(शीर्षक सुचत नाही)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
17 Feb 2008 - 4:19 pm

आमची प्रेरणा मिलिंद फणसेंना शीर्षक न सुचलेली गझल.

लाटणे जरी मी तुझे चुकवले होते
दारावर अमुचे तोंड अपटले होते

साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले
तू मुळात ज्यांना जरा हलवले होते

राहिल्यात मागे स्मृतिपोकळ्या आता
ते घाव मी जरी सर्व विसरले होते

'ते' दुरावल्याचे दुःख कराया हलके
मी मुखात नकली दात बसवले होते

लीलया चघळले कर्वे मी जीवनभर
ते ऊस सोलणे परी न जमले होते

भ्रम,"केश्या"ला विडंबन आवडल्याचा
रे खुळ्या, तुला हे लोक हासले होते !

विडंबन

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

17 Feb 2008 - 4:32 pm | स्वाती राजेश

केशवकुमार तुमच्या कवितेला(विडंबन) प्रतिसाद काय द्यायचा? इतक्या सुंदर कविता करता.
ही मस्त वाटली कारण असे दृश्य १० पैकी ९ घरात असते त्यामुळे वास्तव वाटले.:)))))
मस्त अशाच कविता येऊ देत. आम्ही वाचक आहोत तुमच्या कवितेचे.

केशवराव's picture

18 Feb 2008 - 12:14 am | केशवराव

एक घर कुणाचे वगळलेस ? बाकी हुशार हं !

चतुरंग's picture

17 Feb 2008 - 6:52 pm | चतुरंग

"स्मृती'कवळ्या'" हे शीर्षक कसे वाटते?
बाकी विडंबन छानच!

चतुरंग

लिखाळ's picture

18 Feb 2008 - 12:19 am | लिखाळ

वा वा वा...

साक्षीस ठेव हे दात दोन पडलेले
तू मुळात ज्यांना जरा हलवले होते

नेहमी प्रमाणेच फार सुंदर ...
-- लिखाळ.
तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

विसोबा खेचर's picture

18 Feb 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

लीलया चघळले कर्वे मी जीवनभर
ते ऊस सोलणे परी न जमले होते

वा! या ओळी मस्त...

तात्या.