पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा?
शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा
सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी
ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही!
मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी
रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही!
जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे
सहजता माऊली ही, असते मनात माझी!
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही?
ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
अतृप्त...
०====०====०====०====०====०====०====
प्रतिक्रिया
7 Dec 2020 - 8:50 am | ज्ञानोबाचे पैजार
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही?
ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
लिवा लिवत रहावा, थांबु नका
पैजारबुवा,
11 Dec 2020 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा
@लिवा लिवत रहावा, थांबु नका >>> हो. नक्की. धन्यवाद.
7 Dec 2020 - 12:04 pm | चांदणे संदीप
गुर्जी जोरात!
सं - दी - प
11 Dec 2020 - 10:34 pm | अत्रुप्त आत्मा
__/\__
12 Dec 2020 - 10:02 am | शा वि कु
कविता आवडली.
14 Dec 2020 - 10:44 am | अत्रुप्त आत्मा
शा वि कु > >> धन्यवाद
12 Dec 2020 - 10:50 am | प्रचेतस
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे.
:
:
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.