विश्वास

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
11 Oct 2020 - 2:32 pm

*विश्वास*
तो कोसळतो, सहस्त्रधारांनी
अविरत अखंड आपल्याच नादात..
तीच्या डोळ्यातली वेदना...
निथळते..तीच्याच फाटक्या पदरात !

तीच्या खोपटात दोन भगुली,
ओल्या काटक्या नी थंड चूल..
रिकामे डबे, अन् ओच्यात,
भुकेनं रडून थकलेलं मूल !

तीचे डोळे पावसाच्या आरपार,
आसावले, वाटेवर धन्याच्या
तुंबळ पावसातही लेकराला आणेल..
पसाभर तरी कण्या धान्याच्या !

पावसाला आळवते मनातून
थांब रे , असा नको माजवू कहर,
गेला धनी कामाला, परतून येउदे,
तोवर जोराची, तुझी झड ती आवर !

उलटता रात्र प्रहर, पाऊस थंडावला,
धनी येता आनंदली.,चूलीं घातला निखार,
शिजवल्या कण्या, आजच तरी भागलं,
उद्याची चिंता नाही, घातला देवावर भार !!

ज्यानं दिली चोच, दाणा पाणीही योजतो,
कष्ट करत्या हातांना., 'त्यांचा' देवच पोसतो !
©️सौ वृंदा मोघे
18/06/2020

कविता

प्रतिक्रिया

आंबट चिंच's picture

11 Oct 2020 - 3:39 pm | आंबट चिंच

2 वर्षाचा उटटा एकदम एकाच दिवशी काढायचाय काय ?
विश्वास ठेवा मिपाकर नेहमी चांगलं असेल तर प्रतिसाद देतातच.

VRINDA MOGHE's picture

11 Oct 2020 - 4:13 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद