येता गिर्हाईक दारावर त्याने तिला बाई म्हणावे?
वेश्येच्या त्या पोराने कधी आईला आई म्हणावे ?
चुरगळलेल्या पाकळ्यांना जरी मोहक तो सुगंध येतो
हाती घेत अश्या फुलाला कधी कुणी मग जाई म्हणावे?
नाही केली फसवा फसवी सरळ जमला व्यवहार आहे
आरोप करत का लोकांनी केली दांडगाई म्हणावे?
भाऊबीजेचा सण आल्यावर उगी तिला वाटत होते
सरळ नजरेन पाहत कुणी आज मलाही ताई म्हणावे
जगणे बत्तर असे नशीबी बाप नाही माहीत ज्याला
या जगात त्या पोराने कुणा होऊ उतराई म्हणावे?
प्रतिक्रिया
14 Jul 2020 - 10:10 am | कानडाऊ योगेशु
अफाट लिहिले आहेस मित्रा!
काही कडवी तर एकदम अंगावर आली.
15 Jul 2020 - 1:47 am | वीणा३
:( :(
14 Jul 2020 - 11:05 am | शा वि कु
खूप छान लिहिलिये.
14 Jul 2020 - 4:24 pm | मदनबाण
सुरेख !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh
15 Jul 2020 - 7:50 am | एस
अनेक अशा ताया आणि पोरे डोळ्यांसमोरून तरळून गेले. अप्रतिम गझल.
15 Jul 2020 - 10:53 am | राघव
टोचणारी जुनी सल.
माझ्याच एका कवितेतील काही ओळी सांगाव्याशा वाटल्या या रचनेवरून -
विसंगती जीवनाला पाचवीला पूजलेली..
कुस्करल्या यौवनाचा शाप सदा तिच्याच उरी..
18 Jul 2020 - 3:12 pm | मनोज
धन्यवाद....."शाप सदा तिच्याच उरी" अप्रतिम......
17 Jul 2020 - 5:54 pm | मन्या ऽ
मनाला भिडणारी गझल.. :-(
18 Jul 2020 - 3:14 pm | मनोज
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !