आषाढाच्या एक दिनी

नूतन's picture
नूतन in जे न देखे रवी...
28 Jul 2020 - 2:41 pm

आषाढाच्या एक दिनी...

कुंद,सावळ्या वातावरणी
आषाढाच्या एक दिनी
हिरवा डोंगर झाकून जाई
पाऊसभरल्या मेघांनी

स्तब्ध तरूंवरी स्तब्ध पाखरे
लोकालयीही तीच स्तब्धता
वाराही जणू रुसून बसला
मनात भरवूनी उदासीनता

अशात कुठुनी चुकार बगळा
कापत जाई मेघांना
भेदरलेली चिमणी बसली
मिटून अपुल्या पंखांना

असाच काही काळ लोटला
अन् डोलू लागले वृक्षलता
वा-यासंगे जणू मिळाली
वर्षागमनाची वार्ता

झरझर,सरसर पडू लागल्या
धवल शुभ्र पाऊसधारा
उदासलेल्या चराचरावर
हो चैतन्याचा शिडकावा

कविता

प्रतिक्रिया

आषाढ मस्तच वर्णन केलाय, आवडली कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2020 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरेख वर्णन, लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

मन्या ऽ's picture

29 Jul 2020 - 11:42 am | मन्या ऽ

मस्त आहे कविता.. पण ह्या वर्षी आषाढ कोरडाच गेला...

नूतन's picture

29 Jul 2020 - 1:47 pm | नूतन

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

प्राची अश्विनी's picture

5 Aug 2020 - 5:23 pm | प्राची अश्विनी

कविता आवडली.