ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच.
कुमार1 यांच्या धाग्यावर गाणी शोधताना हे गाणे ऐकले आणि त्याचे हे विडंबन शब्द झाले मोती -2 वर लिहिले.. तेच येथे पुन्हा देतो...
Youtube -
दिवस तुझे हे फुलायचे
Gaana-
दिवस तुझे हे फुलायचे
----------------------------
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
गाडीत चरत जाणे
वाटेत जिलेबी खाणे
गाडीत चरत जाणे
वाटेत जिलेबी खाणे
वड्यात मन हे गुंतायचे
वड्यात मन हे गुंतायचे
चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे
मोजावी देहाची जाडी
वाटावी मनाची थोडी
मोजावी देहाची जाडी
वाटावी मनाची थोडी
श्वासात दम हे लागायचे
श्वासात दम हे लागायचे
श्वासात दम हे लागायचे
चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे
थरारे लोखंडी दार
सोसेना अंगाचा भार
थरारे लोखंडी दार
सोसेना अंगाचा भार
डोळ्यांनी जखमी करायचे
डोळ्यांनी जखमी करायचे
डोळ्यांनी जखमी करायचे
चाटुनपुसून खावायचे, चाटुनपुसून खावायचे
तुझ्या त्या फोटोच्यापाशी
थांब तू यडे जराशी
तुझ्या त्या फोटोच्यापाशी
थांब तू यडे जराशी
पापण्या मिटून बसायचे
पापण्या मिटून बसायचे
चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
दिवस तुझे हे फुगायचे, चाटुनपुसून खावायचे
-- शब्दमेघ ( 9 June 2020, 10:56 pm)
प्रतिक्रिया
10 Jun 2020 - 3:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:) लिहिते राहा. म्हणून पाहिलं भारी म्हणता आलं. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
10 Jun 2020 - 5:31 pm | प्रचेतस
एक नंबर =))
10 Jun 2020 - 5:56 pm | चांदणे संदीप
बेक्कार! =))
हे वाचून मनाची थोडी वाटल्या गेली आहे. ;)
सं - दी - प
10 Jun 2020 - 6:30 pm | मन्या ऽ
हे वाचून मनाची थोडी वाटल्या गेली आहे. ;) >>> अगदी अगदी! :D
11 Jun 2020 - 11:20 am | रातराणी
:) :) :)
11 Jun 2020 - 12:16 pm | ज्ञानोबाचे पैजार
इडंबन आवडले
पैजारबुवा,
11 Jun 2020 - 12:51 pm | प्राची अश्विनी
:)
17 Jun 2020 - 4:13 pm | कौस्तुभ भोसले
मस्त एकदम
18 Jun 2020 - 2:07 am | वीणा३
हाहा, मजेदार विडंबन :D. आत्ताच कटलेट, छोले-पुरी, गुलाबजाम, कोशिंबीर, चटणी, पुलाव, टोमॅटो सार खाऊन झाला, आईस्क्रीम राहिलंय, खाऊन येते, मग "वाटावी मनाची थोडी" वर विचार करेन ;)
25 Jun 2020 - 1:17 pm | गणेशा
:-)) :-)) :-))
आणि
सर्वांचे आभार..
25 Jun 2020 - 1:31 pm | अत्रुप्त आत्मा