मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

कोजागिरी

Primary tabs

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
30 Oct 2020 - 9:53 pm

*कोजागिरी*
पुनवेचा चंद्र उगवता
चांदणे निथळते भूमिवरी,
आली शरदाची पौर्णिमा,
आनंदभरली हि कोजागिरी !!

आबालवृध्द सारे जमूनी,
पुजन ध्यान लक्ष्मीचे करती
लक्ष्मी बसूनी विमानी, पुसते,
"कोजागर्ती" "कोजागर्ती" ? !!

एकत्र सारे खेळ खेळूनी,
गाणी गाऊनी, फेर धरूनी..
आनंदे जागवा रात्रीला,
बदाम केशराचे दुध आटवूनी,
नैवेद्य दाखवा चंद्राला !!

केशर दुधाने भरूनी प्याले,
चंद्रकिरणं त्यात पडूद्या,
आरोग्यदायी शितल दुध,
चवी चवीने रिचवून घ्या !!

अशी आनंदी कोजागरी,
साजरी होईल ज्या ठिकाणी,
लक्ष्मी वसेल सुखाने,
नांदेल कायम त्या ठिकाणी !!

-©सौ वृंदा मोघे

*कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा*

कविता

प्रतिक्रिया

Jayagandha Bhatkhande's picture

31 Oct 2020 - 12:43 pm | Jayagandha Bhat...

मस्त...!!