम्ही लिंक म्हणून देता ती सर्व लोक सत्यवादी हरिश्चंद्र ची संतान नाहीत .
तर लांडगे आहेत.
कोणाला काय वाटतं हे महत्वाचे नाही .तुम्हाला स्वतःला काय वाटते तेव्हढेच सांगत जा.
आणि व्हिडिओ बघण्यासाठी फालतू वेळ पण कोणाकडे नसतो .
दुनिया काय विचार करते हे त्या विचार करणाऱ्या वर सोडा .
फक्त तुम्ही काय विचार करता ह्याच्या शी मिपाकरांना देणेघेणे आहे.
लबाड लोकांशी काही देणेघेणे नाही.
15 Mar 2021 - 4:26 pm | मदनबाण
@ राजेश... तुमच्या प्रतिसादास मी फक्त पास म्हणतो ! :)))
असो...
ताजा कलम :- White Innova car which accompanied explosives-laden Scorpio car recovered from Mumbai Police Commissioner Parambir Singh’s office: Reports
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकार्यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयातून पांढरी इनोव्हा कार जप्त केली आहे.मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवण्यासाठी या इनोव्हाचा वापर केल्याचा संशय होता.
जाता जाता :- वृद्धत्वात देखील मा.शरद पवार यांना किती सगळीकडे हेलपाटे घालावे लागत आहेत, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी. उगाच सगळीकडे डॅमेज कंट्रोल करत बसत स्वतःच्या प्रकृतीस डॅमेज करुन घेउ नये !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Y2K & Bbno$ - Lalala (ilkan gunuc remix) (Bass Boosted)
16 Mar 2021 - 12:35 pm | मदनबाण
आता परमबीर सिंह आत जाणार का ?
परमबीर आत जातील की नाही ते येत्या काळात कळेलच, पण सध्या त्यांची पालखी उचलली जाईल असे दिसते !
जाता जाता :- महाराष्ट्रात इतके मोठे कांड घडले, मुंबई पोलिसांची इज्जत वेशीला टांगली गेली तरी गृहमंत्री अजुन पदावर विराजमान कसे ? नक्की काय काम करुन कशाचा पगार घेतात हे मंत्री महोदय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
16 Mar 2021 - 2:02 pm | सॅगी
कायद्याचे राज्य आहे हे माध्यमांतुन सांगण्याचा....
16 Mar 2021 - 2:03 pm | सौंदाळा
आणि कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या आपल्या माणसांना बाहेर काढायचा.
16 Mar 2021 - 9:57 pm | मदनबाण
परमबीर आत जातील की नाही ते येत्या काळात कळेलच, पण सध्या त्यांची पालखी उचलली जाईल असे दिसते !
पालखी उचलली जाईल असे वाटल्यावर यांची फाफललेली दिसतेय कारण अचानक यांना समर्थन देण्यासाठी कृत्रीम टिवटिवाट सुरु करण्यात आला आहे !
‘Parambir Singh toolkit’: Campaign launched by unidentified groups on Twitter to support Mumbai CP after Shiv Sena backs Sachin Vaze in Antilia case
गाड्या वापरणारे पोलिस,गाड्या पार्क करणारे पोलिस,गाड्यांचे नंबर प्लेट्स बदलणारे देखील पोलिसच मग तरी सुद्धा परबीर आणि गृहमंत्री अजुन पदावरच !
रक्षकच भक्षक !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
16 Mar 2021 - 2:27 pm | रंगीला रतन
तुम्ही कोणत्याच व्हिडिओ ची लिंक देवू नका.
१८८ प्रभू तुम्ही तर कोणत्याही धाग्यावर प्रतिसादच देऊ नका. आता त्यावर हसायला येत नाही पण कीव येते तुमची.
16 Mar 2021 - 10:09 pm | Rajesh188
जास्त हसू नका .माझ्या एका प्रश्न चे उत्तर तुम्ही देवू शकत नाही.
कशाला बुद्धीचे प्रदर्शन करता.
17 Mar 2021 - 1:37 am | अनन्त अवधुत
बर्याच जणांच्या बर्याच प्रश्नांची उत्तरे अजुन द्यायची आहेत.
आता ह्याच धाग्यावर इथे काही बोलता आले तर बघा.
15 Mar 2021 - 9:34 am | मराठी_माणूस
https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/15032021/0/0/
अनोळखी व्यक्तीला किडनी दान करणे , तिही एका उद्योगपतीने सामान्य ट्र्क ड्रायव्हरला अतिशय कौतुकास्पद .
15 Mar 2021 - 11:27 am | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/mumbai-news/municipal-action-for-recovery-of-pr...
आलिशान वाहने बाळगण्याची ऐपत आहे तर मग कर का भरत नसतील ?
15 Mar 2021 - 12:43 pm | आग्या१९९०
घरगुती गॅस सिलिंडर ८०० रू. होऊनही अद्याप सबसिडी मिळत नाही. काय ब्र करावं?
15 Mar 2021 - 2:14 pm | Rajesh188
सत्तेत मग्न बेधुंद काँग्रेस चे शेवटचे दिवस आणि
आता bjp चे वर्तन समान आहे.
आता bjp च शेवट आला आहे
जसे काँग्रेस च्य ::::::: भागावर लाथ मारून त्यांना बाहेर केले त्याच मार्गाने bjp जात आहे
पण खूप लवकर ह्याचे दुःख होत आहे.
एक निर्णय क्षमता असणारा पक्ष काहीच दिवसात नष्ट होईल त्याचे दुःख आहे
15 Mar 2021 - 5:20 pm | उदयगिरी
राजेश जी स्वप्न पाहणे वाईट नाही, जरूर पहा.
15 Mar 2021 - 5:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
बातमी आली रे राजेशा-
He (Waze) was initially very reluctant to speak up and denied all allegations. But when he was confronted with technical evidence, that includes his location at several places that he could not explain and footage from CCTV cameras along with results of forensics, he broke down and confessed that he was part of the conspiracy,” the source said.
NIA claims Waze's teammate arranged for fake number plate for the explosive-laden SUV to mislead investigators, says more names from Mumbai Police will emerge.
द प्रिन्ट वरील बातमी आहे.
उद्या आमचे संजय राउत सामनात काय म्हणतात ते बघुया.
15 Mar 2021 - 7:04 pm | आनन्दा
नाही.. आत्ता नाही.
अजून ६ महिने थांबा प्लीज.
15 Mar 2021 - 6:53 pm | चंद्रसूर्यकुमार
२००८ च्या बाटला हाऊस चकमकीत पोलिस अधिकारी मोहनचंद्र शर्मा यांना ठार मारल्याप्रकरणी दिल्लीतील कोर्टाने आरिझ खानला देहदंडाची शिक्षा सुनावली आहे.
बाटला हाऊस चकमक झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणे रात्रभर तळमळत ढसढसा रडत होत्या. आपले युगपुरूष अरविंद केजरीवाल हे पण ही चकमक बोगस होती असे म्हणाले होते. आता या मंडळींची यावर प्रतिक्रिया काय असेल?
15 Mar 2021 - 8:23 pm | अनन्त अवधुत
म्हणाल्या होत्या कि ही चकमक खरी असेल तर राजकारण सोडेन.
15 Mar 2021 - 9:40 pm | श्रीगुरुजी
आता पुन्हा बांध फुटून अश्रूपात होईल.
15 Mar 2021 - 11:31 pm | चंद्रसूर्यकुमार
सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे.
सांगलीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून त्यांनी १९८६ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जनता पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणुक लढवली आणि जिंकली. ही पोटनिवडणुक माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे झाली होती. त्या पोटनिवडणुकीत संभाजी पवारांनी विष्णूअण्णा पाटील यांचा पराभव करून खळबळ उडवली. संभाजी पवार १९९० आणि १९९५ च्या विधानसभा निवडणुकांमध्येही जनता दलाचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९९५ मध्ये तर सांगलीशेजारच्या मिरज विधानसभा मतदारसंघातूनही जनता दलाचे प्रा.शरद पाटील यांनी विजय मिळवला होता आणि पूर्ण महाराष्ट्रातून अस्तंगत होणार्या जनता दलाचे दोन आमदार सांगली जिल्ह्यातून आले होते. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी मी सांगलीत राहायला होतो. तेव्हा माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा सांगलीत आले होते आणि मतदारसंघात जनता दलाचे दोन आमदार असतानाही पक्षाचा लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवार का नाही ही विचारणा त्यांनी स्थानिक नेत्यांकडे केली होती असे वाचल्याचे लक्षात आहे. संभाजी पवारांचा १९९९ मध्ये काँग्रेसच्या दिनकर पाटील यांनी पराभव केला.
२००३ मध्ये संभाजी पवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या पक्षप्रवेशासाठी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी पण सांगलीत आले होते. २००४ मध्ये संभाजी पवार भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढले पण विष्णूअण्णा पाटील यांचे चिरंजीव मदन पाटील यांनी राष्ट्रवादीमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवली आणि ते जिंकले. संभाजी पवार दुसर्या तर काँग्रेसचे १९९९ ते २००४ या काळातील आमदार दिनकर पाटील तिसर्या क्रमांकावर होते. २००९ मध्ये संभाजी पवारांनी २००४ च्या पराभवाची परतफेड केली. २००९ ची विधानसभा निवडणुक सांगलीत गणेशोत्सवादरम्यान अफजलखान वधाचे पोस्टर लावल्यामुळे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर झाली होती. त्यावेळी मदन पाटील काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे होते. त्यांचा संभाजी पवारांनी पराभव केला. तसेच शेजारच्या मिरजमधूनही भाजपचे उमेदवार म्हणून सुरेश खाडे निवडून आले होते. सांगली आणि मिरज मतदारसंघातून पहिल्यांदाच भाजपने २००९ मध्ये यश मिळवले.
२०१४ मध्ये वाढत्या वयामुळे संभाजी पवारांनी निवडणुक लढवली नाही. सांगली भागात त्यांचे नाव बर्यापैकी आदराने घेतले जायचे हे मी बघितले होते. त्यांना श्रध्दांजली.
16 Mar 2021 - 7:23 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/pune-news/kirit-somaiya-question-to-sharad-pawa...
सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.
16 Mar 2021 - 10:24 am | सुबोध खरे
सामान्य लोकांनी, असामान्य लोकांसाठी, निवडून दिलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.
असे नसून
असामान्य लोकांचे, सामान्य लोकांनी निवडून न देताही मागच्या दाराने आलेले सरकार आहे, त्यामुळे ते योग्य तो निर्णय नक्कीच घेतील.
16 Mar 2021 - 10:47 am | मुक्त विहारि
80% लोकांनी नाकारलेल्या पक्षाचे मुख्यमंत्री होऊ शकतात...
17 Mar 2021 - 3:52 pm | चौकटराजा
अजब लोकशाहीचा किस्सा एकदा प्रमोद महाजन यानी एका चिनी अधिकार्याला सान्गितला होता. १८२ खासदार असलेला भाजपाचा प्रमोद महाजन विरोधी पक्षात तर रमाकान्त खलप हा म गो पक्षाचा एकमेव खासदार केन्द्र सरकारात !
17 Mar 2021 - 4:36 pm | वामन देशमुख
प्रमोद महाजनांचे हे भाषण मी ऐकले होते. लोकशाहीचा काळा विनोद!
16 Mar 2021 - 7:34 am | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/mumbai-news/investigate-shiv-sena-leader-varun-...
हे नक्की काय गौडबंगाल आहे? "वरूण सरदेसाई ", यांचा काय संबंध?
अर्थात, सामान्य लोकांसाठी काम करणारे, असामान्य सरकार असल्याने, योग्य तो निर्णय नक्कीच घेतील....
16 Mar 2021 - 10:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ते पोलिस आयुक्त परमबीर सिंग ह्यांचीही कोठडीत ठेउन चौकशी केली पाहिजे. त्यांच्या छुप्या आशीर्वादाशिवाय हे सचिन वाझे अतिरेकी चाळे करू शकले नसते.
16 Mar 2021 - 11:03 am | सौंदाळा
सुशांतच्या निधनानंतर रिहा चक्रवर्तीबरोबर गुलुगुलु बोलणारे हेच ना
16 Mar 2021 - 1:21 pm | मराठी_माणूस
https://www.loksatta.com/nagpur-news/obstruction-of-finance-department-f...
आर्थिक परिस्थितीची समस्या फक्त शिक्षण क्षेत्रालाच का ?
16 Mar 2021 - 1:29 pm | मुक्त विहारि
काय बोलावं ते सुचेना
16 Mar 2021 - 2:23 pm | चंद्रसूर्यकुमार
राज्यसभेतील राष्ट्रपतीनियुक्त सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा उद्यापासून ग्राह्य धरला जावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
२०१६ मध्ये दासगुप्तांची नियुक्ती राज्यसभेवर झाली होती. नियमाप्रमाणे असे राष्ट्रपतीनियुक्त सदस्य नियुक्ती झाल्यानंतर सहा महिन्यांमध्ये कोणत्या राजकीय पक्षात सामील झाले तर हरकत नसते पण त्यानंतर ते कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास ते अपात्र ठरतात. दासगुप्ता वेगवेगळ्या टिव्ही चॅनेलवर भाजपची बाजू मांडताना अनेकदा दिसतात पण त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र परवा भाजपने बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली त्यात हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर मतदारसंघातून उमेदवार म्हणून स्वपन दासगुप्तांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. म्हणजेच त्यांचा भाजपत प्रवेश होणार आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांना पक्षाकडून त्यांच्या वतीने फॉर्म-बी भरला जाणार आणि ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील आणि त्यांना कमळ हे पक्षाचे चिन्ह देण्यात यावे असे पक्षाकडून निवडणुक आयोगाला सांगितले जाणार. सहा महिन्यांची मुदत उलटून गेल्याने दासगुप्तांनी स्वतःच राजीनामा दिला असता तर ते बरे झाले असते. पण तृणमूल काँग्रेसच्या लोकसभेतील कृष्णनगरच्या खासदार महुवा मोईत्रा यांनी दासगुप्तांचे नाव उमेदवारांच्या यादीत असल्याबद्दल आक्षेप घेतला आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.
स्वतः स्वपन दासगुप्तांनी याची माहिती पुढील ट्विट करून दिली आहे.
16 Mar 2021 - 3:34 pm | श्रीगुरुजी
हे पूर्वी आऊटलुक साप्ताहिकाचे संपादक होते का?
16 Mar 2021 - 4:20 pm | चंद्रसूर्यकुमार
नाही. ते विनोद मेहता. स्वपन दासगुप्ता आऊटलुकमध्ये नव्हते.
अवांतरः पूर्वी स्वपन दासगुप्ता आणि चंदन मित्रा हे दोन पत्रकार चर्चांमध्ये भाजपची बाजू मांडायचे. पण चंदन मित्रा काही वर्षांपूर्वी तृणमूलमध्ये गेले. युट्यूबवर जून १९८८ च्या पोटनिवडणुकांवरील प्रणॉय रॉयचा व्हिडिओ मिळाला. याच पोटनिवडणुकांमध्ये वि.प्र.सिंग अलाहाबादमधून जिंकले होते. या कार्यक्रमात तरूणपणचे प्रणॉय रॉय, विनोद दुआ, चंदन मित्रा आणि शेखर गुप्ता दिसतील.
16 Mar 2021 - 4:32 pm | श्रीगुरुजी
धन्यवाद
16 Mar 2021 - 4:36 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/india-news/quran-verses-row-lawyer-booked-f...
16 Mar 2021 - 7:16 pm | बापूसाहेब
गळा कापणे हे धर्मकार्य आहे..
आणि आता भारत असुरक्षित नसतो.. असहिष्णूंता नसते.. UNA मध्ये जायची गरज नसते.. ट्विटर वर टिवटिवाट आणि अवॉर्ड वापसी करायची नसते. कारण #फेक्युलरिज्म..
रंगपंचमी आणि दिवाळी च्या वेळेस कुत्र्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल लेख च्या लेख लिहिणारे बॉलिवूड अभिनेत्री, अभिनेते, PETA वाले/वाल्या आज 50 हुन जास्त कुत्र्यांसोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीच बोलत नाहीत.
त्यामुळे समाजात खरे कुत्रे आणि कुत्र्या कोण हे दिसले.
#JusticeForShera
16 Mar 2021 - 7:32 pm | मुक्त विहारि
समाजात भरपूर आहेत....
16 Mar 2021 - 7:31 pm | गामा पैलवान
कुराणातले वादग्रस्त भाग वगळण्याच्या बाबतीत माझा रिझवींना पाठिंबा आहे.
-गा.पै.
16 Mar 2021 - 6:23 pm | मुक्त विहारि
https://www.esakal.com/pimpri-chinchwad/chinchwad-shiv-sena-branch-chief...
16 Mar 2021 - 7:13 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/mumbai-news/how-many-more-people-will-be-saved-...
छापील बातमी आहे....
16 Mar 2021 - 9:49 pm | श्रीगुरुजी
केशव उपाध्येंंनी विचारले तर हरकत नाही. पण फडणवीसांनी असा प्रश्न विचारणे अत्यंत हास्यास्पद व ढोंगीपणाचे लक्षण आहे.
16 Mar 2021 - 7:27 pm | Rajesh188
फक्त देणे भोवती च गोल गोल फिरण्यासाठी आयुष्य वाया घालवू नका.
बँक कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे तिकडे पण थोडे लक्ष असू द्या.
भारत जसा खूप मोठा आहे तसेच भारतात समस्या पण खूप आहेत.
फक्त शिवसेना आणि सत्ता मिळाली नाही तर दुखः किती कुरवाळत बसणार.
16 Mar 2021 - 7:31 pm | मुक्त विहारि
काम करायला लागेल, म्हणून त्यांना दूःख होत आहे...
16 Mar 2021 - 7:43 pm | बापूसाहेब
खाजगीकरण होतेय.. बँक कर्मचारी आता जरा सचोटीने आणि भरीव काम करतील अशी अपेक्षा...
काम न केल्यास वरून बांबू बसणे आणि नोकरी जाण्याची भीती निर्माण होणे गरजेचे आहे.. सरकारी सिस्टीम मध्ये हे होत नाही..
16 Mar 2021 - 8:30 pm | आग्या१९९०
सगळ्या सरकारी बँका ( SBI सोडून ) येस बँकेला देऊन टाका. खासगी म्हणजे सगळं शिस्तबद्ध. आणि घोटाळा होऊन बुडलीच तर आहेच RBI आणि SBI वाचवायला. फक्त इथल्या अर्थतज्ञ बोकीलांची सल्लामसलत करून निर्णय घ्यावा.
16 Mar 2021 - 11:00 pm | पिनाक
एक महत्वाची माहिती: जेव्हा तुम्ही बँकेत पैसे ठेवता (म्हणजे बँकेला पैसे कर्जाऊ देता) किंवा त्यांचे शेअर्स घेता तेव्हा ती संपूर्णपणे तुमची जोखीम असते. सरकार तुम्हाला बँकेत पैसे ठेवा असं सांगायला येत नाही. किंवा ठेऊ नका असेही सांगायला येत नाही. सरकारी असो वा खाजगी, जर बँक बुडाली तर कायदेशीर पद्धतीने क्लेम करब्याव्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करावी ही गोष्ट चुकीची निघालि तर तुम्ही आणि तुमचे नशीब. लिमिटेड लैआबिलिटी मुळे बँकेच्या बोर्डावर पण (जर त्यांनी fraud केला नसेल तर) कायदेशीर कारवाई करता येत नाही. म्हणजे त्यांचे इन्व्हेस्टमेंट चे निर्णय चुकले तरी तुम्ही काही करू शकत नाही.
16 Mar 2021 - 11:13 pm | आग्या१९९०
सहमत. त्यामुळे सरकारी बँकांचे खासगीकरण केल्याने समस्या उद्भवणार नाही असेही म्हणता येणार नाही.
16 Mar 2021 - 11:26 pm | Rajesh188
बँकांची ची काहीच जबाबदारी नसेल.बँक बुडाली बँकेच्या चुकीच्या निर्णय मुळे तरी.
तर बँका हव्यात कशाला.
हा पहिला प्रश्न.
माणसांनी रोख पैसे घरात ठेवले तर इन्कम टॅक्स वाले तिकडे का कोलमडत असतात.
बँका काहीच जबाबदारी नसेल तर.
बँकेच्या बाहेर असणाऱ्या किती ही मोठ्या रक्कमे ला ब्लॅक money म्हणता येणार नाही.
सरकार जबरदस्ती करत आहे लोकांना बँकेत पैसे ठेवण्यासाठी.
किती तरी उदाहरणे देता येतील.
नोट बंदी कशा साठी केली.
बँक आणि सरकार जर लोकांनी बँकेत पैसे ठेवावे म्हणून जबरदस्ती करत नाही तर .
ब्लॅक money ची व्याख्या ऐकायला आवडेल.
पिणाक जरा ब्लॅक money ची व्याख्या सांगा.
डिजिटल पेमेंट ची जबरदस्ती का.?
हे पण जरा विस्कटून सांगा.
चेक नी payment ची जबरदस्ती का?
17 Mar 2021 - 9:39 am | मराठी_माणूस
रोखीचे व्यवहार करुन नका असे कोण सांगते ?
17 Mar 2021 - 10:19 am | Rajesh188
प्रॉपर्टी आणि जमिनी चे व्यवहार रोख रक्कम देवून करण्यास बंधन आहे.
असे काही व्यवहार आहेत त्या मध्ये रोख रक्कम देवून व्यवहार करण्यावर बंधने आहेत.
घरात किती ही पैसे ठेवण्यास बंधन नाही पण त्याचा हिशोब द्यावा लागणार.
हीच गेनाबाची मेख आहे.
त्या मुळे तुम्ही घरात जास्त मोठी रक्कम ठेवू शकत नाही.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे ह्याचा अर्थ च बँकेत पैसे ठेवण्यास लोकांना प्रवृत्त करणे हा आहे.
16 Mar 2021 - 8:45 pm | Rajesh188
ठेवू ज्या बँकेत असतात त्यांची सुरक्षा हे तुमचे खासगी भांडवलदार करणार आहेत का?
की बँकेचे मालक च सर्व पैसे घेवून पसार होतील.
असे झाले तर कोणाला फाशी वर चढवले पाहिजे त्या वेळेस.
प्रश्न फक्त कर्मचाऱ्यांचा नाही.
सामान्य लोकांचे पैसे सुरक्षित राहतील की नाही राहणार हा पण आहे.
ह्या देशात अतिशय दुर्गम भाग पण आहे तेथील लोकांना हे खासगी बँकेचे मालक,आणि आता चे देशाचे मालक शेठ हे सेवा देतील का.
की फक्त मुंबई ,पुण्यात च खासगी बँकेचे मालक ब्रांच चालवतील का?
16 Mar 2021 - 8:53 pm | आग्या१९९०
ज्यांना खासगी बँकांवर विश्वास आहे त्यांनी सरकारी बँकेत खाते
काढू नये.
16 Mar 2021 - 8:49 pm | Rajesh188
खासगी कारण झाल्या मुळे फक्त कर्मचारी संकटात येतील आणि बाकी काही प्रश्न च निर्माण होणार नाहीत.
एवढा संकुचित विचार फक्त बुद्धीचे दिवाळे निघाले आहेत त्याच व्यक्ती करू शकतात.
16 Mar 2021 - 9:17 pm | मुक्त विहारि
तुम्ही पण एखादी बॅन्क विकत घेऊ शकता ...
16 Mar 2021 - 9:58 pm | बापूसाहेब
राजेश जी तुमच्या प्रतिसादाला आपला पास.. कारण मी अनुभवावरून बोललो. आजवर मी जवळपास 14 बँकेच्या सेवा वापरल्या आहेत, त्यामध्ये सहकारी, खाजगी, सरकारी, इंटरनॅशनल अश्या सर्व प्रकारच्या बँका आहेत. त्या अनुभवावरून मी सांगु शकतो कि खाजगी बँकामध्ये कस्टमर ला योग्य तो मानसन्मान दिला जातो. कामे विनाकारण अडवली जातं नाहीत आणि शक्यतो प्रत्यक्ष बँकेत जाण्याचे प्रसंग फार कमी येतात. कामे लवकर आणि वेळेत पूर्ण होतात.
खाजगी असली तरी govt चे सगळे नियम पाळूनच व्यवहार होतात त्यामुळे खाजगी बँका धोकादायक पण सरकारी बँका विश्वासार्ह हा जावईशोध कुठून आला ते माहिती नाही.
असो.
बँकेचं खाजगीकरण झाल्याने नेमके काय परिणाम होतील हे एखाद्या निष्पक्ष मिपाकरांकडून वाचायला आवडेल.
त्याचबरोबर जे काही कर्मचारी आत्ता संप करत आहेत त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?? त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत कि पगार कमी होणार आहेत.??
कोणी जाणकार व्यक्ती स्पष्टीकरण देऊ शकेल काय.??
16 Mar 2021 - 10:00 pm | बापूसाहेब
जाणकार व्यक्ती असे वाचावे..
16 Mar 2021 - 10:04 pm | बापूसाहेब
जाणकार व्यक्ती असे वाचावे..
17 Mar 2021 - 8:54 am | साहना
काम करावे लागणार. वारंवार पगारवाढ होणार नाही. टार्गेट पूर्ण करावी लागतील, प्रमोशन निव्वळ वर्षांनी होणार नाहीत तर परफॉर्मन्स पाहून होतील. कार्यक्षम लोकांना जास्त पगार तर निर्बुद्धांना कमी पगार मिळेल. युनियन लोकांची दादागिरी चालणार नाही.
माझ्या मते आपले पैसे सरकारी बँकेतून काढून घेण्याची हि योग्य वेळ आहे.
17 Mar 2021 - 9:02 am | शाम भागवत
असंच म्हणतायेणार नाही. परिस्थिती बदलली की माणसेही बदलतात. १९९५ नंतर खूप मोठ्या प्रमाणावर स्वेच्छा निवृत्ती घेतली गेली. त्यानंतर उरलेल्यांचे काम खूप वाढले होते. त्यामुळे त्यानंतर बँकेची नोकरी पूर्वीसारखी फारशी आरामदायक राहिलेली नाही.
17 Mar 2021 - 9:15 am | Rajesh188
अनेक प्रश्न आहेत त्या मधील किरकोळ प्रश्न कर्मचारी लोकांचे पगार आणि कार्यक्षमता आहे.
खरे गंभीर प्रश्न वेगळेच आहेत.
कर्ज घेवून तो बुडवणारा आणि बँक चालवणारा एकच असेल तर सर्व सामान्य लोकांच्या ठेवी सुरक्षित राहतील ह्याची शास्वती कोण देणार .?
ग्रामीण भागात बँकिंग सेवा हे खासगी बँक वाले देतील का?,
खूप प्रश्न आहेत सध्या हे दोनच सांगितले.
फक्त कर्मचारी आणि त्यांचे पगार ह्या फालतू गोष्टी भोवती च फिरू नका.
काम केले की त्याचा मोबदला दिलाच पाहिजे.
फुकट तर कोणी काम करणार नाही.
16 Mar 2021 - 7:50 pm | Rajesh188
४० crpf चे जवान मारले गेले होते.तो स्फोट कोणी घडवला,एवढी मोठी स्फोटक देशात आलीच कशी हे अजुन इतके दिवस होवून सुद्धा सरकार ला माहीत नाही.
ना ज्यांनी स्फोट घडवला ते पकडले गेले.
त्याची चर्चा टीव्ही वर होत नाही.
पण सचिन वझे म्हणजे राष्ट्रीय प्रश्न झाला आहे.
16 Mar 2021 - 7:52 pm | सुबोध खरे
थापाडेराव
जरा थोडं तरी वाचत चला
https://en.wikipedia.org/wiki/2019_Pulwama_attack
16 Mar 2021 - 7:55 pm | मुक्त विहारि
परमपूज्य राहुल गांधी, यांचे शिष्य आहेत...
त्यामुळे, जास्त विचार न करताच मते व्यक्त करतात...
16 Mar 2021 - 7:53 pm | मुक्त विहारि
अभिनंदनला का सोडावे लागले? ह्याचा अभ्यास करा...
16 Mar 2021 - 8:06 pm | Rajesh188
३०० kg स्फोटक देशाच्या सीमा ओलंडून देशात आलीच कशी ती कोणी आणली?,ती आणायला कोणी मदत केली.?
त्या व्यक्ती वर कोर्टात केस चालू आहे का.?
फक्त strike केला की प्रश्न संपतात का?
खरे साहेब ह्याची उत्तर असतील तर ध्या .
आमची पण थोडी माहीत वाढेल.
सचिन वझे ची कशी पॉइंट to पॉइंट माहिती येत
आहे समोर.
16 Mar 2021 - 8:27 pm | बापूसाहेब
300 kg म्हणजे काही जास्त नव्हे.. एका फुटीरतावाद्याने 1-2 kg जमा केले तरी 200 -300 kg जमा व्हायला वेळ लागनार नाही..!!
आणि सरकारला दोष देण्याआधी तुम्हच्याकडे काही पुरावा आहे का?? कि उगाच आपली कॉन्स्परसी थेअरी ठोकून देताय.. !!!
BTW
काश्मीर खोऱ्यात जवळपास सर्वच घरात किमान एकतरी व्यक्ती फुटीरतावादी असते.
तिथे सैन्याला कोणत्याही एन्काउंटर मध्ये स्थानिक लोकांकडून सपोर्ट मिळत नाही.. उलट सैन्यावर दगडफेक करून आतंकवादी लोकांना पळून जाण्यात मदत केली जाते ( आता हे पाप कोणाचे आणि काश्मीर असे कुणामुळे झाले हे तुम्ही पद्धतशीर पणे झाकून ठेवणार )
16 Mar 2021 - 8:39 pm | Rajesh188
ढकलले नेहरू वर.बाकी काही कर्तृत्व तर आहेच नाही.
तुमच्या कार्यकाळात घटना घडली असेल तर त्याला कोण नेहरू जबाबदार.
काहीच्या काय
16 Mar 2021 - 8:44 pm | बापूसाहेब
काहीही हा राजेश भाऊ... एखाद्या गोष्टीला जो जबाबदार आहे त्यालाच जाब विचारणार.. कारण हे सर्व झाले तेव्हा BJP RSS किंवा इतर पक्ष नव्हते.. आणि जे होते त्यांनाच जाब विचारणार ना...
तुम्हाला खरं माहिती असेल तर मग तुम्ही सांगा ते काश्मीर खोर्याचे पाप कोणाचे ते..
16 Mar 2021 - 9:00 pm | Rajesh188
मारेकरी कोण होते हा आहे.त्या लोकांना अजुन अटक का नाही झाली?.
हे एक माणसाचे तर काम नसणार त्या मधील एक तरी पकडला का गेला नाही?
कोर्टात ह्या प्रकरणाशी संबंधित आरोप पत्र तरी दाखल केले आहे का?
हे सर्व प्रश्न आहेत.
16 Mar 2021 - 9:47 pm | बापूसाहेब
जरा बातम्या वाचत जा ओ राजेशभाऊ.. सगळं मिपाकरांनीच समजावून द्यायचे का???
16 Mar 2021 - 9:52 pm | मुक्त विहारि
त्यांना वेळ मिळत नसेल...
कदाचित, ते दक्षिण कोरियाचा अभ्यास करत असतील...
किंवा
परमपूज्य राहुल गांधी यांचे मौलिक विचार ऐकत असतील...
16 Mar 2021 - 10:02 pm | Rajesh188
माझ्या प्रश्नांची उत्तरं च नाहीत.
कारण तपास झालाच नाही.
Surgical strike (तो पण खरा की खोटा माहीत नाही ) च्या आडून सर्व प्रकरण च दबले गेले पण.
पण निवडणूक जिंकायला मात्र त्या strike चां खूप फायदा करून घेतला.
३०२ त्या मुळेच आहेत.
लोक एकदाच फसतात सारखी नाहीत.
आता एवढ्या समस्या देशात आहेत तरी लोकांना वझे ,अंबानी मध्येच गुंतवून ठेवायचे त्या साठी media नी २४ तास तोच फड लावायचा असले प्रकार चालू आहेत.
पण आता लोक सावध आहेत .
Corona फक्त इथेच का वाढतोय .
बाकी देशातील सर्व राज्य शिस्त बद्ध आणि देशातील यूपी,बिहार सारखी राज्य पण शिस्त बद्ध .
आणि महाराष्ट्र फक्त बेशिस्त आहे का?
बंगाल मध्ये निवडणूक आहे तेथे बिन्धास्त सर्व नियम मोडला जात आहे.
ना मास्क ना सोशल distance.
तरी तिथे corona नाही.
बिहार मध्ये निवडणूक झाली,इथे स्थानिक स्वराज्य संस्था ची निवडणूक झाली तेव्हा बिहार मध्ये corona वाढला नाही पण इथे निवडणुका झाल्या की corona वाढला.
तो पण राजकीय झाला आहे.
पंजाब,केरळ,महाराष्ट्र येथेच तो अस्तित्वात आहे.
आता दीदी जिंकून आल्या तर बंगाल मध्ये corona ची एन्ट्री होईल.
आणि BJP आली तर corona तर corona गायब होईल
16 Mar 2021 - 10:11 pm | मुक्त विहारि
तुम्ही खरोखरच, परमपूज्य राहुल गांधी यांचे शिष्य शोभता...पाकिस्तानच्या नेत्यांनी, सर्जिकल स्ट्राइक झाला, हे कबूल केले, तरी पण तुम्हाला विश्र्वास वाटत नाही...
करोना बाबतीत जबाबदारी राज्य सरकारची आहे,
गोव्यात निवडणूका आहेत का? कारण, गोव्यात करोनाची लागण, फारच कमी आहे....
17 Mar 2021 - 12:17 pm | सुबोध खरे
मारेकरी कोण होते हा आहे.त्या लोकांना अजुन अटक का नाही झाली?.
आपण ठार बधिर आहात का?
मी दिलेल्या दुव्यात याची सर्व माहिती आहे.
आपण सुधारायचं नाहीच असं ठरवलंय म्हटल्यावर कोण काय सांगणार?
16 Mar 2021 - 9:07 pm | मदनबाण
ला इलाही म्हणणारी मॉमता दीदी आता चंडी पाठाच्या ओळी गाउ लागली असुन खुजलीवाल यांनी अयोध्येत मंदीर निर्माण झाल्यावर वृद्ध लोकांना फुकट तिर्थाटन करण्याचे जाहीर केले आहे म्हणे ! अचानक यांना हिंदूंची आठवण आली आहे ! असं कसं झाल ? :)))
बादवे बाटला हाउसवर मॉमता दीदी त्याकाळी म्हणाल्या होत्या एनकांउंटर खोटे होते... माझे बोलणे जर खोटे ठरले तर राजकारण सोडुन देइन !
जाता जाता :-
हिंदूस्थानी राजकारण्यांना पाहुन खालचा प्राणी चिंतेत पडला आहे, त्याला वाटत होते की तोच वेगात रंग बदलु शकतो ! :)))))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
16 Mar 2021 - 9:14 pm | मुक्त विहारि
इतर वेळी हिंदूंना किंमत शून्य
16 Mar 2021 - 9:38 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh-news/sharad-pawar-speaks-on-sachin-...
काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील.
या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत....
शरद पवार, बोलतात कमी, पण एकाच वेळी, अनेक गोष्टी सांगतात....
16 Mar 2021 - 10:14 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nia-court-reject-sa...
16 Mar 2021 - 10:19 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/nia-court-reject-sa...
16 Mar 2021 - 10:22 pm | उपयोजक
https://www.lokmat.com/pune/bjp-film-city-president-rohan-mankani-custod...
16 Mar 2021 - 10:29 pm | मुक्त विहारि
शिक्षा व्हायलाच हवी....
16 Mar 2021 - 10:22 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/sharad-pawar-meets-...
16 Mar 2021 - 10:46 pm | मदनबाण
किती लपवाल ? कुठवर लपवाल ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sun Saiba Sun... :- Ram Teri Ganga Maili
16 Mar 2021 - 11:39 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मॅक्सिमम सिटी ह्या पुस्तकात "नंबर २ आफ्टर स्कॉट्लंड यार्ड' नावाचा लेख मुंबई पोलिसांवर आहे. पकडलेल्या संशियितांच्या बॉसना(दाउद्/शकील वगैरे) फोन पोलिस कमीशनर्/गुन्हे पथकाचे अधिकारी लावतात.. व सौदा केला जातो. व संशयिताची किंमत ठरवली जाते. सौदा यशस्वी झाला की मग हवाला मार्गे पैसा अधिकारी लोकाना व मंत्रालयात पोचवला जातो. सौदा फसला की मग एन्काउंटर स्पेशालिस्ट संशयिताला मध्यरात्री कुठेतरी नेतात व मारून टाकतात. ९०च्या दशकातले हे बहुतांशी एन्काउंटर्स असे सौदेबाजीने झाले होते. दुर्दैवाने आपल्या पत्रकारात/मिडियात ना प्रश्न विचारण्याची धमक होती ना स्वतः संशोधन करण्याचा वकुब होता.
आताही तेच.. त्या अर्नब गोस्वामीची पत्रकारिता आक्रस्ताळी खरी पण ज्या पद्धतीने त्याला अटक केली त्यावर ना आमच्या मिडीयाने प्रश्न विचारले ना स्वतःला बुधिमान म्हणवणार्या गिरीश कुबेर्/निखिल वागळ्यानी/कुमार केतकरांनी.
आता हे जे काही किळसवाणे समोर येतेय त्यावरही हे स्वयंघोषित बुद्धिमान हाताची घडी तोंडावर बोट ठेउन आहेत.
17 Mar 2021 - 10:29 pm | Rajesh188
चा चेहरा बघितला तरी महाराष्ट्र प्रेमी लोकांचे मस्तक उठते.
17 Mar 2021 - 10:45 pm | मुक्त विहारि
म्हणजे?
थोडा खुलासा हवा ....
साधूंच्या हत्याकांडाचा निषेध, महाराष्ट्रातील जनतेने करायला नको का?
तांदूळ घोटाळा झाला, त्याचा निषेध, महाराष्ट्रातील जनतेने करायला नको का?
एका स्त्रीला शिवी दिली, त्याचा निषेध महाराष्ट्रातीलजनतेने करायला नको का?
मराठी कधीच, अन्यायाला साथ देत नाही...
17 Mar 2021 - 12:11 am | Rajesh188
२४ तास देशाच्या सीमेवर सशस्त्र दल पहारा देत असताना सुद्धा अतिरेकी भारतीय सीमेच्या आत येतात कसे.
इथे येवून दहशत वादी हल्ले होतातच कसे.
भ्रष्टचार विरोधी दल अस्तित्वात असून सुद्धा देशात सर्रास भ्रष्टाचार होतात कसे.
देशात न्यायालय अस्तित्वात आहेत तरी लोकांना न्याय मिळत नाही अशी बोंब असते ते कसे.
गुन्हेगार,निवडणुकीत उभे राहून जिंकून पण
कसे येतात.
देशातील सर्वच यंत्रणा ह्या त्यांचे काम योग्य रित्या करत नाहीत.
म्हणून च गुंड,टोळी युद्ध आणि बरेच
प्रकार होत असतात.
फक्त काही पोलिस च देशातील घाण आहे असे नाही
कचरा एवढा आहे देशात की तो साफ करणे अशक्य आहे.
त्या मुळे कोणालाच तू फक्त दोषी असे म्हणण्याचा अधिकार कोणालाच नाही.
17 Mar 2021 - 9:23 am | माईसाहेब कुरसूंदीकर
जागता पहारा , डोळ्यात तेल घालुन वगैरे बोलायला ठीक आहे राजेशा पण भारत-पाकिस्तान सीमेची लांबी ३२०० कि.मी. आहे.
जम्मु-काश्मिर सीमा - १२,२२ कि.मी/ आहे. म्हणजे मुंबई-चेन्नई अंतरापेक्षा थोडे कमी.
17 Mar 2021 - 1:06 am | कपिलमुनी
त्यानंतर_काय_झालं ?
● फडणवीसांनी विधानसभेत प्रचंड आवेशपूर्ण भाषण केलं. पण असं भाषण आणि आरोप करण्याची त्यांची ही पहिली वेळ नव्हती.
● याच सभागृहात ते २०१४ पूर्वी विरोधी पक्षनेते असताना त्यांनी मोठ्या आवेशात विजयकुमार गावित यांच्यावर घोटाळा केल्याचा आरोप करुन सभागृह दणाणून सोडलं होतं.
त्यानंतर काय झालं ?
● गावितांची मुलगी २०१४ ला भाजप खासदार झाली आणि ते आमदार झाले.
याच सभागृहात त्यांनी सिंचन घोटाळ्यावर जबरदस्त फटकेबाजी करत अजितदादा आणि तटकरे यांच्यावर आरोप केले होते. तसंच त्यांनी या घोटाळ्याचे गाडीभर पुरावे दिले होते.
त्यानंतर काय झालं ?
● फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी अजितदादा किंवा तटकरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
उलट याच अजितदादांसोबत त्यांनी पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन केलं.
त्यानंतर काय झालं ?
● अगदी याच सभागृहात ते मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना त्यांनी राणेंवरील आरोपांची आणि दाखल झालेल्या गुन्ह्यांची जंत्रीच सभागृहात वाचून दाखवली. राणेंचा पहाण्यालायक झालेला चेहरा अनेकांना आठवत असेल.
(काही भक्तांची भिंत पाहिली तर या आवेशपूर्ण भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहता येईल)
त्यानंतर काय झालं ?
◆ हेच राणे भाजपचे खासदार झाले आणि त्यांचा मुलगा आमदार झाला.
● याच सभागृहात प्रवीण दरेकरांच्या मुंबई बँकेमध्ये घोटाळा झाल्याचे पुरावे असलेले पेपर दाखवत कारवाईची मागणी केली.
त्यानंतर काय झालं ?
● २०१४ ला मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दरेकरांनाच भाजप मध्ये घेतलं. विधानपरिषदेतून आमदार केला आणि आता ते विधानपरिषदमध्ये भाजपचे विरोधीपक्ष नेता आहेत.
त्यानंतर काय झालं ?
● मुख्यमंत्री असतांना मामुनीं 'शिक्षकांची वेतन बँक खाती' मुंबई बँकेत वळवली...
नंतर आधी हायकोर्ट मग सुप्रीम कोर्टने फटकारल्यावर तोंडावर पडले आणि मग खाती मागे घ्यावी लागली.
त्यानंतर काय झालं ?
● याच सभागृहात कृपाशंकर सिंघ यांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दल पण अनेक आरोप केले.
त्यानंतर काय झालं ?
● विरोधी पक्षनेता असतांना कृपाशंकरच्या घोटाळ्याची कागदं नाचवली. पण स्वत: मुख्यमंत्री, गृहमंत्री झाल्यावर त्याच कृपाशंकर विरुद्ध आम्हाला पुढे चौकशी करायची नाहीये; असं प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं आणि त्याला निर्दोष सिद्ध केला.
त्यानंतर काय झालं ?
अशी अनेक उदाहरण देता येतील.
ते मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना राज्यात वाढलेली गुन्हेगारी असो, विशेषतः नागपूरात. हत्या असोत, आत्महत्या असतो... (विशेषतः गोविंद पानसरे, शेतकरी धर्मा पाटील यांना कोण विसरेल)... अनेक उदाहरण.
■ एकंदर ज्या लोकांवर आधी फडणवीसांनी आरोप केले किंवा सभागृहात आवेशपूर्ण आणि अभ्यासपूर्ण (?) भाषण केलं त्यांना आपल्याच पक्षात सामावून घेतलं किंवा ज्यांना घेता येणं शक्य नव्हतं (जसे की दादा, तटकरे, कृपाशंकर) त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
■ २०१४ पूर्वी ठीक होतं पण आता एक पूर्ण टर्म स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिलेल्या फडणवीसांची कारकीर्द लोकांनी पाहिलेली आहे.
त्यामुळे दरवेळी प्रत्येक विषयात फडणवीस मी.. मी करत आकांडतांडव करत आहेत; ते लोकांच्या सहज पचनी पडताना दिसत नाहीये.
उलट ते मोठ्या प्रमाणावर ट्रोल होतांना दिसत आहेत, कारण यांच्या हातात सत्तासूत्र असतांना हे आधी ज्यांना गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी म्हणायचे त्यांना शासन करायचं सोडून त्यांना जवळ करत पक्ष वाढवण्यात त्यांनी आपल्या पदाचा वापर केला.
मागच्या एक वर्षात विरोधीपक्ष नेता म्हणून करोना महामारी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, लॉक डाऊन, सुशांतसिंग राजपूत, कंगना राणावत, अर्णब गुस्वामी आणि आता सचिन वाझे वगैरे विषयात त्यांनी आणि एकूणच भाजपने केलेला आकांडतांडव पाहता, मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री नव्हे तर विरोधीपक्ष नेता म्हणून पुन्हा येण्याची संधी मिळाली आहे; याचं जास्तच नैराश्य आलेलं दिसत आहे.
असो, अनेक भक्तांना फडणवीस अजूनही अभ्यासू नेते वाटत असले तरी त्यांचा अभ्यास दिवसेंदिवस उघडा पडून त्यांची चिडचिडच जास्त होतांना दिसत आहे.बाकी भक्तांबद्दल तर आपलं ठरलंच आहे,आपण फक्त त्यांची मजा बघायची.
17 Mar 2021 - 8:52 am | शाम भागवत
गुरूजींनी ही पोस्ट नक्की आवडणार.;)
गुरूजी कृहघ्या.
अशीच यादी इतरांचीही करता येईल. त्यात काही विशेष नाही. याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत नाही.
मात्र पद मिळाल्यावर, काम करताना भ्रष्टाचार न करणे. सगे सोयऱ्यांनी सत्तास्थानाचा फायदा न उकळणे, घराणेशाही नसणे याला मी जास्त महत्व देतो. कारण तसे झाले तरच ते सर्वसामान्यांना फायदेशीर ठरेल.
या न्यायाने फडणीस नको असतील तर फक्त पृथ्विराज चव्हाण शिल्लक राहतात. पण त्यांना कॉंग्रेस श्रेष्ठी काम करू देतील की नाही ही शंका राहतेच.
याच निकषावर मला मोदी आवडतात. फक्त क्रिकेट क्रिडांगणाचे नामकरण खटकलंय.
असो
17 Mar 2021 - 9:25 am | मुक्त विहारि
ती, घराणेशाहीला चपराक आहे... त्यामुळेच तर, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, विरोध करत आहेत...
17 Mar 2021 - 9:59 am | श्रीगुरुजी
ही पोस्ट ३-४ दिवसांपूर्वीच मी पोस्ट केली होती. त्यातील सर्व दावे सत्य असल्याने पोस्ट केली होती.
सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असणारेच निर्णय लक्षात घ्यायचे असतील तर मराठा सर्व क्षेत्रात अत्यंत मागास आहेत असा खोटा अहवाल तयार करून प्रगत मराठा जातीला तब्बल १६ टक्के राखीव जागा देण्याच्या फडणवीसांच्या निर्णयाचा ब्राह्मण विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः या विद्यार्थ्यांना १० वी/१२ वी/पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर हव्या त्या शिक्षणसंस्थेत हव्या त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. माझ्या माहितीतील दोन मिपा सदस्यांच्या मुलांना व नात्यातील काही जणांना या स्वार्थी निर्णयाचा मोठा फटका बसला आहे.
स्वत:च्या खुर्चीसाठी फडणवीसांनी नाणार, जैतापूर वगैरे प्रकल्प रद्द केल्याने जनतेला निश्चितच फटका बसला आहे.
परंतु पद मिळाल्यावर, काम करताना भ्रष्टाचार न करणे. सगे सोयऱ्यांनी सत्तास्थानाचा फायदा न उकळणे, घराणेशाही नसणे या गोष्टींचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत नाही. अर्थात फडणवीस स्वतः घराणेशाहीतूनच पुढे आले आहेत (वडील आमदार, काकू आमदार व मंत्री). काम न करताना भ्रष्टाचार न करणे पण तुरूंगात टाकण्याचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात भ्रष्टांवर कारवाई न करता त्यांना क्लीन चिट देऊन त्यांच्याशीच युती करणे, गुन्हेगारांना अभय देणे यामुळे अशा मुद्द्यांवर सुद्धा फडणवीस अनुत्तीर्ण आहेत. अर्थात ते कायमच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतात यावर अंधविश्वास असणाऱ्यांंना त्यांचे सर्व निर्णय बरोबरच वाटतात.
17 Mar 2021 - 12:59 pm | बापूसाहेब
फडणवीस यांचा चाहता असलो तरी वर शाम भागवत आणि कपिलमुनी यांचे मुद्दे आणि प्रश्न रास्त आहेत.
फडणवीस आज तावातावाने बोलत असले तरी ते धुतल्या तांदळाचे नाहीत हेच खरे.
या निमित्तांने आठवले -- निवडणूक म्हणजे चांगला माणूस निवडणे नव्हे.. तर कमीत कमी खराब माणूस निवडणे.
17 Mar 2021 - 2:13 pm | शाम भागवत
एकदम मनातलं बोललात.
17 Mar 2021 - 9:58 am | सॅगी
आता_काय_चाललंय?
ओके, हे सगळे आरोप आहेत...भक्त की चमचे ते सोडून देऊ...
हे सगळे माहित असताना आताचे सरकार काय करतंय? राणे, दरेकर यांच्या विरोधात ठोस पावले उचलायला यांना काय प्रॉब्लेम आहे?
उलट "काय द्या"चे राज्य आहे हा संदेश कॄतीतून देता येईल...पण लक्षात कोण घेतो?
17 Mar 2021 - 1:43 am | Rajesh188
भारतीय जनता पक्षाची विचार श्रेणी च चुकीची आहे.आता पर्यंत ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्या bjp सत्तेवर आल्या पासून घडत आहेत
आता पर्यंत थोडी तरी मीडिया निती मान होती पण bjp सत्तेवर आल्या पासून खोट्या बातम्या आणि ठराविक हेतूंनी प्रेरित होवून २४ तास टीव्ही चॅनेल गुऱ्हाळ चालवत असतात
सरकार विरोधी बोलणारे एकतर देशद्रोही असतात किंवा पाकिस्तानी प्रेमी असतात.
हे नवीन च ह्यांच्या राज्यात चालू झाले आहे .
देशापुढे खूप गंभीर प्रश्न आहेत पण bjp च एकच अजेंडा असतो.
काही तरी फुटकळ प्रकरण काढायची आणि मीडिया ला २४ तास तेच दाखवा असे सांगायचे.
सुशांत नी सहा महिने काढले आता सचिन वझे सहा महिने काढतील.
पंतप्रधान तिकडे चुपचाप कायदे बदलायचे उद्योग चालू ठेवतील..
भीती हैयाच गोष्टी च वाटत भारताच्या सवैधानिक संस्था अर्धवट विचारसरणी च्या सरकार मुळे कमजोर होवू नयेत.
एकदा व्यवस्था कोलमडली तर ती सावरणे कठीण होवून जाईल
Bjp सरकार च्या काम करण्याच्या विचित्र पद्धती मुळे अशी भीती खूप लोकांच्या मनात निर्माण होत आहे
17 Mar 2021 - 1:01 pm | बापूसाहेब
तुम्हाला सचिन वझे हे प्रकरण फुटकळ वाटत असेल तर माझा दंडवत घ्या राजे.. !!!!
17 Mar 2021 - 2:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
कुबेरी अग्रलेख वाचलात तर तेही हे प्रकरण विशेष नाही म्हणतात .
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-sachin-vaze-case-abn...
पुर्वीचे 'बुद्धिमान' संपादक गोविंद तळवलकरही हेच करायचे. राज्यात असे काही घडले की लगेच मॉस्को/लंडनमध्ये काय चालु आहे ह्यावर अग्रलेख यायचा.
17 Mar 2021 - 8:05 am | श्रीगुरुजी
https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/bjp-leader-dili...
भाजपचे माजी खासदार व माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. ते १९९९, २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक जिंकले होते. जानेवारी २००३ ते मार्च २००४ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री पद भूषवले होते.
निष्ठावतांना झिडकारण्याच्या व आयारामांना लाल गालिचा अंथरण्याच्या फडणवीसांच्या धोरणाचा ते बळी ठरले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून आदल्या दिवशी पक्षात आलेल्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर ते फारसे कार्यरत नव्हते.
17 Mar 2021 - 9:48 am | Bhakti
भावपूर्ण श्रद्धांजली!
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना डावलून आदल्या दिवशी पक्षात आलेल्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी देण्यात आली
तसे नसते केले तर भाजपाला एक लोकसभा जागा गमवावी लागली असती.आणि सुजय दुसऱ्या पक्षातून निवडून नसता आला.
असो..निष्ठावतांना झिडकारण्याच्या व आयारामांना लाल गालिचा अंथरण्याच्या फडणवीसांच्या धोरणाचा ते बळी ठरले लोकसभेत फडणवीसांचा काय संबंध आला?
.. पुन्हा एकदा श्रद्धांजली.
17 Mar 2021 - 10:01 am | चंद्रसूर्यकुमार
दिलीप गांधींना श्रध्दांजली.
लोकसभा निवडणुकांमध्ये नक्की कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरविण्यात राज्य युनिट्सचा किती सहभाग होता आणि मोदी-शहांचा किती सहभाग होता हे प्रश्न विचारायचे नसतात. काहीही झाले तरी सगळ्या गोष्टींसाठी फडणवीसांना जबाबदार ठरवायची फॅशन आहे.
बाकी दिलीप गांधी वाजपेयींच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते तरीही २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना तिकिट नाकारले गेले होते. मान्य आहे की त्यावेळी प्रा.ना.स.फरांदे या भाजपच्या निष्ठावंत ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली गेली होती तरीही केंद्रीय मंत्र्याला लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारणे हा प्रकार त्यामानाने कमी होतो. या निवडणुकांमध्ये पक्षातर्फे उमेदवारी दिली न गेल्याने दिलीप गांधींनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारायचे २००४ मध्ये होते तसे काही कारण कशावरून नसेल?
17 Mar 2021 - 10:18 am | श्रीगुरुजी
The state unit of the BJP has forwarded Sujay Vikhe Patil’s name to the central unit to be considered for candidature in the elections, said Devendra Fadnavis.
The state unit of the BJP has forwarded his name to the central unit to be considered for candidature in the Lok Sabha elections, Fadnavis said, according to ANI.
According to reports, Radhakrishna Vikhe Patil had requested the Nationalist Congress Party to leave aside the Ahmednagar Lok Sabha seat for his son. However, the NCP did not agree, according to NDTV.
https://www.google.com/amp/s/amp.scroll.in/latest/916308/maharashtra-sen...
17 Mar 2021 - 10:35 am | चंद्रसूर्यकुमार
दोन गोष्टी-
कोविडकाळात किंवा अन्य वेळीही कर्मचार्यांना कामावरून कमी करायचे असेल तर अनेकदा त्यांना स्वतःला राजीनामा द्यायला सांगतात याचा अर्थ ते स्वतः स्वखुषीने राजीनामा देतात असे नक्कीच नाही. त्याप्रमाणे केंद्रीय नेतृत्वाने हे प्रपोजल फडणवीसांकडून मागवले असेल ही शक्यता नाही?
दुसरे म्हणजे शेवटी निर्णय केंद्रीय नेतृत्वानेच घेतला असेल तर मग मोदी-शहा यासाठी जबाबदार का नाहीत? एकटे फडणवीस कसे?
17 Mar 2021 - 10:43 am | चंद्रसूर्यकुमार
मोदी-शहांनी ज्या पध्दतीने पूर्ण पक्षसंघटना आपल्या मुठीत ठेवली आहे ते पाहता हा निर्णय घेण्यासाठी फडणवीसांना स्वातंत्र्य दिले असेल ही शक्यता त्यामानाने बरीच कमी.
17 Mar 2021 - 11:09 am | शाम भागवत
The state unit of the BJP has forwarded Sujay Vikhe Patil’s name to the central unit to be considered for candidature in the elections, said Devendra Fadnavis.
स्टेट युनिटने पाठवलंय. स्टेट युनिट म्हणजे फडणवीस? का प्रदेश अध्यक्ष? का आणखी कोणी?
याचा अर्थच असा होतो आहे की, देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, स्टेट युनिटने पाठवलंय. (मी काहीही केलेलं नाही आहे.) 😀
मला तर वाटतं, फडणवीसांना हा सगळा प्रकार पसंत नसेल म्हणून हे प्रपोजल मोदी/शहांनी स्टेट युनिटला पाठवायला सांगितलं असेल.
🤣
17 Mar 2021 - 1:20 pm | श्रीगुरुजी
राज्य संघटनेत फडणवीस व चंपा सोडले तर बाकीचे आहेत कोण? जे बाकीचे कोणी असतील (गिरीश महाजन, मुनगंटीवार, शेलार, दरेकर वगैरे) ते सर्व यांचेच समर्थक असून मम म्हणण्यापुरतेच आहेत.
17 Mar 2021 - 1:25 pm | श्रीगुरुजी
मागील ३-४ वर्षातील महाराष्ट्रातील निर्णय पाहिले तर मोदी-शहांनी फडणवीसांना महाराष्ट्रात संपूर्ण रान मोकळे दिले आहे असे दिसून येत आहे. सेनेबरोबरील युती, जागावाटप, उमेदवारी वाटप, आयाराम प्रवेश, अजित पवारांबरोबर युती हे सर्व फडणवीसांच्या आग्रहामुळे झालेले दिसते. या सर्व निर्णयांसाठी फडणवीस अत्यंत आग्रही होते.
17 Mar 2021 - 1:38 pm | शाम भागवत
फडणविसांना मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे हे मात्र मान्य.
17 Mar 2021 - 10:19 am | शाम भागवत
काहीही हं!
२००४ साली पण फडणवीसच जबाबदार.
;)
17 Mar 2021 - 10:10 am | श्रीगुरुजी
२०१९ मध्ये दिलीप गांधीच पुन्हा मोठ्या मतांनी निवडून आले असते. त्यांचा पराभव अजिबात झाला नसता. म्हणून तर चंपाने जसा मेधा कुलकर्णींंना हाकलून कोथरूड हा सुरक्षित मतदारसंघ निवडला तसाच सुजय विखे पाटलांनी नगर हा सुरक्षित मतदारसंघ निवडला.
हा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे होता. राधाकृष्ण विखे पाटीलांनी हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी मागितला व त्या बदल्यात राष्ट्रवादीला दुसरा मतदारसंघ देण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु विखे पाटील घराणे व पवार यांच्यात शत्रुत्व असल्याने पवारांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यामुळे लगेच राधाकृष्ण विखे पाटीलांनी फडणवीसांशी बोलणी करून डील पक्के करून मुलाला भाजपत पाठवून उमेदवारी मिळविली आणि नंतर महिनाभराने स्वत:ही भाजपत डेरेदाखल झाले. फडणवीसांच्या शिफारशीमुळेच हे डील झाले होते.
17 Mar 2021 - 10:41 am | Bhakti
धन्यवाद!
17 Mar 2021 - 10:31 am | चंद्रसूर्यकुमार
काल निवडणुक आयोगाने विविध राज्यातील लोकसभेच्या २ आणि विधानसभांच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या जागांवर १७ एप्रिलला मतदान होईल आणि २ मे रोजी बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ ही चार राज्ये आणि पाँडेचेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीबरोबरच या जागांवर मतमोजणी होईल.
कर्नाटकात बेळगाव आणि आंध्र प्रदेशात तिरूपती या लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुक होणार आहे. बेळगावचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे तर तिरूपतीचे वाय.एस.आर काँग्रेसचे खासदार बल्ली दुर्गाप्रसाद राव यांचे कोविडमुळे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणुक होणार आहे.
पुढील विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक होणार आहे--
१. महाराष्ट्र- पंढरपूर. राष्ट्रवादीचे आमदार भरत भालके यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
२. गुजरात- मोरवा हदाफ. अपक्ष आमदार भुपेंद्रसिंग खंत यांची निवड जातीचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्यामुळे अवैध ठरल्यामुळे ही जागा रिकामी आहे.
३. झारखंड- मधुपूर. झामुमोचे आमदार आणि हेमंत सोरेन यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री हाजी हुसेन अन्सारी यांचे कोविड आणि हृदयविकाराने निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
४. कर्नाटक- बसवकल्याण. काँग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
५. कर्नाटक- मस्की. काँग्रेसचे आमदार प्रतापगौडा पाटील यांनी ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपत प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिल्यामुळे जागा रिकामी आहे.
६. मध्य प्रदेश- दमोह. काँग्रेसचे आमदार राहुल सिंग यांनी ऑपरेशन कमल अंतर्गत भाजपत प्रवेश केल्यामुळे राजीनामा दिल्यामुळे जागा रिकामी आहे.
७. मिझोराम- सरछिप. अपक्ष आमदार आणि माजी आय.पी.एस अधिकारी लालदुहोमा यांनी झोराम पीपल्स मूव्हमेंट या पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्याने ही जागा रिकामी आहे. १९८८ मध्ये हेच लालदुहोमा यांचे पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले होते.
८. नागालँड- नोकसेन. नॅशनल डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे आमदार सी.एम.चँग यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
९. ओरिसा- पिपली. बिजू जनता दलाचे आमदार प्रदीप महारथी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
१०. राजस्थान- सहारा. काँग्रेसचे आमदार कैलाशचंद्र द्विवेदी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
११. राजस्थान- सुजानगढ. काँग्रेसचे आमदार आणि अशोक गेहलोत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री भंवरलाल मेघवाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
१२. राजस्थान- राजसमंद. भाजप आमदार किरण महेश्वरी यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
१३. तेलंगण- नागार्जुन सागर. तेलंगण राष्ट्रसमितीचे आमदार नोमुला नरसिंहय्या यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
१४. उत्तराखंड- साल्त. भाजप आमदार सुरिंदरसिंग जीना यांचे कोविडमुळे निधन झाल्याने ही जागा रिकामी आहे.
17 Mar 2021 - 11:59 am | तुषार काळभोर
देशाच्या कानाकोपर्यात चौदा विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी पोटनिवडणुका , त्यातही नऊ कोविडमुळे निधन. + २ खासदार सुद्धा कोविड मुळे निधन झाल्याने पोटनिवडणुका.
दुर्दैवाने पुढील पोटनिवडणुका "दोन खासदारांची आत्महत्या" या कारणाने होतील.
17 Mar 2021 - 1:54 pm | चंद्रसूर्यकुमार
नाही. यापेक्षाही जास्त मतदारसंघात पोटनिवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. नोव्हेंबर २०२० मध्येच जवळपास ५० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली होती. त्यात मध्य प्रदेशात २० पेक्षा जास्त, गुजरातमध्ये ६ आणि उत्तर प्रदेशात ७ जागांवर पोटनिवडणुक झाली होती.
17 Mar 2021 - 11:09 am | चंद्रसूर्यकुमार
हिमाचल प्रदेशमधील मंडीचे भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला मृतदेह त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आढळून आला आहे.
रामस्वरूप शर्मा हे हृदयविकाराने आजारी होते आणि डिप्रेशनमध्ये होते असे आताच वाचले. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते तेव्हा त्यांची अवस्था बघून अनेकांना काळजी वाटली होती असेही वाचले.
https://www.jagran.com/himachal-pradesh/kangra-himachal-mp-ramswaroop-sh...
गेल्या महिन्या-दीड महिन्यात दुसर्या लोकसभा खासदाराने आत्महत्या केलेली दिसते. हे चांगले लक्षण नाही.